तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि असल्या नररत्नानी स्वतःच्या घरच्या स्त्रियांना पूरेपूर छळलं होतं हेही विसरतात Wink

डिजे नंतर लिहीते. आता घाईत आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला या निमित्ताने झोडायचा उद्देश अजीबात नाही. मी तुमचे उदाहरण दिले, कारण तुम्ही किंवा इतर ज्या समजूतीत आहेत त्याची दुसरी बाजू नक्कीच आहे.

आताच पाहिला.आवडला.
व्हिडीओ गेम चा भास होतो खरा बरेचदा.खास करून टेम्पल रन आणि प्रिन्स ऑफ पर्शिया.
काजोल पण छान दिसलीय.तिची पहिल्या गाण्यात निळी, सोनेरी बुट्टे वाली आणि विटकरी किनार वाली नऊवारी जबरदस्त आहे.वॉर्डरोब कोणत्या ब्रँड ने पाहिलाय तिचा?शिवाय तिचे ब्लाउज पाठभर आहेत, वेलवेट, जरदोसी भरतकाम आणि स्ट्रेच लायक्रा चे नाहीत हा एकदम प्लस पॉईंट आहे.लहान तानाजी, आणि लहान रायबा दोन्ही मुलं गोड आहेत.तानाजीचा वृद्ध नातेवाईक पण छान अभिनेता आहे.(इतिहासातलं नाव विसरले).औरंगजेब म्हणजे रॉक ऑन मध्ये कँसर ने मेलेला लांब केशी मित्र आहे हे वाचून गंमत वाटली.
शरद केळकर मस्त दिसतो.जितका रोल आहे त्यात चांगले काम केलेय.देवदत्त नागे इम्प्रेसिव्ह.याला चांगल्या मोठ्या भूमिका मिळायला हव्यात.राजस्थानी विधवा सुंदर दिसते.
सैफ अली खान ला इतका भडक्क आय लायनर मारायची गरज नव्हती.त्याने जास्त यक्क सायकोपणा न करता चांगले काम केलंय.हसतो तेव्हा क्रूर सरदार न वाटता दिल चाहता है मधला समीरच वाटतो अजून.शिवाय शेवटी काहीतरी अल्ला शब्द असलेल्या गाण्यात का नाचतो राजपूत हे कळले नाही.औरंगजेब ला तशी खबर मिळून इम्प्रेस करायला असेल.
देवगण स्टंट एक्स्पर्ट असल्याने एकंदर रोल ला शोभला आहे.त्याच्या डोळ्यातही मध्ये मध्ये हम दिल दे चुके सनम चा वनराज डोकावतो.
अजिंक्य देव चा रोल पण आवडला.
थिएटर मध्ये फार शिट्ट्या टाळ्या नव्हत्या, पण सर्व शो फुल आहेत.म्हणजे आवडला असावा पिसौ पब्लिक ला.आम्हाला लौंज वाला शेवटचा रो पाहिजेच असल्याने वेगवेगळे बसून पिक्चर पाहिला ☺️☺️ लेग रूम असली की मजा येते.
पिक्चर एकदा नक्की पहावा.

वरण्+भात्+तुप अशा कमी दर्जाची प्रथिने असणार्‍या आहारामुळे काटकपणा ऐवजी मांदं चढलेलं असणं अशा अर्थाने लिहिलेल्या वाक्याला>>>>> हे तुम्हीच लिहिल होत ना डिजे? वरण भात हा तामसी पदार्थ नाही. शरीराला थण्ड करणारा , सहज पचणारा पदार्थ आहे. वरण भात खाणारे लेचेपेचे असतात हे चुकीच विधान आहे. वरण भात खाऊनही आपले मावळे शुरासारखे अवाढव्य शत्रुशी लढले ही कौतुकाची बाब आहे. शेवटी लढण हे एखादयाच्या/ एखादीच्या ताकदीवर, जातीवर किव्वा खाण्यावर अवलम्बून नसत. त्याला लागते ती जिगर.

अहो तुम्ही अन् त्या सुलू_८२ ताई दोघीही माबोच्या जुन्या जाणत्या आणि समजूतदार आयडीज. >>>>>>> धन्स डिजे. मी कुणाच्या जाळयात अडकलेली नाहीये. वरती लिहिलेली मते हि माझी स्वतःची आहेत.

