वाचनाचे वेगवेगळे वैयक्तिक ट्रॅकर धागे

Submitted by ॲमी on 15 January, 2020 - 04:57

मागील एक वर्षपेक्षा जास्त काळ मी, चैतन्य, सनव, इतर काहीजणांनी मिळून इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस हा धागा चालवला होता. तसं पाहायला गेलं तर मी वाचलेले पुस्तक - २ आणि माझ्या या धाग्यात तसा फारसा फरक नव्हता. फक्त इकडे पुस्तकांची भाषा इंग्रजी होती, पुस्तकं नवीन &/ मास अपील असणारी होती, प्रतिसाद देणारी काही ठरावीक लोकच होती.

नंतर मधे कधीतरी अज्ञातवासीचा नारायण धारपांची पुस्तके - विचार/समीक्षा हा धागा आला. एक महिनाभरात धारपांच्या पुस्तकांचं बिन्ज वाचन. पुस्तकाचे नाव, थोडीशी ओळख-रसग्रहण-समीक्षा, रेटिंग असं सगळं प्रतिसादात लिहायचं. इतर आयडी त्या पुस्तकाबद्दल बोलतील किंवा पुढचे पुस्तक कोणते वाचायचे हे धागाकर्त्याला सुचवतील.

हे तिन्ही धागे वाचताना माझ्या लक्षात आलं की माबोवर नियमीत पुस्तकं वाचणारे भरपूर आयडी आहेत. पण पुस्तकाबद्दलचे प्रतिसाद, चर्चा त्यामानाने फारच कमी दिसते. आता नवीन वर्ष नुकतेच चालू झाले आहे. तर या पॅटर्नमधे काही फरक पडावा म्हणून एक कल्पना सुचली आहे

• 'वाचन २०२० - आयडी' असे शिर्षक असलेला धागा प्रत्येक इच्छुकाने काढायचा.

• आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल या धाग्यात आणि प्रतिसादात लिहायचं. नवी, जुनी, परतपरत वाचलेली सगळी पुस्तकं चालतील. काय लिहायचं, किती लिहायचं, कोणत्या फॉरमॅटमधे लिहायचं तेदेखील तुम्हीच ठरवणार. अगदी बिअर पीतपीत जेम्स हॅडली चेस वाचतोय, ब्लँकेटमधे गुरफटून घेऊन रबेका वाचतेय, रेल्वेप्रवास करताना रस्कीन बॉण्ड वाचतोय हे लिहलं तरी चालेल. फोटो टाकला तरी चालेल. बेसिकली या येत्या वर्षात पुस्तकाशी जेव्हाजेव्हा तुमचा सम्पर्क येईल तेव्हा त्याबद्दल दोन ओळी का होईना पण लिहायच्या.

• धागाकर्त्याखेरीज इतरांनी आपण वाचलेल्या पुस्तकाचे उल्लेख इथे प्रतिसादामध्ये शक्यतो करू नयेत. पहिल्या, वरवरच्या नजरेत ही अट काहीजणांना खटकू शकते. पण ही अपेक्षा अगदीच चुकीची नाही. कारण समजा 'वाचन २०२०- आयडी१' असा वै ट्रॅ धा आयडी१ ने काढला आणि तिथे प्रतिसादात आयडी२ मराठी राजकारणांवरील पुस्तकाबद्दल, आयडी३ इंग्रजी कुकबूकबद्दल, आयडी४ हिंदी क्लासिक पुस्तकाबद्दल लिहू लागले तर मी.वा.पु. धाग्यात आणि या नवीन धाग्यात काहीच फरक राहणार नाही.

• धागाकर्त्याखेरीज इतरांनी तिथे उल्लेख झालेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करायला किंवा धागाकर्त्याची आवड लक्षात घेऊन त्याला एखादे पुस्तक सुचवायला काहीच हरकत नाही.

• वर्षअखेरीस किंवा नंतर कधीही जेव्हाजेव्हा धागाकर्ता स्वतःचा हा धागा उघडून बघेल तेव्हा त्याला आपण २०२० वर्षभरात कोणती पुस्तकं वाचली, त्याबद्दल आपलं काय मत होतं वगैरे सगळं एकत्रीत सापडेल.

