एकीकडे नवर्याचं विबासं, डॉमिनेशन आणि दूसरीकडे निष्पाप मुलगा

Submitted by Helpme on 21 November, 2019 - 20:57

हा डुप्लिकेट आयडी आहे. आज मला तुमचा " तुझा तू नीट विचार करून निर्णय घे" असा सल्ला नकोय, तर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते ते ऐकायचं आहे. मी फार मोकळ्या मनाने सर्व काही लिहिले आहे. कृपया कसलाही गैरसमज करून घेऊ नका आणि समजून घ्या.

माझ्या प्रेमविवाहाला ८ वर्ष झाली आहेत. त्यापूर्वी ७ वर्ष आमचे प्रेमसंबंध होते. माझे इंजिनीरिंग झाले असून नवऱ्याची १२वी झाली आहे. वयाच्या १८व्या वर्षी फार दूरचा विचार न करता मी प्रेमात पडले. त्यानंतर ६ महिन्यांनी मला चुकीची जाणीव झाली व मी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला परंतु तो इमोशनल ब्लॅकमेल करायचा म्हणजे ब्रेकअप संदर्भात बोलले कि खूप मोठ्याने रडायचा, त्याला चक्कर यायची, वेड लागल्यासारखं करायचा. मग मी पण घाबरून जायचे.

नंतर मग मी त्याच्यातले चांगले गुण शोधून स्वतःला समजावले. पुढे जाऊन त्यानेही स्वतःला प्रूव्ह केले. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. त्यानंतरच्या काळात त्याने शारीरिक रित्या जवळ यायला सुरुवात केली. थोडी मनाविरुद्धच मी त्यालाही बळी पडले. एकंदरच तो खूप डॉमिनेटिंग वागायचा. अजूनही तसाच आहे म्हणा. जेव्हा नवीन नवीन तो मला लॉजवर घेऊन जायचा सलग न थांबता ५ ते ६ वेळा सेक्स करायचा. मला खूप त्रास व्हायचा परंतु तो अजिबातच माझा विचार करायचा नाही. सेक्स करताना मात्र अजिबातच रोमँटिक वागायचा नाही. no foreplay at all... पॉर्न बघून स्वतःला उत्तेजित करायचा आणि डायरेक्ट इंटरकोर्स सुरु करायचा. मिठी मारणे, चुंबन घेणे असल्या गोष्टी अजिबात नाही. जर घेतलंच तर कडकडून ओठाला चावायचा. एकंदर माझी प्रेमाची मानसिक गरज भागत नव्हती. व मी मनाने एकटी पडले होते. सगळ्या मर्यादा आधीच ओलांडल्यामुळे मला त्याच्याशी लग्न करण्यावाचून पर्याय नव्हता.

नंतर लग्न झाल्यावरही त्याला माझ्याबद्दल कसलंच कौतुक नव्हते. लग्नानंतर माझे सासर छोटे गाव असल्याने तिथे आयटी कंपनी नव्हती. म्हणून मी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. नवीन लग्न झाले तेव्हा मला वाटायचे त्याने माझ्या आजूबाजूला असावे. मला वेळ द्यावा. परंतु त्याला असं काहीच वाटत नव्हते. तो काम झाले कि मित्रांमध्ये जाऊन बसायचा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत बसायचा. मी त्याची वाट बघून कंटाळून झोपी जायची. मला गाढ झोप लागली कि नेमका तो बेडरूम मध्ये यायचा आणि सेक्स करायचा. माझी खूप चिडचिड व्हायची.

असे नाही कि मी या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलले नाही. मी अनेकदा त्याच्याशी बोलले पण तो बोलायचा की त्याचे काही चुकतच नाही. याच गोष्टी असं नाही सगळ्यांच्याच बाबतीत तो प्रचंड डॉमिनेटिंग आहे. वडील नसल्यामुळे सगळ्या फॅमिलीची जबाबदारी त्याने पेलली. त्यामुळेच त्याच्यामध्ये खूप गर्व आला आहे. त्याने धाकट्या भावाला देखील त्याच्या मनाविरुद्ध पसंत नसलेल्या मुलीशी लग्न करायला लावले का तर त्या मुलीची माहेरची प्रचंड श्रीमंती होती म्हणून. पण मी हे बोलून दाखवले तर अजिबात मान्य केले नाही. आता त्याच्या बिचार्याच्या संसारात खूप वाद होत आहेत. पण माझा नवरा करून सावरून नामनिराळा आहे.

मला सेक्सबाबत कधीच स्वातंत्र्य नव्हते अजूनही नाही . जेव्हा नवरा म्हणेल तेव्हा या गोष्टींना सामोरे जावे लागते. आठवड्यातून किमान ६ रात्री तरी मला हि ड्युटी करावी लागते. जर सलग २ दिवसांचा गॅप पडलाच तर तुला कधीच इच्छा नसते, १५ १५ दिवस करू देत नाहीस अशी अतिशयोक्तीपूर्ण विधान ऐकून घ्यावी लागतात. माझी पण या सगळ्या गोष्टींसाठी तीव्र इच्छा आहे असे मला दाखवावे लागते. माझं पण समाधान झालं आहे असेही दाखवायला लागतं. नाही दाखवले तर चावणं, बोचकारणे, चिमटे काढणे हे प्रकार होतात . जर एखाद्या दिवशी माझ्या नशिबाने त्याने माझे म्हणणे ऐकलंच तर पहाटे उठवून करायला लावतो. मी कितीही दमले तरी माझी सुटका नाही. एकदा दिराच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी आम्ही मुंबई ला गेलो असताना दिवसभर खूप दगदग झाल्यामुळे मी खूप दमले होते. त्या रात्री चुलत नणंदेच्या घरी आमचा मुक्काम होता. तेव्हा मी सेक्सला नकार दिला असता त्याने खाडकन कानाखाली लावून दिली. असे नाही कि मी त्याच्या आणि माझ्या घरच्यांशी या विषयावर बोलले नाही. पण त्याच्या घरच्या लोकांनी लक्ष घातले नाही, आणि माझ्या घरच्या लोकांच्या समजावून किंवा रागावून सांगण्याचा काहीच फरक पडला नाही. मला वाटायचे कि माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझाच लिबिडो कमी पडतोय. मी त्याला sexologist कडे जाऊ म्हणायची तर दुर्लक्ष करायचा. नंतर माझ्या लक्षात आले कि अगदी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स सुद्धा खूप आहे. मी त्याला या गोष्टी सांगितल्या तर मला म्हणतो कि मी खरा पुरुष आहे. म्हणून माझी सगळ्यांपेक्षा गरज जास्त आहे. मग तिथे माझे काहीही का हाल होईनात. पाळीच्या दिवसांत पण सुटका नाही.

