वाचनाचे वेगवेगळे वैयक्तिक ट्रॅकर धागे

Submitted by ॲमी on 15 January, 2020 - 04:57

मागील एक वर्षपेक्षा जास्त काळ मी, चैतन्य, सनव, इतर काहीजणांनी मिळून इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस हा धागा चालवला होता. तसं पाहायला गेलं तर मी वाचलेले पुस्तक - २ आणि माझ्या या धाग्यात तसा फारसा फरक नव्हता. फक्त इकडे पुस्तकांची भाषा इंग्रजी होती, पुस्तकं नवीन &/ मास अपील असणारी होती, प्रतिसाद देणारी काही ठरावीक लोकच होती.

नंतर मधे कधीतरी अज्ञातवासीचा नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा हा धागा आला. एक महिनाभरात धारपांच्या पुस्तकांचं बिन्ज वाचन. पुस्तकाचे नाव, थोडीशी ओळख-रसग्रहण-समीक्षा, रेटिंग असं सगळं प्रतिसादात लिहायचं. इतर आयडी त्या पुस्तकाबद्दल बोलतील किंवा पुढचे पुस्तक कोणते वाचायचे हे धागाकर्त्याला सुचवतील.

हे तिन्ही धागे वाचताना माझ्या लक्षात आलं की माबोवर नियमीत पुस्तकं वाचणारे भरपूर आयडी आहेत. पण पुस्तकाबद्दलचे प्रतिसाद, चर्चा त्यामानाने फारच कमी दिसते. आता नवीन वर्ष नुकतेच चालू झाले आहे. तर या पॅटर्नमधे काही फरक पडावा म्हणून एक कल्पना सुचली आहे

• 'वाचन २०२० - आयडी' असे शिर्षक असलेला धागा प्रत्येक इच्छुकाने काढायचा.

• आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल या धाग्यात आणि प्रतिसादात लिहायचं. नवी, जुनी, परतपरत वाचलेली सगळी पुस्तकं चालतील. काय लिहायचं, किती लिहायचं, कोणत्या फॉरमॅटमधे लिहायचं तेदेखील तुम्हीच ठरवणार. अगदी बिअर पीतपीत जेम्स हॅडली चेस वाचतोय, ब्लँकेटमधे गुरफटून घेऊन रबेका वाचतेय, रेल्वेप्रवास करताना रस्कीन बॉण्ड वाचतोय हे लिहलं तरी चालेल. फोटो टाकला तरी चालेल. बेसिकली या येत्या वर्षात पुस्तकाशी जेव्हाजेव्हा तुमचा सम्पर्क येईल तेव्हा त्याबद्दल दोन ओळी का होईना पण लिहायच्या.

• धागाकर्त्याखेरीज इतरांनी आपण वाचलेल्या पुस्तकाचे उल्लेख इथे प्रतिसादामध्ये शक्यतो करू नयेत. पहिल्या, वरवरच्या नजरेत ही अट काहीजणांना खटकू शकते. पण ही अपेक्षा अगदीच चुकीची नाही. कारण समजा 'वाचन २०२०- आयडी१' असा वै ट्रॅ धा आयडी१ ने काढला आणि तिथे प्रतिसादात आयडी२ मराठी राजकारणांवरील पुस्तकाबद्दल, आयडी३ इंग्रजी कुकबूकबद्दल, आयडी४ हिंदी क्लासिक पुस्तकाबद्दल लिहू लागले तर मी.वा.पु. धाग्यात आणि या नवीन धाग्यात काहीच फरक राहणार नाही.

• धागाकर्त्याखेरीज इतरांनी तिथे उल्लेख झालेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करायला किंवा धागाकर्त्याची आवड लक्षात घेऊन त्याला एखादे पुस्तक सुचवायला काहीच हरकत नाही.

• वर्षअखेरीस किंवा नंतर कधीही जेव्हाजेव्हा धागाकर्ता स्वतःचा हा धागा उघडून बघेल तेव्हा त्याला आपण २०२० वर्षभरात कोणती पुस्तकं वाचली, त्याबद्दल आपलं काय मत होतं वगैरे सगळं एकत्रीत सापडेल.

