हैदराबाद- महिला अत्याचार मानसिकता.

Submitted by प्रशि_क on 1 December, 2019 - 00:01

नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.

मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.

काही नियमित मुद्दे वगळता, जसे की लैंगिक दमन (sexual repression), पुरुषप्रधान संस्कृती हे बऱ्याच वेळी चर्चिले जाणारे मुद्दे सोडून एक महत्त्वाचा मुद्दा दिसला.

एका यूजरचे म्हणणे होते की दक्षिण आशियात पुरुष हे मोठाले ग्रुप करून राहतात, म्हणजे कुठे जायचे असेल, मित्रांसोबत भटकायचे असेल तर चांगला ५-७ जणांचा ग्रुप घेऊन बाहेर पडतात, याऊलट व्हाईट लोकांचे आहे ते बाहेर निघालेच तर एक्कट-दुक्कट मित्रांसोबत निघतात आणि कुठे रेंगाळत बसनेही टाळतात, त्यामुळे अमेरिकेत म्हणे महिला अत्याचार कमी होतात, आणि कोणावर बलात्कार झाला तर तो एका व्यक्तिद्वारे केला जातो, सामूहिक बलात्कार घडत नाहीत.

कदाचित वरील तर्कात तथ्यही आहे. एकटा माणूस असला की त्याला तेवढी हिंमत वाटत नाही जेवढी त्याला ४-५ किंवा मोठाल्या समुहात असतांना वाटते. गावात पान-टपरीवर वगैरे असे मित्रांचे समूह सर्रास दिसून येतात; कॉलेजात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल-टवाळी करतांना,झुरके ओढतांना दिसतात. कदाचित ही अशी मानसिकता असणाऱ्यांची प्राथमिक किंवा शक्यतो harmless stage असावी.

पण पुढे चालून extreme stage मधली लोकं कायद्याचा वचका कमी झाला किंवा थोडी हिंमत वाढली की अशी कृत्य करत असावी.

तरी इथे या विषयी चर्चा झालेली आवडेल, अनेक माबोकर भारताबाहेर राहतात त्यांचे यावरचे मतही जाणून घ्यायला आवडेल तसेच तुम्ही राहत असलेल्या देशात या विषयीची मानसिकता काय? ई.

Group content visibility: 
Use group defaults

थांबा. व्हिक्टिम ब्लेमिंगसाठी काही ट्विस्ट मिळतेय का? दुसर्‍या एखाद्या (भाजपेतर शासित) राज्यात अशी काही घटना घडतेय का? किंवा आरोपी मुस्लिम असलेली घटना कुठे दिसतेय का? योगी आणि हिं दू धर्माला बदनाम करण्यासाठी यात काही आंतरराष्ट्रीय कटकारस्थान आहे का?
असलं काही मिळालं की मग आम्ही बोलू. ओप इंडिया, स्वराज्, व्हॉट्स अ‍ॅप इथे अजून याबद्दल काहीच सूचना आलेल्या नाहीत.

हा आणि कुठल्याही राज्यात, कुठल्याही वयाच्या, जातीधर्माच्या महिलेवर झालेला अत्याचार निषेधार्हच आहे.

अशा गुन्हेगाराला शिवरायांनी दिलेली शिक्षा आदर्श होती मग त्याचे वय, जातधर्म, आर्थिक व सामाजिक स्थान काहीही असो.

अत्यंत अमानुष घटना, निर्भया सारखीच. आणि पोलिसांची उदासीनता बघा.
हैद्राबाद केस मध्ये पोलिसांनी परस्पर न्याय करून जनतेचा विश्वास संपादन केला होता आणि गुन्हेगारांना धडकी बसवली होती ना?

>>>हैद्राबादला आरोपी कोणत्या वर्गातले होते, व्हिक्टिम कोणत्या वर्गातली होती?

त्या आरोपींचे फोटो आल्यावर सर्रास 'तोंडावरून लायकी कळते यांची' असं कॅज्युअली म्हणत होते लोक.

