https://ociservices.gov.in/welcome
इतरत्र असलेली OCI Renewal माहीती एकत्रित करून ठेवलेली आहे....
Submitted by परदेसाई on 22 October, 2019 - 09:46
पुनश्च OCI....
या वर्षी भारतात सुट्टीसाठी जाणार्या बर्याच (OCI असलेल्या) लोकांना विमानतळावरून परत पाठवले गेले अशी बातमी आहे.
कालच एका जवळच्या मित्राच्या भाचीला ही परत पाठवले गेल्याचे तो सांगत होता, तेव्हा खरे असावे.
मुळ नियमः OCI आयुष्याची वीस वर्षे पूर्ण होण्या आधी घेतले असले तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा....
५० वर्षे पूर्ण होण्याआधी घेतले असले तर ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर, OCI Renew करणे गरजेचे आहे.
.... Part-B
१. हा नियम पहिल्यापासूनच आहे पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.
२. भारतात Immigration Officer ला विचारले असता, कशाला आजून पैशे खर्च करताय? असे उत्तर ३/४ वर्षांपूर्वी मिळाले होते.
३. अजूनही भारतात Immigration Officer ने या डिसेंबर मधे अडवले नाही..
४. ज्या लोकाना विमानतळावरून परत पाठवले गेले , त्याना विमान कंपन्यानी परत पाठवले (असावे).
५. सध्या हा नियम १ जून २०२० पर्यंत शिथील करण्यात आलेला आहे अशी बातमी वाचली (पण पुन्हा हा प्रश्न येणारच आहे).
६. OCI चा गोंधळ नको म्हणून On -Arrival Visa Online घ्यायला किमान ४ Business days द्यावे लागतात.
७. OCI Renew साठी Online Site आहे, पण ती नीट चालत नाही... (गेल्या ४ वर्षात ३/४ प्रयत्न करून सोडुन दिले आहेत).
OCI Renewal..
१. Part-A, Photo/Image Upload, Part-B अश्या तीन Steps आहेत.
२. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी आपल्या घरातल्या सगळ्यांचे पासपोर्ट, सगळ्यांचे OCI, आणि सगळ्यांचे जुने भारतीय पासपोर्ट हाताशी ठेवा.
३. Part-A केव्हाही भरता येतो. तो भरल्यानंतर मिळालेला Temporary ID जपून ठेवा.
४. Photo/Image Upload इथे सगळ्यात मोठी गोची आहे. Photo/Image वर बरेच नियम आहेत. (Pizel size, aspect Ration, file size) इत्यादी. हे सगळे करूनही जवळपास २ तास घालवले तरी Photo/Image Upload होत नव्हती. याच कारणासाठी मी प्रयत्न सोडला होता.
५. सगळे काही ठिक असूनही, Submit केले तर पुन्हा Photo/Image Upload पान परत येते, आणि एकही Error message दाखवला जात नाही (तुम्ही गाढव आहात, तुमचा Photo चुकीचा आहे, फालतूगिरी करू नका, आम्ही झोपलो आहोत असले काहीही नाही).
६. Internet वर बर्याच लोकांनी प्रश्न विचारले आहेत, पण कोणत्याही साईटवर त्याचे नीट उत्तर नाही.
७. एका ठिकाणी उत्तर मिळाले.. ( भारतात Business Hours असतील तेव्हाच Photo/Image Upload करता येते)...
८. आज इथे अमेरिकेत पहाटे ५:५० ला Photo/Image Upload झाली.
९. Part-B आज सुरू केला आहे. ८ वाजता प्रयत्न केला पण पुर्ण झाला नाही. कदाचित भारतात Business Hours असतील तेव्हाच होणार असेल. उद्या पहाटे परत करून बघणार आहे.
....
....
Internet वर अशी साईट (फक्त Business Hours मधे चालणारी) बघितली नव्हती.. ..
आणि असली तरी 'We are sleeping , come tomorrow,' किंवा 'कल आना' असा Message द्यायला काय होते कळत नाही....
असो.. 'मेरा भारत महान..' असल्याने पुढे प्रयत्न करण्यात येतील...
...
याचा कुणाला उपयोग झाला तर झाला म्हणुन लिहीले आहे.. आणि तुम्हाला काही आतल्या गोटातून माहिती मिळाली असेल तर मला सांगा म्हणजे माझाही त्रास / त्रागा कमी होईल...