लग्नानंतर दीड वर्षात काळात मला मुलगी झाली. दुर्देवाने ती मतिमंद झाली. त्यानंतरची ५ वर्ष अक्षरशः मी खूप सोसले. मी पूर्ण नैराश्याने ग्रासले होते. ती झाल्यावर २ वर्षात मी अजून एक चान्स घेतला. त्यानंतर मी मुलांमध्ये पूर्ण गुरफटून गेले.नंतर पुन्हा एकदा माझ्यावर दुर्दैवाने आघात केला. माझी मुलगी ५ वर्षांची झाल्यावर हे जग सोडून गेली. तेव्हा माझ्या माहेरच्यांनी मला १ महिना माहेरी नेले. तिथे मला खूप मोकळे वाटले. मुलगी जाण्याचे दुःख बाजूलाच राहू दे, मला सासरी येऊन परत या माणसाला शारीरिक सेवा द्यायचे टेन्शन आले होते. पुन्हा त्याच्याकडे जाण्याआधी मी कबूल करून घेतले कि तो याबाबतीत मला समजून घेईल. अर्थात तसे काही झाले नाही म्हणा. पहिले पाढे पंचावन्न.

मुलगी गेल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचे ठरवले. मी पण आमच्या कंपनी मध्ये यायला लागले. जरा बरे वाटायला लागले. नवऱ्याची तर्हा काही बदलली नव्हती म्हणा.

गेले ६ महिने झाले नवऱ्याचे कंपनी मधल्या एका सतरा वर्षांच्या मुलीबरोबर अफेयर सुरु आहे. सर्व ३० कामगारांना माहित आहे. मला फक्त १ महिन्यापूर्वी confirm समजले आहे. अगदी खात्रीशीर पुरावे मिळाले आहेत. सासूलासुद्धा आधीपासून सर्व माहित आहे. ती काहींच बोलत नाही. indirect support..

मी खूप वेळा नवऱ्याला या विषयावरून बोलले, पण तो नेहमी एवढंच बोलतो कि माझा गैरसमज आहे. मी त्या मुलीला कंपनी मधून बाहेर काढले तर नवरा तिला बाहेर भेटेल. वर माझ्या शरीराचे अजून अजून लचके तोडेल ते वेगळंच. मला आता त्याच्याबरोबर राहणे मुश्कील झाले आहे. इतके दिवस फक्त मुलांना आई आणि बाबा दोघांचे प्रेम मिळावे यासाठी राहत होते. इथून पुढेही राहिले तर याच कारणासाठी राहीन. पण बऱ्याच वेळा असं वाटत कि मुलगा मोठा झाला कि तो त्याच्या आयुष्यात सुखी होईल. मला मात्र मरेपर्यंत या माणसासोबत राहावे लागेल. आता ३४ वय आहे माझे. अजून ५ ते ६ वर्षानंतर बाहेर पडणे नाही जमणार. पण नंतर परत मुलाचा निरागस चेहरा डोळयासमोर येतो आणि असे वाटतं करावी तडजोड.

काय योग्य राहील माझ्या आणि मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने?
खरं सांगा तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता? मला तटस्थपणे सल्ला नकोय. तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केले असतं ते सांगा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बौद्धिक क्षमता असून काय उपयोग होता. तेव्हा माहेरचे पण कचरत होते. एक वर्ष झाले मी काम करायला सुरुवात केली आहे. आणि मुख्य म्हणजे मला आणि माहेरच्या लोकांना पण पटलं आहे की नवरा कधीच बदलणार नाही. मुळात नवरा अतिरेक करतोय हेच उशिरा समजलं. मला वाटायचं की माझा लिबिडो कमी पडतोय. मला मुर्ख समजू शकता. माझं लग्न झालं तेव्हा मी याबाबत कोणाशी शेअर सुद्धा करत नव्हते. खरं सहन करण्याचं कारण माझी मुलगी होती. ती होती तेव्हा तिला प्राधान्य होते. आता कुठे मी स्वतःचा विचार करायला लागली आहे. >> तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण प्रत्येक abusive relationship victim चा हा अगदी असाच journey असतो, त्यामुळे स्वत:ला किंवा स्वतःच्या अकलेला अजिबात दोष देऊ नका. आयुष्यातला एक unfortunate accident होता असं समजा , जर फारच प्रश्न पडायला लागले तर. आणि जे तुमच्या वरतीच बोट दाखवत आहेत, अशांना पूर्ण बेदखल करा.

जे मुलगा आणि बाप हे एक सुंदर नातं आज तुम्हाला दिसतंय त्याला तुमच्या नवर्‍याकडुनच सुरुंग लागू शकेल. बापानीच स्वतःच्या मुलीशी / मुलाशी केलेलं अनैतिक वर्तन, लैंगिक शोषण यासंबंधी खूप वाचलं आहे, ऐकलं आहे.
>>>>>

हे वाचायला ऐकायला कितीही त्रासदायक वाटत असले तरी ही शक्यता नाकारू शकत नाही.

