एकीकडे नवर्याचं विबासं, डॉमिनेशन आणि दूसरीकडे निष्पाप मुलगा

Submitted by Helpme on 21 November, 2019 - 20:57

हा डुप्लिकेट आयडी आहे. आज मला तुमचा " तुझा तू नीट विचार करून निर्णय घे" असा सल्ला नकोय, तर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते ते ऐकायचं आहे. मी फार मोकळ्या मनाने सर्व काही लिहिले आहे. कृपया कसलाही गैरसमज करून घेऊ नका आणि समजून घ्या.

माझ्या प्रेमविवाहाला ८ वर्ष झाली आहेत. त्यापूर्वी ७ वर्ष आमचे प्रेमसंबंध होते. माझे इंजिनीरिंग झाले असून नवऱ्याची १२वी झाली आहे. वयाच्या १८व्या वर्षी फार दूरचा विचार न करता मी प्रेमात पडले. त्यानंतर ६ महिन्यांनी मला चुकीची जाणीव झाली व मी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला परंतु तो इमोशनल ब्लॅकमेल करायचा म्हणजे ब्रेकअप संदर्भात बोलले कि खूप मोठ्याने रडायचा, त्याला चक्कर यायची, वेड लागल्यासारखं करायचा. मग मी पण घाबरून जायचे.

नंतर मग मी त्याच्यातले चांगले गुण शोधून स्वतःला समजावले. पुढे जाऊन त्यानेही स्वतःला प्रूव्ह केले. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. त्यानंतरच्या काळात त्याने शारीरिक रित्या जवळ यायला सुरुवात केली. थोडी मनाविरुद्धच मी त्यालाही बळी पडले. एकंदरच तो खूप डॉमिनेटिंग वागायचा. अजूनही तसाच आहे म्हणा. जेव्हा नवीन नवीन तो मला लॉजवर घेऊन जायचा सलग न थांबता ५ ते ६ वेळा सेक्स करायचा. मला खूप त्रास व्हायचा परंतु तो अजिबातच माझा विचार करायचा नाही. सेक्स करताना मात्र अजिबातच रोमँटिक वागायचा नाही. no foreplay at all... पॉर्न बघून स्वतःला उत्तेजित करायचा आणि डायरेक्ट इंटरकोर्स सुरु करायचा. मिठी मारणे, चुंबन घेणे असल्या गोष्टी अजिबात नाही. जर घेतलंच तर कडकडून ओठाला चावायचा. एकंदर माझी प्रेमाची मानसिक गरज भागत नव्हती. व मी मनाने एकटी पडले होते. सगळ्या मर्यादा आधीच ओलांडल्यामुळे मला त्याच्याशी लग्न करण्यावाचून पर्याय नव्हता.

नंतर लग्न झाल्यावरही त्याला माझ्याबद्दल कसलंच कौतुक नव्हते. लग्नानंतर माझे सासर छोटे गाव असल्याने तिथे आयटी कंपनी नव्हती. म्हणून मी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. नवीन लग्न झाले तेव्हा मला वाटायचे त्याने माझ्या आजूबाजूला असावे. मला वेळ द्यावा. परंतु त्याला असं काहीच वाटत नव्हते. तो काम झाले कि मित्रांमध्ये जाऊन बसायचा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत बसायचा. मी त्याची वाट बघून कंटाळून झोपी जायची. मला गाढ झोप लागली कि नेमका तो बेडरूम मध्ये यायचा आणि सेक्स करायचा. माझी खूप चिडचिड व्हायची.

असे नाही कि मी या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलले नाही. मी अनेकदा त्याच्याशी बोलले पण तो बोलायचा की त्याचे काही चुकतच नाही. याच गोष्टी असं नाही सगळ्यांच्याच बाबतीत तो प्रचंड डॉमिनेटिंग आहे. वडील नसल्यामुळे सगळ्या फॅमिलीची जबाबदारी त्याने पेलली. त्यामुळेच त्याच्यामध्ये खूप गर्व आला आहे. त्याने धाकट्या भावाला देखील त्याच्या मनाविरुद्ध पसंत नसलेल्या मुलीशी लग्न करायला लावले का तर त्या मुलीची माहेरची प्रचंड श्रीमंती होती म्हणून. पण मी हे बोलून दाखवले तर अजिबात मान्य केले नाही. आता त्याच्या बिचार्याच्या संसारात खूप वाद होत आहेत. पण माझा नवरा करून सावरून नामनिराळा आहे.

मला सेक्सबाबत कधीच स्वातंत्र्य नव्हते अजूनही नाही . जेव्हा नवरा म्हणेल तेव्हा या गोष्टींना सामोरे जावे लागते. आठवड्यातून किमान ६ रात्री तरी मला हि ड्युटी करावी लागते. जर सलग २ दिवसांचा गॅप पडलाच तर तुला कधीच इच्छा नसते, १५ १५ दिवस करू देत नाहीस अशी अतिशयोक्तीपूर्ण विधान ऐकून घ्यावी लागतात. माझी पण या सगळ्या गोष्टींसाठी तीव्र इच्छा आहे असे मला दाखवावे लागते. माझं पण समाधान झालं आहे असेही दाखवायला लागतं. नाही दाखवले तर चावणं, बोचकारणे, चिमटे काढणे हे प्रकार होतात . जर एखाद्या दिवशी माझ्या नशिबाने त्याने माझे म्हणणे ऐकलंच तर पहाटे उठवून करायला लावतो. मी कितीही दमले तरी माझी सुटका नाही. एकदा दिराच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी आम्ही मुंबई ला गेलो असताना दिवसभर खूप दगदग झाल्यामुळे मी खूप दमले होते. त्या रात्री चुलत नणंदेच्या घरी आमचा मुक्काम होता. तेव्हा मी सेक्सला नकार दिला असता त्याने खाडकन कानाखाली लावून दिली. असे नाही कि मी त्याच्या आणि माझ्या घरच्यांशी या विषयावर बोलले नाही. पण त्याच्या घरच्या लोकांनी लक्ष घातले नाही, आणि माझ्या घरच्या लोकांच्या समजावून किंवा रागावून सांगण्याचा काहीच फरक पडला नाही. मला वाटायचे कि माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझाच लिबिडो कमी पडतोय. मी त्याला sexologist कडे जाऊ म्हणायची तर दुर्लक्ष करायचा. नंतर माझ्या लक्षात आले कि अगदी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स सुद्धा खूप आहे. मी त्याला या गोष्टी सांगितल्या तर मला म्हणतो कि मी खरा पुरुष आहे. म्हणून माझी सगळ्यांपेक्षा गरज जास्त आहे. मग तिथे माझे काहीही का हाल होईनात. पाळीच्या दिवसांत पण सुटका नाही.

