दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

दिगंतराचे प्रवासी... (२०१९)

‘दिगंतराचे प्रवासी’ ही माझी ऑनलाईन असलेली डायरी आहे. रोजनिशी आहे. येथे मी वेळोवेळी पाहीलेल्या पक्ष्यांची, त्यांच्या सवयींची, काही खास प्रसंगांची किंवा मला महत्वाच्या वाटलेल्या घटनांची नोंद करत आहे. वर्षा अखेरीस मला या रोजनिशीमुळे एखाद्या पक्षाचा व्यवस्थित मागोवा घेता येईल. पुढच्या वर्षीच्या पक्षीनिरीक्षणासाठी काही महत्वाचे मागोवे मिळतील. पक्ष्यांच्या नोंदवलेल्या अधिवासामुळे, त्यांच्या विणीच्या हंगामामुळे, विणीच्या हंगामात त्यांच्यात होणाऱ्या बदलांमुळे, स्थलांतराच्या नोंदीमुळे मला खुप मार्गदर्शन मिळेल असे वाटते आहे. या वर्षी केलेल्या नोंदींमध्ये आणि पुढच्या वर्षीच्या नोंदींमध्ये असलेल्या फरकामुळे काही गोष्टी नव्याने समजण्याचीही शक्यता आहे. एकूण या नोंदींमुळे माझ्या माहितीत नक्कीच मोलाची भर पडेल.

लॅपटॉपवर अनेक डायरी ऍप आहेत पण मी मायबोलीवर सहज सुरु केलेला २०१९ चा ‘दिगंतराचे प्रवासी’ हा धागा पुर्ण व सलग वाचला तेंव्हा जाणवले की ऍपपेक्षा या धाग्याच्या प्रतिसादस्वरुपात असलेल्या नोंदी जास्त स्पष्टपणे डोळ्यासमोर चित्र उभे करत आहेत. त्यामुळे २०२० या वर्षीचा ‘दिगंतराचे प्रवासी’ या नावानेच पुन्हा दुसरा धागा म्हणजेच माझी ‘रोजनिशी’ सुरु करत आहे. येथे त्या त्या तारखेला पाहीलेल्या पक्ष्यांचे फोटो व इतर माहिती यांची नोंद मी करणार आहे. वेळेच्या उपलब्धतेनुसार नोंदीची तारीख एक दोन दिवस मागे पुढेही होऊ शकते.

— हरिहर (शाली)

चित्रबलाक
ID: Painted Stork (Mycteria leucocephala)
Size: 93cm
Loc: Bhigwan (8 Jan 20)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैना, साळुंकी, शाळू
(संस्कृत नाव : कलहप्रिया, सारिका)
----------------------
ID : Common Myna
Scientific name: Acridotheres tristis
Size : 23 cm, Mass : Female: 120 – 140 g (Adult), Male: 110 g (Adult)
LOC : Devrai
DOP : 1 Feb 20 (7:15 am)

फारच सुंदर फोटो
गप्पीदासाचा तारेवरील फोटो मस्त आलाय
पिसांचे व वेड्या राघू च्या चोचीचे फोटो, निरीक्षण मस्तच
तसेच या वेड्या राघूची चोच मला वाटत होती तशी स्कलच्या बाहेर उघडत नाही तर ती खुप खोलवर उघडते हे या फोटोमुळे लक्षात आले. >>>>>मलाही आत्ताच हे लक्षात आलं
अङ्गारक, कलहप्रिया.......काय सुंदर नावं

अङ्गारक, कलहप्रिया.......काय सुंदर नावं...... +१.

अहा, सारिका म्हणजे मैना होय!
चंद्रिके ग सारिके ग कुशल आहे ना!......गौरी देशपांडे आठवल्या.

पक्षांचे इतके बारीक निरीक्षण? हे सोडून उरलेला वेळ कसा घालवता?गम्मत केली.दोन पाने वाचता वाचता,व पक्षांचे फोटो बघताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.तुमच्या पेशन्सचे कौतुक किंवा( सगळ्याच पक्षी प्रेमींचे )कसे करावे?

टिटवी
संस्कृत: ताम्रमुखी टिट्टिभ
-----------------------------
Name: Red-wattled Lapwing (Large Plover)
Scientific name: Vanellus indicus
Size: 33 cm, Mass: 180 g
LOC: Devrai
DOP: 3 Feb 20 (7:30 am)

देवकी, ऋतुराज, निर्झरा, समई थँक्यू!