व्हॉटसपवर मित्रांचे काही ग्रूप नॉनवेज जोक्स आणि पॉर्न साहित्य शेअर करयचे बनवलेले असतात. गेल्या आठवड्यात आमच्या एका ग्रूपवर एकाने दहाबारा पॉर्न कथा टाकल्या. त्यात एकदोन कथा भाऊबहीण आणि मुलगीवडील या संबंधाच्या होत्या. सर्वांनी शेअर करणारयाला शिव्या घातल्या. त्यानेही मी सगळ्या न वाचता शेअर केल्या सॉरी बोलून प्रकरण मिटवले. पण अश्या क्था बनवल्या जातात म्हणजे त्या न खटकता आवडीने वचणारे लोकंही या जगात असतील.

<<< अजून तरी सुटका झाली नाही. तसं लवकर झाले तर बरं होईल. >>>
Uhoh खूप वाईट वाटले. पण माझ्याकडे तुमच्या समस्येचे उत्तर नाही. मनापासून सॉरी.

@इतर सर्वांना,
विषय गंभीर आहे. कृपया धागा भरकटवू नका. (डुप्लि़केट आयडी, स्त्री/पुरुष आहे का, घाबरवून टाकलत इत्यादी.)

प्रत्येक व्यक्ती नॅचरली फ्री असते.

दुर्दैवाने वरील वाक्याचा अर्थ लवकर समजत नाही. तुम्हाला तो लवकर समजो ही मनोकामना.

वरील सल्ला मी महत्त्वाचे निर्णय घेताना स्वत:पुरता नेहमी मानला आहे. प्रेमात पडायचा निर्णय जसा आपला असतो आणि जगाशी भांडून ते आपण मिळवतो तसा त्या प्रेमाचा कैफ उतरल्यावर त्यातून बाहेर पडायचा निर्णय देखील घेता आला पाहिजे.

मी माझी कुचंबणा या पातळीपर्यंत आणूच दिली नसती.

नंतर दारुड्या झालेल्या माझ्या एका मावस नातलगाच्या, खूप कमी वयात प्रेमात पडलेल्या एका मुलीला मी फार जवळून ओळखतो. तिनेही फाईट देऊन प्रेमविवाह केला आणि घरच्यांना तोडलं. नंतर मात्र तिचं आयुष्य नरकासम होतं. एका निकराच्या क्षणी ती आपल्या तीन वर्षाच्या मुलीला पॅटर्नल आज्जीकडे सोडून तिच्या माहेरी निघून गेली. पुढे काय होईल ते ठाऊक नाही. तिची फक्त नववी झाली आहे. बुद्धीने अतिहुशार नाही. त्या लहान मुलीकडे पाहून मला खूपदा भडभडून येते. वाटतं, माझ्या पत्नीसारखी, कोणाकडे हात न पसरता सन्मानानं सुखानं जगता येईल येवढे पैसे कमवण्याची तिच्या आईची ताकद असायला हवी होती. ती लहान मुलगी पुढे मोठी होईल तेव्हा खूप शिकेल, उत्तम पैसे कमवेल एव्ढीच आशा बाळगतो.

>>>> प्रश्ण योग्य आहे का?<<<<<
माझ्या पोस्टमधील अर्थ हा होता की, ' तुम्ही काय केलं असतं' हा प्रश्ण 'विचारणे' चुकीचे नाही तर त्याच्या उत्तारानुसार आपला निर्णय घेणे 'चुकीचा' असू शकतो आणि ते योग्य नाही.
जसं आधीच लिहिलं त्याप्रमाणे, कोणीच पुर्णपणे तुमच्या परीस्थितीशी सामोरी जात नाही आहे. म्हणून फक्त, एक 'दिशा प्रवर्तक' कमीत कमी म्हणून बघू शकता.

बाकी, सर्वांनी बरेच सल्ले दिलेत. ह्यामधून काहीतरी क्लोजर मिळते का ते ठरवू शकता.

----
आता, खालील लिहिलेली पोस्ट वा अनुभव हा मायबोलीवरील लेखाशी, लेखिकेशी वा आयाडीशी सबंधित नाही.

हा 'हेल्पमी' आयडी स्त्री का पुरुष, की खरा का खोटा ह्या फंदात नाही पडले मी तरी, कारण, अश्या समस्या मधून गेलेल्या अगदी जवळच्या मैत्रीणी/सबंधी पाहिल्यात.
- आणि हो, सर्व स्त्रीया शैक्षणिक, आर्थिक दॄष्ट्या किमान पातळीपेक्षा नक्कीच ज्यास्त आहेत. अगदी नावजलेली डॉक्टर पासून वकील.
ह्यात, बरीच गुंतागुंतातीची कारणे असतात. मानसिक आणि भावनिक दृष्ट्या असे निर्णय घेणे कठिण झाल्याने/ कठिण केल्याने ह्या व्यक्ती अडकतात. कळतं पण वळत नाही असेच वागणं मी तरी ह्या मैत्रीणींबाबत पाहिलय.
मला माहित असलेल्या , ह्या सर्व स्त्रीयांचे जोडीदार हे 'नारसीसिस्ट' आहेत हे दिसून सुद्धा , त्यां अडकल्या आहेत.
प्रत्येकाची शारीरीक, मानसिक व भावनिक जडण-घडण सुद्धा कारणीभूत असते, त्यामुळे नक्की एका गोष्टीवर बोट ठेवू शकत नाही.
माझं मन विष्ण्ण होतं जेव्हा, त्या मैत्रीणीमधली एक खूप जवळची आहे. अतिशय सुंदर, उच्च पदावर असून, घरचे साथ द्यायला तयार असून, ती अजून निर्णय घेत नाहीय. तिला मूलही नाहीये. पण, तिची स्वतःची भिती, 'समाज काय म्हणेल'? आता ह्या वयात एकटी कसे राहू? तिचे वय ४२ आहे. जेव्हा जेव्हा तिचा निर्णय होतो वेगळं होण्याचा, त्या नवर्‍याच्या रडण्याला आणि काव्याला बळी पडते व मन बदलते. कठिण आहे.
तिला स्वतःला कौन्सिलिंगचा उपाय सांगून , ती अजून डिनायल फेजमध्येच आहे.