काजोल पण छान दिसलीय.तिची पहिल्या गाण्यात निळी, सोनेरी बुट्टे वाली आणि विटकरी किनार वाली नऊवारी जबरदस्त आहे.वॉर्डरोब कोणत्या ब्रँड ने पाहिलाय तिचा >>>>>>>> सेटवर तिला नऊवारी नेसवायला ७५ वर्षाच्या आजीबाई यायच्या अस कुठेतरी ऐकलेल.

औरंगजेब म्हणजे रॉक ऑन मध्ये कँसर ने मेलेला लांब केशी मित्र आहे हे वाचून गंमत वाटली. >>>>>>> कोण? तो पूरब कोहली? Uhoh

वरण्+भात्+तुप अशा कमी दर्जाची प्रथिने असणार्‍या आहारामुळे काटकपणा ऐवजी मांदं चढलेलं असणं
>> हे नक्की कुठे लिहिले आहे.. कोणत्या धाग्यावर..

वरण भात हा तामसी पदार्थ नाही. शरीराला थण्ड करणारा , सहज पचणारा पदार्थ आहे. वरण भात खाणारे लेचेपेचे असतात हे चुकीच विधान आहे. >> चुकीचं असेल तर कॅलरीज, प्रथिने, फायबर यांची सांगड घालून सिद्ध करून दाखवा.

वरण भात खाऊनही आपले मावळे शुरासारखे अवाढव्य शत्रुशी लढले ही कौतुकाची बाब आहे. >> खरे की काय? वरणभात खाऊन शत्रूशी लढले हे कशाच्या आधारावर ठामपणे सांगतात? तन्हाजिंच्या काळी असा वरणभातचा आहार मावळे घेत असते तर ते कुठल्यातरी जुन्या सिनेमात, मालिकेत नाही निदान महाराष्ट्रभूषण इतिहासकारांनी तरी लिहून ठेवले असते.

शेवटी लढण हे एखादयाच्या/ एखादीच्या ताकदीवर, जातीवर किव्वा खाण्यावर अवलम्बून नसत. त्याला लागते ती जिगर.>> ती जिगर आपल्या रक्तात असावी लागते, आपल्या समोरील अदर्शात असावी लागते, आपल्या संस्कारात आणि जडणघडणीत असावी लागते.. त्यासोबत रोजचा आहार तसेच मेहनतीवर अवलंबून असते. बगळ्याचा आदर्श घेऊन त्याच्यासारखाच आहार, आचार, विचार, संस्कार, मूल्ये ठेऊन गरुडझेप घेता येते का हो सुलू_८२ ताई..?

फक्त वरचे दोन तीन वरण भातावरचे प्रतिसाद वाचून डोक्यात आले की पूर्ण शाकाहारी हत्ती पूर्ण मांसाहारी सिंहाला भारी पडतो.

शाकाहारी हत्ती पूर्ण मांसाहारी सिंहाला भारी पडतो.
>>>>
वजनाने भारी असेल
मस्कल पवार सिंहाचे जास्त असावेत.
म्हणून जंगलका राजा कौन.. तो शेरू टायगर ..

नक्की कल्पना नाही. हा एक अंदाज.. प्राणीमित्र ऊजेड टाकतील.

>>शाकाहारी हत्ती पूर्ण मांसाहारी सिंहाला भारी पडतो.<<
तुलना चूकिची आहे. दोन सिंहात, एक पुर्ण शाकाहारी, आणि दुसरा मिश्रहारी यांच्यात कोण कोणाला भारी पडेल हे बघणं रोचक ठरेल...

बाकि, डिजे यांचा मुद्दा ह्ळुहळु कळायला लागला आहे. इथे काहिजण विनाकारण कुठे खुट्ट झालं कि "इस्लाम खतरेमें है" च्या मोडमध्ये जातात. विषय काहिहि असो... Wink

दोन सिंहात, एक पुर्ण शाकाहारी, आणि दुसरा मिश्रहारी यांच्यात कोण कोणाला भारी पडेल हे बघणं रोचक ठरेल...
>>>>

दोन हत्ती घेऊन हाच प्रयोग केला तर?

