तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी क्यारेमल चीज पॉपकॉर्न घेत ले ल. बसायची जागा मिळेपरेन्त एकही महागाचा पॉपकॉर्न पडू नये म्हणून शर्थीने बचाव केला. वरवरचे गोड खाउन टाकले आधीच लोक बघत बघत. मग बसल्यावर परत उभे राहायला लागते तेव्हा ही शेजारच्या सीट वर नीट ठेवला तो पॉपकॉर्नचा ग्लास. हा खुर्चीत जे ड्रिंक सा ठी खोच बनवलेले असते त्यात बसत नाही. बाहेरच्या व्यासाचा आहे ग्लास. आपण स्मॉल द्या म्हटले की काउंटरवाला मुलगा तोंड वाकडे करतो. प्लस एक पाणी बाटली घेतली ती नंतर दोन दिवस पिउन संपवली. पण एकच हे महाग पॉपकॉरन फ्रेश होते.

भवानी आईची आरती मराठीत हवी होती. एक चांगला सेट पीस करता आला असता व तो नवरात्रीत प्रसिद्ध पण झाला असता.

काजोल खरेच कद्धी पण राहुल क्रिशी असे ओरडेल असे वाटत राहते. शी इज जस्ट हरसेल्फ.

अज य व इतरांचे कपडे लै भारी डिझाइन केले आहेत. तो ऑफ व्हाइट ड्रेस, लेदर बेल्ट रेड फेटा लुक मस्त आहे.

महाराज स्क्रीन वर आल्यावर आत काय होते ते व्यक्त करता येत नाही. हलून जायला होते.

मी शाळेत असताना दोन दा सिहगड चढला आहे. तोच तो शिरा पुरी बटाटा भाजी वॉटर बॅग वाला डबा पाठीस मारून. अजूनही वर्गातले म्हातारे झालेले लोक्स वीकांताला जात असतात.

काजोल अजय रोमास बळंच आहे. काहीच गरज नाही.

सैफ मस्त

ती राजस्थानी मुलगी एका फ्रेम मध्ये अगदी पेंटिंग सारखी दिसते व नाजुक सुरेख आहे. पण तिचा कथेशी संबंध नाही.

मुळात प्रश्न ते खाद्यपदार्थ महाग विकतात हा नसून ऐन जेवण स्लॉट ला पिक्चर असला आणि बरोबर पथ्य किंवा ऍसिडिटी वाली माणसं असली तर धड बाहेर खाता येत नाही धड ते पॉपकॉर्न, कॉफी,सामोसे पोटाला झेपवत नाहीत>>> अशा लोक्स नी जेवण स्लॉट ला picture ला जावंच कशाला? Happy

अशा लोक्स नी जेवण स्लॉट ला picture ला जावंच कशाला? Happy>> मला सकाळच्या वेळातच जमते पिक्चर बघायला. सकाळ चा डॉग वॉक उरकून तयार होउन नेहमी सारखे ऑफिसला जातो बंड्या म्हणून बाहेर पडले म्हणजे कुत्रे रडत नाही. व पिक्चर लंच शॉपिन्ग करून तीन च्या सुमारास परत आले की दुपारचा वॉक वेळेत होतो. असे कोणाचे काही कंपल्शन असू शकते. पण जे पदार्थ पचत नाहीत ते कधीच खाउ नये. सिनेमात तरी का? उकडलेले कॉर्न मिळतात किंवा फ्राइज , सँडविच मिळते ते घ्यावे. नाहीतर पिक्चर नंतर फूड कोर्ट किंवा बाहेर लंच.

लहान पणी आम्हाला घरूनच मारि बिस्किट पुडा, एक कॅडबरी व वॉटर बॅग देउन पाठवत पुण्यात पिक्चरला भरत मध्ये बालनाट्ये बघायला.

संध्याका ळी -रात्री मी बाहेरच पडत नाही. ट्राफिक व गर्दी फार अस्ते. अगदी एन सी पी ए लाच जायचे असेल तर बाहेर पडते. तिथे खरेतर
बेस्ट सँड विचेस, बटाटेवडे, ज्युसेस व कॉफी मिळते. एन सी पी ए कॅफे पण आहे. पर वो सब अलग चीज है.