अश्या विक्टीमची जर्नी हि अशीच असते,
नारसीसिस्ट जोडीदार माईंडगेम खेळतात व विक्टीमला, अपराधी पणात लोटणे, मग सिंपथी मिळवणे, दोष देणे, घाबरवणे( हार्ट अ‍ॅटॅक आलाय, मी आत्महत्या करतोय असे सांगणे) असे वेळ असेल त्या प्रमाणे खेळी खेळतात. त्यामुळे, समोरचा विक्टीम गोंधळतो व अडकला जातो.
असो. अशी उदाहरणं पाहिली की, शाळेत, अजून मेंटल हेल्थ आणि ईमोशनल ईंटेलिजेन्स शिकवत नाहीत. हि खंत आहे म्हणून.

उपाशी बोका, घाबरवून टाकलंत का यात धागा भरकटवण्यासारखं काय आहे ? आपण एखाद्याला सल्ला देताना तारतम्य पाळणे अपेक्षित आहे. वाचलेले किस्से, ऐकलेले किस्से खरे किती खोटे किती याबद्दल काहीच माहिती नसताना केवळ इथे आलेल्या माहितीवर मत बनवून थेटच असे होईल अशी भीती घालणे योग्य आहे का ?
हेच अशा अशा शक्यता असतात त्यामुळे काळजी घ्या असेही सांगता आले असते. ती व्यक्ती ऑलरेडी ताणाखाली आहे हे लक्षात नको का घ्यायला ?

> अश्या समस्या मधून गेलेल्या अगदी जवळच्या मैत्रीणी/सबंधी पाहिल्यात.
- आणि हो, सर्व स्त्रीया शैक्षणिक, आर्थिक दॄष्ट्या किमान पातळीपेक्षा नक्कीच ज्यास्त आहेत. अगदी नावजलेली डॉक्टर पासून वकील.

अश्या विक्टीमची जर्नी हि अशीच असते,
नारसीसिस्ट जोडीदार माईंडगेम खेळतात व विक्टीमला, अपराधी पणात लोटणे, मग सिंपथी मिळवणे, दोष देणे, घाबरवणे( हार्ट अॅटॅक आलाय, मी आत्महत्या करतोय असे सांगणे) असे वेळ असेल त्या प्रमाणे खेळी खेळतात. त्यामुळे, समोरचा विक्टीम गोंधळतो व अडकला जातो.
>

जर तुम्हाला अशा स्त्रिया माहित असतील, त्यांचा प्रवास जवळून पाहिला असेल तर त्याविषयी (खरी नावं, जागा, व्यक्ती कोण हे ओळखू येईल अशा इतर गोष्टी बदलून/वगळून का होईना पण) लिहायला चालू करा. पब्लिक फोरमवर, खुलेपणाने, जिथे स्त्री-पुरुष दोघे येतात तिथे! शाळा-कॉलेजात मेंटल हेल्थ आणि ईमोशनल ईंटेलिजेन्स कधी चालू होईल तेव्हा होईल; तोपर्यत हे असे लेख, चर्चा इतर अंड्यातल्यांना थोडतरी जागरूक करतील.
===

Helpme ने असा धागा काढला, त्यात व्हेग न बोलता खुलेपणाने लिहले त्याबद्दल तिचे कौतुक वाटले.
निर्णयासाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!

अ‍ॅमी,

सुरुवातीला मी खरे तर काम सुद्धा केलय एक मदतनीस म्हणून आणि त्यामुळेच मला ज्यास्त हळहळ वाटते. तिथे बर्‍याच स्त्री/पुरुष/लहान मुलं केसेस यायच्या. बुलिंग झालेल्या, होम वायलेन्स, टॉर्चर वगैरे.... पण ते काही माझं पुर्णवेळ काम न्हवते.
सुरुवातीला खुप इच्छा होती, जेव्हा स्त्रीया म्हणा वा पुरुष म्हणा पण जेव्हा लहान लहान मुलं बुलिंग, अथवा नारसीसिस्ट आई-वडीलांच्या जाळ्यात अडकलेली पाहिली तेव्हा वाटलं की, लिहावं, बोलावं, सपोर्ट ग्रूप करावा पण एकंदरीत, इतकी उदासिनता आहे ना ह्या विषयात की, आपण व्यर्थ प्रयत्न करतोय असे झाले. असो. हा धाग्याचा विषय नाही.
पण, डिजिटल वर्ल्ड मध्ये, आता तरी बरेच कानावर पडतेच लोकांना. जाग आलीय पण डोळे पुर्ण उघडायचे बाकी आहेत... तर बघुया... शाळेत तर मेंटल हेल्थ हा विषय असू शकतो हे अजून बर्‍याच लोकांना पटायचे आहे.