लग्नानंतर दीड वर्षात काळात मला मुलगी झाली. दुर्देवाने ती मतिमंद झाली. त्यानंतरची ५ वर्ष अक्षरशः मी खूप सोसले. मी पूर्ण नैराश्याने ग्रासले होते. ती झाल्यावर २ वर्षात मी अजून एक चान्स घेतला. त्यानंतर मी मुलांमध्ये पूर्ण गुरफटून गेले.नंतर पुन्हा एकदा माझ्यावर दुर्दैवाने आघात केला. माझी मुलगी ५ वर्षांची झाल्यावर हे जग सोडून गेली. तेव्हा माझ्या माहेरच्यांनी मला १ महिना माहेरी नेले. तिथे मला खूप मोकळे वाटले. मुलगी जाण्याचे दुःख बाजूलाच राहू दे, मला सासरी येऊन परत या माणसाला शारीरिक सेवा द्यायचे टेन्शन आले होते. पुन्हा त्याच्याकडे जाण्याआधी मी कबूल करून घेतले कि तो याबाबतीत मला समजून घेईल. अर्थात तसे काही झाले नाही म्हणा. पहिले पाढे पंचावन्न.

मुलगी गेल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचे ठरवले. मी पण आमच्या कंपनी मध्ये यायला लागले. जरा बरे वाटायला लागले. नवऱ्याची तर्हा काही बदलली नव्हती म्हणा.

गेले ६ महिने झाले नवऱ्याचे कंपनी मधल्या एका सतरा वर्षांच्या मुलीबरोबर अफेयर सुरु आहे. सर्व ३० कामगारांना माहित आहे. मला फक्त १ महिन्यापूर्वी confirm समजले आहे. अगदी खात्रीशीर पुरावे मिळाले आहेत. सासूलासुद्धा आधीपासून सर्व माहित आहे. ती काहींच बोलत नाही. indirect support..

मी खूप वेळा नवऱ्याला या विषयावरून बोलले, पण तो नेहमी एवढंच बोलतो कि माझा गैरसमज आहे. मी त्या मुलीला कंपनी मधून बाहेर काढले तर नवरा तिला बाहेर भेटेल. वर माझ्या शरीराचे अजून अजून लचके तोडेल ते वेगळंच. मला आता त्याच्याबरोबर राहणे मुश्कील झाले आहे. इतके दिवस फक्त मुलांना आई आणि बाबा दोघांचे प्रेम मिळावे यासाठी राहत होते. इथून पुढेही राहिले तर याच कारणासाठी राहीन. पण बऱ्याच वेळा असं वाटत कि मुलगा मोठा झाला कि तो त्याच्या आयुष्यात सुखी होईल. मला मात्र मरेपर्यंत या माणसासोबत राहावे लागेल. आता ३४ वय आहे माझे. अजून ५ ते ६ वर्षानंतर बाहेर पडणे नाही जमणार. पण नंतर परत मुलाचा निरागस चेहरा डोळयासमोर येतो आणि असे वाटतं करावी तडजोड.

काय योग्य राहील माझ्या आणि मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने?
खरं सांगा तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता? मला तटस्थपणे सल्ला नकोय. तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केले असतं ते सांगा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्याच्या वैयक्तिक बाबीबाबत जास्त खोलात जाऊन लिहवत नाही. मात्र रोजच्या रोज इतकी तीव्र इच्छा होणे हे काही झेपलं नाही. तुम्हीच म्हणता तो पॉर्न पाहतो तर याबाबतीत जाणकारांचे सल्ले घ्यायला हवे होते.
एकत्र राहणे किंवा विभक्त होणे याबाबतीत तुमच्या जागी दुस-या कुणी स्वत"ला ठेवून लिहीणे हे सुद्धा काल्पनिक असेल. लक्षात ठेवा सोशल मीडीयात लोक स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी लिहीत असतात. त्याला फसू नका. ७०% लोक लहान लोकरांचा विचार करून कोंडमारा सहन करतात. लहान लेकरांची पाय चूक हा विचार करणारे चुकीचे असतील का ? त्यांना विचारले तर ते काय पर्याय निवडतील ? मुलं जन्माला घातल्यानंतर विभक्त होण्यात त्यांना काय चॉईस असणार आणि नंतर त्यांच्या भावनिक गरजांचे काय ?

बाकी आयुष्य पडलेलं आहे समोर , लग्न म्हणजे गुलामी नव्हे. अशा माणसासोबत एक क्षणही राहणार नाही असेच मला लिहावे लागले असते. ते बरं पण दिसलं असतं. खरंचच हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.

तुम्हीच एक विचार करा एक मिनीटं,
हा जो प्रश्ण आहे ना, की तुम्ही माझ्या जागी काय कराल? तो योग्य आहे का?
मुळात समस्या बिकट असो वा नसो पण काठापलिकडच्या व्यक्तीला तिची धग समजणे किंवा कसं समोर जाणं योग्य असेल ह्याचा अंदाज येणे खरेच अवघड आहे.
एक तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अनुभवावर आधारीतच बोलते, प्रत्येकाचा दृष्टीकोण, सहनशक्ती, सामोरे जाण्याची पद्धत, खाजगी निकड ( आर्थिक, सामाजिक, भावनिक) ह्यावरून निर्णय काय घेतला जातो ठरते.
त्यामुळे सुचवलेले उपाय हे मुळात फक्त पुरवलेल्या माहितीवर एक कयास बांधून केलेले असतात, ते लागूच होतील असे खात्रीदायक नसतात.
“फक्त, एक होवु शकते, तुम्हाला व्यक्त होवून काही दिशा प्रवर्तक काहीतरी मिळु शकते“.

सध्याच एका जवळच्या ऑळखीत असाच एक प्रश्ण विचारला गेला, ओळखीची व्यक्ती मला ‘तिची’ मार्गदर्शक मानत होती आणि मला तिच्या मनाची घालमेल जाणवून, तिलाच काही प्रश्णांची उत्तरं लिहायला सांगितली.
१) तुमचे स्वतःचे आर्थिक बळ ( रहायची सोय, गुंतवणूक ,खर्च मुलगा व तुमचा)
२) शारीरीक बळ
३) मानसिक बळ
४) नात्याची निकड( मुलाला पोषक वातवरण, मुलाला 'बाबा' नी दिलेला वेळ, तुम्हाला सहचर्य , आनंद वगैरे ),
ह्याचा क्रम तुम्हीच ठरवा आणि गणित मांडा. काय शक्य आहे व कसे शक्य आहे व कुठला मार्ग आहे. ह्याने स्वतःच्या शक्तीचा अंदाज येइक व कशी सुरुवात ( जी काही) करायची कळू शकते. मग बघा काय वाटते.
घाबरून विचार करु नका नाहितर गणित चुकेल व निर्णय चुकेल. शुभेच्छा!

विबासं मधे मांडलेली समस्या ही खरी आहे असे समजूनच त्यावर प्रतिसाद देण्याची रीत आहे. काही जणांनी या सुविधेचा दुरूपयोग मनोरंजन म्हणून देखील केला आहे. तुम्हाला चांगल्या सल्ल्याची आवश्यकता आहे हे नकीच. पण त्यासाठी काही गोष्टींचा खुलासा व्हायला हवा.

१. त्या मुलीबद्दल समजले कसे ?
२. कोणत्या पदावर आहे ? तुमच्या पतीच्या कंपनीत कमीत कमी शैक्षणिक अर्हता काय आहे ?
३. त्या दृष्टीने पुराव्यांचे स्वरूप काय आहे ?