स्वरा भास्कर ने बकरवाल मुलीच्या बलात्काराबद्दल I am ashamed म्हणून पाटी धरली की whataboutri करत 'यावेळेस का नाही बोलला' वैगेरे बडबड हि टॉक्सिक भक्तमंडळी सुरु करतात, आणि इतर केसेस मध्ये आरोपीचे समर्थन आणि संरक्षण होत नव्हते हे सोयीस्करपणे विसरतात.

कुणीतरी चंद्रमुखी म्हणून भाजपची स्त्री बोलली , कशाला ती संध्याकाळी बाहेर पडली , म्हणूनच तिच्यावर अतिप्रसंग गुदरला

---

हिचेही नाव चंद्रमुखीऐवजी सूर्यमुखी हवे होते का ?

>>हैद्राबादला आरोपी कोणत्या वर्गातले होते, व्हिक्टिम कोणत्या वर्गातली होती?<<

हीच मानसिकता वाईट आहे.... जिथे तिथे जातपात, धर्म, वर्ग, वर्ण वगैरे बघणे!

<< >>हैद्राबादला आरोपी कोणत्या वर्गातले होते, व्हिक्टिम कोणत्या वर्गातली होती?<<

हीच मानसिकता वाईट आहे.... जिथे तिथे जातपात, धर्म, वर्ग, वर्ण वगैरे बघणे!
>>

------- अत्याचार ग्रस्त महिलेच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याचे आणि प्रकरण दाबण्याचे कारण काय?

दिल्ली मधे निर्भया प्रकरणात सर्व देश एकत्र आला होता, पण हाथरस घटना घडल्यावर दहा दिवस मिडिआ तसेच सतर्क जनता आणि कर्त्यव्य कठोर अजय भिस्त सरकार शांत होते.

कोर्टाने फटका मारल्यावरच अजय भिस्त यांना जाग येते.

महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाविकासआघाडीचे कॅबिनेट मंत्री(सामाजिक न्याय) धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही बलात्काराचा आरोप झाला आहे.
मंत्री मुंडेना एक पत्नी, अजून एक पत्नी आणि तिच्यापासून दोन मुलं प्लस तीन फ्रॉम पहिली पत्नी अशी टोटल पाच मुलं आहेत. बलात्काराचा आरोप दुसरी पत्नीच्या बहिणीने केला आहे.
ही सर्व माहिती निवडणुकीचा फॉर्म भरताना दिली होती का हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुरोगामी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकार समर्थकांनी सुरू केलेलं victim blaming मायबोलीसकट सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
तरी योगी आदित्यनाथ, पीएम मोदी, व्हीपी कमला ह्यारिस आणि रतन टाटा यांनी सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारावी व राजीनामे द्यावे अन्यथा इथे काही संवेदनशील स्त्रीवादी पुरोगामी पुरुषांच्या प्रतिभेला पाझर फुटून ते बलात्काराबद्दल आणि पुरोगामी स्त्रीवादाबद्दल जळजळीत पोस्टी टाकतील गप्प बसून पॉपकॉर्न खात victim blaming ची मजा घेतील।

काही असंवेदनशील अधोगामी पुरुषांच्या/स्त्रियांच्या प्रतिभेला पाझर फुटून ते बलात्काराबद्दल आणि पुरोगामी स्त्रीवादाबद्दल कडवट पोस्टी टाकतील गप्प बसून पॉपकॉर्न खात पुरोगामी बॅशिंग ची मजा घेतील।

<थांबा. व्हिक्टिम ब्लेमिंगसाठी काही ट्विस्ट मिळतेय का? दुसर्‍या एखाद्या (भाजपेतर शासित) राज्यात अशी काही घटना घडतेय का? किंवा आरोपी मुस्लिम असलेली घटना कुठे दिसतेय का? योगी आणि हिं दू धर्माला बदनाम करण्यासाठी यात काही आंतरराष्ट्रीय कटकारस्थान आहे का?
असलं काही मिळालं की मग आम्ही बोलू >

माझी ७ जानेवारीची कमेंट सिद्ध झाली. आधी नागपूर इस्पितळ मधील अर्भकांचे अपमृत्यू आणि आता धनंजय मुंडे प्रकरण झाल्यावर अमेरिकेत पुरोगामी आणि भारतात हिंदुत्ववादी असलेल्यांना कंठ फुटला.