तुम्ही जे लिहीलय त्या अनुषंगाने विचार करुन मला वाटलेले काही.
* तात्काळ असा पति नी असं घर सोडुन स्वतःची स्वतंत्र व्यवस्था पहा. (जास्त सेक्स ड्राईव्ह असणं गुन्हा किंवा चुक नाही पण अशावेळेस समोरची व्यक्तीही माणुस असुन तिलाही तिच्या भावना, इच्छा-अपेक्षा आहेत याच स्पष्ट भान असणं नी ठेवणं गरजेच आहे)
* तुमच शिक्षण व्यवस्थित झालेले आहे, त्यामुळे वेगळे रहाण्यास फारसे कष्ट पडणार नाहीत. तसेच तुम्ही तुमचा व्यवसायही सुरु केलेला आहेच.
* मुलाशी तुमचा किती जिव्हाळा आहे. त्याच्याशिवाय किंवा त्याच्या बरोबर यापैकी कोणता पर्याय तुम्हाला मानवेल. (हे यासाठी की मुलाला नवर्याकडे सोडुन निघालात तर नजीकच्या भविष्यात तुम्हाला भावनिकरित्या मानसिक त्रास दिला जावु शकतो जसं की भेटु न देणे वगैरे.)
* ईतर कसलीही चिंता न करता सर्वप्रथम स्वतःला आर्थिकरित्या मजबुत करा त्यासाठी पहिली काही वर्ष मान मोडुन मेहनत करावी लागली तरी
* माहेरचं पाठबळ असेल तर बाहेरुन त्या मुलीला साम, भेद किंवा गरज पडल्यास दंड पद्धतीने समजवण्याचा एक प्रयत्न करुन पहा. (पुरावे असतील तर ते फक्त तिला तिच्या सामाजिक बदनामीची भिती यासाठी पुरेसे ठरावेत.)
* तुम्ही मानसिकरित्या किती खंबीर आहात, यावर तुमची पुढील सामाजिक वाटचाल अवलंबुन आहे. जर मनापासुन वाटत असेल तरच पुन्हा पती-पत्नी नात्यात गुंता पण त्यावेळेसही १० वेळा विचार करा (तुमची चुक दाखवण्यासाठी म्हणुन नाही पण आधी उचलेल्या अविचारी पावलाने जे घडले तसं पुन्हा घडु नये यासाठी).
* एकट्या आहात असे पाहुन तुम्हाला भावनिक, मानसिक किंवा आर्थिक आधार देणारे (काही सज्जन सोडले तर) भुछत्र्यांसारखे उगवतील, त्यात लोकांची मानसिकता ओळखा, प्रत्येकाला नीट पडताळल्याशिवाय तुमच्या खाजगी वर्तुळात किंवा खाजगी बाबीत ढवळाढवळ किंवा नाक खुपसु देवु नका ( आपण दु:खी असताना सहानुभुतीने बोलणारा प्रत्येकजण आपल्याला अगदीच मनाच्या, हृदयाच्या जवळचा वाटतो). अशी तकलादु सहानुभुती शारिरिक शोषण या टप्प्यावर जावु शकते.
* असणारे पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी साठवुन ठेवा पण त्याचा गवगवा करु नका. योग्य वेळेस योग्य बाण वापरला गेला तरच त्याचा फायदा.
* शेवटचे महत्त्वाचे तुमच्या अंतरंग संबंधांबद्द्ल तुम्ही लेखात किंवा प्रतिसादात लिहीलेत, ती तुमची तुमचा मुद्दा स्पष्ट करायची गरज होती असे समजतो.पण यापुढील कोणत्याही प्रतिसादात त्या बाबींचा उल्लेख कृपा करुन करु नका. आंतर्जालावर मानसिक विकृत असणार्यांची कमी नाही वाटल्यास मोठा भाउ म्हणुन अधिकाराने सांगतोय अस समजा. (पुन्हा काही सांगावसं वाटलं तर लिहीन.)
* काळजी घ्या, विचारपुर्वक निर्णय घ्या, जे कराल त्यात यशस्वी व्हा. पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा.

>> शाळेत तर मेंटल हेल्थ हा विषय असू शकतो हे अजून बर्‍याच लोकांना पटायचे आहे.
>> Submitted by झंपी on 23 November, 2019 - 07:25

आपले शालेय शिक्षण फक्त नोकरी मिळविण्यासाठी कामी येईल असे आहे. ते शिक्षण नाही प्रशिक्षण आहे. शिक्षण हे जीवनाभिमुख असते. जगायला व जगताना येणाऱ्या समस्या सोडवायला शिकवते. दुर्दैवाने सध्या तरी असे शिक्षण दिले जात नाही. ज्याचे त्यालाच शिकावे लागते. मोठा विषय आहे. वेगळा धागा काढावा लागेल. अवांतराबद्दल क्षमस्व.

सर्व पोस्ट ची सरासरी काढली तर जास्त सल्ले हे वेगळे व्हा असे आहेत.
सल्ले देणाऱ्याने ते दिले आहेत खरी लढाई तुम्हाला लढायची आहे.
इथे भावनेला किंमत नाही.
तुमच्या पोस्ट मधील माहिती प्रमाणे तुम्ही खेडेगावात राहत आहात.
आणि तुम्ही जे शिक्षण घेतले आहे त्याला शहरात scope आहे.
एक तर तुमचे शिक्षण पूर्ण होवून 12 वर्ष झाली आहेत.
तुम्हाला त्या क्षेत्र मधील काम करण्याचा अनुभव 0 आहे.
प्रतक्षत कामाचा अनुभव नसेल तर पुस्तकी शिक्षण काही कामाचे नाही.
तंत्र बदलेले आहे रोज बदलत आहे.
त्या मुळे त्याच क्षेत्रात नोकरी मिळेल ह्याची शक्यता किती आहे ह्याचा अंदाज तुम्हाला नोकरी शोधताना येईल.
शहरात आलात की राहण्याचा बंदोबस्त करणे ही प्रधमिक गरज आहे.
म्हणजे वेगळे झाल्या पासून स्थिर होण्या पर्यंत तुमच्या कडे पुरेल एवढं पैसा हवा.
परत कोर्टात केस पण चालू असेल.
वकील समाजसेवा करण्यासाठी व्यवसाय करत नाहीत .
अडवणूक करून जास्तीतजास्त फीस उकळण्याचा प्रयत्न करेल..ह्याची जाणीव प्रत्यक्ष त्यात पडल्यावरच येईल
सल्ले देणे ही वेगळी बाब आहे आणि प्रताक्षात मदत करणे ही वेगळी बाब आहे.
मदत करणारे दुर्मिळ असतात.
मदतीचा देखावा उभा करून स्वार्थ साधणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.
तुमचे प्रश्न ज्यांना माहीत नाहीत .
आणि आता आर्थिक बाबतीत सुस्थितीत असल्या मुळे जी लोक जवळ आली आहेत .
तीच लोक आर्थिक संकटात सापडले की दूर जातील हे वास्तव
विसरू नका.
इथे कोण्ही कोणाचा नसतो.
त्या मुळे भावनेला जास्त किँमत न देता एक प्लॅन बनवून तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न चालू करा .
आणि खात्री पटली की सर्व पत्ते उघडे करा.
इथे बसून आम्ही पाकिस्तान मध्ये घुसून तो जिंकायचे सुद्धा सल्ले सरकारला आणि सैन्य ल देतो.
पण युद्ध म्हणजे काय असते ते सैन्य च जाणतात जे युद्ध भूमीवर लढत असतात.

