माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2020 - 18:52

सर्वसाधारणपणे लहान मुले रडत रडत जन्माला येतात, मी नाचत नाचत आलो...
अशी काहीतरी फुशारकी मी मारेन असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. किंबहुना नाचाचा "न" माझ्या अंगात कुठल्या वयात निपजला हा एक संशोधनाचा विषय ठरेल.

ज्या ज्युनिअर सिनिअर केजीच्या बालवाडी वयात आपण नाचाच्या नावावर काहीssही उड्या मारल्या तरी घरच्यांना काय आपला बाबू नाचतो म्हणून कौतुकच वाटते त्या वयात देखील मी हातपाय फारसे हलवल्याचे आठवत नाही. प्राथमिक शाळेतही शारीरीक शिक्षणाच्या नावाखाली आगे मूड, पीछे मूड म्हणत होणार्‍या कसरती आणि मूड मूड के ना देख, मूड मूड के वर होणारा नाच हे माझ्यासाठी एकसमानच होते.

पौगंडावस्थेत तर विचारू नका, माझे भलतेच गैरसमज होते. म्हणजे मुले नाचत असताना मुली त्यांना निरखून बघतात आणि आपण घाणेरडे नाचलो तर त्या आपल्यावर अन-ईंप्रेसड होतात अश्या अफवांचा मी शिकार होतो. आणि तुम्हाला तर अनुभवाने माहीत असेलच, की पौगंडावस्थेत मुली पटवण्याच्या पलीकडे आयुष्यात दुसरे काही ध्येय नसते. त्यामुळे नाचाला मी नेहमी ‘नाs’च म्हटले.

पुढे कधीतरी साक्षात्कार झाला की मुलींना नाचणारी नाही तर त्यांच्या तालावर नाचणारी मुले आवडतात आणि हळूहळू मी चारचौघांसारखे नाचायला सुरुवात केली. तरीही आपण नाचताना लोकं बघतात हा संकोच मनात असायचाच. त्यामुळे कधी खुलून असा नाच बाहेर आलाच नाही.

कालांतराने ही अवस्थाही गेली आणि मी विचार करू लागलो की आपल्याला काही सोनेनाणे चिकटलेले नाही, ना आपण मदनाचे पुतळे आहोत... (हो, अ‍ॅक्चुअली त्या वयात माझा हा देखील एक गैरसमज होता की आपण अगदीच सामान्य रुपाचे आहोत.) असो.., तर अश्यात आपला नाचही काही भारी नाही, तर आपल्याला कश्याला कोण नाचताना बघतेय. बघणार्‍यांसाठी आजूबाजूला बरेच काही छान छान उपलब्ध आहे. ते आपले डोळे तिथे शेकतील, आपण आपले एक कोपरा पकडून नाचावे हे उत्तम.

आणि बघता बघता चिमित्कार झाला. एवढे दिवस जखडून ठेवलेले अंग अचानक मोकळे झाले. ना कोणाकडे बघून नाचायचो, ना कोणाला दाखवायला नाचायचो, पण माझी स्वत:ची अशी नाचाची शैली लोकांना आवडू लागली. हा काहीतरी भन्नाट नाचतो असे कोणी म्हटले की ते कौतुकाने असायचे की माझी मजा घेण्यासाठी हे आधी कळून यायचे नाही. पण सगळेच का मजा घेतील? मग मला जाणवू लागले की आपण रुढ अर्थाने नर्तक वगैरे नसलो तरी एक मनोरंजक प्रकार नक्की आहोत.

हळूहळू नवरात्रीचे नऊ दिवस माझा नाच बघायला बिल्डींगच्या गॅलर्‍या भरू लागल्या. त्यांच्या वाढत्या अपेक्षा पुर्ण करायला मी उत्स्फुर्तपणे वेगवेगळ्या शैलीत नाचू लागलो. गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला तर ईतके झिंगल्यासारखे अतरंगी नाच नाचायचो की दुसरे दिवशी केवळ माझ्यामुळे सारी पोरं दारू पिऊन नाचत होती म्हणून बदनाम व्हायची. कॉलेजमध्येही वार्षिक स्नेहसंमेलनात डीजे गाजवून सोडायचो. एकदा असेच माझा डान्स बघून मला कॉलेजच्या एका ग्रूपने त्यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करायची ऑफर दिली. आणि तिथेच माझ्या गाठीशी जो काही थोडाफार अहंकार जमा झाला होता तो गळून पडला.