तुमचे वय ३४ आहे. कदाचित नव-याचे वय इतकेच किंवा जास्त असू शकेल. गेली १५ वर्षे तुमच्यात संबंध आहेत. तरीही त्याची शारीरीक भूक कमी होत नाही. हे नॉर्मल आहे का हे समजत नाही. कारण एकाच पार्टनरच्या बाबतीत इतका काळ सेक्सबाबत अशी भूक असणे मानसिकदृष्ट्या शक्य आहे का हा प्रश्न पडला आहे. ते ही इतर कोणतीही भावनिक गुंतवणूक नसताना..

नवरा मुलाशी प्रेमाने वागतो का? मुलात त्याची भावनिक गुंतवणूक आहे का?
जरी असली तरी माझ्या मते विभक्त व्हा. मुलाला नवऱ्याला भेटू द्या. किंवा त्याला बाबांबद्दल काही निगेटिव्ह आत्ताच सांगू नका. तुम्ही जर तुमच्या संसारात सुखी नसाल तर मुलाचीही निकोप वाढ होणार नाही.

माणूस हा अनेक नात्यात बांधलेला असतो .
काही नाती व्यवहारिक पद्धतीने चालतात,काही गरज म्हणून असतात.
तर काही रीतिरिवाज ,पद्धत म्हणून formaliti म्हणून पाळली जातात.
ह्या मध्ये kotumbik नात्यांपासून सर्व नाती येतात.
पण खूप कमी नात्यात माणूस मनापासून गुंतलेला असतो.
ते विश्र्वासच नात असते.
तिथे धोका झाला किंवा फसवणूक झाली की माणूस खचून जातो.
त्या ला नैराश्य येते.
नवरा आणि बायको हे नात्यात प्रेम,विश्वास,आपुलकी,जिव्हाळा असणे गरजेचं असतं
माणसाच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याची कोणतीच साधनं उपलब्ध नाहीत.
प्रेमाचा दिखावा करून स्वार्थ साधणाऱ्या लोकांची जगात कमी नाही.
तुमच्या प्रेमाचा प्रकार हा प्रेमाचा दिखावा करून स्वार्थ साधने ह्याच पायावर उभा आहे.
ह्यात तो रोल तुमचा नवरा करत आहे आणि तुम्ही त्या दिखाव्याला प्रेम समजून तुमची मानसिक स्थिती बनवली आहे.
आता डोक्यात राग घेवून भडक निर्णय घेण्यासाठी परिस्थिती प्रतिकूल आहे.
कारण मुलाची मानसिक गरज आणि त्याचे भवितव्य ही कारणे आहेत.
आता मन ,इच्या,ह्या गोष्टी बाजूला ठेवा आणि आणि तुमची भावनिक गुंतवणूक पहिली नवऱ्या मधून काढून टाका.
पण तसे दाखवू नका.
फक्त आणि फक्त व्यवहारी विचार करा.
बाहेर दुसऱ्या स्त्री शी असलेल्या सेक्स संबंध मुळे तुमच्या नवरा बायको ह्या व्यवहारिक नात्यावर काहीच परिणाम होणार नाही( तुम्ही तुमची भावनिक गुंतवणूक नवऱ्या मधून काढली तर ते नात फक्त व्यवहारिक असेल).
तो प्रश्न मिटला.
तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा .
चांगल्या लोकांच्या मध्ये मिसळा,सुख दुःख वाटून घेणारी त्या मध्ये साथ देणारी लोक जमवा.
त्या मुळे तुम्ही निराशेच्या गर्तेत वाहणार नाही.
तुम्हाला तुमचा नवरा मारत नाही किंवा तुमच्या वर संशय घेत नाही किंवा तुमचे आर्थिक स्वतंत्र हिरावून घेत नाही.
राहण्यास घर उपलब्ध आहे.समाजाचे दृष्टीने तुम्ही एकट्या पडलेल्या नाही आहात.
हे सर्व सर्व प्लस पॉइंट आहेत.
तुमच्या नवऱ्याचे काही गुण हे तुमच्या फायद्याचे आहेत .
ते सर्व तुमचे प्लस पॉइंट आहेत ह्या सर्व परिस्थीत फक्त स्वतःच्या फायद्या साथी व्यवहारिक तत्व वर (म्हणजे गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त) तुम्ही उपयोग करून घ्या.
पण मनातील भावना दाबून ठेवून परिस्थिती रूप चेहर्या वर भावना दाखवणे ही कला तुम्हाला अवगत करावी लागेल.
आणि तुम्ही योग्य स्थितीत आलात की सरळ काडीमोड घ्या

तुम्ही माझ्या जागी असता तर काय कराल हा प्रश्न योग्य आहे. जो सल्ला आपण तिसर्‍या व्यक्तीला देऊ किंवा तात्त्विक चर्चेत जे मुद्दे मांडू ते स्वतःवर तशी वेळ आल्यावर अमलात आणण जमेलच असं नाही. उलट होण्याची शक्यता अधिकच. पण दुसर्‍याच्या परि स्थितीत स्वतःला ठेवून विचार करणंही अशक्यच आहे.

नवर्‍याची अतिरेकी लैंगिक भूक ही गोष्ट जगावेगळी किंवा अविश्वसनीय नाही. एन डीटीव्हीने मॅरिटल रेप वर वुई द पीपल खाली एक कार्यक्रम केला होता, त्यात एका स्त्रीनेही तुमच्यासारखंच कथन केलं होतं. त्यावर उपाय त्याच्याशी बोलून पाहणं हाच आहे. तो तुम्ही करून पाहिलाय.
झंपी म्हणतात तसं प्रश्न विचारून मदत करता येईल.

यावर त्याने विवाहबाह्य संबंधांचा किंवा पेड सेक्सचा मार्ग शोधला असेल आणि त्याने तुमच्या बाकीच्या संसारात फरक पडत नसेल, तर चालेल का?
इथेही दोन इश्युज आहेत. ती मुलगी अंडर एज आहे. आणि पुढे ते प्रकरण शारीरिक जवळिकीपुरतेच राहील आणि तुमच्या संसारावर परिणाम होणारच नाही, याची खात्री काय?

दुसरा प्रश्न - स्वतंत्र जगणे शक्य आहे का ? तुम्हांला हवं आहे का? त्यासाठी जवळच्या लोकांची किती मदत मिळेल.

जर एक सुशिक्षित कमावती बाई हा निर्णय चटकन घेऊ शकत नाही तर अशिक्षित न कमावणारया आणि अश्या नवरयांवर अवलंबून असणारया बायकांचे काय हाल असतील Sad

पंखात बळ असेल तर उडा ....

नवरा इमोशन ड्रामा, थयथयाट, रडणे चिडणे दमदाटी, उपदेश प्रवचन, तुमची बदनामी. उलटे आरोप, काहीही करेना कसाही रिॲक्ट होईना, तुम्ही त्याच्यासमोर आपला चेहरा निर्विकार ठेवा. जेणेकरून तो समजून चुकेल की या बाईचा निर्णय पक्का झाला आहे आणि तो फार काळ तुमचा पिच्छा पुरवणार नाही.

नवीन आयुष्याला शुभेच्छा Happy

अवांतर - लग्ना आधी सेक्स केले म्हणजे लग्न करावेच लागते असे काही नसते. यावर स्वतंत्र चर्चा व्हायला हवी.