१. बर्यापैकी वाचन असणार्यांना ही कल्पना उपयुक्त वाटतेय का?
२. माबोवर पुस्तकं, वाचनाबद्दलचे प्रतिसाद, धागे अधिकाधिक यावेत यासाठी काही इतर सुचवण्या आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

'विजय तेंडुलकरांचा' ललित संग्रह - ते वाचते आहे.
.
पहीलीच कथा - 'राज कपूर' यात राज कपूरचे एक दिग्दर्शक व एक शोमॅन, व्यक्तीमत्व पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे. अजुन पुढील गोष्टी वाचायच्या आहेत. वानगीदाखल ही पोच. अजुन जशा कथा येतील तशा प्रतिक्रियेमधून मांडत जाइन.
____
पहीलीच कथा - 'राज कपूर' यात राज कपूरचे एक दिग्दर्शक व एक शोमॅन, व्यक्तीमत्व पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे.
'तीसरी कसम' सिनेमा तेंडुलकरांनी लागोपाठ २ दा पाहीलेला इतका त्यांना आवडलेला होता.'अर्धसत्य' सिनेमाचा शेवट निहलांनीच्या आग्रहानुसार बदलण्यात आलेला ज्यात पोलिस अधिकारी, वेलणकरची हत्या करतो. मूळ शेवट होता वेलणकरची आत्महत्या. मुख्य राज कपूरला भेटल्यानंतर राजजींचे अतिशय भारवून टाकणारे अगत्य, तेंडुलकरांना तर राजजींची ऑफर स्वीकारायची नाहीये पण नाही म्हणता येत नाहीये. ही द्विधा मनस्थिती फार उत्तम रीतीने मांडलेली आहे. ललितात तेंडूलकर सतत म्हणतात जरी 'अर्धसत्य' चित्रपटाने जो काही भरघोस धंदा केला त्यात माझे निमित्त (=योगदान, शेअर) फार कमी होते.
_____________
तीसरी 'माझा ज्योतिषी' ललित. छान आहे हे. एक बडा ज्योतिषी 'सुखटणकर' म्हणुन गांधीजींच्या खूनाचे भविष्य वर्तवितात पण त्यांचे ते भविष्य लिहायला वर्तमानपत्रे राजी होत नाहीत आणि दुसर्‍या आठवड्यात गांधी हत्या घडते. पुढे याच ज्योतिषाची आर्थिक वाताहात होते व शेवटी तर कपाळाला खोक असलेल्या अवस्थेत ते भीक मागताना आढळतात इथे तेंडुलकर लिहीतात - "काळाच्या पडद्या आड डोकावून, कुणाचे तरी भविष्य जाणण्याचे प्रयत्न करणार्‍याला, नियती त्याची जागा दाखवत असावी." इथे ते त्यांना भेटलेल्या एका ज्योतिषाबद्दल दिवाडकरबद्दल, लिहीतात. पण किती अभ्यासू, चिकीत्सक आणि संवेदनशील मनाने! ते वाचण्यासारखे आहे. त्यांचा ज्योतिषावर विश्वास नाहीये पण तो ज्योतिषीच यांना बळजबरीने काही सांगू पहातो व पुढेपुढे त्यांच्यातला लेखक त्या व्यक्तीरेखेत गुंतत जातो असे काहीसे.

अरे व्वा खूपच छान!! मातृभाषेतून सविस्तर रसग्रहण लिहा. वाचायला आवडेल.

उपाशी बोकांना जोरदार अनुमोदन.
अन्य काही धाग्यांवरही काही जण मोठाले इंग्रजी परिच्छेद टाकत आहेत हे पाहून खेद वाटतो.

मला इंग्रजी समजून घेण्यासाठी मेंदूला पन्नास टक्के जास्त ताण द्यावा लागतो म्हणून मी वर असे लिहिले आहे. कृपया लिहा. धागा सुरु ठेवावा.