जेव्हा मी त्या पोरांसोबत प्रॅक्टीसला गेलो तेव्हा जाणवले की ते वन-टू-थ्री-फोर फाईव्ह-सिक्स-सेव्हन-एट म्हणत सराईतपणे एका लयीत नाचत होती. माझे अंग मात्र भलतीकडेच अन भलत्याच स्पीडने हलत होते. ना मी त्यांच्या स्टेप्सला स्टेप्स मॅच करू शकत होतो ना त्यांच्या नाचाचा टेंपो पकडू शकत होतो. हे स्टेजवर स्टेप्स बसवून नाचणे आपल्या कपातला चहा नाही हे मी समजून चुकलो. त्यांचा मग फारसा वेळ न खाता मी तिथून कल्टी मारली.

पुढे कॉलेज संपले. जॉब लागला. साधारण वर्षवर्ष भर दोन ठिकाणी जॉब केले. दोन्ही ठिकाणी एकेकदा पार्टी पिकनिकच्या निमित्ताने नाचायचा योग आला, तिथे नेहमीसारखे नाव काढले. पुढे मग सध्या आहे त्या कंपनीत जॉब लागला. कॉलेजचा व्रात्यपणा मागे सोडून आता जरा सिन्सिअर बेअरींग पकडले होते ज्याला साजेशी माझी नृत्यशैली नसल्याने ऑफिसच्या पार्टीत नाचापासून दूरच राहणे पसंद करू लागलो. अगदी सर्वात मोठ्या साहेबांनी जरी माझा हात खेचून मला नाचायला आत ओढले तरी एक हात वर करून गर्दीत शिरायचो, आणि मला नाचता येत नाही म्हणत दुसर्‍या अंगाने बाहेर पडायचो. पुढे माझ्यावर सनी देओलचा शिक्का बसून लोकांनी हात धरून खेचायचेही बंद केले.
घरी मात्र येता जाता, सकाळी ऑफिसची तयारी करताना, घरी आल्यावर कपडे बदलताना, किचनमध्ये लुडबूड करताना, रात्री बेडवर झोपायला जाताना जिथे संधी मिळेल तिथे सारी कामे सवयीने नाचाच्या स्टेप्समध्येच व्हायची. त्यामुळे नाचाशी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती.

अश्यातच गेले वर्षी ऑफिसने नवीन वर्षाच्या पार्टीत आपल्याच कर्मचार्‍यांचे नाचगाण्याचे कार्यक्रम करायचे ठरवले. आपण कधीकाळी कॉलेजला असताना स्टेजवर नाचायला कच खाल्लेली ही जुनी सल पुन्हा टोचू लागली. म्हटलं बस्स आता. ठरलं. नियतीने पुन्हा दिलेली ही संधी. हिची माती करायची नाही. आता नाचायचंच!

दिवस कमी होते, कामाचा लोड खूप होता, ग्रूप डान्स कसा बसवायचा, कोणी बसवायचा हा प्रश्नच होता. सोलो डान्सला परवानगी नव्हती. एकट्याने पाच मिनिटे स्टेजवर नाचायची हिंमतही नव्हती. अखेर जमवले. कसे जमवले, ते जमवताना काय धमाल केली, काय चुका केल्या, काय शिकलो, हे सारे अनुभव स्वतंत्र लेखाचा विषय होईल, त्यापेक्षा तुम्ही सरळ खालचा नाचच बघा.

मी नाचतो हाच तेव्हा ऑफिसमध्ये सर्वांसाठी धक्का होता. त्यामुळे या कार्यक्रमानंतर ऑफिसच्या कानाकोपरयात माझी किर्ती पसरली. ज्यांच्याशी कधी कामानिमित्त वा कुठल्याही निमित्ताने संबंध आला नव्हता त्यांच्यातही माझ्या नाचाने माझी ओळख बनवली.

