मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.
1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.
२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.
३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.
(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)
४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.
५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.
६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.
७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.
८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...
९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.
१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही
-------------------------------------------------
अवांतर निरीक्षणे
अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...
क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?
ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?
असो,
मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही
धन्यवाद,
ऋन्मेष
(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)
खरंतर एवढं डोक्यावर उचलून
खरंतर एवढं डोक्यावर उचलून घेण्यासारखं ह्या शिनेमात आहे काय हेच कळले नाही. >>> + १२३४५६७८९
>>>>>
बहुधा दिपिकाचा पिक्चर पाडायला काही लोकांनी याला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. लाटेत सगळे फसत गेले. बघून आल्यावरही सगळे लोकं सांगत नाहीत आपण फसलो. आणि तसेच आपल्या मराठी मातीतील योद्ध्याच्या पिक्चरला प्रामणिकपणे नावे ठेवायलाही काही लोकं कचरतात. पण येस्स फारच ओव्हरहाईप झालाय हे नक्की.
तानाजी बागितला नाही. मला
तानाजी बागितला नाही. मला बघायचा नव्हता म्हणून नवरा एकट्याने बघुन आला. त्याने ठीक आहे सिनेमा असं सांगितलं.
इथली चर्चा वाचुन संमिश्र प्रतीचा वाटतोय.
खाण्याची चरचा वाचुन आश्चर्य वाटलं. सिनेमा बघताना काही तरी खावंच लागतं का? म्हणजे अगदी २ अडीच तास असतो वेळ त्यातही हेल्दी ऑपशन वैगेरे का शोधावेत? अनहेल्डी किंवा महग वाटत असेल तर सरळ काहीही घेउ खाऊ नये.
नवरा आणि मी गेलो असु तर आम्ही काहीही खात नाही फक्त सिनेमा बघुन येतो. घरी येउन काय ते जेवण, नाश्ता, चहा कॉफी.
मुलं सोबत असतील तर खाऊ घ्यावा लागतो. पॉप्कॉर्न सॉफ्टी वैगेरे.
सिनेमा बघताना काही तरी खावंच
सिनेमा बघताना काही तरी खावंच लागतं का?>> शास्त्र असतंय ते.
सिनेमा बघताना काही तरी खावंच
सिनेमा बघताना काही तरी खावंच लागतं का?
तो थोडा फार प्रतिष्ठेचा पण प्रश्न असतो बघा.
मैत्रीण असेल तर सोडून जाण्याची भीती असते बघा.
बायको असेल तर टोमणे ऐकवण्याची भीती असते बघा.
मित्र असतील तर अशी काही भीती नसती खाण्याच्या पदार्थ च्या जागी शिव्या खाण्याची तयारी असली म्हणजे झाले..
हा सर्व असा प्रकार असतो बघा
आधीच पोटभर खाऊन गेलो असलो
आधीच पोटभर खाऊन गेलो असलो तरीही आजूबाजूच्या लोकांना खातांना बघून / ऐकून, व खासकरुन पदार्थांचे गंध यामुळे मन थोडे विचलित होते. हा माझा अनुभव.
जेव्हा सिनेमाला जातो तेव्हा
जेव्हा सिनेमाला जातो तेव्हा मी घरुन १०रुपये वालं पॉप कॉर्न गरम-गरम तडतडवुन कंटेनर मधे भरुन घेऊन जातो.. सिनेमा पहात पहात खायचं.. कशाला हवेत ते थेटरातले महागडे पॉप्कोर्न..???
सिनेमा बघताना काही तरी खावंच
सिनेमा बघताना काही तरी खावंच लागतं का?
>>>>
.तसे तर सिनेमा न बघताही आपण जगू शकतोच. पण बघायला मजा येते म्हणून बघतो ना. तसेच हे.. जसे चौपाटीवर भेल खायला मजा येते तसे सिनेमागृहात लाह्या खायला मजा येते. ईथेही एखादा धागा पेटला की आपण म्हणतोच ना, आता पॉपकॉर्न घेऊन बसूया...
तसं नव्हे.