१. बर्यापैकी वाचन असणार्यांना ही कल्पना उपयुक्त वाटतेय का?
२. माबोवर पुस्तकं, वाचनाबद्दलचे प्रतिसाद, धागे अधिकाधिक यावेत यासाठी काही इतर सुचवण्या आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचू आनंदे विभागात तुम्हाला हव्या त्या भाषेतील पुस्तकांवर चर्चा, टिपण, यादी वा इतर कुठल्याही कारणासाठी धागा काढायला काहीच हरकत नाही. अमूकच कारणासाठी धागा काढला पाहिजे वा अमूकसाठी नाही असे काही नियम नाहीयेत. योग्य ग्रुपमध्ये धागा असणे उत्तम.

अरे वाह राजपण 'नियमीत वाचक' आहेत का Lol

> पण माबोवर धागा उघडुन तुम्हाला व्हिजिबिलिटी सुद्धा हवी आहे (परागच्या भाषेत फ्लाँटिंग). तर नेमकं कारण काय आहे. हा प्रकार ताकाला जाउन भांडं लपवण्याचा नाहि अशी आशा करतो... Wink >
इथे जाऊन पाहिल्यास वैयक्तिक ट्रॅकर धागे काढा हे मी ललिता, रुनी यांना सांगितल्याच दिसेल. याचा काय फायदा होईल हे अज्ञातवासीला लगेच कळल्याने त्याने धागा काढलादेखील. तरीही यात 'मी' फ्लॉंट करणे किंवा ताकाला जाऊनभांडे लपवणे वगैरे कसे दिसू लागले कळाले नाही. असो.

===
वैयक्तीक ट्रॅकर धाग्यांचा उपयोग त्यात्या धागाकर्त्याला होईलच पण इतरांनादेखील काही फायदे होतीलच
• आपणपण वेळ काढून वाचलं पाहिजे वाटेल
• आपली आवड कोणाशी जुळतेय हे कळालं की त्याला फॉलो करता येईल
• आवड जुळत नसेल तर ते धागे इग्नोर करता येतील.
===

टवणे सर,
आताच तुमचे गेल्या वर्षीचे प्रतिसाद पाहिले. तुम्हीदेखील वैयक्तिक ट्रॅकर धागा काढावा असे मला वाटते. कृपया पुस्तकांबद्दल यावर्षी अधिक लिहा. Happy Reading!

बऱ्यापैकी वाचन असणार्या गटात तुम्ही आहात हे बघून आश्चर्य वाटलं. >>>> वाटणारच. कारण आम्ही फ्लाँटींग करत नाही. Wink असो.
हा धागा मायबोलीवरचा सार्वजनिक धागा असल्याने स्वतःला कुठल्याही क्रायटेरीयात न बसवता मी मत दिलं. Happy

त्यापैकी ९० (अबब) गेल्यावर्षीचे. त्यातही पुस्तकांच्या नावाचा उल्लेख असलेले कमी (२५-३०) आहेत, इतर चर्चाच जास्त दिसतेय. >>>> तुमचे (फक्त पुस्तकांबद्दलचे) आणि त्या नारायण धारप धाग्यावरचे प्रतिसाद तिथे गेले असते तर अजून पाच सातशे वाढले असते की.

असो. मला जे लिहायचं होतं ते लिहीलं. तुम्ही माझं मत विचारात घेतलच पाहिजे असं काही नाही. पुढे चर्चेत वाचनमात्र.

पुस्तकांबद्दल लिहण्यात फ्लॉन्ट करणे काय आहे हे मला कळत नाहीय खरंच. इथे पाककृतीचे धागे टाकतात ते फ्लॉन्ट करणं असतं का? बघा बघा आम्ही किती कायकाय खातोपितो eyeroll...

गुळपोळीच्या पाककृतींचे १० धागे आले तरी त्याचा कोणाला त्रास होत नाही. पण एकाच पुस्तकाचा उल्लेख १० धाग्यात आला तर? नको बाबा! भीतीदायक कल्पना!! त्यापेक्षा सगळा 'कचरा' मिवापु धाग्यातच जमा करत राहिलेलं बरं

चांगली कल्पना आहे. नियमीत वाचकांनी असे ब्लॉग टाइप आपापले धागे काढणे माबो धोरणात बसते की नाही माहीत नाही. किंवा अशा धाग्यांची संख्या बरीच होणार असेल तर व्यवस्थापना कडून यासाठी वेगळा ग्रुप बनवता यईल येईल, तिथे असा धागा काढताना तो सार्वजनीक ठेवू नये, म्हणजे त्या ग्रुप मेम्बर्सनाच हे धागे दिसतील.