....मग यावर्षी पुन्हा नाचायचे होते. गेल्यावेळचे चारातले दोन मित्र जॉब सोडून गेलेले. एक मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही दोघांनीच मग पुन्हा हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. गेल्यावेळचे आव्हान वेगळे होते. स्टेज फिअर घालवायचा होता. यावेळी लोकांनी आधीपासूनच धरलेल्या अपेक्षांना जागायचे होते. त्यात यावेळीही प्रॅक्टीसला कमी वेळ म्हणजे फक्त शनिवार रविवारच मिळाले. पण तरीही लोकांच्या अपेक्षांना जागलो. येणारया प्रतिक्रियांवरून तसे वाटले Happy

हा नाचही खालच्याच विडिओत बघा. दोन्ही नाच एकत्रच जोडले आहेत. यूट्यूबवर अपलोड करायला प्रॉब्लेम येत होता म्हणून मायबोलीकरांच्या फर्माईशीनुसार दुसरया एका साईटवर खास माबोकरांसाठीच अपलोड केला आहे. बघितल्यावर प्रतिसाद द्यायला विसरू नका. मिक्स गाण्यांवर सोलो नाच आहेत पण प्रत्येकाच्या नाचात माझा थोडाफार सहभाग राहील आणि माझी नाचाची तसेच चमकोगिरीची भूक भागेल याची काळजी मी घेतली आहे Happy त्यामुळे सारी गाणी, सारे नाच दहा मिनिटे वेळ काढून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुर्णच बघा Happy

____________________________

माझे दोन्ही नाच एकत्र ईथे बघू शकता...

https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup

____________________________

जो देखे उसका भी भला, जो ना देखे उसका भी भला Happy
मनापासून धन्यवाद,
ऋन्मेष !

अरे हो, शीर्षक माझ्या नाचाचा प्रवास असे दिलेय जरी, पण खरे तर नाचाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे Happy

ओळख टीप -
१) पहिल्या वर्षीच्या डान्स शो मध्ये खलीबली गाण्यावर नाचलेला मी आहे. पुढेही प्रत्येक गाण्यात अध्येमध्ये काळ्या कपड्यात दिसत राहीन.
२) यंदाच्या वर्षी बचना ए हसीनो वर नाचलेला मी आहे. ढगाला लागली कळवर शेवटी पुन्हा एंट्री आहे.

________

कोणाला वरच्या लिंकला प्रॉब्लेम येत असल्यास खालील लिंकवर बघू शकता -

गेल्या वर्षीचा नाच - यूट्यूबवर

https://www.YouTube.com/watch?v=RrY3DLDFRwQ

यंदाचा नाच - फेसबूकवर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1337425706426139&id=10000476...

____________

यंदा मागच्या डिजिटल लाईटसमुळे विडिओत चेहरे दिसणे त्रासदायक झाले. पण प्रत्यक्षात लाईव्ह बघणारयांना ते छान दिसत होते. फोटो व्यव्स्थित आले. तरी नाचणारा मीच होतो हा संशय कोणाला पडलाच तर दूर करायला फोटो टाकायचा चान्स घेतो Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यक्ती  हा शब्द स्त्रीलिंगी आहे >>>>

मी "तो" व्यक्ती हे इतके सर्रास ऐकले / वाचले आहे की "व्यक्ती" ने लिंगबदल केला आहे असे वाटून राहिलेय ♂♀

व्यक्ती  हा शब्द स्त्रीलिंगी आहे >>>>

मी "तो" व्यक्ती हे इतके सर्रास ऐकले / वाचले आहे की "व्यक्ती" ने लिंगबदल केला आहे असे वाटून राहिलेय ♂♀

पुढे माझ्यावर सनी देओलचा शिक्का बसून लोकांनी हात धरून खेचायचेही बंद केले.>>
सनी देओल: ते 'ढाई किलो का हात'वालेच ना?
म्हणजे मारलं बिरलं की काय तुम्ही नाचासाठी ओढणा-यांना? (गंमत हो. नाहीतर "नाचासाठी ओढणा-यांना मी दिलेला प्रसाद" असा नवीन धागा वाचायला मिळेल आम्हाला)
बाकी तुमचा नृत्याविष्कार मस्तच.

आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांचे आभार.
Srd यांनी विडिओ अपलोड शेअर करणेबाबत मदत केली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
पाफा यांनी ईथे हा विडिओ शेअर करायची विनंती केली आणि ज्यांनी ती उचलून धरली त्या सर्वांचेही आभार Happy

हो. ऋन्मेष या आयडीमागची लिंगनिरपेक्ष व्यक्ती हीच आहे. पण अजूनपर्यंत भारतीय समाजात ईतकी मोठी क्रांती झाली नाही की एखाद्या आयडीमागे रोबोट असेल. सर्व आयडींमागे व्यक्तीच असाव्यात. त्यामुळे हा फार चर्चेचा विषय ठरू नये.

नाचात सुधारणा होण्याचा स्कोप आहे आणि तो आयुष्याच्या अखेरीपर्यंत राहावा. फक्त ईथून प्रत्येकवेळी पुढे एक एक पायरी चढावे. काहीतरी नवीन करावे ईतकीच ईच्छा आहे.

बाकी नाच शिकण्याची तुर्तास तरी ईच्छा नाही. मात्र या नाचाच्या निमित्ताने जाणवले की आपला फिटनेस म्हणावा तसा नाहीये. अर्त्गात याला जबाबदार माझा पोटाचा आतड्याचा आजार crohns disease हा सुद्धा आहे. पण पुढे नाचायचे असेल तर फिटनेस टिकवणे गरजेचे. किमान ५० व्या वर्षी मी ज्या कुठल्या कंपनीत असेल तिथे वा आणखी कुठे असे स्टेजवर नाचावे आणि ते देखील एनर्जीशी कॉम्प्रोमाईज न करता हेच ध्येय आहे.

आता थोडे ग्रूप आणि नाचाबद्दल -

गेल्या वर्षी आम्ही नाचणारे चौघे होतो. आम्ही तीनही मित्र आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर काही नाचणार होतो. पुढाकार मीच घेतला होता. माझे गाणे मीच निवडले. माझा खलीबली गाण्यावरचा नाच घरच्याघरी मीच बसवला. ते सोपे पडले कारण जे जमते तेच नाचलो.
मल्हारी नाचणारया मित्राच्या शेजारी प्रोफेशनल कोरीओग्राफर राहते. तिने त्याचा नाच बसवला.
मैत्रीण क्लासला जाणारी होती. तिचा कंमरीया नाचाच्या स्टेप्स रेडी होत्या. ती तेच नाचली. ग्रूप डान्सच्या स्टेप्स सोलोला साध्या वाटल्या असाव्यात. तसेच ऑफिस क्राऊडने ज्या शिट्ट्या वगैरे वाजवायला सुरुवात केली ते तिने नजर खालीच घालून नाचणे पसंद केले.

यावेळी दोन्ही मित्र गेले. आणि ही मैत्रीणही मागच्या अनुभवाने नाचायला तयार नव्हती. मी दुसरा ग्रूप बनवायचा प्रयत्न केला पण तो ऐनवेळी गळपटला. शुक्रवारी ऑडिशन होते आणि मंगळवारी शो. ऑडीशनला दखवायला काहीच नव्हते. शेवटी विनंती करून शनिवार रविवारमध्ये काहीतरी करतो असे आश्वासन दिले. मैत्रीणीला गळ घातली. थोडावेळ मी सुद्धा तिच्यासोबत नाचायचे ठरवले. शनिवार रविवार माझा मी घरी बचना ए हसीनोवर नाच बसवला. तिचा क्लासमधील डान्स रेडीच होता. सोमवारी ऑफिसला आल्यावर मी तिच्यासोबत आमच्या कॉमन स्टेप्स बसवल्या आणि मंगळवारी परफॉर्म केले.