<ही सर्व माहिती निवडणुकीचा फॉर्म भरताना दिली होती का हाही प्रश्न उपस्थित झाला आहे >

हा प्रश्न धर्मेंद्र यांच्याबद्दल उपस्थित झाला होता का?

हाथरस प्रकरणी केलेल्या व्हिक्टिम ब्लेमिंगचं प्रायश्चित्त कोणत्या नदीत डुबकी मारून घेतलं?

बाकी, धनंजय मुंडे आपल्यावर बलात्कार करत होते हे त्या महिलेला कितीही वर्षांनी उमगलेलं असू दे, या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हायलाच हवी.

<हीच मानसिकता वाईट आहे.... जिथे तिथे जातपात, धर्म, वर्ग, वर्ण वगैरे बघणे! ?

बघा की. निर्भया मध्यमवर्गीय. हैद्राबादमधली दुर्दैवी स्त्री मध्यमवर्गीय. दोघीही शिक्षित. शहरी , उच्च जातीतल्या. तेच उन्नाव, हाथरस, बदायूं प्रकरणातल्या स्त्रिया अशिक्षित, ग्रामीण, खालच्या जातीतल्या. मीडिया, सोशल मीडिया, अगदी महिला आयोग यांना एका प्रकारच्या केसेसमध्ये घसा सुकेतो ओरडता येतं. दुसर्‍या प्रकारच्या केसेसमध्ये मूगडाळीचा हलवा चोपून गप्प बसतात.
ताज्या पोस्टमध्येही हाच बायस दिसतोय.

कमला हॅरिसना आपलंसं करून घेण्याआधी हा व्हिडियो बघून घ्या.

अर्थात अमेरिकेत पुरोगामी , लिबरल, सेक्युलर, अल्पसंख्यांकहक्कसमर्थक असलेले भारतात याच्या नेमके उलट असतात यात काही नवल वाटत नाही. पण असं करताना आपण मांडत असलेल्या मतांचं मूल्य आपणच कमी करतो हे लक्षात घ्यावं. यापुढे प्रत्येक वेळी प्रतिवाद करताना या गोष्टीची आथवण करून देण्यात येईल..

हिपोक्रिसी की भी सीमा होती है.


दुसर्‍या प्रकारच्या केसेसमध्ये मूगडाळीचा हलवा चोपून गप्प बसतात.

नुसत्या गप बसत नाहीत तर त्यावर विनोद करून हसतात . इथल्याच काही स्त्रीवादी आयडीचे ( मामी , साधना इ. ) हाथरस धाग्यावरचे प्रतिसाद बघा. ढोंगीपणाचा कळस.

मी कोणत्याच घटनेवर धागा काढून तो 'चालवत' बसत नाही.

विशिष्ट घटनांवर धागा काढून शक्य तितकं sensationalise आणि politicise करून , जातीयवादाची फोडणी देऊन राजकीय प्रचार करण्यासाठी एखाद्या दुर्दैवी घटनेचा वापर कोण करतं हे इथे सर्वाना दिसतं.
पण जर एखादी घटना आपल्याला राजकीय दृष्ट्या सोयीची नसेल तर धागा काढणं आणि तो चालवणं तर दूरच- जणू काही घडलंच नाही असं वागणं, मौन धरणं हेही समोर दिसतं.
ते अधोरेखित केलं की सारवासारव करणं साहजिक आहे.

हैद्राबाद बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरची चौकशी करणार्‍या सर्वोच्च न्यायालय नियुक्त आयोगाने हा एन्काउंटर फेक होता असा निष्कर्ष काढला. आयोगाने एन्काउन्टरमध्ये सहभागी असलेल्या दहा पोलिस कर्मचार्‍यांच्या विरोधात खुनाचा खटला चालवण्याची सूचना केली.
https://www.thenewsminute.com/article/hyderabad-encounter-was-fake-cops-...