Submitted by सुनिधी on 6 January, 2020 - 13:16
मी मागच्या वर्षात दोन वेळा हे उद्योग केले होते. आता मागच्या १-२ महिन्यांत प्रोसेस पुन्हा बदलली आहे. मेधा म्हणते तसे आता सुरूवातीलाच ओरिजिनल ओसीआय पाठवावे लागते. पूर्वी अॅप्लाय करताना फक्त कॉपीज पाठवून अगदी नंतर ओरिजिनल पाठवावे लागे व त्यानंतर दोन आठवड्यात नवीन ओसीआय येत होते. माझा दोन्ही वेळचा अनुभव असा होता की ही प्रोसेस किचकट आहे पण सीकेजीएस शी संपर्क करून सर्व शंकांबद्दल कन्फर्म माहिती काढून केले की व्यवस्थित होते. सीकेजीएसचे मेल ला उत्तरे देण्याबद्दल आणि फोनवरही माहिती देण्याबद्दल अनुभव चांगले आहेत.
https://www.in.ckgs.us/resources/pdf/Press%20Release%20OCI%20Reissuance.pdf
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).
दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)
भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..
एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...
असल्या भानगडी बर्याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...
चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...
यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..
Submitted by परदेसाई on 7 January, 2020 - 16:23
मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..
मनिऑर्डर साठी... Cox & Kings Global Services USA LLC असा Recipient असणे आवश्यक...
टवणे सर, फारएण्ड माहितीसाठी
टवणे सर, फारएण्ड माहितीसाठी धन्यवाद.
माझा पासपोर्ट कॅनडा पोस्टच्या संपामुळे अडकलेला आहे. तो आल्यावर OCI साईट वर पासपोर्ट डिटेल्स ( आणि फोटो) टाकेल. ५० च्या नंतरचा हा पहिला पासपोर्ट आहे आणि " re- issue " शब्दामुळे संभ्रम होतो. नुसते नव्या पासपोर्टचे डिटेल्स आणि फोटो अपलोड करण्या मुळे काम होणार असेल तर उत्तम.
BLS ला काढण्याचा निर्णय चांगला आहे.
<< नुसते नव्या पासपोर्टचे
<< नुसते नव्या पासपोर्टचे डिटेल्स आणि फोटो अपलोड करण्या मुळे काम होणार असेल तर उत्तम. >>
------ पन्नाशी नंतरचा नवा पासपोर्ट आला , मिळायला थोडा जास्तच वेळ लागला.
दुसर्याच दिवशी OCI अपडेट साठी विनंती केली. दोन वेळा प्रयत्न करावा लागला ( माहिती लिहीतांना थोडा विलंब झाला म्हणून system ने log out केले असेल ).
भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले. आता दहा वर्ष तरी OCI अपडेट करावे लागणार नाही यातच आनंद आहे.
ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट
ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट करायचं ना? नवा ओसीआय काढावा लागत नाही हे भाग्यच आहे.
भारतात असतांना OCI कडून नव्या
भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले >>> गुड
धन्यवाद इथे लिहून कन्फर्म केल्याबद्दल. आणि तोपर्यंत कन्फर्मेशन आलेले नसले, तरी भारतात जाताना इमिग्रेशनला काही अडचण आली नाही (नसावी) असे दिसते.
पापो चे नूतनीकरण केल्यावर ई
पापो चे नूतनीकरण केल्यावर ई-मेल पाठवून सूचित केले होते. त्या ई -मेलची एक स्थळप्रत काढून ती स्वप्रमाणित करून ठेवलेली आहे. अजून पर्यंत तरी कोणा महाभागाने त्या बद्दल पृच्छा केलेली नाही त्यामुळे नोंद (रेकॉर्ड) अद्ययावत झाली आहे असे वाटते बट यू नेव्हर नो !
<< ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन
<< ओके. म्हणजे फक्त ऑनलाइन अपडेट करायचं ना? नवा ओसीआय काढावा लागत नाही हे भाग्यच आहे. >>
------ ५० नंतर, नवा पासपोर्ट आल्यावर, केवळ माहिती अपडेट करायची आहे. " reissuance " शब्द वापरणे संभ्रमांत टाकतो , तो योग्य वाटत नाही.