आणखी एक -
एक अनुभव वाईट आला म्हणून जग वाईट नसते. वेगळे झाल्यावरही दुसरया लग्नाचा पर्याय कायम खुला ठेवा.

१) नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी ३४ म्हणजे फार नाही वय झाले तेव्हा आयुष्यभर नरकयातना भोगत स्वताला त्रास करवुन घेणे थांबवून लवकरात लवकर सेपरेट होणे हेच बरे.

२) सेपरेट होऊन दोन पर्याय असतात एकतर माहेरी किंवा स्वतंत्र वेगळे राहून मुलाच्या भवितव्यकड़े लक्ष देत आपलेही करिअर पुनःस्थापित करणे आणि यशस्वी स्वावलंबी जीवन जगणे किंवा ह्याच दोन्ही गोष्टी नव्याने संसारात पडून वैवाहिक जीवनाचाही आनंद घेत जगणे.

३) अनेक मॅट्रिमोनी साइट्सच्या मदतीने तुम्हाला तुमच्या मुलासकट स्विकारणारी प्रपोझल नक्कीच उपलब्ध असणार आहेत तेव्हा हां पर्याय सजग राहून सखोल चौकशीअंती निवडल्यास आयुष्याला एक चांगली दिशा मिळून तुम्ही वैयक्तिक लाइफसुद्धा नीट एन्जॉय करू शकाल.

४) आजच्या काळात अनेक स्त्रीया ( अविवाहित किंवा घटस्फोटित) एकट्या यशस्वीपणे जगत आहेत आणि समाजसुद्धा त्यांना एक व्यक्ति म्हणून सन्मान करत सुदृढ़ मनाने स्विकारत आहे ही एक चांगली सुरुवात हल्ली अनुभवास येते खरी. पण समाजात सर्वच व्यक्ति तितक्या निकोप वृत्तीच्या नसल्याने तुमचे तरुण वय आणि एकटे राहणे क्वचित प्रसंगी धोकादायक आणि मानसिक क्लेशकारक ठरू शकते ह्यासाठी खंबीर मनाने येणाऱ्या प्रत्येक संकटास परिस्थितीपुढे लाचार न होता परतवून लावण्याची तयारी असणे आवश्यक आहे.

५) मुलाची आवड़ आणि वय लक्षात घेत मिलिट्री स्कूल / नवोदय सारख्या अकादमी / हॉस्टेल असे पर्याय उपलब्ध असताना आपल्यासाठी काय योग्य असेल ह्याचा तुम्ही स्वताः आणि तुमचे पालक मिळून निर्णय घेतल्यास डिवोर्स नंतरचे पुनः लग्न करून वैवाहिक आयुष्य नव्याने सुरु करायची एक संधी मिळेल. शक्यतो आईचे मन ह्या पर्यायाचा अजिबात विचार करत नाही पण एक व्यवाहारिक दृष्टिकोन म्हणून सुचवत आहे.

हे वरील मुद्दे म्हणजे तुम्हाला सल्ला म्हणून देऊ केले आहेत आता जसे तुम्ही ऑलरेडी म्हटले की आम्ही तुमच्या जागी असतो तर काय केले असते -
घरगुती हिंसाचार ही एक बाजू तर कोर्ट केस भक्कम करणारी आहेच शिवाय विबासं आहे ती मुलगी माइनर आहे आणि ही फौजदारी केस बनु शकते त्याचा डिवोर्ससाठी खुप मोठ्ठा फायदा मिळेल. ह्या माणसाला मी तरी नक्कीच असातसा सोडले नसते.

तुमच्या नवऱ्याचा स्वभाव पटत नसेल, दोघांमधे प्रेम उरले नसेल तर वर सगळ्यांनी छानच सल्ले दिलेत त्याचा विचार करा. पण त्याची प्रमाणाबाहेर सेक्सची इच्छा आणि त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास हा मुख्य मुद्दा असेल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण सेक्सची इच्छा नसने ही जशी समस्या आहे तशीच अतिप्रमाणात सेक्सची भुक ही देखील एक समस्या आहे. त्यावर उपाय देखील आहेत. पार्टनरला समस्या आहे म्हणून सोडून देणे चुकीचे आहे. अशीच एक केस माझ्या वाचण्यात आली होती ज्यात एका स्त्रीला हीच समस्या होती. त्यासाठी तिने जे जे केले ते वाचूनच अंगावर काटा आला. तिच्या घरातल्यांनी तिच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले होते. ऑफिसमधेही तिच्या या समस्येचा गैरफायदा घेतला गेला. पण तिच्या मुलीने तज्ञांच्या मदतीने आईला यातून बाहेर काढले.

तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केले असतं ते सांगा... >>> लग्नाआधी जर माझ्या ईच्छेविरुद्ध जवळीक साधायचा प्रयत्न केला अन ते त्याला योग्य वाटत असेल तर तेव्हाच सगळे सबंध तोडले असते, पण ती वेळ निघुन गेलीये.

लग्नाआधी ७ अन नंतर ८ म्हणजे १५ वर्षे ईच्छेविरुद्ध त्रास सहन करणे खुप आश्चर्यकारक वाटले, म्हणजे एखाद्या कमी शिकलेल्या मुलीचे असे वागणे एकवेळ समजु शकते पण तुम्ही तर चांगल्या शिकलेल्या आहात.

असो,
आता सुद्धा, त्याच्याविरुद्ध केस करा अन डिव्होर्स घ्या, सोबत त्याच्याविरुद्ध NC करुन ठेवा पोलीस स्टेशनमध्ये. सध्या आर्थिक गरज असेल तर पोटगीचा दावा करु शकता, खरेतर बरेच काही असते, एखाद्या महिला मदत मंडळ किंवा पोलिसांचेच महीला मंडळ असते त्यांची हि मदत घेऊ शकता. अन तुम्हाला होणारा त्रास भले मुलाला सगळे सांगु नका पण पुर्ण लपवूदेखिल नये असे मला वाटते.

ऋन्मेऽऽष चा प्रतिसाद पटला

बहुतेक लिबिडो कमी करण्याचे औषधे डॉक देउ शकतात, पण तो तयार होणार नाही, आणि त्याच्या परवानगी शिवाय कोणताही डॉक हे करणार नाही, अर्थात हा मुद्दा निकालात निघाला तरी विबासंचा शिल्लक राहतो. हा व्यक्ति मुलाला किती वेळ देत असेल हे पण पाहण मह्त्वाच आहे.