इथे पाककृतीचे धागे टाकतात ते फ्लॉन्ट करणं असतं का? बघा बघा आम्ही किती कायकाय खातोपितो >>> Lol मुद्दा बरोबर आहे.

flaunt
verb [ T ]
US /flɔnt, flɑnt/

to intentionally make obvious something you have in order to be admired:

<<< या वर्षात मी स्वतः किती कोणती पुस्तकं वाचली याद्दल लिहणार होते. >>
<< पण तरीही मला हा धागा 'पर्सनल ट्रॅकरसारखाच' हवा होता. >>
<< इतर लोकं माझ्या पुस्तकांबद्दल बोलू शकतील किंवा खास मला आवडेल असं वाटल्याने >>
<< पण त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्याबद्दलचे जनरल प्रतिसाद मला इथे नको होते. >>
बघा समजतंय का काही.

<<< बऱ्यापैकी वाचन असणार्या गटात तुम्ही आहात हे बघून आश्चर्य वाटलं. >>> Lol

<< त्यापेक्षा सगळा 'कचरा' मिवापु धाग्यातच जमा करत राहिलेलं बरं >> Lol

ॲमी,

धागा काढणार हे ठीक आहे पण तिथे कोणी प्रतिसाद देऊ नयेत किंवा फक्त तुला बुक्स सुचवायलाच प्रतिसाद द्यावेत ही अट लोकांना खटकू शकते.
कारण धाग्यावर काय प्रतिसाद यावेत यावर लेखकाचा कंट्रोल नसतो. (अगदीच आक्षेपार्ह प्रतिसाद आले तर कदाचित कारवाई होईल इतकंच.)

नकटीच्या लग्नात विघ्न फार Uhoh

धागा काढायचा ओ बिंदास. लोक्स काहीही काहीबाही बोलत राहणारच. असा धागा मायबोली नियमात बसत नसेल तर एडमिन कारवाई करतील की...
आणि अजुन नाही केलीय म्हणजे बसते आहे धोरणात Happy सिम्पल !!

अ‍ॅमी, तुझा गेल्या वर्षीचा धागा अधूनमधून बघत होते, तरीही एकूण पराग आणि उपाशी बोका यांच्याशी सहमत. सनव यांनी प्रतिसादांच्या अटीबद्दल वरती लिहिलंय (ही अट लोकांना खटकू शकते) त्याच्याशीही सहमत.

मीवापु-२ धाग्यावर २०१९ साली प्रकाशित झालेलं एकही पुस्तक नाही, हे निरिक्षण चांगलं आहे; मात्र त्याचा एकच एक निष्कर्ष काढू नये, इतर विविध शक्यता विचारांत घेतल्या जाव्यात, असं माझं मत.

तरीही पर्सनल ट्रॅकर धागा काढला तर तो ग्रूपपुरता मर्यादित ठेवावा, पब्लिक करू नये, असंही वाटतं.

द्रुपल दृष्टीने टेक्निकली हा एक विचारपूस व्हर्जन2 सारखा प्रकार असू शकेल.म्हणजे फक्त तो 2020 किंवा काही ग्रुप चे सदस्य असलेल्याना एकमेकांचे रीड लिस्ट डॅशबॉर्ड दिसतील, त्यावर टिप्पणी/सुचवण्या देता येतील.
दुसऱ्या प्रकारात 'एक वाचक' किंवा काहीही आयडी कॉमन नेम पासवर्ड वाला ठेवता येईल.या आयडीनेच सगळे धागे माझे वाचन-<सदस्य नाव> असे तयार करता येतील.हे सर्व एका विशिष्ट टॅब मध्ये.नंतर ज्याला सर्व लिस्ट बघायच्या आहेत त्याला नुसतं एक वाचक चं सगळं लेखन पाहिलं की झालं.
पण हे सर्व टेक्निकल एक्सटेन्शन आहेत.प्रशासक टीम ला वेळ असल्यास नक्की करू शकतील.