राशन कार्ड , वोटर कार्ड जमा केले आहे याबाबत एक declaration जोडावे लागते.
https://www.cgitoronto.gov.in/docs/1730314174OCI%20Declaration.pdf
<< भारतात असतांना OCI कडून नव्या माहितीची नोंद झाल्याचे email कन्फर्मेशन मिळाले >>> गुड Happy धन्यवाद इथे लिहून कन्फर्म केल्याबद्दल. आणि तोपर्यंत कन्फर्मेशन आलेले नसले, तरी भारतात जाताना इमिग्रेशनला काही अडचण आली नाही (नसावी) असे दिसते. >>
----- माहिती अपडेट झाल्याचे कन्फर्मेशन यायला ४ ते ८ आठवडे लागतात, पण त्या काळांत प्रवास / प्रवेश करायला काही अडचण आली नाही.
ज्या जुन्या पासपोर्ट मधे " life long " OCI चे स्टिकर आहे तो सोबत ठेवला होता. कुणी विचारणा केली नाही, दाखवण्याची गरज पडली नाही.
अपडेट ची प्रक्रिया सुरु असतांनाच्या काळांत, OCI च्या साईटवर " new passport information received " , "in process " आणि शेवटी "Granted " असे बदल दिसतांत.
OCI मधे झालेले काही बदल आणि
OCI मधे झालेले काही बदल आणि अनुभव...
१. नवीन पासपोर्ट आल्यानंतर सगळ्या OCI धारकाना नवीन पासपोर्टचा तपशील (Details) OCI वर टाकावा (च)
(https://ociservices.gov.in/onlineOCI/ )
२. भारतात जाताना पूर्वी विमानतळावर मिळत असलेला (पिवळसर), प्रवेश अर्ज (entry form) Online भरून छापून न्यावा लागतो.
३. वरील दिलेल्या लिंकवरून eOCI ची PDF download करता येते.
४. भारतात जाता आणि येताना OCI धारकाना fast-Track वापरता येते. म्हणजेच तिथे इमिग्रेशनच्या रांगेत उभे रहावे लागणार नाही.
(ttps://ftittp.mha.gov.in)
...
OCI लिंकवर पासपोर्टचा तपशील टाकताना एक स्वत:चा फोटो (digital) आणि एक सहीचा फोटो लागतो. दोन्ही फोटो सेलफोन वर घेऊन तपशील टाकला , १० मिनिटात काम झाले.
तिथेच eOCI घेतला, त्याला अजून १०/१५ मिनिटे लागली.
प्रयत्न करून बघू म्हणून फुकट असलेला fast-Track चा अर्ज केला. त्यावर अमेरिकन पासपोर्टची pdf टाकावी लागली. १० मिनिटात तेही झाले. सर्वसाधारणपणे या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी हाताचे ठसे लागतात, जे भारतात जाताना विमानतळावर देता येतात. पण तिथून message आला की OCI च्या वेळी घेतलेले बोटांचे ठसे त्यांच्याकडे असल्याने पुन्हा ठश्यांची गरज नाही.
एकंदरीत हे सगळे काम अर्ध्या तासात झाले, आणि सगळा अनुभव बघता यापुढे तो पिवळा कागदही लागणार नाही बहुतेक (कारण Immigration Officer पुढे जावे लागणार नाही). मला तर वाटते की अमेरिकेतून भारतात आणि परत येताना लवकरच पासपोर्ट आणी OCI पण बघितले जाणार नाही. काही दिवसानी भारतातही face scanning करून जाऊ / येऊ देतील, जसे इथे आता Global Entry साठी करतात.
My experience from April 2026
My experience from April 2026 with Fast Track is not good. They have a separate line for FT but my passport did not scan so I was told to stand in the line. May be it is an isolated incident.
I did download my eOCI. Let's see if that makes any difference on my next trip.
मी पण भारतात जाऊन आल्यावर
मी पण भारतात जाऊन आल्यावर नक्की काय ते मला कळेल. यावेळी सगळ्या लिंक नीट चालल्या ह्याचाच खूप आनंद आहे.
यावेळी सगळ्या लिंक नीट
यावेळी सगळ्या लिंक नीट चालल्या ह्याचाच खूप आनंद आहे. >> लिंक चालल्या पण आम्हा तिघांपैकी फक्त दोघांचेच दुसर्या दिवशी मिळाले. एक दीड महिन्यांनंतर अजूनही पेंडींग मधेच आहे. का ते देवालाच माहित. हेल्पलाईनवाल्यांनाही काही कळत नाहिये. परत एकदा अप्लाय करून घेऊ का असा विचार करत होतो पण त्यांनी तसे करू नका असे सुचवले. सध्या घाई नसल्यामूळे थांबलो. बायको नुकतीच जाऊन आली. सकाळी फक्त एकच काऊंटर उघडे होते. फास्ट ट्रॅ़कसकट बाकी सगळे बंद होते. त्यांनी फिजिकल कार्ड पण दाखवायला सांगितले.