बिना साखरेचा चहा /कॉफ/, तेलकट नसणारे, फार तिखट / मसालेदार नसणारे पदार्थ चित्रपटगुहा सारख्या गर्दी असलेल्या ठिकाणी उपलब्ध असायला हरकत नसावी असे वाटते. विकणाऱ्यांना सुद्धा हे आर्थिक दृष्ट्या व्हाएबल असावे असे वाटते, अर्थात मोठ्या शहरांत.

तानाजी मालुसरे शरीरयष्टीने धिप्पाड असावेत.
अजय देवगण किरकोळ वाटला शरीरयष्टीने.
त्याने वेट गेन करायला हवं होतं.
सैफला मुस्लिम लूक का दिलाय काय माहिती
आणि त्याला विकृत दाखवायचे कारणही कळले नाही...
ती राजस्थानी मुलगी ती कोणती एक्टरेस आहे?
छान दिसलीय.
मला तर वाटतं शरद केळकर ला तानाजी म्हणून कास्ट करायला हवे होते.
काय मस्त दिसलाय शिवाजी महाराजांच्या रोल मध्ये
तो स्क्रीन वर आला की भारी वाटायचं.

सिंहगडावर त्यांचा पुतळा आहे.
तसेही सगळे मावळे शरीरयष्टीने धिप्पाड होते असे निरीक्षण आहे.
बाजीप्रभू देशपांडे पण तसेच होते. तलवार, भाला चालवणे हे काही लेच्यापेच्यांचे काम नव्हे.

आता बाजीप्रभुंवर पण एक चित्रपट निघायला हवा. पन्हाळ्याचा वेढा, सुटका, आणि खिंडीतली लढाई असे बरेच काही आहे दाखवण्यासारखे. जमल्यास संभाजीराजे यांच्यावर देखील चित्रपट बनायला हवा. खरे ठाऊक नाही पण मला असे वाटते की मराठी सोडून देशातील इतर जनतेला शिवाजीराजे, मावळे, संभाजीराजे, पेशवा यांचे स्वराज्यसंरक्षण आणि स्वराज्यस्थापन यातील योगदानाचा इतिहास, महत्वाच्या घटना/लढाया हे सर्व म्हणावे तितके माहीत नाही. खास करून सध्याच्या काळात देशातील नागरिकांना त्याची माहिती होणे खरेच आवश्यक आहे.

तानाजी बघून आले काल. ओवरऑल सिनेमा आवडला. थोड्या फार सिनेमॅटिक लिबर्टीने माझ्या भावना नाही दुखावत, गोष्ट चांगली मांडलीय असे वाटले, कास्टिंग मस्त, बॅकग्राउंड स्कोअर विशेष आवडला, सुरवातीची आणि शेवटची लढाई मस्त.
पण! ... जितकी हवा झालीय तितका माइंडब्लोइंग नाही वाटला. कारण बंडल व्हिएफेक्स. दर थोड्या वेळाने त्या विचित्र आउट ऑफ प्रपोर्शन हत्ती, ऑबव्हियस खोटे खोटे दिसणारे बुरुज, तटबंद्या , कार्टून सारखे दिसणारे सैन्य (आणि एकदा अ‍ॅनिमेटेड शिवाजीमहाराज सुद्धा!) यामुळे भातात खडा यावा तसा विरस होत होता.