'वाचन २०२० - आयडी' असे शिर्षक असलेला धागा प्रत्येक इच्छुकाने काढायचा
• आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल या धाग्यात आणि प्रतिसादात लिहायचं. फॉरमॅट तुम्हाला हवा असेल तो.
• इतरांनी त्या धाग्यावर केवळ तिथे उल्लेख झालेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करायची किंवा धागाकर्त्याची आवड लक्षात घेऊन त्याला एखादे पुस्तक सुचवायचे.
• वर्षअखेरीस किंवा नंतर कधीही जेव्हाजेव्हा धागाकर्ता स्वतःचा हा धागा उघडून बघेल तेव्हा त्याला आपण २०२० वर्षभरात कोणती पुस्तकं वाचली, त्याबद्दल आपलं काय मत होतं वगैरे सगळं एकत्रीत सापडेल.

>>> या पोस्टबद्दलः काही लोक जर असे करायला उत्सुक असतील तर त्यांनी जरूर काढावेत. योग्य ग्रूप मधे काढावेत. पब्लिक करावे की नाही हा धागाकर्त्याचा/कर्तीचा चॉइस. लोकांना वाचायचे वा दुर्लक्ष करायचे स्वातंत्र्य आहेच. एखाद्या आयडीचे लिखाण जर लोकांना आवडले तर ते आपोआपच लोकप्रिय होईल, नाहीतर मागे पडेल.

कोठे काय प्रतिक्रिया येतील वगैरे मात्र कोणाच्याच हातात नाही - ते विषयावर, लोकांच्या माहितीवर आणि धागा काढणार्‍या आयडीच्या इतरांशी असलेल्या संबंधावर व त्यांच्या माबोवरच्या एकूण वावरावर अवलंबून असेल Happy त्यामुळे प्रतिसादांच्या अटीचा बाऊ करायचे कारण नाही - ती अट एरव्हीही कधी पाळली जातेच असे नाही.

प्रतिसादची अट यासाठी ठेवलीय कारण आधीच उपलब्ध असलेल्या इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस, मी वाचलेले पुस्तक - २ या दोन धाग्यांमध्ये आणि आता काढलेल्या या नवीन वैयक्तिक धाग्यामधे 'काहीतरी' फरक असायला हवा.
वाचन २०२० - अमी अशा शिर्षकाचा धागा आहे तर तिथे अमीने वाचलेली इंग्रजी फिक्शन पुस्तकच सापडतील. जर तिथे प्रतिसादात आयडी१ मराठी राजकारणांवरील पुस्तकाबद्दल लिहू लागला, आयडी२ इंग्रजी कुकबूकबद्दल तर आयडी३ हिंदी क्लासिक पुस्तकबद्दल तर त्या वरच्या दोन धाग्यात आणि या नवीन धाग्यात काय फरक असणारे?
१. एकतर भाषा&&जॉन्रनुसार वेगवेगळे धागे काढता येतील किंवा
२ धारपांबद्दल होता तसा एका ठरावीक लेखकाच्या पुस्तकबद्दलचा धागा काढता येईल किंवा
३. ठराविक आयडीने काय वाचन केलं त्यानुसार.
माबोवर आयडीनुसार करणं सोप्प जाईल असं मला वाटलं.
===

> मीवापु-२ धाग्यावर २०१९ साली प्रकाशित झालेलं एकही पुस्तक नाही, हे निरिक्षण चांगलं आहे; मात्र त्याचा एकच एक निष्कर्ष काढू नये, इतर विविध शक्यता विचारांत घेतल्या जाव्यात, असं माझं मत. > काय विविध शक्यता असू शकतात?

१. गुडरिडस वर तुमच अकाउण्ट उघडा, त्यात तुमच्या आवडीच्या पुस्तकाबन्द्दल लिहा. तुमच्या प्रोफाईल लिन्क माबोवरच्या प्रोफाईलवर टाका.

२. नाहीतर सरळ एखादा ब्लॉग काढायचा वर्डप्रेसवर ( मराठी किव्वा इन्गलिश ) आणि तिकडे लिहायच.

>>इथे पाककृतीचे धागे टाकतात ते फ्लॉन्ट करणं असतं का? बघा बघा आम्ही किती कायकाय खातोपितो <<
तुलना चूकलेली आहे. खाणे आणि पाककृती मधे तो फरक आहे, जो वाचणे आणि स्वतः लिहिणे यात आहे. बघा समजतंय का...