भारतात विमान उतरल्यावर
भारतात विमान उतरल्यावर इमिग्रेशन कडे जाताना इमिग्रेशनचे app डाउनलोड करण्याचे बोर्ड लावले होते. app डाउनलोड करून फॉर्म भरुया. ते पटकन होईल असे पत्नीचे म्हणणे. बॅकअप म्हणून पेपर फॉर्मच्या रांगेत उभे राहून अँपवर आणि पेपर असे दोन्ही फॉर्म भरुया अशी माझी स्ट्रॅटेजी. मी पेपर फॉर्म भरले. ती app वर फॉर्म भरत होती. आमचं विमान रात्री ११:५० ला लँड झालं. मुंबई विमानतळावरच्या दिव्य कार्पेट वरून बॅगा ओढत इमिग्रेशन पर्यंत यायला वीसेक मिनिटे गेली. तारीख बदलली. ऍप्प वर विमान लँड झालं ती (आदल्या दिवसाची) तारीख काही घालता येईना. तितक्यात पेपर फॉर्मच्या रांगेत आमचा नंबर आला. बॅकअप स्ट्रॅटेजी लागू पडली
भारतात विमान उतरल्यावर
भारतात विमान उतरल्यावर इमिग्रेशन कडे जाताना इमिग्रेशनचे app डाउनलोड करण्याचे बोर्ड लावले होते >>> हे नवीन ऐकले.. हा फॉर्म म्हणजे तो छोटा पिवळा फॉर्म का? तसं असेल तर त्याची app किंवा link देऊन ठेवा.
(ही सुस्वागतम अॅप आहे बहुतेक. मला पण सापडली.. )
हे इलेक्ट्रॉनिक अरायव्हल
हे इलेक्ट्रॉनिक अरायव्हल रेकॉर्ड पेक्षा वेगळे नवीन काही आहे का? गेली एक दोन वर्षे इलेक्ट्रॉनिक अरायव्हल रेकॉर्ड वापरले आहे आणि ते सोपे आहे. तेथे पोहोचायच्या आधी ७२ तास ते अपडेट करावे लागते इतकेच. हे तेथे उतरल्यावर जे कार्ड भरावे लागायचे त्याऐवजी.
फा+१.
फा+१.
तो गंडलेला असावा. आपल्याला आलेल्या प्रिंट मधला क्युआर कोड त्यांनी स्कॅन केला की काम पटकन होते.
या फाईल ची प्रिंट घेऊन ठेवा, किंवा फोन वर हाताशी ठेवा. इमीग्रेशन हापिसरला ती सिस्टिम मध्ये ( सहज) मिळणे अपेक्षित असले तरी सर्च Amazon ला करायला दिल्याने
हे कदाचित कॉमन नॉलेज असेल, पण सकाळच्या वेळात मुंबईला लँड झाले तर इमिग्रेशन फार पटकन होते. ओसिआयचे तरी पटकन होते असा अनुभव आहे. त्यावेळात कदाचित कमी आतंरराष्ट्रीय विमाने येत असतील, विमानांत जास्त भारतीय नागरिक असतील, जास्त व्हिसाधारी असतील किंवा जास्त खिडक्या उघड्या असतील. पण रात्री सारखा महा गोंधळ उडालेला नसतो असं गेल्या दोन वर्षांत लक्षात आलं.
हे कदाचित कॉमन नॉलेज असेल, पण
हे कदाचित कॉमन नॉलेज असेल, पण सकाळच्या वेळात मुंबईला लँड झाले तर इमिग्रेशन फार पटकन होते. >> जरुरी नाही रे. माझे वरचे पोस्ट बघ. जेंव्हा शिफ्ट चेंज होत असते तेंव्हा नेहमी एकच काऊंटर उघडे असते. असे का हे माहित नाही पण २-३ वेळा हे झाले आहे.