तसं नव्हे.
केवढ्याला पडला सिनेमा 

मी पण खायचे आताही कधीमधी खाते. पण खायलाच पाहिजे असं नसतं. पण काहीच्या काही महाग आहे, अनहेल्डी आहे तरी उगीच खायचं म्हणून खायचं असतं की स्टेट्स वैगेरे काही भाग असतो.
एकतर पैसे घालवा वर महाग आहे अनहेल्दी आहे अशी नावं पण ठेवा आणि वर बोअर पिच्चर आवडलेला नसेल तरी छान छान म्हणा. इथे लिहा.
८० ला दोन बारकुसे समोसे आणि १८० ला एक पॉप्कॉर्न मला तरी महाग वाटतात.
थेही एखादा धागा पेटला की आपण
थेही एखादा धागा पेटला की आपण म्हणतोच ना, आता पॉपकॉर्न घेऊन बसूया...>>>>> हो पण फुकटचे. १८०-२५० रुपये मोजायला जास्त वाटतात.
साधनाताई, (तुमच्या प्रतिसाद
साधनाताई, (तुमच्या प्रतिसाद आणि लिखाणावरून तुम्ही माझ्यापेक्षा मोठया असाव्यात म्हणून ताई म्हणतीय )तुम्ही पुण्याच्या लाल महालातील मावळ्यांचा प्रतिकात्म पुतळा पहिला असेल किंवा सिंहगडावरचा तानाजी मालुसऱ्यांचा पुतळा पहिला असेल तर मी तसं का लिहिलं आहे ते कळेल.
मी हे फक्त मावळ्याबद्दल लिहिलंय शिवाजी महाराजांबद्दल नव्हे.
बऱ्याच मराठी मालिकांमध्येही मावळ्यांचे साधारण तसेच(धिप्पाड आणि रांगडे ) कॅरॅक्टर उभे केलेले दिसते.
अर्थात हे माझे निरीक्षण आहे. तुम्हाला पटलेच पाहिजे असे नाही.
१८० किंवा २०० रुपये ही काही
१८० किंवा २०० रुपये ही काही मोठी रक्कम नाही पण ३०/२५ रुपयाची वस्तू २०० रुपये मध्ये असल्या मूळे एक आपण फसल्याची भावना निर्माण होते.
त्या मुळे थिटर मध्ये खाद्य पदार्थ न घेणे उत्तम
१८० किंवा २०० रुपये ही काही
१८० किंवा २०० रुपये ही काही मोठी रक्कम नाही पण ३०/२५ रुपयाची वस्तू २०० रुपये मध्ये असल्या मूळे एक आपण फसल्याची भावना निर्माण होते.
त्या मुळे थिटर मध्ये खाद्य पदार्थ न घेणे उत्तम
सिनेमा बघताना काही तरी खावंच
सिनेमा बघताना काही तरी खावंच लागतं का? >>
सिनेमा बघताना, रेल्वे स्टेशनवर, ३ तासाच्याच ट्रेन प्रवासात, विमानतळावर, एक दोन तासाच्याच विमान प्रवासात - काही खावच लागता का हा एकदम सात्विक, मार्मिक, तार्किक आणि योग्य प्रश्न आहे.
पण आम्हाला - सारख्या फिरतीवर असणाऱ्या लोकांना -असं खावं लागतं नेहमीच. धावत पळत ही ट्रेन पकडा, ती फ्लाईट पकडा आणि त्यातच स्टेशन / विमानतळावर खावे लागते. कधी ट्रेन / फ्लाईट खूप डिलेड असेल तर आराम करण्यास, थोडं खाऊन छोटी झोप काढण्यास जवळपासच्या थिएटरचा छान उपयोग होतो. शे दीडशे रुपयात एसी मध्ये बसण्यास अडीच तासांकर्रता हक्काची आरामदायी खुर्ची मिळते.