चपखल उदाहरणंच द्यायचं झालं तर - उद्या एखाद्या रोड वारियरने तो दररोज ब्रेकफास्ट, लंच, डिनर ला वेगवेगळ्या शहरांत काय खातो (पितो) यावर धागा काढला (कॅलरीज ट्रॅकर करता - त्याकरता शेकडो अ‍ॅप्स असतानाहि) तर ते कदाचित काहिंना आवडेल, पण इतरांकरता ती कृती हास्यास्पद ठरेल. आणि त्या प्रकाराला फ्लाँटिंग किवा शोऑफ म्हटलं जाणं साहजिक आहे. तुमचा प्रपोज्ड धागा याच कॅटेगोरीत मोडतो ना?..

धागा काढण्याला विरोध नाहि; फ्लाँट करण्यालाहि नाहि, पण त्यामागचा स्पष्टिकरणांत आलेला उद्देश बालीश आहे. आणि त्यातुनच छुपा अजेंडा ध्वनीत होत असल्याने ती फ्रेज - ताकाला जाऊन... Proud

अ‍ॅमींचा इथला एकुण वावर लक्षात घेता हा शो ऑफ आहे असं वाटलं नाही. त्यांनी सुरुवातीलाच ‘सर्वांनीच’ (म्हणजे खुप वाचन असलेल्यांनी) हे करावे असे सुचवले आहे. उदाहरण देताना स्वतःचे दिले.
अ‍ॅमी सुरु तर करुन पहा. नाही जमतंय वाटलं तर थांबायचं. आणि अ‍ॅड्मिन सांगतीलच “हो, नको” असे. मुळात खुप लोक असे करतील वाटत नाही. ‘सार्वजनिक न करता सभासदांपुरताच मर्यादीत करावा‘ याला अनुमोदन. म्हणजे एकाच प्रकारचे धागे सारखे वर दिसणार नाहीत. व ज्यांना अधुनमधुन वाचायचे असेल तेव्हा अधुनमधुन सभासद होता येईल व वाचुन झाले की बाहेर पडता येईल.

धारपांबद्दल होता तसा एका ठरावीक लेखकाच्या पुस्तकबद्दलचा धागा काढता येई >> जुन्या मायबोलीवर अशा प्रकारचे धागे होते-आहेत.

अ‍ॅमींचा इथला एकुण वावर लक्षात घेता हा शो ऑफ आहे असं वाटलं नाही. >> मलाही वाटले नाही असे. मायबोलीचा हा उद्देश नाही किंवा अशा प्रकारचे लिहायला इतर वेबसाईट आहेत हे पूर्णतः पटले नाही. तसा पाहता मायबोलीची तरी काय गरज आहे असे ही म्हणू शकाल Happy

सुनिधीला अनुमोदन. अ‍ॅमी तुम्ही धागा काढला तर मला तरी खटकणार नाही. रंगीबेरंगी मधे असा धागा काढला तर कोनीच आक्षेप घेऊ शकणार नाही.

> तुलना चूकलेली आहे. खाणे आणि पाककृती मधे तो फरक आहे, जो वाचणे आणि स्वतः लिहिणे यात आहे. बघा समजतंय का... >
तुलना चुकलेली नाही.
स्वतः लिहणे = स्वतः खाद्यपदार्थ बनवणे
वाचणे = खाणे
वाचन/इतर कोणत्याही छंदाबद्दल माबोवर लिहणे = माबोवर पाककृती लिहणे

ट्रेकींग करणारे, रांगोळी काढणारे, बागकाम, फोटोग्राफी सगळ्यांबद्दलच असं म्हणता येऊ शकतं की
> माबोवर असला धागा उघडणाऱ्याना व्हिजिबिलिटीच हवी असते,परागच्या भाषेत फ्लाँटिंग. >
किंवा उबो म्हणत आहेत तसं
> ज्याला कुणाला जाणून घ्यायचे आहे त्याने/तिने स्वतःची रेसिपी स्वतः जवळ ठेवावी. ही लिहण्यासाठी स्वतःचा ब्लॉग, कागद, फोन अॅप, गूगल डॉक, स्प्रेडशीट असे अनेक पर्याय आहेत. कुणी कुठली आणि किती पाककृती बनवल्या, एकच पदार्थ इतर किती धागाकर्यांच्या धाग्यात आहे वगैरे तपशील जाणून घेण्यात आम्हाला रुची नाही आणि त्यासाठी ५-५० धागे वाचत बसायची इच्छा नाही. >

बघा काही समजतंय का...