ह्या वेळी इबोलाचा फॉर्म पण भरावा लागला. अॅप त्यासाठी आहे का ? अॅप आसीआयसीच्या अॅप सारखे असेल तर लोक भारतात बेकायदेशीर एंट्री करणे अधिक पसंत करतील
बापरे! इतक्या सगळ्या गोष्टी
बापरे! इतक्या सगळ्या गोष्टी वाचून मला “हमारे जाने बगैर, यहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता“ म्हणत असरानी इमिग्रेशन काऊंटर वर उभा असलेला दिसायला लागलाय.
बँकिंग पासून इमिग्रेशन पर्यंत किती तो किचकटपणा! त्या ब्रह्मास्त्र सिनेमा सारखं पुढे फेन्स, गेट, लॉक वगैरे आणि इतर तीन बाजूंनी सगळं मोकळं असं वाटतं कधी कधी.
अॅक्च्युअली बर्याच
अॅक्च्युअली बर्याच अनुभवानंतर माझे मत भारतीय वेब साइट्स, अॅप्लिकेशन्स आणि युजर इंटरअॅक्शन बद्दल आता बदलले आहे. त्यातली मेथड इन मॅडनेस लक्षात आली आहे (असे वाटते).
हे सर्वांना लागू होईल असे नाही पण अमेरिकेत इतकी वर्षे अशा कंपन्याच्या, सरकारच्या वेब साइट्सचा व अॅप्स चा अनुभव घेतल्यावर एका ठराविक प्रकारच्या इंटरअॅक्शनची सवय होते. टेस्क्स्ट बॉक्स पासून ते कॅलेण्डर कंट्रोल कशी तयार केली जातात, आपल्या इनपुटला ती कसा प्रतिसाद देतात याचे एक स्टॅण्डर्डायझेशन बर्यापैकी झालेले आहे. ते अंगवळणी पडते. मग नंतर भारतीय साइट्स वापरताना अडखळल्यासारखे होते, त्यांचे प्रतिसाद वेगळेच वाटतात. पण ते बराच काळ वापरले की त्याचा पॅटर्न लक्षात येऊ लागतो आणि मग आपण त्याला सरावतो. पूर्वी जेव्हा नवीन पासपोर्ट काढल्यावर ओसीआय कार्ड सुद्धा नवीन काढावे लागे तेव्हा मी भारतीय एम्बसीच्या वेबसाइटवर आणि त्यांनी ही कामे ऑफलोड केलेल्या कंपन्यांच्या वेबसाइटवर बराच अनुभव घेतला आहे. सुरूवातीला अनाकलनीय वाटणार्या गोष्टींमागचे लॉजिक हळुहळू समजू लागले आणि मग आपण अपेक्षाही "ट्यून" करू लागतो. त्यानंतर आपण अडखळत नाही.
हे मी जनरल युजर इंटरअॅक्शन डीझाइन बद्दल बोलतोय. पेज रिफ्रेश झाल्यावर आधी टाकलेला मजकूर हरवणे, कॅलेण्डर मधे आधीची किंवा पुढची डेटच ग्राह्य न होणे, एखाद्या फील्डमधे नक्की काय भरायचे याबद्दलची संदिग्ध माहिती - याबद्दल नाही. ती सगळी poor web/app page design ची उदाहरणे झाली. किंवा एखाद्या आवश्यक फील्ड मधे आपण गेल्या गेल्या ते फील्ड मॅण्डेटरी असल्याचा एरर दिसणे आणि आपल्या मनात "अरे मला आधी काही लिहू तर दे" येणे वगैरे
इव्हन आयसीआयचे अॅप आता बरेच चांगले झाले आहे. पूर्वी शिकाऊ एचटीएमएल किंवा जावास्क्रिप्ट डेव्हलपर्स कडून करून घेतल्यासारखी पाने असत. ट्रॅन्झॅक्शन्स बघायला तारखांचे तीन पर्याय १. गेला महिना २. गेले २ महिने आणि ३. कस्टम रेंज. यातील ३ निवडून कस्टम रेंज टाकली की "फक्त तीन महिन्यांपर्यंतच ट्रॅन्झॅक्शन्स लिस्ट करता येतील" असा एरर
मग तिसरा पर्याय गेले तीन महिने असाच द्यायचा ना! (फुल स्टेटमेण्ट करता वेगळा पर्याय होता)
खरं खोटं देव जाणे, पण असं
खरं खोटं देव जाणे, पण असं म्हणतात की आपल्याकडच्या आऊटसोर्सिंग कंपन्या जगातील अनेक बँकांचे युआय/ युएक्स बनवतात. हे जर खरं असेल तर त्याच लोकांना जेव्हा भारतीय वेबसाईट बनवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं तेव्हा सगळं मुसळ केरात का जातं?