कालच मुक्ता थिएटर सीएसटी ला रात्री हा हा सिनेमा बघितला.
3d madhye बघायला मज्जा येते पण काही गोष्टी योग्य वाटल्या नाहीत .
सह्याद्री डोंगर दऱ्या ज्या दाखवल्या आहेत त्या फक्त खडकाळ दाखवल्या आहेत.
त्या वेळी सर्व डोंगर दर्य ह्या घनदाट वृक्ष वेलीनी झाकलेले होते.
तानाजी ना साखळी
मध्ये बांधलेले दाखवलं आहे ते इतिहास मध्ये कधीच वाचलेलं नाही.
तो प्रसंग इतिहास ल धरून नसावा.
कोंढाणा किल्ला हा छत्रपती कडेच होता तहात दिला गेला होता त्या मुळे त्या किल्ल्याची खडा न खडा माहिती मराठ्या ना होती.
किल्ल्या ची माहिती तानाजी ज्या आंधळ्या व्यक्तीला विचारतात तो प्रसंग बिलकुल पटला नाही
उदयभान हा शुर,बलवान असा योद्धा होता त्या ची खात्री पटवणे महत्वाचे होते ते दाखवलं गेले नाही
हत्तीची सोंड कापण्याचा प्रसंग परिणाम शून्य वाटला.
मराठ्यांची संस्कृती नीट दाखवली गेली नाही.

Rajesh188 तुम्ही पिक्चर बघताना पण महाचर्चा सुरू केली असाल तिथे.

अर्धांगिनी बरोबर होत्या साध्या चर्चेत क्षणोक्षणी माघार घ्यावी लागते तिथे महाचर्चा घडवून कोण आपत्ती ओढवून घेईल.

@बोकलत अरे वा पावन खिंड दिवाळी २०२० मध्ये म्हणजे भारीच. निदान यात तरी VFX चा वापर कमी करून खरोखर गडावरचे चित्रीकरण असावे आणि चित्रपटाच्या मसाल्यासाठी ऐतिहासिक घटनांची जेवढी कमीतकमी मोडतोड करण्यात यावी ही अपेक्षा.

ती राजस्थानी मुलगी एका फ्रेम मध्ये अगदी पेंटिंग सारखी दिसते व नाजुक सुरेख आहे. पण तिचा कथेशी संबंध नाही
>>>>

आहे की संबंध. शेवटी तिलाच बकरी बनवून सैफुद्दीनची शिकार होते. पण तिचे नंतर काय होते हे कळले नाही. कोणी ईतिहासाचा जाणकार असेल तर प्रकाश टाका.

@ थिएटर जेवणाची महागाई आणि पथ्यपाणी तर पिक्चरच्या आधी आणि नंतर खावे. दोन खाण्यात तीन तासांचा ब्रेक ओके आहे. पॉपकॉर्न खाल तर आधार मिळतो. ते ही खायचे नसेल तर बिस्कीटचा पुडा कुठेही लपवून नेऊ शकतोच. पोरं सोबत असली तर पोरांचाच खाऊ बोलू शकतो.

आम्ही सकाळच्याच शोला जातो. मग तो तान्हाजी असो वा मुंबई-पुणे-मुंबई.. पोरांना झोपेत सोडून जातो. आताही मी आधी बाहेर पडून वडापाव पार्सल घेतले. रिक्षात बसताच बायकोच्या हातात एक गरमागरम वडापाव ठेवला. ती ही खुश. तिच्या आवडीचा आहे. एक फेमस दुकान आहे समोर. मॉर्निंग वॉल्कला जाणारयांची चिक्कार गर्दी असते. बायकोने एक संपवताच दुसरा हातात ठेवला. बायको डबल खुश. आणि आता ईंटरवलला ९० रुपयांचे दोन समोसे आणि दिड दोनशे रुपयांचे सॅंडवीच घ्यावे लागणार नाही म्हणून मी ट्रिपल खुश. त्यात मुंबईत पडलेली "कडाक्याची" थंडी मदतीला धाऊन आली. कोकाकोलाचाही बेत रद्द झाला. एकंदरीत आपल्या मातीतला चित्रपट लाह्या आणि मराठमोळा वडापाव खाऊन साजरा झाला.