त्यात अशा ठिकाणी हेल्दी चॉईस नसेल तर कधी न खाऊन उपासमार तर कधी खाऊन कुचंबणा होते. या करता मी वेगळे उपाय करतो ही गोष्ट वेगळी, पण अशा गर्दीच्या ठिकाणी हेल्दी फूड चॉईसेस मिळाले तर मस्तच, आणि ते ठेवणे विक्रेत्यांनाही आर्थिक दृष्टीने शक्य असावे असे वाटते.
उठांनी काल तान्हाजी पाहीला.
उठांनी काल तान्हाजी पाहीला. आता युपी प्रमाणे इथे पण टॅक्स फ्री करतील का अशी बातम्यात चर्चा होती.
मावळे शरिरयष्टीने धिप्पाड
मावळे शरिरयष्टीने धिप्पाड होते हे विधान सरसकटपणे स्वीकारता येणार नाही. १८ पगड़ जाती प्रमाणे रामोशी भिल्ल वगैरे सुद्धा महाराजांच्या सैन्यात होतेच आणि ह्या मंडळीची शरीरयष्टि काटक कणखर म्हणता येईल पण क्वचित एखादा सरदार धिप्पाड म्हणावा ऐसा असू शकतो. मात्र बहुतांश मावळे हे किरकोळ शरीर असलेलेच असणार. ह्यांच्या संदर्भात दोन गोष्टी वाचलेल्या आठवतात -
१) मोगल सैन्य अगड़बंब देहाचे (हाइट आणि वेट) त्यामुळे समोरासमोर लढताना त्यांची ताकद जास्त असायची आणि अर्थातच त्यांच्या तलवारीचा घाव झेलून तितक्या ताकदीने प्रतिहल्ला करणे आपल्या सैन्याला सहजशक्य नाही ह्याचा प्रैक्टिकल विचार करून लांब काठी असलेले भाला हे मुख्य शस्त्र मावळ्याकड़े असायचे. (रोमन सैन्य हात घाईच्या लढाईत तरबेज त्यामुळे त्यांच्या तलवारी आणि भाले आखुड दांडयाचे असावे. तसेच जापनीज सामुराई सुद्धा प्रचण्ड ताकदीचे आणि लांब लचक तलवार बाळगणारे असले तरी मुख्य तलवारीसोबत एक हात भर लांबीची छोटी तलवार हातघाईच्या युद्धास / कमी जागेत चपळाईने फिरवण्यास सुलभ म्हणून कायम असायची) मात्र आपल्या ऊँचीपेक्षा जास्त असलेला मोगल सैनिक सुरक्षित अंतरावरुन टीपू शकणारे आणि पहिल्या घावानंतर तलवारीच्या सहाय्याने त्याची शकले करणारे मावळे असावेत हे नक्की वाटते.
२) सैन्य हे पोटावर चालते आणि मोगल सैन्याची रसद ही विविध आहारयुक्त (मुख्यत्वे मांस, सुका मेवा वगैरे) असणे त्यांच्या मिलिट्री बजेट नुसार सहज शक्य असले तरी आपले गरीब मावळे स्वराज्यासाठी अर्धपोटीसुद्धा लढायला तयार असत. आपली गोरिल्ला वॉर फेयर शत्रुला नामोहरम करण्यासोबत त्यांची रसद लुटायलासुद्धा खुपदा वापरली जाई. रसद तोडणे हे नासधुस करत नष्ट करणे ह्या पर्यायपेक्षा लूटून आपल्या सैन्याची गरज भागवेल असे पहाणे जेव्हा आवश्यक बनते तेव्हा आपण मावळ्यांच्या देहयष्टीला एवरेज वेट असलेली काटक प्रकृति म्हणूनच विचारात घेऊ शकतो असे वाटते.
मावळे काटक होते .
मावळे काटक होते .
हे खरे आहे पण आड दांड होते हे नाही सांगता येणार
.
चीन च्या प्रवाशी (नाव नाही आठवत) नी वर्णन केल्या प्रमाणे मावळे (मराठी लोक)
आड दांड नव्हती उंची नी सुद्धा कमी होती पण काटक होती.
पठाण हे आड दांड च होते .
काटक पना म्हणजे.
जिम करून सर्व पॅक मिळवलेला व्यक्ती जास्त धावू शकत नाही.