तुम्ही माझ्या जागी असता तर काय कराल हा प्रश्न योग्य आहे. जो सल्ला आपण तिसर्‍या व्यक्तीला देऊ किंवा तात्त्विक चर्चेत जे मुद्दे मांडू ते स्वतःवर तशी वेळ आल्यावर अमलात आणण जमेलच असं नाही. उलट होण्याची शक्यता अधिकच. पण दुसर्‍याच्या परि स्थितीत स्वतःला ठेवून विचार करणंही अशक्यच आहे. <<<<<<<<<<<<< +१११११११११

नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी ३४ म्हणजे फार नाही वय झाले तेव्हा आयुष्यभर नरकयातना भोगत स्वताला त्रास करवुन घेणे थांबवून लवकरात लवकर सेपरेट होणे हेच बरे. ========= ++ ११११११११११

मी सांगेन की आता मात्र तुम्ही तुमच्या gut feeling ने च पुढे जा, जे तुम्हाला काही महिन्यात जाणवले होते (सुरूवातीच्या 6 महिन्यात).
आपले स्वतः चे Gut feeling ९९% वेळा चुकत नाही.
वरील सर्व comments मधील बरेचसे मुद्दे योग्य आहे त म्हणून परत लिहित नाही.
आता जास्त वेळ न घालवता वेगळ्या व्हा. ३/६ महिने निर्णय पक्का करायला / विचार करायला हवा असेल तर घ्या आणि त्या वेळी वेगळी नोकरी, वेगळी जागा, मुलाची शाळेची व्यवस्था, भविष्यात (पुढच्या १ -२ वर्षात लागणारी) पैशाची तरतुद (काही savings / स्त्री धन etc asel te ) जमवाजमव करून ठेवा.
तुम्ही चांगल्या शिकलेल्या आहात तर नोकरी नक्की च मिळेल फक्त self confidence गमावू नका, स्वतः साठी आणि मुलासाठी आता खंबीर रहावे लागेल..

१. नवराही ३४ वर्षांचा आहे. माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले आहे. अर्थात बराच गॅप पडला आहे. पण मी माझी स्वतःची रिटेल आणि ऑनलाईन सेलिंग ची फर्म सुरू केली आहे. हळूहळू जम नक्कीच बसेल. मला माहेरी आई, वडील आणि भावाचा पुर्ण सपोर्ट आहे. माहेरचे दार कायम उघडं आहे.

२. आमच्याकडे कामगारांना शैक्षणिक पात्रता फक्त लिहिता वाचता यावी इतकीच आहे. ती मुलगी बारावीला आहे. १७ वर्षांची आहे.

३. तिच्याबद्दल बाहेरून बरेच समजलं आहे. तिच्या आजीने स्वतः तिच्या बेताल वागण्यामुळे कॉलेज बंद केले आहे. बाहेरून परिक्षा देत आहे.

४. मी या रक्षाबंधनला माहेरी गेली असताना माझी कामवाली अचानक लवकर आली. तिनं बराच वेळ दार वाजवल्यावर या दोघांनी दार उघडले. पण ही गोष्ट तिने मला काल सांगितली. माझ्याकडे त्या दोघांची कॉल रेकॉडींग क्लिप पण आहे. पण मी अजून सबळ पुराव्यासाठी थांबली आहे.

५. माझ्या नवर्याचं ५ वर्षाच्या मुलाबरोबर अतिशय सुंदर नातं आहे. त्यासाठी तर जीव तुटतो. पण अजून १० वर्षांनी मुलाचे जग फक्त आई आणि बाबा एवढंच नसणार हे नक्की. तेव्हा तडजोड केल्या बद्दल वाईट वाटेल असं वाटतं.

६. त्या मुलीबरोबर संबंध असूनही नवरा मान्य करत नाही आणि मला संबंधांना सुट्टी देत नाही. Sad

७. माझी नवर्या मधली भावनिक गुंतवणूक कधीच संपली आहे. हे त्याला माहीत नाही. मी घरात चांगले वातावरण ठेवण्यासाठी प्रेम असल्याचं नाटक करते. त्यांच्या अफेअर मुळे मला जराही मत्सर, जळफळाट , एकटेपणा असं काही जाणवलं नाही. तो सेक्ससाठी जवळ येतो तेव्हा मात्र मी माझ्यावर अत्याचार करते असं वाटतं Sad

८. हा लेख १०० टक्के सत्य आहे

नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी ३४ म्हणजे फार नाही वय झाले तेव्हा आयुष्यभर नरकयातना भोगत स्वताला त्रास करवुन घेणे थांबवून लवकरात लवकर सेपरेट होणे हेच बरे. >> सहमत

निर्णय घ्या, चांगली माणसे तुमच्या पाठीशी असतील. मानसिक आधार खूप गरजेचा असतो. Happy

<< माझी नवर्या मधली भावनिक गुंतवणूक कधीच संपली आहे. हे त्याला माहीत नाही. मी घरात चांगले वातावरण ठेवण्यासाठी प्रेम असल्याचं नाटक करते. त्यांच्या अफेअर मुळे मला जराही मत्सर, जळफळाट , एकटेपणा असं काही जाणवलं नाही. तो सेक्ससाठी जवळ येतो तेव्हा मात्र मी माझ्यावर अत्याचार करते असं वाटतं >>

------ प्रश्न गुंतागुंतीचा आहे...
पण तुम्ही आधी स्वत: चा विचार करावा... वातावरण चांगले ठेवण्यासाठी "नाटक" का करायचे ? मी या वातावरणात आनंदी नाही आहे, मला त्रास होतो, माझ्यावर अत्याचार होतो... असे तुम्हाला वाटत असेल तर ते सर्व तुमच्या वागण्याने दिसायला हवे.

स्पष्टपणे बोलून (ते तुम्ही केले आहेच) आणि दैनंदिन वागणूकी मधून तुमच्या खर्‍या भावना व्यक्त व्हायलाच हव्यात. संवादाचा तो पण एक प्रकार असतो.

१-२ दिवस नाटक ठिक आहे... पण आयुष्यभर नक्कीच नाही... आणि तसे करणे तुमच्या आरोग्याला, मानसिक स्वास्थ्याला हानीकारक आहे.

निर्णय घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

अजून एक, माझ्या फोन मध्ये नवर्याचा मेल आयडी रेजिस्टर्ड आहे. मला त्यामुळे गुगल असिस्टंट वरून त्यांच्या फोनच्या ऍक्टिव्हीटीज कळतात. मी माहेरी गेली की मला रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याच्या फोन मध्ये पॉर्न साइट्स सर्फींग केलेल्या दिसतात. नंतर त्याने मी नसताना सकाळ संध्याकाळ हस्तमैथुन करतो हे कबूल केलं. अर्थात तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा. पण यावरून त्याच्या भुकेचा अंदाज येतो.

पण तुम्ही आधी स्वत: चा विचार करावा... वातावरण चांगले ठेवण्यासाठी "नाटक" का करायचे ? मी या वातावरणात आनंदी नाही आहे, मला त्रास होतो, माझ्यावर अत्याचार होतो... असे तुम्हाला वाटत असेल तर ते सर्व तुमच्या वागण्याने दिसायला हवे. >>> ५ वर्षाच्या लहान मुलासाठी वातावरण चांगले ठेवते. आणि नवरा अडेलतट्टू आहे. तूच कटकटी आहेस म्हणून सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा होतो. त्याच्या चुका मान्य करत नाही.

सोडुन द्या.
काय सोडायचं ते तुम्ही ठरवा.