क्रिस्प फील का नाही येत? कायम नवखा शिकाऊ लोकांनी बनवले आहे हा फील का येतो? फाँट, रंग, रँडम हलत्या डुलत्या गोष्टी प्रोफेशनल वाटतच नाही काही मला. माबुदो असेल.
बीएलएस ची साईट, अरे किती माहिती! अटेस्टेशन सर्विस ते प्रोव्हाईड करतात. करा चांगलं आहे. पण भारत सरकारने काय करार केला, किती साली केला, कॅनडाने कुठला करार केला... https://www.blsindia-canada.com/toronto-jurisdiction/attestation_service... दमाला होईल. कशासाठी आलेलो विसरुन जाईल माणुस!
जीवनातही असंच होतं. आणि मायबोली धाग्यावरही!फाँट, रंग, रँडम हलत्या
फाँट, रंग, रँडम हलत्या डुलत्या गोष्टी >>>
अमित
"छापणारे काय, द्याल ते छापतील" या तत्त्वावर या आउटसोर्सिंग कंपन्या काम करत असाव्यात. त्यांना ज्या रिक्वायरमेण्ट्स दिल्यात त्यानुसार ते तुमचे वेब पेज तयार करणार.
त्या बीएलएसच्या साइटवर गेलो तर एक कहर धमाल गोष्ट दिसते. होम पेज वर जा आणि पूर्ण खाली स्क्रोल करा. तेथे खालील मजकूर दिसेल.
We Accept visa and master card Online prices, selection, descriptions, specifications and images generally match our website, but may vary and are subject to change without notice. Not all accessories pictured are included. Manufacturer rebates, terms, conditions and expiration dates are subject to manufacturers forms. Not responsible for typographical errors."
इथे शेवटचे वाक्य चपखल आहे कारण त्यानंतर जो मजकूर संपला या अर्थाचा कोट आहे त्याचा सुरूवातीचा कोट कोठेच दिसत नाही. हे उद्गारचिन्ह अनादि आहे पण अनंत नाही
मुळात या मजकुराचा बीएसएलच्या कामाशी काहीही संबंध दिसत नाही. एकतर बहुतांश गोष्टींकरता फी ही चेक किंवा कॅशनेच भरावी लागते. दुसरे म्हणजे बाकी फाइन प्रिंट तर महाविनोदी आहे. एखाद्या रिटेल वेबसाइटवरून जशीच्या तशी टेम्प्लेट वापरली असावी. तेथे "मॅन्युफॅक्चरर", "अॅक्सेसरीज" वगैरे मंडळी आहेत. आता बीएलएस व्हिसा प्रोसेसिंग बरोबर जनरल कसलीतरी रिटेल मालची विक्री याच साइटवरून करत असेल तर कल्पना नाही
पुलंच्या नारायण मधे लग्नपत्रिका सिनेमाची तिकीटे छापणार्या छापखान्याला देतात व पत्रिकेत खाली तिकीटविक्री चालू आहे लिहून येते, तसे वाटले
बीएलएसने ज्यांना हे काम दिले ते बहुधा त्याच वेळेस एखाद्या रिटेल वेबसाइटचे काम करत असावेत. नशीब व्हिसा किंवा पासपोर्ट सिलेक्ट करून "कार्ट" मधे टाका वगैरे नाही.
बँका हल्ली डिझायनर डेबिट
पत्रिकेत खाली तिकीटविक्री चालू आहे लिहून येते, तसे वाटले Happy >>>
@परदेसाई , हो, बहुतेक
@परदेसाई , हो, बहुतेक सुस्वागतम app . त्या फॉर्मचा रंग आठवत नाही. लहानसं चिटोरचं होतं.
आणखी एक गम्मत म्हणजे नवीन पासपोर्ट आल्यावर ओसीआय वरती त्याचा नंबर अपडेट करण्याचा जो फॉर्म असतो त्यात कुटुंबातल्या सर्वांच्या ओसीआय एप्लिकेशन चे नंबर (प्रत्यक्ष ओसीआयचे नाही ) मागितले होते. नशिबाने ते एप्लिकेशन फॉर्म्स सेव्ह करून ठेवले होते म्हणून बरं.