काय झाले? पोस्ट पुर्ण ईंग्लिश होती का? बहुधा मायबोलीचा असा नियमच आहे की मराठी भाषेतलेच लिखाण् हवे. ईंग्लिश वा हिंदीही नको. त्यामुळे कोणी काय म्हटले वा कोणाला काय वाटले याचा विचार न करता नियम पाळायला पोस्ट मराठीत लिहा... आणि हो, आधी खरेच असा नियम आहे का कन्फर्म करा Happy

पोस्ट इंग्रजी नव्हती पण फक्त इंग्रजी पुस्तकांबद्दल होती. जसा अन्य लोकांना आक्षेप घेण्याचा हक्क आहे तसाच अ‍ॅमीला पोस्ट ठेवण्याचा आहे. तिने पोस्ट उडवायला नको होती. अ‍ॅमी प्लीज परत टाक. २०२० साली आपण काय काय वाचणार आहोत त्याची यादी होती.

मराठी संकेत स्थळावर मराठीत लिहिणे अपेक्षित आहे. पण विषय कोणताही असायला काही हरकत नसावी.
मायबोलीवर फक्त आणि फक्त मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी कलाकार, मराठी पाककृती, मराठी कविता, मराठी गाणी, मराठी व्यक्ती, मराठी ....नाव, गाव, फळ, फूल बद्दलच लिहायला पाहिजे असा काही नियम नाही.

मध्यंतरी कोणीतरी कविता म्हणुन, हिंदी शेरच टाकत होतं. मान्य आहे जरा अ‍ॅनॉयिंग भात खाताखाता, दाताखाली खडा आल्यासारखा वाटतो पण मग ती पोस्ट टाळायची. बाकीच्यांची क्षितीजे विस्तारु शकतात तेव्हा अ‍ॅमी पोस्ट परत टाक. असो.

Submitted by sonalisl on 16 January, 2020 - 02:44 +१११
मूळ पोस्ट्स / चर्चा मराठीत असल्यास आक्षेप घेण्याचे कारण कळाले नाही.

मी वाचलेले पुस्तक हा धागा अ‍ॅडमिननी उघडला होता. त्यात फक्त मराठी पुस्तकांबद्दल लिहा , असं म्हटलेलं नाही. या धाग्याच्या दोन्ही भागांत आणि वाचू आनंदे ग्रुपमध्ये इंग्रजी पुस्तकांबद्दल भरभरून लिहिलं गेलं आहे. आता हा धागा का खटकावा?

इंग्रजीतले परिच्छेद कॉपी पेस्ट करण्याऐवजी त्यांची लिंक देऊन मराठीत त्याबद्दल थोडक्यात लिहावं.

अरे भांडू नका लोकहो!! (कोणी भांडत असालच तर Wink )

हा धागा 'पर्सनल ट्रॅकर' म्हणून काढला होता मी. या वर्षात मी स्वतः किती कोणती पुस्तकं वाचली याबद्दल लिहणार होते. पुस्तकं इंग्रजीच असणार होती. पण मी लिहणार मराठीतच होते.
इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस या धाग्यावर माझे पुस्तकांबद्दलचे प्रतिसाद जसे असायचे अगदी तसंच.

पण तरीही मला हा धागा 'पर्सनल ट्रॅकरसारखाच' हवा होता. इतर लोकं माझ्या पुस्तकांबद्दल बोलू शकतील किंवा खास मला आवडेल असं वाटल्याने एखादं पुस्तक सुचवू शकतील. पण त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्याबद्दलचे जनरल प्रतिसाद मला इथे नको होते.

पण आता मला स्वतःलाच खात्री नाहीय की असा धागा काढणे-चालवणे 'इथे' शक्य/योग्य आहे की नाही.
त्यामुळे थोडा विचार करतेय.... धागा काढण्याआधीच हा विचार करायला हवा होता माहीत आहे, केलादेखील होता, पण आता थोडी शंका येतीय....

पण त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्याबद्दलचे जनरल प्रतिसाद मला इथे नको होते.>>>
हे टाळणे शक्य नाही व योग्य देखील होणार नाही.