एच आय व्ही एड्स ची टेस्ट पहिले करुन घ्या.
जोपर्यंत त्या माणसाशी रिलेशन आहे तोपर्यंत हा धोका कायम तुमच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार. तुम्हाला त्याच्यामुळे असा काही रोग झाला तर मुलाचं पुढे काय होईल हाही विचार करा. आणि लवकरात लवकर संबंध तोडा.

मुलावर या माणसाचा सहवास, प्रभाव अजिबातच चांगला नाही. तो मुलालाही अब्युज करु शकेल ही शक्यताही नक्कीच आहे. इतरही मार्गाने तो मुलाला त्याच्यासारखं बनवेल. ते तुम्हाला हवं आहे का? तो 'चांगला बाप' नक्कीच नाही. स्वतःसाठी नाही तर मुलासाठी बाहेर पडा. मुलगा शिकायला हवा आहे ना? त्याचं वैवाहिक जीवन तुमच्यासारखं असायला हवंय की नॉर्मल असायला हवंय?

> सुरुवातीला मी खरे तर काम सुद्धा केलय एक मदतनीस म्हणून > झंपी _/\_
===

> * माहेरचं पाठबळ असेल तर बाहेरुन त्या मुलीला साम, भेद किंवा गरज पडल्यास दंड पद्धतीने समजवण्याचा एक प्रयत्न करुन पहा. (पुरावे असतील तर ते फक्त तिला तिच्या सामाजिक बदनामीची भिती यासाठी पुरेसे ठरावेत.) > हे अजिबात करू नका. एकतर ती मुलगी १८- आहे आणि नवरा इमोशनल मॅनिप्युलेटर+पर्व्हर्ट असल्याचा १५ वर्षांचा अनुभव तुम्हाला स्वतःला आहे. मुलीचे वडील/गार्डिअन रेप केस् लावू शकतात नवर्यावर. या विबसंचे पुरावे गोळा करण्याचा उपयोग फक्त आणि फक्त नवर्याला स्वतःपासून दूर ठेवण्यास+ पुढे घटस्फोट घेताना गरज पडली तर म्हणून करा.

> * शेवटचे महत्त्वाचे तुमच्या अंतरंग संबंधांबद्द्ल तुम्ही लेखात किंवा प्रतिसादात लिहीलेत, ती तुमची तुमचा मुद्दा स्पष्ट करायची गरज होती असे समजतो.पण यापुढील कोणत्याही प्रतिसादात त्या बाबींचा उल्लेख कृपा करुन करु नका. आंतर्जालावर मानसिक विकृत असणार्यांची कमी नाही वाटल्यास मोठा भाउ म्हणुन अधिकाराने सांगतोय अस समजा. (पुन्हा काही सांगावसं वाटलं तर लिहीन.)> याच्याशीदेखील असहमत. आंतरजालावर मानसिक विकृत लोकं आहेत म्हणून घरातल्या मानसिक विकृताबद्दल स्पष्ट लिहू नका? हे सांगायचा उद्देश कितीही चांगला (वाटत) असला तरी तो एकंदर स्त्रियांच्या दृष्टीने लॉंगटर्म पाहता हानिकारक आहे. उलटा मीतर म्हणते स्त्रियांनी याबद्दल उघडपणे बोलायला चालू करावं (डुआयडी घेऊन किंवा मी वर लिहलंय तसं खरी नावं, जागा, व्यक्ती कोण हे ओळखू येईल अशा इतर गोष्टी बदलून/वगळून)

हां जालावरच्या अनोळखी कोणाशीही १:१ मैत्री, व्यनितून बोलणे वगैरे करू नका हे सांगणे ठिकय. कोणाला जर खरंच तुम्हाला मदत करायची असेल, मदत करणाऱ्या संस्थेचा पत्ता द्यायचा असेल तर ते इथे पब्लिकली देऊ शकतात.

हां जालावरच्या अनोळ कोणाशीही १:१ मैत्री, व्यनितून बोलणे वगैरे करू नका हे सांगणे ठिकय. >>> मी इथे दणदणीत तुम्हाला विपू केली आहे असे म्हटले आहे. आणि त्याचा उद्देश प्रतिसादाला फाटे फुटू नये इतकाच आहे. इथे दीड शहाणे लोक असतात म्हणून तसे केले. ओळखीचा गैरफायदा घेण्यासाठी नव्हे. ती विपूही वाचू शकतातच की लोक.

पुरोगामी गाढव,
मी ते खासकरून , केवळ तुम्हाला उद्देशून असे लिहलेले नाही.

> * एकट्या आहात असे पाहुन तुम्हाला भावनिक, मानसिक किंवा आर्थिक आधार देणारे (काही सज्जन सोडले तर) भुछत्र्यांसारखे उगवतील, त्यात लोकांची मानसिकता ओळखा, प्रत्येकाला नीट पडताळल्याशिवाय तुमच्या खाजगी वर्तुळात किंवा खाजगी बाबीत ढवळाढवळ किंवा नाक खुपसु देवु नका ( आपण दु:खी असताना सहानुभुतीने बोलणारा प्रत्येकजण आपल्याला अगदीच मनाच्या, हृदयाच्या जवळचा वाटतो). अशी तकलादु सहानुभुती शारिरिक शोषण या टप्प्यावर जावु शकत >

या मुद्यानंतर Rajeshच्या प्रतिसादात आलेला

> सल्ले देणे ही वेगळी बाब आहे आणि प्रताक्षात मदत करणे ही वेगळी बाब आहे.
मदत करणारे दुर्मिळ असतात.
मदतीचा देखावा उभा करून स्वार्थ साधणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. >

या मुद्यानेच पुढे जाऊन लिहले...