मला वाटते मिश्राहारी जनावरांवर हा प्रयोग करावा

चुकीचं असेल तर कॅलरीज, प्रथिने, फायबर यांची सांगड घालून सिद्ध करून दाखवा. >>>>>>>> हेमावैम

खरे की काय? वरणभात खाऊन शत्रूशी लढले हे कशाच्या आधारावर ठामपणे सांगतात? तन्हाजिंच्या काळी असा वरणभातचा आहार मावळे घेत असते तर ते कुठल्यातरी जुन्या सिनेमात, मालिकेत नाही निदान महाराष्ट्रभूषण इतिहासकारांनी तरी लिहून ठेवले असते. >>>>>>>>> हे मलाही माहित नाही. वरती अस कुणीतरी लिहिल होत म्हणून तस वाटल मला.

ती जिगर आपल्या रक्तात असावी लागते, आपल्या समोरील अदर्शात असावी लागते, आपल्या संस्कारात आणि जडणघडणीत असावी लागते.. त्यासोबत रोजचा आहार तसेच मेहनतीवर अवलंबून असते. >>>>>>>>> +++++++११११११११

बगळ्याचा आदर्श घेऊन त्याच्यासारखाच आहार, आचार, विचार, संस्कार, मूल्ये ठेऊन गरुडझेप घेता येते का हो सुलू_८२ ताई..? >>>>>>> नाही पण बगळयाचे चान्गले गुण घेता येतात की.

फक्त वरचे दोन तीन वरण भातावरचे प्रतिसाद वाचून डोक्यात आले की पूर्ण शाकाहारी हत्ती पूर्ण मांसाहारी सिंहाला भारी पडतो. >>>>>>> का नाही भारी पडू शकत? इट डिपेण्डस ऑन फिझिकल ऑर ब्रेन पॉवर.

बादवे मी मिश्राहारी आहे.

वरचे प्रतिसाद वाचून मी प्राणिसन्ग्रहालयात आले की काय वाटल.

ह्म्म... बघा सुलु_८२ तै, आपण तान्हाजी चित्रपटाबद्दल चर्चा करत होतो. आपल्या ना ध्यानी ना मनी पण चर्चा आपल्या आपल्या परिने सुरु होतीच. अचानक त्या २ भगिनी निवेदिता अवतरल्या (अस्मानी आणि मिनल हरिहरण) काय आणि चर्चेचा रोख कुठल्या कुठे वाहत गेला काय. त्यानंतर त्या दोघिंनी एकदाही तोंड दाखवले नाही. तुम्ही आणि रश्मी.. वैनी मात्र त्या भगिनींनी काढलेल्या निष्कर्षावरुन अगदी दे ठाय सुटलात.

मला तरी त्या दोघी कुणाचे तरी ड्यु आयडी वाटतात. नाहीतर अशी आग लावुन पसार झाल्या नसत्या. हो ना..?

उगाच काय वरण भात प्रोटिन्सची इतर प्रोटिन्सशी तुलना.
भारतातील मिश्राहारींना भात, वरण, भाकरीचे वावडे होते / आहे का? दिवसातून किती मांसाहार करायचे काही डेटा आहे का? आणि शाकाहारींना दूध दुभते, सुकामेवा इत्यादी व्यर्ज होते आणि फक्त वरण भात खायचे का?

निदान तुलना तरी योग्य रीतीने करा, काय शाळकरी पोरांसारखे हत्ती / वाघ / सिंहात हीरो कोणच्या गप्पा करताय?

आजच्या घडीला ए.सी. मधे बसुन सुकामेवा, दुध-दुभते, वरण्+भात्+तुप बोलणं एकवेळ समजु शकतो आपण पण विषयापुरता विचार केला तर तन्हाजींच्या सोबत असणार्‍या मावळ्यांना ही असली थेरं करायला वेळ मिळाला असेल का..? आणि ते शक्य तरी असेल का..?? सर्वात जलद आणि शक्तीवर्धक आहार घेतला जात असणार हे ओघाने आलंच.

पास.

क्षत्रिय आहार नॉन व्हेजच असतो. रामायणकाळापासूनचं सत्य आहे.
उगाच काय वरणभातावरून डीजेना टार्गेट करताय? बरोबर बोलतायत ते. वरणभात लहान मुलांचा आहार असतो.

https://www.maayboli.com/node/68349?page=1 >>>>> या धाग्यावर डिजेंचे आणी माझे जाम वाजले होते. Proud आणी या धाग्यावर वरण भाताचा उल्लेख झाला म्हणून मी आधीच लिहीले की प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असतेच.