तू असा तिमाही धागा काढू शकशील का? जानेवारी ते मार्च: वाचलेली बुक्स, त्याचं रसग्रहण.
मग खाली लोकांनी काहीही प्रतिसाद दिले तरी तुझं रेकॉर्ड कीपिंग हेडरमध्येच झालेलं असेल. आणि वर्षभरात मिळून चारच धागे होतील.

इतरांचे प्रतिसाद नको असतील तर इथे टाकण्यापेक्षा फोन मध्ये टू डू ऍप्प मध्ये वगैरे टाकलेले बरे.
किंवा मायबोलीने परिवते धागा काढण्याची सोय द्यावी.

सनव,
चांगली कल्पना सुचवली आहे. विचार करते.

अज्ञातवासी,
लगेच धागा काढलादेखील! व्हेरी गुड!!

बाकी सगळ्यांना,
वेगवेगळ्या सुचवण्यांसाठी आभार. विचार करते.

१. बर्यापैकी वाचन असणार्यांना ही कल्पना उपयुक्त वाटतेय का? >>> अजिबात नाही.

२. काही इतर सुचवण्या आहेत का? >>>

<<< प्रतिसाद देणारी काही ठरावीक लोकच होती. >>>
यातच सर्व काही आले.

ज्याला कुणाला जाणून घ्यायचे आहे त्याने/तिने स्वतःची यादी स्वतः जवळ ठेवावी. ही यादी बनवण्यासाठी स्वतःचा ब्लॉग, कागद, फोन अ‍ॅप, गूगल डॉक, स्प्रेडशीट, गुडरीड्स सारख्या साईट असे अनेक पर्याय आहेत. कुणी कुठली आणि किती पुस्तके वाचली, एकच पुस्तक इतर किती धागाकर्यांच्या धाग्यात आहे वगैरे तपशील जाणून घेण्यात आम्हाला रुची नाही आणि त्यासाठी ५-५० धागे वाचत बसायची इच्छा नाही. दुसरे म्हणजे एक धागाकर्ता एकाच प्रकारची पुस्तके वाचण्याची शक्यता असते, उदा. अ‍ॅमीतै फक्त फिक्शनच वाचतात, नॉन-फिक्शन नाही.

याउलट "मी वाचलेले पुस्तक - २" मध्ये जास्त प्रतिसाद झाले तर भाग ३ सुरू करावा. "मी वाचलेले पुस्तक" हा अतिशय उत्तम धागा आहे, तिथे वेगवेगळ्या विषयावरील (मराठी आणि इंग्रजी सुद्धा) पुस्तकांची माहिती मिळते, चर्चा होते आणि it meets my needs.

उपाशी बोका ह्यांना पूर्ण अनुमोदन. वाचनासाठी असे वैयक्तिक धागे मायबोलीवर अजिबात काढू नयेत असं मला वाटतं:
१. मायबोली ही काही गूडरिड्स किंवा तत्सम वेबसाईट्स सारखी पुस्तकांसाठीची किंवा वाचनासाठीची खास वेबसाईट नाहीये. त्यामुळे इथे तिथल्यासारख्या सोई सुद्धा नाहीयेत. गुडरिड्सवर तुम्ही वैयक्तिक यादी ठेवली तरी त्यातून आपोआप या वर्षातली टॉप २० पुस्तके, ह्या प्रकारातली (विनोदी / थरार इत्यादी) टॉप २० पुस्तके अशी जेनरीक यादी तयार होऊ शकते. तसचं पुस्तकं टॅग केलेली असल्याने एखाद्या पुस्तकाचे वेगवेगळे रिव्हू एकाच ठिकाणी वाचता येऊ शकतात. मायबोलीवर ह्यातल्या कुठल्याही सुविधा नाहीत. त्यामुळे एकच पुस्तक १० धाग्यांवर येऊ शकते आणि पुस्तका बद्दल एकत्र चर्चा शक्य होणार नाही आणि माहितीच्या संकलनापेक्षा माहितीचा पसाराच जास्त होईल.
२. 'मी वाचलेलं पुस्तक' ह्या धाग्यावर लिहिणे किंवा एखाद्या विशिष्ठ पुस्तकाबद्दल चर्चा करायची असल्यास त्यासाठी धागा काढणे ह्या योग्य पद्धती आहेत असं मला वाटतं. नवीन पुस्तक वाचायची किंवा विकत घ्यायची असल्यास मी बर्‍याचदा मी वाचलेलं पुस्तक धागा चाळतो आणि त्यातून यादी करून दुकानात जातो.
३. माबोवर चित्रपट, मालिका, पुस्तके ह्यांचे वेगवेगळे धागे असताना (आणि ज्यात इंग्रजी पुस्तकं, मालिका, चित्रपट ह्यांबद्दल्ल लिहीण्याची बंदी नसताना) अ‍ॅमी ह्यांचा सगळ्याची मिसळ असलेला गेल्यावर्षीचा धागा ही खटकला होता.
४. वैयक्तिक याद्या करायच्या असतील तर त्यासाठी वर बरीच वेगळी माध्यमे आली आहेत ती वापरणं जास्त संयुक्तिक आहे. कारण तसेही बाकीच्यांचे प्रतिसाद नकोच आहेत आणि पुस्तकं शोधायची किंवा रेको हवे असतील तर मी नंबर २ मध्ये लिहिल्यामध्ल्या धाग्यांवरून मिळूच शकेल.
५. वर्षभरात किंवा क्वार्टरली किती पुस्तके वाचली ह्याबद्दल फ्लाँटच करायचं असेल तर वर्षाच्या शेवटी 'वाचू आनंदे' मध्ये धागा काढून किंवा मीवापूमध्ये पोस्ट लिहून ते करूच शकता. Happy