शुक्रवारी असे वाटलेले की यंदा नुसते ऑडीयन्समध्ये बसून खुर्च्या गरम करायच्या आहेत पण मंगळवारी आम्ही करून दाखवले ते पाहता जे काही केले त्यात समाधानी आहोतच. पण तरीही अजून दोनचार दिवस मी आधी प्रॅक्टीस केली असती तर अजून थोडे वाढवत, अजून थोडे सराईतपणे, कंट्रोलमध्ये नाचता आले अस्स्ते... आता पुढच्यावेळी Happy

शनिवार रविवार माझा मी घरी बचना ए हसीनोवर नाच बसवला. तिचा क्लासमधील डान्स रेडीच होता. सोमवारी ऑफिसला आल्यावर मी तिच्यासोबत आमच्या कॉमन स्टेप्स बसवल्या आणि मंगळवारी परफॉर्म केले.>>> इतक्या कमी वेळेतही छान नाच बसवला.

ओफिसमध्ये धाडस करून पुढे येऊन कला सादर करणारे कमीच असतात,त्यातही नाच नाहीच. त्यात मुली आणखीच मागे राहतात. त्यातही पब्लिकला हवं असलेल्या 'ढगाला लागली गळं' गाण्यासाठी अपेक्षा अधिकच सवंग होतात.
उत्तेजन आणि स्वत:चा उत्साह हवाच. काहींना तर शेरेबाजीचीच आवड असते.

एकाचा उत्साह आणखी दहांना उद्युक्त करतो.

ऋ भाऊ,
मी गंमतीत म्हणालो होतो. पण खरे धारिष्ट्य तुमचे पडदा उचलायचे. बाकी तुमचे नृत्यकौशल्य उत्तमच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
आम्ही कायमच पाठीशी आहोत.

>>मैत्रीण क्लासला जाणारी होती. तिचा कंमरीया नाचाच्या स्टेप्स रेडी होत्या. ती तेच नाचली. <<
मिनिमलिस्ट डँसिंगचं एक शोधुनहि न सापडणारं उदाहरण, अगदि या गाण्याच्या तोडिस तोड... Lol

तिथे विडीओ बघुन सांगितलेलंच पुन्हा सांगते.
अशा डिस्को लाईट्समुळे नाच बघ्ताना त्रास होतो.
समोरासमोर आणि विडीऑ बघ्ताना पण.
आणि मेन म्हणजे नाचाची मजा येत नाही. स्टेप्स, चेहर्‍याचे एक्सप्रेशन्स दिसत नाहीत. हे स्वानुभवावरुन सांगतेय.
मी माझ्या मुलीचा आणि तिच्या मैत्रीणींचा नाच बसवलेला. तेव्हा अशा लाईट्समुळे हिरमोड झाला होता.
पुढच्या वेळी लक्षात ठेव नाच बसवताना.
तुझा नाच छानच आहे.
पुढच्या वेळी रीतीक रोशन मॅशप कर.

आणि मेन म्हणजे नाचाची मजा येत नाही. स्टेप्स, चेहर्‍याचे एक्सप्रेशन्स दिसत नाहीत>>>>>+१.
त्यामुळे विडिओ पळवत पाहिला.

सस्मित, ह्ममम यावर्षी त्या डिजिटल लाईटने विडिओत प्रोब्ब्लेम केला खरे. पण लाईव्ह बघणारयांनी तर ते एंजॉय केले म्हणतात. आणि एक्स्प्रेशन म्हणाल तर ते सुद्धा दिसले असावेत. कारण बरेच जणांनी मला नंतर एक्स्प्रेशन्सबद्दल कॉम्प्लिमेण्ट दिलेत.
अर्थात माझीही ईच्छा आहे की पुढच्यावेळी लाईटसचा भडीमार नको. पण ऑर्गनाईझरना ते आता पटवून द्यावे लागेल. लाईव्हमध्ये लोकांनी एंजॉय केले असेल तर ऐकतील का माझे याची शंका आहे. किंवा निदान आमचा डान्स तरी तसा नको म्हणायला हवे.

बाई दवे, त्या मागच्या वर्षीच्या डान्समध्ये जी प्रकाशयोजना होती ती ओके होती का?