छत्रपती शिवरायांनंतर राज्य आले ते पेशव्यांचे. आता एवढे माझे वाचन नाही बाकी माबोकरांसारखे. ( माझ्या विधानांना आक्षेप पण घेतला पण जाईल ) जनरली, ब्राह्मण समाज हा उपजिवीकेकरता शारीरीक कष्टांपेक्षा बौद्धीक कष्टांवर जास्त भर देतो. त्यामुळे शेतीसारख्या कष्टाला इतर समाज आणी त्यातुन मराठा समाज जास्त भर देतो, कारण त्यांची शारीरीक आणी मानसीक ताकद पण जास्त आहे. मराठे किती साहसी, निडर आणी निर्भय आहे हे शिवाजी महाराजांच्या काळापासुन दिसले. त्यामुळे वरण-भात-तुप हा ब्राह्मणी आहार तर भाकरी+ पोळी+ भाजी+कांदा+ नॉन्व्हेज हा इतर लोकांचा आहार यातुन ही तुलना झाली. पेशवाई म्हणली की लोकांना पेशव्यांच्या जेवणावळी आठवतात पण त्यांचे शौर्य नाही. पेशवाई आणी पंत हा समज शरद पवारांनी तयार केला, त्यातुन मागे त्या जेम्स लेन नावाच्या ब्रिटीश लेखकाने महाराजांच्या विरुद्ध काहीतरी विकृत असे पुस्तक लिहीले आणी ते भांडारकर मध्ये ठेवले गेले. त्यातुन भडकुन ब्रिगेडींनी भांडारकरची जी नासधुस केली तिथुन पुढे ब्रिगेडींच्या मनात ब्राह्मणांविरुद्ध क्षोभ उसळला. मग दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु नव्हेतच असे म्हणून त्यांच्या पुतळ्याची शोभा केली. मग राम गणेश गडकरींकडे मोर्चा वळवला, तिथे पण वाट लावली. ह्या सगळ्याला कारणीभूत आहेत ते स्वयंघोषीत जाणत्या राजाचे जातियवादी विखारी फुत्कार.

दुर्दैवाने समाजात आता या ब्रिगेंडीमुळे ब्राह्मण व मराठा, मराठा व दलित, ब्राह्मण व दलित असा भेद निर्माण होत चाललाय. तो कोणाही सुजाण नागरीकाच्या लक्षात येत नाहीये. जिथे जिथे छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांचे नाव येईल तिथे आमचा अधिकार असणारच या वृत्तीने दंगे होतायत मग तो तान्हाजी सिनेमा का असेना. वर मी दिलेल्या धाग्यात माझे आणी डिजे यांचे वाजले कारण नाण्याची दुसरी बाजू डिजे पाहु शकले नव्हते. माझे कोणाशी खडाजंगी वाजले तरी मी मनात ते जास्त ठेवत नाही. राजकीय भूमिका वेगळ्या आणी आपले विचार वेगळे.

सनव शी मी सहमत होते कारण त्या काळात दलितांवर जो अन्याय झाला, तो एक राजे , एक सत्ताधारी म्हणून पेशव्यांनी दूर केला असता, प्रबोधन करुन जाती निर्मुलनाकडे वाटचाल केली असती तर आज भिमा कोरेगाव घडले नसते.

तानाजीचा वृद्ध नातेवाईक पण छान अभिनेता आहे.(इतिहासातलं नाव विसरले).>>>>>अनू, ते शेलार मामा. शशांक शेंडेने काम केलय ते. त्या बेशक खानाचे काम करणारा कोण नट आहे?

पिक्चर कालच पाहीला. आवडला. सैफला पाहुन जाम हसू यायचे. शरद केळकर शोभलाय महाराजांच्या रोल मध्ये. अजिंक्य देव आधी ओळखुच नाही आला. त्याची आणी चुलत्याची छोटीशी पण चांगली भूमिका आहे. गाणी बरी आहेत. शेवटी खरच काही प्रसंगात डोळ्यात पाणी आले.