प्रतिसादासाठी धन्यवाद उपाशी बोका आणि पराग.
बऱ्यापैकी वाचन असणार्या गटात तुम्ही आहात हे बघून आश्चर्य वाटलं. दोघेही दुसऱ्या कोणत्यातरी आयडीने पुस्तकांबद्दल लिहित असता का? कारण मी तुमच्या लेखनात जाऊन पाहिले, मी वाचलेले पुस्तक - २ धाग्यावरचे गेल्या वर्षी आलेले प्रतिसाद वाचले तर तिथेही उबो अजिबात दिसले नाहीत, पराग यांनी ३ पुस्तकांबद्दल लिहलंय.

मी वाचलेले पुस्तक - २ धाग्यावर २०१३ पासून १५०० प्रतिसाद आलेत. त्यापैकी ९० (अबब) गेल्यावर्षीचे. त्यातही पुस्तकांच्या नावाचा उल्लेख असलेले कमी (२५-३०) आहेत, इतर चर्चाच जास्त दिसतेय. टवणे सर आणि जिद्दू या दोघांचे प्रतिसाद अधिक आहेत.
२०१९ मधे प्रकाशित झालेलं एकही पुस्तक तिथे नाही. तरीही तुमच्या गरजा तिथून भागताहेत तर आनंदच आहे.
===

अजून कोणा नियमीत वाचणाऱ्याच्या काही सुचवण्या आहेत का??

>>अजून कोणा नियमीत वाचणाऱ्याच्या काही सुचवण्या आहेत का??<<
हो. नेमका उद्देश काय आहे या धाग्यामागचा ते अजुन क्लियर झालेलं नाहि. म्हणजे एकिकडे तुम्ही म्हणतांय - "पण तरीही मला हा धागा 'पर्सनल ट्रॅकरसारखाच' हवा होता. इतर लोकं माझ्या पुस्तकांबद्दल बोलू शकतील किंवा खास मला आवडेल असं वाटल्याने एखादं पुस्तक सुचवू शकतील. पण त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्याबद्दलचे जनरल प्रतिसाद मला इथे नको होते.", पण माबोवर धागा उघडुन तुम्हाला व्हिजिबिलिटी सुद्धा हवी आहे (परागच्या भाषेत फ्लाँटिंग). तर नेमकं कारण काय आहे. हा प्रकार ताकाला जाउन भांडं लपवण्याचा नाहि अशी आशा करतो... Wink

तात्विक आणि तांत्रिक (फ्रॉम माबो स्टँडपॉइंट) दृष्ट्या उपाशी बोका आणि पराग यांच्या मताशी सहमत...

Pages