सैफला मुस्लिम लूक का दिलाय काय माहिती
>>>>
कदाचित तो त्याचा ओरिजिनलच असेल Happy
जोक्स द अपार्ट, मराठ्यांसमोर व्हिलन राजा मुस्लिम लूकचा वाटणे कमर्शिअल गरज असावी चित्रपटाची. त्याचे सैन्यही सारे मुघलच दाखवलेय. लग्नाच्या रात्री तो त्यांच्यासोबत नृत्यही तसेच करतो. अलादिन खिलजी आणि खलीबली सुद्धा तेव्हा आठवते. लग्नाचा होकारही हा लिहून आणतात ते सुद्धा निकाह कबूल सारखे वाटते.

अरे वा पावन खिंड दिवाळी २०२० मध्ये म्हणजे भारीच. निदान यात तरी VFX चा वापर कमी करून खरोखर गडावरचे चित्रीकरण असावे
>>>>>>>

जर असा चित्रपट येणार असेल आणि तो वरचा त्याचाच पोस्टर असेल तर पाहून वाटत नाही की आपली ही ईच्छा अपेक्षा पुर्ण होईल.
तान्हाजीला जे व्यावसायिक यश मिळाले आहे ते पाहता तर आता हेच माथी मारले जाणार.

मराठ्यांची संस्कृती नीट दाखवली गेली नाही.
>>>>>
मुळात दाखवलीच कुठे?
ईण्टरव्हलमध्ये मी पॉपकॉर्न आणायला गेलो तेव्हा काही दाखवले का??

...

हत्तीची सोंड कापण्याचा प्रसंग परिणाम शून्य वाटला.
>>>>
हो. मला जेव्हा कल्पना आली तो काय करणार तेव्हा आता एक किळसवाणे दृश्य बघायची मनाची तयारी केलेली. पण अगदीच फूड प्रोसेसरमध्ये दुधी भोपळ्याची एखादी स्लाईस करावी ईतके सपक वाटले. कदाचित संभाव्य वाद टाळायला वा लोकांच्या भावना जपायला ऐनवेळी त्यात विचलित करणारे चित्रीकरण टाळले असावे.

चित्रपटात उदयभान ने तानाजी ला पकडून साखळीने बांधले खरेच दाखवले आहे का?
>>>>

हो. त्याचबरोबर शत्रूच्या गोटात नाचणारयांच्या ग्रूपमध्ये सामील होत शिरणे हा सत्तरच्या दशकापासून चालत आलेला टिपिकल फिल्मी पैतरांही आहे.
नाच संपल्यावर जेव्हा सैफला कळते की अजय देवगण हाच तानाजी आहे तेव्हा त्याचे एक्स्प्रेशन तर लाजवाब. काही पण दाखवतात यार हे तो सुद्धा आपल्या एक्स्प्रेशनमधून सुचित करतो.

ऋन्मेष, सगळेच प्रतिसाद ह. ह. पु. वा. Lol
खरंतर एवढं डोक्यावर उचलून घेण्यासारखं ह्या शिनेमात आहे काय हेच कळले नाही.

तसेही सगळे मावळे शरीरयष्टीने धिप्पाड होते असे निरीक्षण आहे.
बाजीप्रभू देशपांडे पण तसेच होते. तलवार, भाला चालवणे हे काही लेच्यापेच्यांचे काम नव्हे.>>>

महाराजांच्या शरीरयष्टीचे वर्णन वाचलेय का आपण?

सैफ अली खानने पेपरात दिले आहे, यात इतिहास अगदी शून्य आहे व कल्पनाविलास जास्त आहे >>>>

त्याचा इतिहासाचा सखोल अभ्यास किती खोल आहे ते माहीत आहे.

ये ढाल भाले तलवार, चार पैसे खर्च करके बाजार से कोई भी खरीद सकता है. थोडी ताकद लगा के उठा भी सकता है. लेकीन वो चलाने के लिए जो जिगर लगता है, वो मर्द मराठा मावळा लेके पैदा होता है !