वरील सर्वांचेच सल्ले योग्य आहेत.
ह्या सर्व सुचणे मधून तुम्ही तुमची क्षमता ओळखून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
तुमचे शारीरिक शोषण हा तुमचं आणि तुमच्या नवऱ्या मधील समस्या आहे.
त्या मुलाला काही ही इंटरेस्ट नसणार.
आणि तो प्रश्न समजण्या एवढं तो मोठा सुधा नाही आणि त्याचा त्या प्रश्र्नाशी काही ही संबंध नाही.
त्याचे वडील त्याच्या बाबत सर्व कर्तव्य पार पाडत असतील तर.
तुमचा नवरा त्या कथित मुली मध्ये शारीरिक संबंध स्थापन करण्यास यशस्वी झाला असेल तर तुमच्या मधील सेक्स विषयी इंटरेस्ट त्याला राहणारच नाही.
माणूस पार्टनर किंवा बायको व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्ती शी तसा संबंध ठेवते ह्याचा अर्थच attraction संपले किंवा भावनिक तिरस्कार हेच असते.
पण असे संबंध खूप वेळा काही मर्यादेच्या बाहेर जात नाहीत.
सेक्शुअल संबंध ठेवणे आणि त्या व्यक्तीची जबाबदारी घेणे हे दोन ही ध्रुवाची विरूद्ध टोक आहेत ..
कायदेशीर मार्ग हे वेळकाढू असतात हे सत्य सुद्धा विसरू नका..
डोक्यात राग घेवून घेतलेले निर्णय नेहमी अंगलट येतात.
शांत डोक्याने बुध्दी च वापर करून घेतलेलं निर्णय सौम्य दिसत असले तरी खात्री नी यशस्वी होणारे असतात.
पोडगी चा दावा तुम्ही केला की चालू होईल असं नसतं .
अनेक डावपेच,आखून केस लांबवले जाते किंवा कमीत कमी पोडागी देण्यासाठी प्रयत्न होतात .
ही लढाई दीर्घ कालीन असते.
ती चिकाटीने लढण्याची क्षमता असणे गरजेचे असते.
शेवटी निर्णय तुमचा

१. नवराही ३४ वर्षांचा आहे. माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले आहे. अर्थात बराच गॅप पडला आहे. पण मी माझी स्वतःची रिटेल आणि ऑनलाईन सेलिंग ची फर्म सुरू केली आहे. हळूहळू जम नक्कीच बसेल. मला माहेरी आई, वडील आणि भावाचा पुर्ण सपोर्ट आहे. माहेरचे दार कायम उघडं आहे. >>> इतक्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर नवर्याला सोडणे नक्कीच चांगले.

५. माझ्या नवर्याचं ५ वर्षाच्या मुलाबरोबर अतिशय सुंदर नातं आहे. त्यासाठी तर जीव तुटतो. पण अजून १० वर्षांनी मुलाचे जग फक्त आई आणि बाबा एवढंच नसणार हे नक्की. तेव्हा तडजोड केल्या बद्दल वाईट वाटेल असं वाटतं. >>> वेगळे झाल्यावरही तो मुलाला भेटू शकतो. उद्या मोठं झाल्यावर जर तुमच्या मुलाला समजले की त्याच्यासाठी तुम्ही इतके दिवस एवढा त्रास भोगला तर त्यालाही अपराधी वाटेल.

<< ५ वर्षाच्या लहान मुलासाठी वातावरण चांगले ठेवते. >>

-------- संसार टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही त्याग करतच असते... (शारिरीक कष्ट, थोड्या काळासाठी घराची पुर्ण जबाबदारी, ताण) तो करावा पण अत्याचार आणि मानसिक कोंडमारा हे सहन करु नाही... मुलासाठी पण नाहीच.
एक थोडा काळ (१ आठवडा - वर्ष) ठिक आहे.... पण सबंध आयुष्य नक्कीच नाही.

मुल लहान आहे... पण पुढे तो तुमची मानसिक स्थिती समजेल...

मी प्रतिसाद वाचले नाहीयेत अजून, पण हे सर्व वाचून अंगावर काटा आला. असं वाटलं तुमची मुलगी दुर्दैवाने गेली, तेव्हाच सेपरेट व्हायला हवं होतंत की काय.

तुम्ही उत्तम शिकलेल्या आहात तर तुम्हाला दुसरा जॉब मिळेल, मुलाला घेऊन वेगळं होणं हे करू शकता का. माहेरच्या लोकांचा सपोर्ट आहे का, सर्वात महत्वाचं तुमची तयारी असेल तर इतकं सहन करण्यापेक्षा स्वतंत्र वाटचाल सुरु करा. मला सांगणे सोपं आहे पण प्रत्यक्षात तुमच्यासाठी अवघड असेल पण मला तरी हा मार्ग पटतोय, मी तुमच्याजागी असते तर इतकं सहन नसते करू शकले, कधीच वेगळी झाले असते. डिव्होर्सचाच विचार करा, सबळ कारण आहे तुमच्याकडे.

आता सर्व नीट वाचते.

पुरावे आहेत ते पुरेसे आहेत का हे विश्वासू कायदेशीर सल्ला घेऊन कन्फर्म करा. ( आणि नसेल तर त्या दृष्टीने हलचाल करून मिळवा). आणि मग घटस्फोट घ्या. तुमच्यासाठी आणि मुलासाठीही ते आवश्यक आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत ; पण येणारे दिवस तरी चांगले जावेत असा प्रयत्न करणे हे अगदी रास्त आहे.

लग्नाआधी जर माझ्या ईच्छेविरुद्ध जवळीक साधायचा प्रयत्न केला अन ते त्याला योग्य वाटत असेल तर तेव्हाच सगळे सबंध तोडले असते, पण ती वेळ निघुन गेलीये. >>> खरं आहे.

मी माझी स्वतःची रिटेल आणि ऑनलाईन सेलिंग ची फर्म सुरू केली आहे. हळूहळू जम नक्कीच बसेल. मला माहेरी आई, वडील आणि भावाचा पुर्ण सपोर्ट आहे. माहेरचे दार कायम उघडं आहे. >>> हे फार छान आहे. मग फार विचार करू नका, डिव्होर्स घ्या. एक हेल्दी आयुष्य जगता येईल तुम्हाला आणि मुलालाही.

गेलेले दिवस परत येत नाहीत ; पण येणारे दिवस तरी चांगले जावेत असा प्रयत्न करणे हे अगदी रास्त आहे. >>> मम.

पंखात बळ असेल तर उडा .... >>> अगदी अगदी, पंखात बळ आणा खरंतर.

तुम्हाला शुभेच्छा चांगल्या आयुष्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी.

१. नवराही ३४ वर्षांचा आहे. माझं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले आहे. अर्थात बराच गॅप पडला आहे. पण मी माझी स्वतःची रिटेल आणि ऑनलाईन सेलिंग ची फर्म सुरू केली आहे. हळूहळू जम नक्कीच बसेल. मला माहेरी आई, वडील आणि भावाचा पुर्ण सपोर्ट आहे. माहेरचे दार कायम उघडं आहे. >>> इतक्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर नवर्याला सोडणे नक्कीच चांगले.