जास्त वेळ कष्टाचे काम करू शकत नाही
पण काटक व्यक्ती धावू शकतो ,जास्त वेळ कष्टाचे काम करू शकतो.
उदाहरण शेतकरी.
जेवढा वेळ शेतात कष्टाचे काम करू शकतो,कडे कपारी मध्ये चढू शकतो.
बराच वेळ एकच स्थिती मध्ये बसू शकतो.
तसा फक्त शरीर नी आड दांड असलेला व्यक्ती करू शकत नाही.
हा फरक आहे.
सह्याद्रीच्या कुशीत लहानाचे
सह्याद्रीच्या कुशीत लहानाचे मोठे झालेले बरेचसे मावळे, किरकोळ शरीरयष्टीचे पण काटक असणार.
काजू तर कोकणात पिकतात, तरी
काजू तर कोकणात पिकतात, तरी मावळ्यांना मिळत नव्हते अन दिल्लीला मात्र मिळत होते.
हो ना.. मावळे काटकच असणार. ते
हो ना.. मावळे काटकच असणार. लेचेपेचे असायला ते थोडीच वरण(गोडं)+भात+तुप+लिंबु खात असतील..?
Black cat
Black cat
वेडा आहेस का तु.
प्रत्येक प्रदेशाच्या हवामान नुसार शरीर आणि त्याची गुणवत्ता अवलंबून असते.
निग्रो लोक ही शक्ती
शालीच असतात .
कमी दर्जाचे आहार घेवून सुद्धा.
तसे मराठे (मराठी लोक) ही काटक होती त्या वेळी.
त्या मुळे तर अवाढव्य अफजल खान ला किरकोळ शरीर वृष्टी असणाऱ्या महाराजांनी ठार केले.
उदयभान हा खूप बलाढ्य विर होता पण तानाजी नी त्याला असमान दाखवलं.
आता सुद्धा काश्मीर सारख्या दुर्गम भागात पाकिस्तानी पठाण आपल्या सैन्याला भारी पडतात.
पण तिथे नेपाळी आणि मराठी सैन्य मुकाबला करू शकत.
लेचेपेचे असायला ते थोडीच वरण
लेचेपेचे असायला ते थोडीच वरण(गोडं)+भात+तुप+लिंबु खात असतील..?>>>>> डिजे, बाजीराव ( दुसरा बाजीराव , जो अटकेपार झेंडा रोवुन आला) आणी त्यांचे पिताश्री बाळाजी विश्वनाथ ( ज्यांनी मुघलांच्या कैदेतुन महाराणी येसूबाईंना सोडवुन आणले ) ते वरणभात -तुप-लिंबुच खात होते तरी त्यांचा पराक्रम वादातीत आहे.
आता सुद्धा काश्मीर सारख्या
आता सुद्धा काश्मीर सारख्या दुर्गम भागात पाकिस्तानी पठाण आपल्या सैन्याला भारी पडतात.
पण तिथे नेपाळी आणि मराठी सैन्य मुकाबला करू शकत.>>>>>+११ काटकपणा आणी अचाट मनोधैर्य ही ती ताकद.
Ohh my god... माझ्या त्या एका
Ohh my god... माझ्या त्या एका वाक्यवर एवढे प्रतिसाद बघून मन भरून आले
तर लोकहो, मी जसं वर लिहिलं की माझ्या काही निरीक्षणवरुन मी ते मत बनवले होते. त्यांचा आहारविहार किंवा भौगोलिक परस्थिती एवढा खोलवर विचार केला नव्हता.
तुम्ही सगळे त्या प्रमाणे ते काटक शरीरयष्टीचेही असू शकतील.
तुम्ही सगळे त्या प्रमाणे ते
तुम्ही सगळे त्या प्रमाणे ते काटक शरीरयष्टीचेही असू शकतील.>>
मी होतो काटक पण आता माझे पोट थोडेसे सुटलेले आहे.
तुम्ही सगळे त्या प्रमाणे ते
तुम्ही सगळे त्या प्रमाणे ते काटक शरीरयष्टीचेही असू शकतील.