> निकालावर पुढच्या कोर्ट मध्ये अपील केलेय.
त्यामुळे फायनल निकाल लागत नाहीत तोवर ते अजूनही अडवतात.पदार्थ आणले असतील तर ठेवून घेऊन पिक्चर नंतर परत देतात.ड्रिंक वर जास्त लक्ष नसते.मी थर्मास मधून घरचा चहा नेते.काही ठिकाणी अजिबात चेक नाही काही ठिकाणी एकदम कडक चेक असतो. > अच्छा.
ऋन्मेषची आयडिया चांगली वाटतेय चित्रपटाच्या थोडंस आधीच आपल्याला जे हवं आहे चटपटीत/हेल्दी ते खाऊन घ्यायचं. पण सिनेमा बघताना पॉपकॉर्न खायला मजा येते हेदेखील खरंय...

इतिहास वर आधारित सिनेमा काढणे हे मोठे धोकादायक काम आहे.
कधी , कशा,आणि कुणाच्या भावना दुखावतील ह्याचा काही भरवसा नाही.
त्या मुळे बरेच प्रसंग दाखवायचे टाळले जात असावेत एक माझी शंका.
मध्ये पानिपत च्या वेळी अफगाणी लोकांच्या भावना दुखावल्या होत्या अब्दालीला क्रूर दाखवलं म्हणून .
नंतर राजस्थानी लोकांच्या भावना दुखावल्या त्यांच्या राजाचे खरे रूप दाखवले म्हणून.
मराठ्या ना उत्तरेतील कोणत्याच राजांनी पानिपत वेळी मदत केली नाही उलट दुश्मन ला साह्य केले मराठे एकटे लढले हा इतिहास आहे पण हे दाखवलं असते तर सिनेमा प्रदर्शित झाला असता का?
तसेच तानाजी सिनेमा चे असावे.
औरंगजेब ला क्रूर कपटी दाखवता येत नाही(इतिहास मध्ये असला तरी).
उदयभान चे पात्र सुद्धा खूप विचार करून दाखवायला हवं नाही तर राजस्थानी लोकांच्या भावना कधी दुखावतील त्याचा भरवसा नाही.
मराठा राज्य कर्त्यांचा जास्त उदो उदो करता येणार नाही ( त्या मुळेच सिनेमा मध्ये मराठी संस्कृतीच्या कोणत्याच खुणा दाखवल्या नसतील)तर देशाच्या भावना दुखावतील.
एवढ्या सर्व चाळणी मधून कथा गेल्यावर काय शिल्लक राहणार.
हिंदी मध्ये सिनेमा असल्या मुळे एक फायदा झाला सर्व देशात त्रुटक का होईना मराठी साम्राज्याची माहिती मिळाली.
पण हे युद्ध नक्की का लढल गेले ह्याचा उलगडा बाकी लोकांना ह्या सिनेमा बघून होणार नाही.
फक्त किल्ला ताब्यात घेणे एवढंच ध्येय ह्या युद्ध मागे नव्हत .
तर स्वराज्य निर्माण करणे हे होते.
आणि त्या साठी गड किल्ले ताब्यात असणे महत्वाचे होते.
मग स्वराज्य म्हणजे काय हे पण दाखवणे गरजेचं होते(पण परत भावना दुखवण्या ची भीती)

उदयभानामुळे रजपूतांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून बहुदा इतर २ रजपूतांना चांगले दाखवले ( कमल आणि तिच्या भावाने तानाजीला मदत केल्याचे दाखवले.)
तसेच फक्त रजपूतच नाही तर काही मराठेही गद्दार होते हे दाखवल Happy
मुघल वाईट असले तरी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते हे दाखवले.
मराठ्यांच्या भावना दुखवल्या जाऊ नयेत म्हणून सूर्याजीने दोर कापणे, पळून जायचा प्रयत्न करणारे सैन्य वगैरे दाखवलं नाही.
पहिल्या ट्रेलरमधे उगीच काँट्रोव्हर्सी झालेले ब्राह्मणोंका जनोआ, गौ वगैरे शब्द बदलले. इ.इ....; अवघड आहे भारतात सगळ्या कम्युनिटीजना सोशल मिडियाच्या जगात शान्त ठेवणे Happy
असो, पण सिनेमा आवडला !

Pages