माझ्या नात्यातल्या एका मुलीची तीन लग्ने झाली. पहिल्या वेळी प्रेमविवाह असतानाही कोर्टात जावे लागले. त्या वेळी सर्वांना किती मन:स्ताप झाला हे माझं मलाच ठाऊक आहे. शिवाय समुपदेशनाच्या वेळी दोघेही पुन्हा विचार बदलत राहतात. अशाने तारखा वाढत जातात. शेवटी आमची मुलीची बाजू असल्याने आणि वकीलाने आम्हाला सल्ला दिल्याने कोर्टाबाहेर मिटवतो असे कोर्टाला सांगून त्याप्रमाणे सगळ्या अटी मान्य करून घटस्फोट मिळवावा लागला. वकीलाने सांगितले की बहुतेक केसेस मधे असेच घडते. अडून बसले की वेळ जात राहतो.

दुसरी केस मित्राची आहे. अजून पर्यंत घटस्फोट झालेला नाही. जज्जच्ची बदली झाल्याने आता पुन्हा पहिल्यापासून केस सांगावी लागत आहे.
अजून दोन तीन केस नंतर आता मी कुणासोबत म्हणूनही जात नाही कोर्टात की कुणाला कोर्टात जायचा सल्लाही देत नाही. न्याय नको पण तारखा आवर असली भिकार प्रोसेस आहे. शिवाय बेछूट आरोपांनी मन:स्ताप होते ते वेगळेच. आपल्याला काही त्याची सवय नसते. हे कोडग्या लोकांचे काम आहे.

म्हणून मी ताईंना पर्सनली सल्ले दिले.
आंजा वर सगळे मी कसा भारी विचार करतो या स्पर्धेत भाग घेतल्याप्रमाणे करत असतात. यातल्या किती जणांना प्रॅक्टीकल अनुभव असतात हे देवच जाणे !

१. मायबोलीकरहो, अतिशय तणावपूर्ण मनस्थितीत मी हा धागा उघडला आणि मला दिशादर्शनाची तीव्र गरज होती. आपण सर्वांनी अतिशय विचारपूर्वक संयतपणे उत्तमोत्तम पर्याय सुचवले आणि मला निश्चित दिशा मिळाली आहे.

२. हो, इतकं मोकळ्या मनाने सर्व लिहीणं अवघड होते. शब्द सुचत नव्हते. तरीही धाडस केले. हा धागा काल्पनिक नाही. शिक्षीत असूनही सहन करत राहिले कारण छळ होतोय हेच उशिरा समजलं. मारझोड, शिविगाळ, विबासं, हुंडा फक्त अशा गोष्टी अन्यायात मोडतात असं वाटायचं. आजूबाजूच्या लोकांना माझी समस्या ही समस्याच वाटत नाही.

३. इतर त्रास आहेच मला पण मी क्षुल्लक समजून धाग्यात नमुद केला नाही. जसं की, तो घरखर्च देत नाही, सगळं सामान घरी आणून देतो, कपडे घेताना त्याच्या आवडीचे घ्यावे लागतात, कोणती भाजी पावशेर आणि कोणती भाजी अर्धा किलो घ्यायची हे तो ठरवतो. सगळं त्यालाच ठरवायचं असतं. बाकीचे चुकीचे असतात असं त्याला वाटतं.

४. या सगळ्यात तुम्हा सर्वांशी बोलून एक गोष्ट लक्षात आली की त्याचा नेहमी वर्चस्व गाजवणारा स्वभाव आणि माझा सतत नमतं घेणारा स्वभाव यामुळे सगळी वाट लागली. माझी आई सांगायची एकाने आग झाले तर दूसर्याने पाणी झाले पाहिजे तरच संसार टिकतो आणि ते मी तंतोतंत पाळले. मला संसार मोडणं हा गुन्हाच वाटायचा. गेली वर्षभर झाले मी थोडा वेगळा विचार करायला लागले आहे हे खरं.

५. माझं आपल्या सर्वांशी बोलून संपूर्ण समाधान झालं आहे. मी अत्यंत सावधपणे काही निश्चित पावलं उचलणार आहे. गरज वाटल्यास पुन्हा मदत मागेन. माझ्या निर्णयांचा काय परिणाम होतो तेही नक्की शेअर करीन, कदाचित त्याचा एखाद्याला उपयोग होईल.

६. तुर्तास चर्चा थांबवली तरी चालेल. मौल्यवान वेळ आणि मदतीसाठी मनापासून धन्यवाद Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा !
मनाने खंबीर राहा, मुलाची काळजी घ्या. त्याला तुमच्याशिवाय कोणी नाही हे कधीच विसरु नका. Happy

ऑल द बेस्ट !
आणि आता पुढचे सल्ले एखाद्या चांगल्या अन ओळखीच्या वकिलाकडून घ्या.

ऑल द बेस्ट !
आणि आता पुढचे सल्ले एखाद्या चांगल्या अन ओळखीच्या वकिलाकडून घ्या.
>>> +१

ऑल द बेस्ट !
आणि आता पुढचे सल्ले एखाद्या चांगल्या अन ओळखीच्या वकिलाकडून घ्या.> > +1

ऐकीव आणि प्रत्यक्षात आपण एकादी कृती करतो तेव्हा येणारा अनुभव,अडचणी ह्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात .
त्याचा विचार आपण पाहिलं केलेला नसतो.

> Submitted by पुरोगामी गाढव on 23 November, 2019 - 13:36 > तुमच्या कोर्टातील अनुभवांवर तुम्ही वेगळा धागा काढला तर अनेकांना त्याचा उपयोग होऊ शकेल किंवा कमीतकमी कळेल तरी की काय, कसं, किती अवघड-सोपं असतं.
===

> माझं आपल्या सर्वांशी बोलून संपूर्ण समाधान झालं आहे. मी अत्यंत सावधपणे काही निश्चित पावलं उचलणार आहे. > शब्बास!! शुभेच्छा.

> गरज वाटल्यास पुन्हा मदत मागेन. > जरूर.

> माझ्या निर्णयांचा काय परिणाम होतो तेही नक्की शेअर करीन, कदाचित त्याचा एखाद्याला उपयोग होईल. > हे नक्की कर.

> तुर्तास चर्चा थांबवली तरी चालेल. > हो Happy

परत एकदा खूपखूप शुभेच्छा!!