धन्यवाद सुनिधी आणि असामी Happy

> मुळात खुप लोक असे करतील वाटत नाही > सध्यातरी मी आणि अज्ञातवासी दोघेच आहोत.

> जुन्या मायबोलीवर अशा प्रकारचे धागे होते-आहेत. > हितगुज का? खरंतर भाषा && जॉन्र असे धागे काढणं सगळ्यात बेष्ट होतं. पण त्यात भरपूर धागे निघाले असते (म्हणजे मी एकटीनेच इंग्रजी- फिक्शन, इंग्रजी-मिस्टरीथ्रिलर, इंग्रजी-रोमान्स, इंग्रजी-हिस्टोरीकलफिक्शन, इंग्रजी-YA असे धागे काढणार) आणि प्रतिसाद किती आले असते माहित नाही...
===

असामी, तुम्हीदेखील भरपूर वाचता असे वाटते. मी स्वतः तुमचे धागे, प्रतिसाद वाचले नसले तरी इतरांना त्याबद्दल उल्लेख करताना पाहिलं आहे.
मी_अनु, तूदेखील भरपूर वाचन करते माहीत आहे.
इतरकोणीही एक्सवाचक असतील ज्यांना यावर्षीपासून परत वाचन चालू करायचं आहे, अगदी ६ पुस्तक वर्षभरात वाचणार असाल तरी चालेल.
किंवा कोणी नियमीत वाचक आहेच पण इथे फ्लॉन्ट करत नव्हते त्या सगळ्यांनीच स्वतःचे ट्रॅकर धागे काढा किंवा मीवापु धाग्यावर दोनचार ओळी का होईना पण लिहा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल.
२०१९ मधे फक्त २५-३० पुस्तकांचा उल्लेख माबोवर व्हावा हे काही फार भुषणास्पद नाहीय Wink

मी करते खूप वाचन,
पण खूप ओल्ड स्कुल आहे ☺️☺️
आवडलेली तीच जुनी पुस्तकं परत परत वाचते.
त्यामुळे नवीन काय वाचलं धाग्यावर लिहायला माझं योगदान शून्य.धागे वाचायला येईन.

मीवापु धाग्यावर दोनचार ओळी का होईना पण लिहा नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल >>> अतिशय पते की बात!

------------------

काय विविध शक्यता असू शकतात? >>>

१) पहिलं म्हणजे ताजी, नवी पुस्तकं सहजी हाती न लागणे. माझा स्वतःचा अनुभव.

२) पुस्तकं विकत घेण्याला घरातली उपलब्ध जागा इ. मर्यादा येऊ शकतात. (हा देखील माझा अनुभव! त्यामुळेच अखेर किंडलचा आसरा घेतला आहे. किंडलवर मराठी पुस्तकं खूपच कमी आहेत. पण किमान इंग्रजी वाचन तरी होईल, अशी स्वतःची समजूत काढली आहे.)

३) वाचनयादी खूप मोठी असते. नवी पुस्तकं हाती लागत नाहीत, तर किमान मिळतील ती जुनी तरी वाचू असा विचार केला जातो... आणि याचंच एक्स्टेंशन, मिळतील ती तरी वाचू, वाचनयादीत असोत वा नसोत.
(मी अनेक वर्षं महाराष्ट्राबाहेर राहिले. वाचनाशी संपर्क शून्य. मराठी पेपरही मिळायची मारामार होती. त्या काळातली माझी वाचनयादी इतकी मोठी आहे, की आधी ती पूर्ण करायचं ठरवलं तर आणखी काही वर्षं मी एकही नवीन पुस्तक वाचू शकणार नाही. आणि मग त्या काही वर्षांतल्या पुस्तकांची पुन्हा नवीन यादी तयारच असेल.... महाराष्ट्रात परतून १० वर्षं झाली तरी हे चक्र संपलेलं नाही.)

३) वाचलेल्या पुस्तकांबद्दल माबोवर (किंवा इतरही कुठल्या प्लॅटफॉर्मवर) लिहिण्याबद्दलचा निरुत्साह / वेळेचा अभाव. खरं म्हणजे न आवडलेल्या पुस्तकांबद्दलही लिहिलं जायला हवं; पण ते होत नाही. त्यामुळे मिवापु धाग्यावर नवीन पुस्तकं दिसत नाहीत, याचा अर्थ ती कुणी वाचतच नाहीत असा काढला जाऊ नये, असं मला वाटतं.