५. माझ्या नवर्याचं ५ वर्षाच्या मुलाबरोबर अतिशय सुंदर नातं आहे. त्यासाठी तर जीव तुटतो. पण अजून १० वर्षांनी मुलाचे जग फक्त आई आणि बाबा एवढंच नसणार हे नक्की. तेव्हा तडजोड केल्या बद्दल वाईट वाटेल असं वाटतं. >>> वेगळे झाल्यावरही तो मुलाला भेटू शकतो. उद्या मोठं झाल्यावर जर तुमच्या मुलाला समजले की त्याच्यासाठी तुम्ही इतके दिवस एवढा त्रास भोगला तर त्यालाही अपराधी वाटेल.

नवीन Submitted by मी नताशा on 22 November, 2019 - 11:03

>>>>>११११११११

लवकरात लवकर लाथ मारा
नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा

नवरा सोडा आणी नंतर मुलाला त्याला भेटु द्या टाईप प्रतिसाद बघुन असा विचार आला की, बाई मुलाला नवर्‍याकडेच ठेवु शकतेच की. तिला जबाबदारी नको असेल किंवा सध्या घ्याय्ची नसेल, घेउ शकत नसेल तर. बाई घर-नवरा सोडतेय तर मुलं तिच्याबरोबरच घेउन जाणार हे आपल्याकडे फारच गृहित धरलेलं आहे दुर्दैवाने. त्यामुळे बाईला तेच करावं लागणार लोकलाजेस्तव.

बाई घर-नवरा सोडतेय तर मुलं तिच्याबरोबरच घेउन जाणार हे आपल्याकडे फारच गृहित धरलेलं आहे दुर्दैवाने. त्यामुळे बाईला तेच करावं लागणार लोकलाजेस्तव. >>> +१११

अन तीने तसे नाही केले तर तिच्यातच दोष असणार, तीच वाईट चालीची वगैरे वगैरे

नवरा चूक की बायको चूक किंवा जग काय म्हणेल याऐवजी मुलाला काय वाटेल हा त्यांचा प्रश्न आहे असे मला वाटते. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे पण लक्षात आणून दिले आहे. त्यांना मूल महत्वाचे आहे.

मला या केसमध्ये मुलगा आईबरोबर

मला या केसमध्ये मुलगा आईबरोबर राहिला तर बरं असं वाटलं आणि मी त्या जागी असते तर काय केलं असते, हा विचार करून मी मुलाला जवळ ठेवलं असते.

पण शेवटी मुलगा त्यांच्याबरोबर राहणार हे गृहीत धरणे चूक आहे हे सस्मित याचंही बरोबर आहे. त्यामुळे धागाकर्तीने याबाबत विचार करावा.

त्यांना मूल महत्वाचे आहे. >>> बरोबर, असंच दिसतंय.

असं वाटलं तुमची मुलगी दुर्दैवाने गेली, तेव्हाच सेपरेट व्हायला हवं होतंत की काय.

तुम्ही उत्तम शिकलेल्या आहात तर तुम्हाला दुसरा जॉब मिळेल, मुलाला घेऊन वेगळं होणं हे करू शकता का. माहेरच्या लोकांचा सपोर्ट आहे का, सर्वात महत्वाचं तुमची तयारी असेल तर इतकं सहन करण्यापेक्षा स्वतंत्र वाटचाल सुरु करा. मला सांगणे सोपं आहे पण प्रत्यक्षात तुमच्यासाठी अवघड असेल पण मला तरी हा मार्ग पटतोय, मी तुमच्याजागी असते तर इतकं सहन नसते करू शकले, कधीच वेगळी झाले असते. डिव्होर्सचाच विचार करा, सबळ कारण आहे तुमच्याकडे.>>>> अगदी अगदी.

मूल लहान असताना बाय डिफॉल्ट कायद्याने मुलाचा ताबा आईकडे राहतो / येतो ( अपवादात्मक स्थिती सोडून)
आणि आई कमावती असेल तरी अपत्यासाठी वडिलांना वन टाइम सेटलमेंट किंवा मासिक तत्वावर मेनटेनेन्स हां द्यावाच लागतो. तो किती कमीत कमी बसायला हवा ही झाली कायदेशीर पळवाट अर्थात वकिलाची फी.
आणि डिवोर्स नंतर आईने मुलाना त्याच्या जन्मदात्या पित्यास भेटू देणे अनिर्वाय असले तरी कित्येक प्रसंगात वडिलांना ते नकोस वाटले (त्यांचे अफेयर्स किंवा पुनर्विवाह) तर हाही मुद्दा संपुष्टात येतो.

बाकी मुलाची त्याच्या आजी आजोबांच्या (वडिलांचे आई वडील) अर्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी कायम राहते आणि हां धाक प्रत्येक अश्या नवऱ्याना आयुष्यभर छळण्यास पुरेसा आहे Wink फक्त तुमचा वकील तेवढा कुशल हवा

बाई घर-नवरा सोडतेय तर मुलं तिच्याबरोबरच घेउन जाणार हे आपल्याकडे फारच गृहित धरलेलं आहे दुर्दैवाने. त्यामुळे बाईला तेच करावं लागणार लोकलाजेस्तव. >>> मुलाचे वय बघता (५ वर्ष) ताबा आईकडे येणार अस ग्रुहीत धरले आहे.

मला मुल जास्त महत्त्वाचं आहे. मोठा झाल्यावर कुठे राहायचं हा त्याचा प्रश्न. समाज महत्त्वाचा नाही. वैवाहिक बलात्कार होतो तेव्हा समाज रात्री गाढ झोपेत असतो. मी मुलाला वडील आजी पासून कधीच तोडणार नाही. मुलाला आनंदी करून मला शोषणमुक्त, आनंदी आयुष्य जगायचे आहे

मला एक विचित्र प्रश्न पडतो
किती जोडप्या मध्ये सेक्स विषयी एकमत असेल.
म्हणजे पुरुषाची इच्या असेल तेव्हा स्त्री ची नसेल.
स्त्री ची असेल तेव्हा पुरुषाची नसेल.
दोघांची असेल तेव्हा पद्धती विषयी मतभेद असतील.
अगदी दोघांची मत जुळणारे .01 percent तरी जोड्या निघतील का.
अशा विषयावर जोडी दारा समोर सुद्धा कोण्ही जास्त व्यक्त होत नाही.
कारण सेक्स पलीकडले सुद्धा नात असते .

अनैसर्गिक सेक्स ही गंभीर बाब आहे ह्या विषयी बिलकुल मतभेद नाहीत.
मनाविरुद्ध सेक्स हा विषय jatil आहे.
सेक्स केला तर शोषण नाही केला तर शारीरिक भूक भागवण्यासाठी सक्षम नाही .
हे सर्व शब्दांचा खेळ आहे.
नवरा बायको मध्ये सेक्स chya पलीकडल नात असतं.
अत्याचार त्यालाच म्हणतात शारीरिक ताकत वापरून तुमच्या मना विरुद्ध कृती करण्यास भाग पाडणे.
त्यात फक्त सेक्स येत नाही सर्वच गोष्टी येतात.
ओशो हेच सांगत होते सेक्स chya दलदली मधून बाहेर याल तेव्हा च जीवनाचा आनंद नितळ पने भोगाल

वर या सेक्सच्या भूकेला आजार म्हणत नवरयाला आधार देत उपचार करायचे सल्लेही आलेत.
जे योग्यही ठरले असते.
पण सेक्सची अतिआवड असणे वेगळे आणि ते डॉमिनेट करून मिळवणे वेगळे. यात जिला भोगावे लागते ते तिलाच ठाऊक. किंबहुना एक पुरुष असून मी सुद्धा या समाजमान्य बलात्कारातून होणारया त्रासाची कल्पना करू शकतो.
त्यामुळे तुम्ही उगाच कुठलाही मानवतावादी विचार करायची गरज नाही वा सोडायचा निर्णय घेतल्यावर तशी गिल्टही मनात ठेऊ नका.