राज तो डान्स भारी होता.. पुढच्यावेळी मला ग्रूप शोधायचे वांधे झाले तर मिळेल त्यांना जमवून यावर वा असे नाचता येईल.. प्लस माझे सोलो वगैरे.. अर्थात पुढच्यावेळी तर कश्यावर नाचावे आणि कसे नाचावे यावर रीत्सर धागाच काढेन.. माबोवर बहुधा नाचाच्या डिस्कशनला एकही धागा नसावा

सोनाली हो, दोन्ही वेळा अल्पावधीत जमले कारण प्रत्येकाचा सोलो वेगळा होता. कॉमन स्टेप्स कमी. त्यात डान्सक्लास वाल्या मैत्रीणीचा बसलेला रेडी होता.
माझेही कोणाच्या मदतीशिवाय लवकर बसणे शक्य झाले ते कसे तर आधी मी गाणे लाऊन जे उत्स्फुर्तपणे अंगातून येईल ते नाचलो. त्याचा विडिओ काढून जे चांगले जमले दिसतेय ते ठेवले आणि उरलेल्या स्टेप्स बसवायलाच काय ती मेहनत घेतली.

Srd, हो. ते ढगाला लागली कळ गाणे मुलीने ऑफिस क्राऊड समोर नाचणे हे खरे तर अवघडच होते. त्यातही ते तुझं नि माझे जुळं या लाईनची लोकं वाट बघणार.. त्यात ती मुलगी आधीच गेल्यावेळीही शिट्ट्यांनी बावरलेली. तरीही मी तिला धीर द्यायला म्हणालो की लक्ष देऊ नकोस. त्यावेळी मी लोकांचा फोकस माझ्यावर राहील हे बघतो.
तिचे नाचायला तयार होणे माझ्यासाठी गरजेचे होते कारण सोलो डान्सला परमिशन नव्हती. मग मलाही परफॉर्म करता आले नसते.
आता पुढच्यावेळी वेळ काढून दोघांचा कॉमन डान्स जास्त बसवेन जेणे करून तिचा एकटे नाचतानाचा अवघडलेपणा जाईल.

बाई दवे, त्या मागच्या वर्षीच्या डान्समध्ये जी प्रकाशयोजना होती ती ओके होती का?>>>>>>>>>>>> दवे बाईंना विचारतोयस तरी मीच सांगते की तोही विडीओ असाच आहे. लाईट् डोळ्यावर येताहेत.
आणि पब्लिक एन्जॉय करतच रे. बीट्स म्युझिक माहोलमुळे.

अहो एंजॉय केले म्हणजे दिसले त्यांना एक्स्प्रेशन वगैरे.. विडिओ काढताना त्यात लाईट जितकी स्प्रेड होतेय तितका प्रॉब्लेम प्रत्यक्षात होत नसावा. येनी वेज लेट्स सी पुढच्यावेळी काय ठरतेय. मी कंपनीला विडिओशूट करायचीही गळ टाकणार आहे. भले एखादा चांगला मोबाईल स्टॅण्डला लाऊनच करा. पण जवळून योग्य ॲंगलने तरी होईल.

छान नाचलाएस ऋन्मेssष,  तुझं नाव जसंच्या तसं लिहीणं कसरतच आहे रे.

नवीन Submitted by धनुडी on 6 January, 2020 - 18:38
>>>
मग त्याचे ओरिजिनल नाव लिहा हाकानाका
Rofl

एक्स्प्रेशन प्लेझंट आहेतच. दिसायलाही शाहरुख खान आहात Happy कोणाच्या दिसण्यावर चांगली अथवा वाईट टिप्पणी करणे हे शिष्टाचारास धरुन नसते. आणि तरीही ..... दिसायला तुम्ही खूप उजवे आहात.
____________
नाचाचा व्हिडिओ मात्र देवकी यांनी लिहील्याप्रमाणे, मी ही पळवला. फार लांबून घेतला होता. व पेशन्सही नव्हता.