अरे हो, यात त्या उंचीने कमी असलेल्या पात्राचं राहिलं.त्याने पण खूप गोड काम केलंय.वाईट वाटतं त्याला मारतात तेव्हा.
मला सर्वच कास्टिंग आवडलं.प्रत्येक माणूस आपल्या रोल मध्ये फिट वाटला.राजस्थानी सुंदरीला आणि तिच्या भावाला अजून थोडा रोल देता आला असता.आणि ऑफ कोर्स आपल्या मल्हारी खंडोबा ला पण.
शेलार मामा मराठी मध्ये मध्ये बोलतात ते एकदम छान अकसेंट मध्ये बोललंय.

मला तरी त्या दोघी कुणाचे तरी ड्यु आयडी वाटतात. नाहीतर अशी आग लावुन पसार झाल्या नसत्या. हो ना..? >>>>>>>> कदाचित

काय शाळकरी पोरांसारखे हत्ती / वाघ / सिंहात हीरो कोणच्या गप्पा करताय? >>>>>>> Rofl

रश्मीच्या पुर्ण पोस्टीशी सहमत. सो, वरण भात मावळे खात नव्हते हे त्यान्च्यामुळे समजल. माझ इतिहासातल अज्ञान . धन्स रश्मी.

वरणभात लहान मुलांचा आहार असतो. >>>>>>> असहमत

https://en.m.wikipedia.org/wiki/Luke_Kenny
हा म्हणतेय मी.तो अगदी कमी दिसतो. >>>>>> ओहो, हा होता तर.

सूलु, तु जिगर बद्दल म्हणालीस ते पण १०० टक्के खरे आहे. मनच खंबीर असेल तर उंची, शरीरयष्टी इत्यादीचा काही फरक पडत नाही.
सिंघमचा डॉयलॉग आठवला. माझ्या अपेक्षा कमी आहेत म्हणूनच मेरे जिगरमें दम है ! ( अजय त्यात मराठी + हिंदी बोलायचा )

@ रश्मी, पुढची विधाने निव्वळ खोडसाळ, मुद्दाम चिथवण्यासाठी तुम्ही लिहिली आहेत. "तो एक राजे , एक सत्ताधारी म्हणून पेशव्यांनी दूर केला असता", "छत्रपती शिवरायांनंतर राज्य आले ते पेशव्यांचे" खुद्द पेशव्यांनी जर तुमची हि वाक्ये वाचली तर तेसुद्धा संतापले असते तुमच्या या वाक्यांवर. पेशव्यांनी स्वराज्याची सेवा केली, ते सत्ताधारी कधीच नव्हते. नोकरदार होते स्वराज्याचे. कृपया इतिहास कळत नसेल तर त्यावर बोलून इतरांवर चुकीचा इतिहास बिंबवू नका. त्या जेम्स लेन ला खोटा इतिहास सांगणारे सुद्धा असेच.

>>दुर्दैवाने समाजात आता या ब्रिगेंडीमुळे ब्राह्मण व मराठा, मराठा व दलित, ब्राह्मण व दलित असा भेद निर्माण होत चाललाय. << मनुवादापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो मी या एका वाक्यावरून.. मुळात जातीव्यवस्था, चातुर्वर्ण्य निर्माण करणारे कोण? ब्राम्हणांच्या अत्याचाराखाली दबलेल्या, ज्यांना ब्राह्मणांनी शूद्र ठरवले होते, ज्यांच्यावर शिवरायांनी अनेक मोठे मोठे अधिकार, किल्लेदारी, हेरगिरी सारखी जोखमीची कामे सोपवली आणि त्यांनी ती प्राणपणाने सांभाळली सुद्धा त्यांच्याच कमरेला मडके आणि खराटे बांधले पुण्यात पेशव्यांनी. परिणामी, मराठा साम्राज्यविरोधात कोरेगावच्या युद्धात उतरले ते लोक. आजदेखील, मराठा विरुद्ध दलित हा वाद पेटता राहील याची काळजीच अतिरेकी संघटना आर एस एस घेत आहेच.

सुरुवातीला पेशव्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल, त्यांच्या स्वराज्य निष्ठेबद्दल कधीच प्रश्न निर्माण होऊ शकणार नाही, पण म्हणून काही बाबतीत त्यांनी केलेला अन्याय, स्त्रीलंपटपणा, घटकंचुकी, तथाकथित शुद्रांवरील अत्याचार, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करता येऊच शकत नाही.

Pages