किंबहुना मला वाटते हा धागा काढण्यामागे आपला असाही एक सुप्त हेतू असावा की लोकांचे विचार जाणून घेऊया. त्यांनीही अश्या नवरयाला सोड असे सल्ले दिल्यास मग आपल्या मनात गिल्ट राहणार नाही.
आणि हो, या हेतूत काही गैर नाही. याची मनाला गरज असतेच.

आज मला तुमचा " तुझा तू नीट विचार करून निर्णय घे" असा सल्ला नकोय, तर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते ते ऐकायचं आहे. >>>>

ज्या विवाह बंधनात कोणत्याही प्रकारचे सुख मिळत नाही उलट त्रासच होत आहे असे बंधन जोखड बनून वाहण्यात काहीच अर्थ नाही. माहेरून पाठिंबा असताना आणि तुम्ही आर्थिकरित्या स्वावलंबी असताना तर अजिबात म्हणजे अजिबातच नाही.

पुरावे गोळा करा आणि काडीमोड घ्या.

फार हळहळ वाटली हे सर्व वाचून! तुम्ही विचारले आहे म्हणून - एकतर मी बहुदा लग्न केले नसते आणि दुसरे ते इतके टिकवलेही नसते. माहेरचा भक्कम आधार असताना का स्वतःला रोज रोज ही शिक्षा देता? वेगळे रहायला लागा शक्य तितक्या लवकर. कायदेशीर लढाई सोपी असेल नसेल पण किमान या रोजच्या अत्याचारापासून तरी सुटका होईल तुमची. It's your body. It is your responsibility to respect it. If you don't respect/take care of your body nobody will. बाहेर पडल्यावर उगीच लोकभयास्तव खोटी कारणे देऊ नका. खरे कारण सांगा. लोक काय म्हणतील या गोष्टीचा मुळीच विचार करू नका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! I hope you will be a very happy person one day!

किंबहुना मला वाटते हा धागा काढण्यामागे आपला असाही एक सुप्त हेतू असावा की लोकांचे विचार जाणून घेऊया. त्यांनीही अश्या नवरयाला सोड असे सल्ले दिल्यास मग आपल्या मनात गिल्ट राहणार नाही.
आणि हो, या हेतूत काही गैर नाही. याची मनाला गरज असतेच. >> मला सोडायची मनापासून इच्छा आहे. पण मी फक्त माझ्या त्रासाचा विचार करून मुलाला वडिलांपासून वेगळे करत नाही ना असं वाटतंय. मोठा झाल्यावर तो ठरवेल कुठे राहायचं ते. पण आता मी वेगळी राहिले तर त्याच्या बालमनावर वाईट परिणाम होणार नाही ना? तसं झालं तर नक्की गिल्टी वाटेल

सुरवातीच्या संकटात .
आर्थिक स्थिती सावरे पर्यंत आर्थिक मदत ही तुम्हाला हित चिंतक लोकांकडून होणे गरजेच आहे.
त्या प्रमाणे मानसिक support पण गरजेचा आहे.
आव्हान करा प्रतक्षात येवून किती मदत करतील आणि फुकटचे सल्ले किती देतील हे माहीत पडेल.
आपण निर्णय घेताना आपले कमीत कमी नुकसान व्हावे.
दोघं मध्ये चर्चा करून प्रश्न सोडवणे
जी गोष्ट मना विरूद्ध घडत आहे त्याचा विरोध करणे.
विरोध केल्या नंतर समोरचा शारीरिक इजा पोचवत नसेल तर.
त्याला समजावून डॉक्टर चा सल्ला घेणे आणि ह्या मध्ये जबाबदार व्यक्ती ला(आई वडील, नणंद,जवळचा कॉमन मित्र)सहभागी करून घेणे.
ह्या स्टेप मध्ये प्रश्न सुटलाच पाहिजे.
आणि तरी सुद्धा प्रश्न सुटला नाही तर वेगळे होणे.
तुमच्या नवऱ्याला तो कुठे चुकतोय ह्याची जाणीव नसते पण तुमच्या विषयी द्वेष पण नसतो.
चूक दाखवून ध्या .
मत परिवर्तन होईल.
समाज प्रत्यक्षात कधीच मदत करत नाही हे त्रिवार सत्य आहे स्वतःचे
प्रश्न स्वतःच सोडवायला लागतात आणि असफल झालो तर परिणाम सुद्धा स्वतःच
भोगायचे असतात.
त्या मुळे भावना विवेश
न होता बुध्दी नी निर्णय
घ्या

मी नवर्याला बोलले, रोजच्या ऐवजी आठवड्यातून दोन वेळा संबंध ठेऊ. मला पण आराम मिळेल. पण तो ऐकत नाही Sad

नवीन Submitted by Helpme on 22 November, 2019 - 03:32

रात्री झोपताना जायफळ खालून दूध किंवा कॉफी पाजा, झोपून जाईल लवकर मग त्रास देणार नाही.

तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता? >> चांगली नोकरी पकडून लगेचच वेगळे झालो असतो. घटस्फोट मिळो किंवा नाही मिळो, पोटगी मिळो किंवा नाही मिळो, घरच्यांचा आधार असुदे किंवा नसूदे. पुढची परिस्थिती खूप कठीण झाली असती पण त्या सर्वाला सामोरे जाण्यासाठी ठाम उभा राहिलो असतो. मुलासाठी तडजोड हि दोघांकडून असावी. तुम्ही वेगळे राहिल्यास जर तो मुलाच्या शिक्षणाचा आणि इतर खर्च स्वतःहून उचलायला तयार असेल तर त्याचे मन मुलामध्ये गुंतले आहे असे म्हणता येईल. नाहीतर फक्त मुलाला लळा आहे म्हणून एकत्र रहाण्यात काहीही अर्थ नाही. मुलाला कसे समजावयाचे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

रात्री झोपताना जायफळ खालून दूध किंवा कॉफी पाजा, झोपून जाईल लवकर मग त्रास देणार नाही. >>

अजनबी रात्री राहिलं एखाद्या वेळेस तर तो पहाटे उठवतो. फॅक्टरी घराला चिकटून आहे. दूपारी जेवायला आल्यावरही त्याला चालते. नातेवाईकांकडेही सुट्टी नसते. एकदा तर माहेरी वडील आमच्या बरोबर खोलीत झोपले होते. तेव्हा सुद्धा या माणसाने असला गलिच्छ प्रकार केला. आणि असं नेहमीच घडतं.

रात्री झोपताना जायफळ खालून दूध किंवा कॉफी पाजा, झोपून जाईल लवकर मग त्रास देणार नाही. >> आणि मला हा धागा विनोदी व्हायला नकोय.

Pages