आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I have a offer for you.

आम्हांला निघायची परवानगी द्या.
हिंदीतल्या अनुमतीचं परवानगी.
मराठीत निरोप द्या म्हणतात. एफेम वरच्या आरजे लोकांनी हे सुरू केलं. आम्हांला कार्यक्रम संपवायची अनुमती द्या.

दोन सवतींची जुगलबंदी रंगणार बहुतेक आता. सासू नाराज आहे अरुची. तिला अजून घटस्फोट या शब्दाचा अर्थ कळला नाहीये. अरु तिथेच राहतेय तोपर्यंत कळणारही नाही. अन्या उठला नाही सेल्फी काढायला. अन्या आशुपुढे एवढासा दिसत होता. अप्पाच्या दाताला बेसन लागलं होतं.

प्रोमो मधे पाहिले कि कांचन अरूला स्वयंपाकाबद्दल न विचारता विशाखाला विचारते आणि निघून जाते. अरू लगेच दु:खी होते.
स्वयंपाक हा अरूचा विक पॅाईंट आहे. दरवेळी सासू फुगली कि अरूला जेवणाबद्दल विचारत नाही, तिच्या हातचे खात नाही. मग अरू लगेच गयावया करत बसते.

अशा सासुला उपाशीच ठेवा,कान्चनचे गुडघे दुखतात ना कशाला खायला पाहिके चारिठाव? वजन कमी कर म्हणाव

अरू च्या छोट्या स्वप्नांमधे आई कांचन साठी पाय चेपायला househelp ठेवायची आहे, पण स्वतः च्या आई भावासाठी मोठं घर, निहारचं डॉक्टर बनायच्या स्वप्नांसाठी जागाच नाहीये.

ह्या आणि मुळात बिझनेस क्लासने युरप ला जाईन स्पा मध्ये होल बॉडी ट्रीट मेंट घेइन मग आल्यावर प्रीनप करून आशूला त्याच्या संपत्ती पासून मुक्ती देइन असे काही हिच्या डोक्यात कोणी घालत नाही.

सुपरगाय निव्वळ

बिझनेस क्लासने युरप ला जाईन स्पा मध्ये होल बॉडी ट्रीट मेंट घेइन मग आल्यावर प्रीनप करून आशूला त्याच्या संपत्ती पासून मुक्ती देइन>>
लोल अमा. Rofl

ही असली दरिद्री स्वप्न आहेत म्हणूनच बहुतेक सगळे तिला घरात बसायला सांगतात. ही असली स्वप्न संजनाला पडतात पण आशुतोष अरु दरिद्री जोडी चपखल आहे.

अरू च्या छोट्या स्वप्नांमधे आई कांचन साठी पाय चेपायला househelp ठेवायची आहे, पण स्वतः च्या आई भावासाठी मोठं घर, निहारचं डॉक्टर बनायच्या स्वप्नांसाठी जागाच नाहीये. >>> धन्य ती अरु.

अरुंधतीने सुलेखाताईंना लग्नपत्रिका देण्याचा प्रसंग छान रंगवला होता. अरुंधतीला दाटून येणं, कुंकू लावू का म्हणून न बोलता विचारणे, त्यांनी होकार देणं, हे सगळं अपेक्षित होतं. पण चांगलं दाखवलं. पण मग वाहावत गेले आणि अरुंधतीला रडू फुटलं.

केळकरांकडून गिफ्ट्स जरा जास्तच दिल्या गेल्या.

Yes. One a widow and another a divorcee. Applying kumkum. Such an emotional act.

काल घरचे केळवण, आज ही तेच आज आहेर . संजना मध्ये मध्ये खव ट पणा. आता बॉइज व गर्ल्स बॅचलर व बॅचलरेट पार्टी मेंदी हळद संगीत होपफुली लग्न. पण जर इतके इशूज आहेत तर आधी रजिस्टर लग्न करून घेउन मग हे सर्व केले असते तर बरे झाले अस्ते हे काही कोणा शहाणयच्या डोक्यात येत नाही. वर्श अखेरीपरेन्त हेच लग्नाचे गुर्‍हाळ चालू राहील

https://omny.fm/shows/sakalchya-batmya/2a072f3b-75fb-4ad5-8a52-ae0100f3fd40

सकाळला मधुराणी गोखले प्रभुलकरने दिलेली मुलाखत.

मधल्या काळातल्या मालिका रिग्रेसिव्ह, पॅट्रिआर्कीचं ग्लोरिफिकेशन करणाऱ्या होत्या म्हणून मी त्या केल्या नाहीत.

कपाळावर हात.

पुढे पण असेच तारे आहेत.

सन्जनाचा सुर्य अचानक कुठे उगवला? अभिच्या लग्नाचे लाडू वळतेय, केळवणाचे जेवण एन्जॉय करतेय, गेम्समध्ये भाग घेतेय. एरवी तिला हा आरडाओरडा , धान्गडधिन्गा खपत नसतो.

तिला हा आरडाओरडा , धान्गडधिन्गा खपत नसतो>>>> एरवी मॅड फॅमिली,मॅड फॅमिली म्हणून बोंबा मारत असते.
केदार, शेखर असते तर अजून मजा.

पूर्ण टाइम पास एपिसोड चालू आहेत काही पिसे काढायला स्कोप नाही आहे. मोठी फ्यामिली गेम खेळ त आहे. प्लस फ्रेंड्स.
आजी अप्पा रोमान्स
अन्या संजना धुमसत स्पर्धा
इशा गौरी मुली मुली
देविका इरिटेटिन्ग ओवर अ‍ॅक्टिन्ग
अरू सुपर समजुतदार
विशाखा समजुतदार
यश इशा भांडण
अभी अनघा स्लाइट कोमट रोमान्स
नित्या खादाड
आशुतोस् लाइन मारीन्ग

आणि एवढं ती आजी म्हणत होती मला सगळयांना बोलवायचं आहे पण एक नातेवाईक आधीपासून आलेला दाखवला नाहीये. फक्त घरचीच माणस आहेत लग्नघरात. त्या केदारला पण शेंडी लावलीय.
आलाय कोण तर आशु नित्या आणि देविका जी उगबलीच आहेत क्षितीजावर दोन महिन्यांपूर्वी.

बाकी काही ही टाईम पास चालू आहे. संवाद तरी लिहून देतायत की सांगतायत त्यांनाच तुम्ही च बोला काय हवं ते कोण जाणे.

अंगणात एक मोठा दगड अचानक आणून ठेवलाय का आधीपासून होता ?

अगदीच बालिशपणा चालू आहे. विशाखाची मुलगी पण कधी दिसत नाही. केदार दुसर्या मालिकेत बिझि झालेला दिसतोय.

अंगणात एक मोठा दगड अचानक आणून ठेवलाय का आधीपासून होता ?>>> त्यावर कोणालातरी आपटवायचा बेत असू शकतो. म्हणजे आजी अनघाचा पायगुण वाईट ठरवून थयथयाट करायला मोकळी.

Pages