दुष्ट सर्वोच्च न्यायालय,
अहो, सगळे गुन्हे असेच सोडवले जाऊ लागले तर आपल्या पोटावर पाय येईल या इनसेक्युरिटी मधून दिलेला निर्णय आहे हा . पोलिसांनी केले ते बरोबरच होते Proud

कधी कधी वाटते ज्युरी सिस्टिम मोडीत काढून भारताने चांगले काम केले आहे. एकंदरीत "महिलांवरील अत्याचार " याविषयावरती माबो सॅम्पल स्पेस मधील लोकांची ( विशेषतः काही स्त्री id ची) extream मते पहिली आणि खऱ्या ज्यूरींमध्ये असे लोक असतील असे गृहीत धरले तर खऱ्या गुन्हेगाराला शासन मिळायची शक्यता कमीच दिसते.

Fake encounter.
म्हणजे काय?
१) ज्याचे एन्काऊंटर केले ते आरोपीचं होते आणि त्यांनीच बलात्कार च गुन्हा केला होता हे सत्य आहे.
फक्त न्यायालयीन पद्धत न वापरता पोलिस नी त्यांना मारले.
हे असे असेल तर अपवाद म्हणून अशा गोष्टी होणे गरजेचे आहे सर्रास नाही.
२), ज्यांचे एन्काऊंटर पोलिस नी केले ते आरोपी नव्हतेच,त्यांनी गुन्हा केला नव्हताच.
पोलिस नी बनाव निर्माण करून त्या निरपराध लोकांस पकडले आणि hero giri करण्यासाठी त्यांची हत्या केली .
अशा अर्थाने fake encounter असेल तर .
तात्काळ सुप्रीम कोर्टाने सहभागी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी ह्यांच्या अटकेचे आदेश द्यावेत.

<< ज्याचे एन्काऊंटर केले ते आरोपीचं होते आणि त्यांनीच बलात्कार च गुन्हा केला होता हे सत्य आहे.
फक्त न्यायालयीन पद्धत न वापरता पोलिस नी त्यांना मारले.
हे असे असेल तर अपवाद म्हणून अशा गोष्टी होणे गरजेचे आहे सर्रास नाही. >>
------- ते आरोपी असतील... पण त्यांनी गुन्हा केला आहे हे कोर्टात सिद्ध झाले होते का? आता ते कसे सिद्ध होणार? पोलिसांचे काम आरोपींना अटक करणे, घटनेसंबद्धात पुरावे गोळा करणे आहे आणि कोर्टात केस दाखल करणे. आरोपींना शिक्षा देण्याचे काम कोर्टाचे आहे, पोलिसांचे नाही.

अटक केलेले आरोपी पोलिसांच्या तावडीमधून पळून जात होते किंवा त्यांनी पोलिसांवर प्राणाघातक हल्ला केला असे घडले असेल तर त्याला " encounter " म्हणायचे. तसे झाले होते असा खोटा देखावा निर्माण करुन त्यांना मारले तर त्याला " fake encounter" म्हणायचे.

येथे कायद्याचे रक्षण करणार्‍या पोलिसांनी कायद्याचाच खून केला आहे. असे परस्पर शिक्षा देण्याचे प्रकार घडत राहिले तर कायद्याचे राज्य आहे असे म्हणता येणार नाही.

मग ब्यांका बुडवून फरार झालेल्या लोकांच्या घरावर लोकांनी स्वतः हल्ला करून ते जप्त करायचे काय ?

काय गम्मत आहे , काही लोकांना कशीही करून बुलडोझर , एन्काऊंटर करून शिक्षा व्हावी अशी वाटत असते

आणि त्याच वेळी रीतसर पोलिसांनी पकडले तर केतकी चितलेला सोडून द्या असे हेच लोक सांगतात.