अ‍ॅमी, तुम्हाला धागा काढावासा वाटतोय तो जरूर काढा. योग्य त्या गृपमध्ये काढा. इतर कोणाला त्यापासून स्फुर्ती घेऊन धागा स्वतःकरता धागा काढावासा वाटला तर ते देखिल काढतील. जसा शालींनी पर्सनल बर्ड वॉचिंग ट्रॅकर धागा काढला आहे तसा तुमचा पर्सनल पुस्तक वाचनाचा धागा. इतरांना तो धागा कसा वाटतो, त्यामागचा हेतू योग्य वाटत नाही वगैरे बाबत जी प्रत्येकाची मतं आहेत ती ते व्यक्त करतील तर करू द्यात. तुमच्या डोक्यात तुमच्या धाग्याचा हेतू क्लियर आहे तर सरळ सुरूवात करा. न जाणो, तुमच्या धाग्यामुळे कदाचित अजून कोणाला पुस्तकं वाचनाची इच्छा / आवड निर्माण होईल.

पुस्तक, नियमित वाचन, त्यावर टिप्पणी यावरचा धागा असेल तर त्यात वाईट काहीच नाही. तो धागा एका व्यक्तीच्या पुस्तकवाचनाचा आहे की चार व्यक्तींच्या हे गौण ठरावे.

अनु,
काही आवडलेली जुनी पुस्तकं मीदेखील परतपरत वाचत असते. मी जे धागे काढा सांगतेय ते नवीन काय वाचलं नसून यावर्षी काय वाचलं आहेत. तसेच तो वरदाचा धागा मी वाचलेले पुस्तक असा आहे. जुनी पुस्तकं परत वाचताना दरवेळी नवीन काहीतरी गवसत असेल. त्याबद्दल लिहू शकते. एनिवे तुला योग्य वाटेल ते कर Happy
===

ललिता,
हम्म भरपूर नवीन शक्यता कळल्या. धन्यवाद Happy
> त्यामुळे मिवापु धाग्यावर नवीन पुस्तकं दिसत नाहीत, याचा अर्थ ती कुणी वाचतच नाहीत असा काढला जाऊ नये, असं मला वाटतं. > नाही नवीन पुस्तकं कुणी वाचतच नाहीत असा अर्थ नव्हता काढला. पण मीवापु धागा मला पुस्तकं सुचवण्यासाठी पुरेसा आहे या उबो, पराग यांच्या म्हणण्यावर असेल ब्वा म्हणलं होतं.
===

धन्यवाद मामी Happy
शालींचा पक्षीनिरीक्षण धागा हे अगदी चपखल उदा दिलंत तुम्ही! शाली, वावे, ऋतुराज तिघांना पक्षीनिरीक्षणाचा छंद आहे. तिघांनी तीन वेगवेगळे धागे काढून यावर्षीची डायरी मेन्टेन केली. इतकं साधं सरळ आहे ते. हा एकच पक्षी तीनतीन धाग्यात आला!! म्हणण्याला काहीच अर्थ नाही Lol
===

माझा वाचनाचा वैयक्तिक ट्रॅकर धागा वेळ मिळाला की काढतच आहे.
सर्व प्रतिसादकांचे आभार _/\_

ओह ओके
मग लिहीन.जुनी मी वाचलेली आणि इतरांनी कमी वाचलेली बरीच पुस्तकं असतील.

अनु,
काही आवडलेली जुनी पुस्तकं मीदेखील परतपरत वाचत असते. मी जे धागे काढा सांगतेय ते नवीन काय वाचलं नसून यावर्षी काय वाचलं आहेत. तसेच तो वरदाचा धागा मी वाचलेले पुस्तक असा आहे. जुनी पुस्तकं परत वाचताना दरवेळी नवीन काहीतरी गवसत असेल. त्याबद्दल लिहू शकते. एनिवे तुला योग्य वाटेल ते कर

ओह, जुनी पण चालतात का, मग लिहीन नक्की.

नाही नवीन पुस्तकं कुणी वाचतच नाहीत असा अर्थ नव्हता काढला >>> ओके, अ‍ॅमी Happy (माझी थोडी तशी समजूत झाली होती.)

Pages