सामो धन्यवाद. दिसण्यावरून चांगली टिप्पणी देखील करू नये हे मला आजच समजले Happy बाकी तुलना नक्कीच करू नये. वा एखाद्या ग्रूपमधील एखाद्याला दिसायला छान म्हणत ईतरांना दिसण्यात कमी दाखवू नये.. प्रत्येक व्यक्तीची तुलना त्याच व्यक्तीशी करावी आणि ती ज्या दिवशी नेहमीपेक्षा छान फ्रेश दिसत असेल वा छान कपड्यात असेल तर तिला आवर्जून सांगावे. मी तर तोण्डओळख असलेली एखादी महिला सहकर्मचारी जरी ऑफिसमध्ये येताजाता पास झाली तर सवयीने म्हणतो, वा मॅडम आज छान दिसत आहात.. एखाद्याचा दिवस छान जातो Happy
असो आपल्या कॉमेंटबद्दल धन्यवाद. माझा आजचा दिवस छान जाईल Happy

>>>>दिसण्यावरून चांगली टिप्पणी देखील करू नये हे मला आजच समजले>>> नाही माझी चूक झाली. अमेरिकेमध्ये एक अलिखित शिष्टाचार आहे तो म्हणजे जाड झालीस/बारीक झालीस किंव झालास अशी शरीरयष्टीवरुन टिप्पणी करु नये. माझा गोंधळ झाला . छान दिसताय म्हणणे अगदी पळेल Happy

मग त्याचे ओरिजिनल नाव लिहा हाकानाका>>>
तुऋ ! Lol

<<<तुलना नक्कीच करू नये. वा एखाद्या ग्रूपमधील एखाद्याला दिसायला छान म्हणत ईतरांना दिसण्यात कमी दाखवू नये.. >>>+७८६
पण तरीही अपवाद म्हणून Wink
शाहरुखपेक्षा उजवे दिसता आहात.

खरं सांगायचं तर ऋन्मेषच्या नाचत कोणालाही इंटरेस्ट नाही. ऋन्मेष या आयडीमागे कोण व्यक्ती आहे ते सगळ्यांना पाहायचं होतं.

बोकलत ते बरेचजणांना माहिती होतं.
फ्रिज घेतला हे सिद्ध करून दाखवायला त्यांनी फ्रिजवर माठ/माठाचे झाकण ठेवलेला फोटो टाकला होता.
नाचाबाबत कुठली कोलांटउडी घेतात हे बघायचं होतं.

कोण आहे ही व्यक्ती?
>>>
खुद्द शाहरूख खान ! खान ! खान !

जोक्स द अपार्ट. विडिओ दिलाय, नाचतानाचे स्प्ष्ट दिसतील असे फोटो टाकलेत. क्लोज अप मध्ये डिपी लावला आहे. त्यात जी आहे तीच व्यक्ती .. फक्त ती ऋन्मेष ईतकी फेमस नाही त्यामुळे कोणाला कळलं न कळलं तरी काही फरक पडत नव्हताच.. पण एक हुमायून नेचर असते ना. कोणी काय लपवले आहे तर तेच जाणून घेण्यात लोकांना जास्त रस असतो. मग एकदा कळले तर त्या माहितीचा त्यांना काही खास उपयोग नसतो Happy

ऋ+१

आत्मा नश्र्वर असतो, इच्छीत कार्य झाले की तो देहत्याग करून नवीन रूपात जन्म घेतो. - आध्यात्म.

तसेच,

गेली कित्येक वर्षं इन्स्पेक्टर महेश जाधव एका सिक्रेट मिशन वर आहेत.
बाबा चमत्कारने खुलेआम मृत्युंजय मंत्र "झपाटलेला-१" मधे सांगितल्यापासून माबो डू आयडींनी पछाडलेली आहे.

ऋ तुझे बरोबर आहे,पण मला तो व्यक्ती बाबतचा प्रतिसाद समजला नाही,मला वाटले दुसऱ्या धाग्यावर याबाबत चर्चा झाली असावी आणि त्या अनुषंगाने हा संदर्भ असावा म्हणून मी विचारले फक्त,कारण तसेही मी एकाही माबोकराला वैयक्तिक रित्या ओळखत नाही त्यामुळे तो प्रश्नच नाहीये

Pages