हे सोडून उरलेला वेळ कसा घालवता? Lol
सकाळी ३:३० - ४ वाजता उठायची सवय आहे. त्यातले दोन तास जरी या छंदाला दिले तरी पुरेसे होतात. बहुतेक फोटोंखाली वेळ दिलेली आहे. साधारण ७ ते ८:३० दरम्यान सगळे फोटो काढलेले आहेत.

खंड्या, धिवर
संस्कृत नाव : चंद्रकांत मीनरंक
—————
ID : White-throated Kingfisher
Scientific name: Halcyon smyrnensis
Size : 19 - 21 cm, Mass : 66 - 81 g
LOC : Devrai
DOP : 4 Feb 20 (7:15 am)

.

वा! काय मस्त फोटो आहे धीवरचा.

तळ्याकाठी गाती लाटा
लाटांवर उभे झाड
झाडावर धीवराची हाले चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट.....

बालभारती पाचवीला(?) होती कविता.

मस्त कविता आहे. आम्हाला मात्र नव्हती ही. नेटवर पुर्ण कविता मिळाली. सुरेख वर्णन केलय.

तळ्याकाठी गाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.

शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.

जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.

गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.

चोच मस्तच आलीये, ह्याची कर्कश्श शीळ अगदी टिपिकल.
ह्यालाच कॉमन किंगफिशर म्हटलं पाहिजे
कविता पण भारीच.... सुंदर वर्णन

मीनरंक
>> मीन म्हणजे मासे अन रंक म्हणजे गरीब!

नेमकी फोड जमत नाहीये!

नेमकी फोड जमत नाहीये!>>>> मी देखील अशीच फोड करुन पाहीली पण जमलं नाही. एक मित्र म्हणाला की रंकचा दुसरा अर्थ रंग असा होतो. माशाच्या रंगाचा म्हणजे मीनरंक. पण तेही काही पटले नाही. पण हे चंद्रकांत मिनरंक हे नाव मला आवडले.

राखी तित्तीर, चितूर, तित्तूर, चित्तर
---------------------
आज सकाळी पार्कींगमधे असताना हे दोघे फ्रँकी दिसले. रोज असतात पण कधी स्पष्ट दिसत नाहीत. कधी कधी कंपाऊंडच्या भिंतीवर येऊन बसतात. मी एक ऑब्झर्व्ह केलय की हे उन्हात बसत नाहीत. भिंतीवर जेथे उन व सावलीची रेषा असते तेथे हे सावलीत बसतात. आज जरा जवळ आले होते. पण सावलीत बसल्यामुळे आजही फोटो ठिक नाही मिळाले. त्यांचे पंख साफ करणे मात्र व्यवस्थित पहाता आले.
----------------------
ID : Grey Francolin (Grey Partridge)
Scientific name: Francolinus pondicerianus
Size : 33 cm, Mass : 330 g
LOC : Devrai
DOP : 5 Feb 20 (7:45 am)
1

2

3

4

खुप दिवस हा धागा बंद आहे का ? (म्हणजे लॉकडाऊन पुर्वीपासून) मध्यंतरी बरेच दिवस मायबोलीवर यायला जमले नाही त्यात हरवला धागा असेच वाटले.

किती दिवसांत वर आलेला नाही.. त्यामुळे सापडतच नव्हता.. शेवटी आज शोधून काढ्ला! आता निवडक १०तच नोंदवला आहे तेंव्हा चिंता नाही Lol

मला खूपवेळा आठवण येते या धाग्याची.. कधीही आलं आणि कुठुनही वाचलं तरी प्रसंन्न वाटते!

ओह ते गेले होते का.. नका हो जाऊ हरिहरजी! तुमचे असंख्य चाहते आहेत या उपक्रमाचे.. बाकी कडे दुर्लक्ष करा ही विनंती! काय झाले आहे मला माहित नाही कारण मी इथे रोज नाही येत. पण वेळ मिळाला की हमखास चक्कर असतेच! म्हणून विनंती करते.. तुमचा उपक्रम आणि धागा दोन्ही सुरु ठेवावे!

Pages