>> त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे पुतळे पाहावे लागतील
कालच तान्हाजी बघितला. अतिशय
कालच तान्हाजी बघितला. अतिशय overhyped वाटला. ना कुठे अंगावर रोमांच उभे राहिले ना कुठे डोळ्यात पाणी आलं. उदयभान तर अगदी caricature वाटतो. राजपूत लोक बहुतेक मांसाहार करत नसत किंवा केला तर grill केलेली मगर नक्कीच खात नसावेत
उदयभान कोणत्याही अंगाने राजपूत वाटत नाही. त्या कमलशी बोलताना थोडी राजस्थानी बोली दाखवली आहे पण ती तेवढ्यापुरतीच. VFX चा अतिरेक नको वाटतो. गड किल्ले बुरुज तर अगदीच खोटे वाटतात. तान्हाजीच्या शौर्याने आणि आत्मसमर्पणाने खरं तर भारावून जायला हवं पण चित्रपटात ते इतकं बालीश दाखवलं आहे. जी नागीण तोफ ढकलायला हत्ती आणि अनेक लोक लागले त्या तोफेला मनगट कापलेला तान्हाजी उदयभानला बांधतो आणि केवळ एका धक्क्याने त्याचा तोफेसकट कडेलोट करतो. आणि तेव्हा उदयभानचा प्रतिकार तर काहीच दिसत नाही
आणि एका पो़झिशनमधेच सकाळपर्यंत भगवा धरून बसतो आणि बरोब्बर महाराज आले की प्राण सोडतो
अजय देवगण अथपासून इतिपर्यंत सिंघमच वाटतो. तो कुबडी फेकायचा प्रसंग म्हणजे काहीही अगदी 


जमेच्या एक दोन गोष्टी म्हणजे शरद केळकरने खूप छान काम केलं आहे. ती राजस्थानी मुलगीही आवडली. काजोलचा कपडेपट आणि दागिने मराठमोळे वाटतात. भन्साली स्टाईल जर्दोसी, कुंदनचे दागिने नाहीत ते आवडलं. देवगणचा कपडेपटही बराचसा जमला आहे पण ते लेदरचे बूट खटकतात
बाकी इतिहास वगैरे या चित्रपटात शोधायला जाऊ नये हे खरं आहे
एका पो़झिशनमधेच सकाळपर्यंत
एका पो़झिशनमधेच सकाळपर्यंत भगवा धरून बसतो आणि बरोब्बर महाराज आले की प्राण सोडतो
>>>>>
ओह तो सकाळपर्यंत बसला असतो तसा... मला वाटलेले की महाराज लगेचच येताना दाखवले जसे क्यायमॅक्सला पुलिस एंट्री मारतात
धिप्पाड विरुद्ध काटकपणा
धिप्पाड विरुद्ध काटकपणा म्हणाल तर कोकणातली लोकं
बहुधा काटक असतात. उर्वरीत महाराष्ट्राबद्दल नो कॉमेण्टस. कारण कल्पना नाही. पण मावळे मुख्यत्वे महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले होते? सांगली सातारा कोल्हापूर? तिथे बहुधा रांगडे व्यक्तीमत्व असते..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जास्त करून आत्ताचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागातील सरदार आणि सैनिक होते (इतर भागातीलसुद्धा होतेच)...परंतु पुणे परगण्याच्या मावळ भागातील लोक जास्त होते आणि मावळातील म्हणून मावळे असे झाले आहे...महाराजांनी स्वराज्याची सुरुवात करताना पुणे आणि १२ मावळातून सहकारी गोळाकरून तोरणा जिंकून केली...
१२ मावळ
अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, हिरडस मावळ, गुन्जन मावळ खोरे, पौड मावळ खोरे, मुठे खोरे, कानद मावळ खोरे, मुसे मावळ खोरे, वेळवंड मावळ खोरे, रोहिड मावळ खोरे, कोरबारसे मावळ
ओके.धन्यवाद मित्रा
ओके.धन्यवाद मित्रा
Pages