केसमधून सुटायला पैसे दिले नाहीत म्हणून देखील एन्काऊंटर झालेले असू शकते

पोलीस राज म्हणजे काय हे लोकांना कळत नाही म्हणुन अशा फेक एन्काऊंटरचे समर्थन करत आहेत.
सध्याचे वातावरण बघा. देशभरात याला त्याला अटक आणि सूड बुद्धीने जास्तीत जास्त गंभीर कलमे लावून जास्तीत जास्त अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालये यावरून ताशेरेही ओढत आहे.
यात पोलिसांना दिली मुभा परस्पर तुम्हीच न्याय निवडा करा आणि द्या शिक्षा तुम्हाला योग्य वाटते ती असे म्हटले तर?

मुंबई मधील गँग वार एन्काऊंटर चा धडाका लावला म्हणूनच संपले.
सिस्टीम नुसार पोलिस नी पकडले असते,पुरावे गोळा केले असते,कोर्टात केस उभी राहून निकाल लागला असता .
ही पद्धत वापरली असती तर मुंबई मधील गँग वार नी भयंकर रूप घेतले असते.
आता जवळ जवळ सर्व भाई मुंबई मधून नाहीसे झाले आहेत.
आता पुण्यात तोच प्रकार चालू आहे.गल्ली बोळात भाई आहेत.
तिथे एन्काऊंटर च धडाका लावला तर पुणे पण भाई मुक्त होईल.
हा चांगला परिणाम आहे .
एन्काऊंटर च.
पण अतिरेक नसावा.हे मान्य.अपवाद म्हणून स्वीकारायला काही हरकत नाही.

<< अपवाद म्हणून स्वीकारायला काही हरकत नाही. >>

------ एखादी घटना अपवाद आहे हे कुणी ठरवायचे? पोलिसांना संशयीतांची हत्या करायची सवय/चटक लागल्यावर आणि ते राक्षस हाताबाहेर जाणारच नाही हे कशावरुन? गेले तर?

हैद्राबाद मधील घटनेत चार पैकी दोन लोकांचा (किंवा चारही) काहीच सहभाग नसेल असे आज उघडकीला आले तर? घटनेशी दुरान्वयेही संबंध नसतांना केवळ वैयक्तीक कारणासाठी ( आर्थिक किंवा अन्य कारण) त्यांना मारले असेल तर ?

पोलीसांनी घटना नोंदवायला मोठी वेळ लावला होता. पोलिसांनी वेळीच हालचाल केली असती तर तिचा जिव वाचला असता... पोलिसांनी आपला हलगर्जीपणा झाकण्यासाठी हत्या करुन प्रकरण निकालांत काढले.

घरात बसून टिव्ही बघून, व्हॉट्सॲप फेसुबुकवर वाचून "हेच सत्य आहे, ते साफ झूट आहे" असे ठासून सांगणारे ठरवणार कोणते अपवादात्मक आहे कोणते नाही ते.

https://youtu.be/0P9pVwYzZ50?t=188

उदय,
हे सगळे मुद्दे मागच्या 9 पानांत बोलून/प्रतिवाद करून झाले आहेत,
तरीही पालथे घडे तेच तेच मुद्दे पुढे करत राहतात.
तेव्हा तुमचे BP वाढवून घेऊ नका Lol

"तुमची वेळ आलीच तर, तुम्हाला फॅन्सी आहे तसा न्याय मिळो म्हणा" आणि पुढे चला

"तुमच्यावर वेळ आलीच तर !"
समजा तुमच्याच नात्यातला एक सालस व सद्वर्तनी तरुण आपल्या तीन मित्रांबरोबर हिल स्टेशन ला गेला. तिथे आलेल्या दुसर्‍याच चार धनवान व मुजोर तरुणांनी एखाद्या मुलीवर बलात्कार करून खून केला. मग बातमी पसरल्यावर त्यांनी पोलिसांना भरपूर पैसे दिले. पोलिसांनी ते चार सोडून हे चार संशयित म्हणून पकडले व एन्काउंटर केले. तेव्हाही तुम्ही चीअरिंग कराल ? आणी हे फारच अशक्य आहे असे ज्या भाबड्या लोकांना वाटते त्यांनी एकदा त्याच आंध्र पोलिसांनी केलेले रेड सँडल्वूड एन्काउंटर बद्दल वाचावे !

Pages