बहुतेक वेळा फोटो, पासपोर्ट,
बहुतेक वेळा फोटो, पासपोर्ट, किंवा कोणतेही Document Upload करायचे असेल तर पूर्वी खूप कटकट असायची. तासन्तास घालवला तरी ती Upload होत नसे. यावेळी तसे झाले नाही.. तुमची JPG File टाकली की Zoom and crop दोन्ही option दिले असल्याने Upload साठी झटापट करावी लागली नाही..
गेल्या २ वर्षातलं माझं
गेल्या २ वर्षातलं माझं निरिक्षण -
१. इ-अरायवल करावं लागतंच. फास्टट्रॅक इमिग्रेशन लेनमधे कोणिहि ते चेक देखील करत नाहित्त, हा भाग वेगळा. मेबी ओसिआय्+फास्टट्रॅक्+इ-अरायवल सिस्टम्स इंटिग्रेट केल्या असाव्यात असं समजुया.
२. पास्पोर्ट रिनु केल्याने ओसिआय अप्डेट करावं लागलं. फोटो आणि सहि अपलोड बर्याचदा मारामारी (पिक्स्ल मिस्मॅच, पिक्चर साइज, वेब्साइट टाय्माउट इ.) केल्यावर झाला. स्टॅटस अंडर-प्रोसेस २ महिने दाखवत होतं. दर्म्यान काहिहि कम्युनिकेशन नाहि. साधारण अडिच महिन्यांनी पासपोर्ट नंबर अपडेट झाल्याची इमेल आली. लगोलग इ-ओसिआय डाउन्लोड करण्याची इमेल देखील आली. तोवर वॅलिड ओसिआय असुनहि इ-ओसिआय डाउनलोड करता येत नव्हतं. पासपोर्ट अपडेट पेंडिंग असल्याने बहुतेक.
३. नविन पास्पोर्ट आल्यावर करावे लागतात त्या सोपस्कारात (एयर्लाइन्स प्रोफाय्ल्स, नेक्सस) यावेळी फास्टट्रॅक इमिग्रेशनची भर पडली. त्या वेबसाइटने हि पास्पोर्ट नंबर अपडेट आणि अप्रुवल द्यायला २ महिने घेतले. २०२४ मधे मुंबई एयर्पोर्टवर दिलेले बायोमेट्रिक्स (आय्रिस स्कॅन, फिंगरप्रिंट्स) माझ्या फाइलला असल्याने ती प्रोसेस रिपीट करण्याची गरज नाहि अस नोटिफिकेशन आलं.
आता यावर्षी इ-ओसिआय अमेरिकन आणि योरपच्या एयरपोर्ट्सवर स्विकारतात कि नाहि ते बघता येइल. अर्थात, ओसिआय बुक नेणार आहे, बॅकप म्हणुन...
. पासपोर्ट अपडेट पेंडिंग
. पासपोर्ट अपडेट पेंडिंग असल्याने बहुतेक. >> येस येस्स यू इस म्हणिंग राईट. माझाही तोच अनुभव आहे.
आता यावर्षी इ-ओसिआय अमेरिकन आणि योरपच्या एयरपोर्ट्सवर स्विकारतात कि नाहि ते बघता येइल. अर्थात, ओसिआय बुक नेणार आहे, बॅकप म्हणुन... >> अर्थातच घेऊन जा. मला डॅलसला ब्रिटिश वाले ओसीआय मधे जुना पासपोर्ट नंबर होता म्हणून अडकवत होते. त्यांना मी भारत सरकार नवे ओसीआय ईश्यू करत नाही नि ऑनलाईन अपडेट केल्याचे इमेल दाखवलतर, त्या नंतर एमिरेट्स, कतार वगैरेने चार वेळा जऑन आलो आहे हे ही दाखवले पण ते मख्ख होते. शेवटी सुपरवायसरला बोलवून तिच्या समोर मी परत ऑनलाईन पासपोर्ट अपडेट करून दाखवला . ते स्टेटस अर्थातच पेंडींग होते ते चालले
यथावकाश पासपोर्ट नंबर आधीच अपडेट केलेला आहे ह्याचे ईमेल आले .
अरे इंग्रजी (a, b, c, d )
अरे इंग्रजी (a, b, c, d ) लिहा , नाहीतर मराठीत (देवनागरी) लिहा... मित्रांनो.. काय लिहीलंय हे वाचायला तासभर लागला.
मेक मायबोली ग्रेट अगेन!
मेक मायबोली ग्रेट अगेन!
Pages