लोक मग कायद्याचा कीस पाडत बसतील. आपण वकील सांगेल त्या बाकावर बसतो, तो सांगेल तिथे सही करतो. इथे मुद्दामून धागा काढणे म्हणजे पायावर धोंड मारून घेण्याचा प्रकार होईल. धाग्याचा उद्देश लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद आले तर हार्टफेल होईल.

कोर्टाचे काम हे खूप वेळ
खाणारे असते.
तुमची समस्या किती तीव्र स्वरूपाची आहे ह्याची जाणीव कोर्टाला नसते
ज्या साठी तुम्ही कोर्टात गेला असता त्या पेक्षा जास्त पैसा न्याय मिळवण्यासाठी जातो .
वेळ वाया जातो ते वेगळे.
तुमची बाजू सत्य असली तरी तुम्ही विजयी व्हाल ह्याची शास्वती 5 percent पण नसते .
त्या मुळे शाहणी लोक म्हणतात कोर्टाची पायरी कधीच चढू नये

हा जोक नाही.
फक्त प्रसिद्ध लोक,प्रभाव शिल लोक,
ह्यांच्या साठी च तो मार्ग योग्य आहे .
मीडिया पैसे देवून पाठपुरावा करण्यासाठी वापरता येते.
तसे सामान्य लोकांचे नाही.
पुरोगामी
नी वर खरे लिहाल आहे वकील बस म्हणेल तिथे बसावे लागते.
5 -50, लाख वर गर्व करत असाल तर मुख भंग होईल

कोर्टात जाऊ नका सल्ला देणाऱ्यांचा बाईंना त्रास होऊ नये हा उद्देश आहे की एका फेलो भारतीय नवऱ्याला कोर्टकचेरीच्या लफडयापासून वाचवण्याचा सुप्त हेतू आहे ? माझ्या माहितीतील एका स्त्रीला तर बाईंना होणाऱ्या त्रासाच्याच प्रकारातला त्रास ( एवढा नाही खूपच कमी ह्यामानाने , मारहाण / इतर बाबतीत त्रास नाही फक्त लैंगिक बाबतीत समान त्रास आणि खूप काळ झाला नव्हता लग्नाला ; नवविवाहिता होती ) होत असल्याचं कारण कोर्टात दिल्यावर लवकरच घटस्फोट आणि पोटगी दोन्ही मिळाली ... योगायोगानेच ही माहिती मला समजली नाहीतर घरचे अजून लहानच समजतात , असल्या विषयावर काही बोलणं निघालं तर कानावर सुद्धा पडू देत नाहीत ..

की एका भारतीय नव ऱ्याला कोर्टकचेरीच्या लफडयापासून वाचवण्याचा सुप्त हेतू आहे ? >> केव्हढी अचाट शक्ती आहे तुमच्यात. अगदी बरोब्बर ओळखलेत. भारतीय नव-यांची एक संघटना आहे. आणि ते जालावर भारतीय नव-याला कोर्टापासून वाचवण्यासाठी कार्यरत असतात. फार डेंजर संघटना ! कोर्टात सकाळी गेलं की संध्याकाळी नवरा जेलात जातोच जातो, त्यामुळे घाबरून या संघटनेचं काम गुप्तपणे चालू आहे. आप्ण भ्यंकर हुषार असल्याने ते अचूक ओळखलेत.

@Helpme
बरेच जण माहिती/सल्ला मिळाला की इथे फिरकतपण नाहीत. तुम्ही तसे न करता शेवटी प्रतिसाद दिला म्हणून तुमचे आभार. काहीही मदत लागली तर विनासंकोच, मायबोलीवर हक्काने मदत मागा.
उर्वरित चांगल्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

पुरोगामी
प्रॅक्टिकल अनुभव सुरक्षित ठिकाणी बसून किंवा तशी वेळ न आल्या मुळे माहीत नसतात .
त्या मुळे स्वप्नं रंजनात अशी माणसं असतात आणि स्वतःच भ्रम निरस करून घेतात

(कोतबो मधे निघणारे धागे आणि प्रश्न नेहमीच त्याच्या सत्य-असत्यवरुन सन्भ्रमात टाकतात तरी हा प्रश्न खरा आहे अस सम्जुन लिहत आहे)
भारतिय कायदा स्त्रीच्या बाजुने आहे त्यांमुळे निडरपणे निर्णय घ्या, घर सोडण्याआधी तुमच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी (दागिने, जमारक्कम , सर्टिफिकेट इ.) सुरक्षित ठिकाणि नेवुन ठेवा .
(खुप जवळच्या एका केसमधे मुलिचे सर्टिफिकेट जाळुन टाकले होते सासरच्यानी)
वकिलासाठी नातेवाइक, ओळखितुन जरा ४ लोकाना विचारुन निर्णय घ्या. सगळ्या शक्यता पडताळुन पेपरवर लिहुन बघा.
तुम्हाला मन शान्त ठेवण्यासाठी परमेश्वर भरपुर शक्ती देवो आणि पुढिल उज्वल वाटचालिसाठी शुभेच्छा!

ऑल द बेस्ट !
आणि आता पुढचे सल्ले एखाद्या चांगल्या अन ओळखीच्या वकिलाकडून घ्या. >>> +१११११११११

निडरपणे निर्णय घ्या, घर सोडण्याआधी तुमच्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी (दागिने, जमारक्कम , सर्टिफिकेट इ.) सुरक्षित ठिकाणि नेवुन ठेवा, तसेच चांगल्या वकिलाला गाठून पोटगी साठी अर्ज करा.

।रोज भांडणे करा, खूप मोठी मोठी भांडणे, मारहाण होईतो, शेजार पाजार जमा करा, सतत नातेवाईक, शेजारी यांच्याकडे गार्हाणे गा, एखाद्या संस्थेची मदत , समुपदेशन घ्या , एखादी पोलीस तक्रार करा अशी व्यवस्थित केस बिल्ड करा मग घटस्फोट घ्या , लगेच मिळेल , पोटगी मिळेल , नवीन नोकरी शोधा आणि सुखी राहा ..

Pages