एकीकडे नवर्याचं विबासं, डॉमिनेशन आणि दूसरीकडे निष्पाप मुलगा

Submitted by Helpme on 21 November, 2019 - 20:57

हा डुप्लिकेट आयडी आहे. आज मला तुमचा " तुझा तू नीट विचार करून निर्णय घे" असा सल्ला नकोय, तर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते ते ऐकायचं आहे. मी फार मोकळ्या मनाने सर्व काही लिहिले आहे. कृपया कसलाही गैरसमज करून घेऊ नका आणि समजून घ्या.

माझ्या प्रेमविवाहाला ८ वर्ष झाली आहेत. त्यापूर्वी ७ वर्ष आमचे प्रेमसंबंध होते. माझे इंजिनीरिंग झाले असून नवऱ्याची १२वी झाली आहे. वयाच्या १८व्या वर्षी फार दूरचा विचार न करता मी प्रेमात पडले. त्यानंतर ६ महिन्यांनी मला चुकीची जाणीव झाली व मी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला परंतु तो इमोशनल ब्लॅकमेल करायचा म्हणजे ब्रेकअप संदर्भात बोलले कि खूप मोठ्याने रडायचा, त्याला चक्कर यायची, वेड लागल्यासारखं करायचा. मग मी पण घाबरून जायचे.

नंतर मग मी त्याच्यातले चांगले गुण शोधून स्वतःला समजावले. पुढे जाऊन त्यानेही स्वतःला प्रूव्ह केले. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. त्यानंतरच्या काळात त्याने शारीरिक रित्या जवळ यायला सुरुवात केली. थोडी मनाविरुद्धच मी त्यालाही बळी पडले. एकंदरच तो खूप डॉमिनेटिंग वागायचा. अजूनही तसाच आहे म्हणा. जेव्हा नवीन नवीन तो मला लॉजवर घेऊन जायचा सलग न थांबता ५ ते ६ वेळा सेक्स करायचा. मला खूप त्रास व्हायचा परंतु तो अजिबातच माझा विचार करायचा नाही. सेक्स करताना मात्र अजिबातच रोमँटिक वागायचा नाही. no foreplay at all... पॉर्न बघून स्वतःला उत्तेजित करायचा आणि डायरेक्ट इंटरकोर्स सुरु करायचा. मिठी मारणे, चुंबन घेणे असल्या गोष्टी अजिबात नाही. जर घेतलंच तर कडकडून ओठाला चावायचा. एकंदर माझी प्रेमाची मानसिक गरज भागत नव्हती. व मी मनाने एकटी पडले होते. सगळ्या मर्यादा आधीच ओलांडल्यामुळे मला त्याच्याशी लग्न करण्यावाचून पर्याय नव्हता.

नंतर लग्न झाल्यावरही त्याला माझ्याबद्दल कसलंच कौतुक नव्हते. लग्नानंतर माझे सासर छोटे गाव असल्याने तिथे आयटी कंपनी नव्हती. म्हणून मी दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करायला सुरुवात केली. नवीन लग्न झाले तेव्हा मला वाटायचे त्याने माझ्या आजूबाजूला असावे. मला वेळ द्यावा. परंतु त्याला असं काहीच वाटत नव्हते. तो काम झाले कि मित्रांमध्ये जाऊन बसायचा. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत बसायचा. मी त्याची वाट बघून कंटाळून झोपी जायची. मला गाढ झोप लागली कि नेमका तो बेडरूम मध्ये यायचा आणि सेक्स करायचा. माझी खूप चिडचिड व्हायची.

असे नाही कि मी या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलले नाही. मी अनेकदा त्याच्याशी बोलले पण तो बोलायचा की त्याचे काही चुकतच नाही. याच गोष्टी असं नाही सगळ्यांच्याच बाबतीत तो प्रचंड डॉमिनेटिंग आहे. वडील नसल्यामुळे सगळ्या फॅमिलीची जबाबदारी त्याने पेलली. त्यामुळेच त्याच्यामध्ये खूप गर्व आला आहे. त्याने धाकट्या भावाला देखील त्याच्या मनाविरुद्ध पसंत नसलेल्या मुलीशी लग्न करायला लावले का तर त्या मुलीची माहेरची प्रचंड श्रीमंती होती म्हणून. पण मी हे बोलून दाखवले तर अजिबात मान्य केले नाही. आता त्याच्या बिचार्याच्या संसारात खूप वाद होत आहेत. पण माझा नवरा करून सावरून नामनिराळा आहे.

मला सेक्सबाबत कधीच स्वातंत्र्य नव्हते अजूनही नाही . जेव्हा नवरा म्हणेल तेव्हा या गोष्टींना सामोरे जावे लागते. आठवड्यातून किमान ६ रात्री तरी मला हि ड्युटी करावी लागते. जर सलग २ दिवसांचा गॅप पडलाच तर तुला कधीच इच्छा नसते, १५ १५ दिवस करू देत नाहीस अशी अतिशयोक्तीपूर्ण विधान ऐकून घ्यावी लागतात. माझी पण या सगळ्या गोष्टींसाठी तीव्र इच्छा आहे असे मला दाखवावे लागते. माझं पण समाधान झालं आहे असेही दाखवायला लागतं. नाही दाखवले तर चावणं, बोचकारणे, चिमटे काढणे हे प्रकार होतात . जर एखाद्या दिवशी माझ्या नशिबाने त्याने माझे म्हणणे ऐकलंच तर पहाटे उठवून करायला लावतो. मी कितीही दमले तरी माझी सुटका नाही. एकदा दिराच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी आम्ही मुंबई ला गेलो असताना दिवसभर खूप दगदग झाल्यामुळे मी खूप दमले होते. त्या रात्री चुलत नणंदेच्या घरी आमचा मुक्काम होता. तेव्हा मी सेक्सला नकार दिला असता त्याने खाडकन कानाखाली लावून दिली. असे नाही कि मी त्याच्या आणि माझ्या घरच्यांशी या विषयावर बोलले नाही. पण त्याच्या घरच्या लोकांनी लक्ष घातले नाही, आणि माझ्या घरच्या लोकांच्या समजावून किंवा रागावून सांगण्याचा काहीच फरक पडला नाही. मला वाटायचे कि माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझाच लिबिडो कमी पडतोय. मी त्याला sexologist कडे जाऊ म्हणायची तर दुर्लक्ष करायचा. नंतर माझ्या लक्षात आले कि अगदी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स सुद्धा खूप आहे. मी त्याला या गोष्टी सांगितल्या तर मला म्हणतो कि मी खरा पुरुष आहे. म्हणून माझी सगळ्यांपेक्षा गरज जास्त आहे. मग तिथे माझे काहीही का हाल होईनात. पाळीच्या दिवसांत पण सुटका नाही.

लग्नानंतर दीड वर्षात काळात मला मुलगी झाली. दुर्देवाने ती मतिमंद झाली. त्यानंतरची ५ वर्ष अक्षरशः मी खूप सोसले. मी पूर्ण नैराश्याने ग्रासले होते. ती झाल्यावर २ वर्षात मी अजून एक चान्स घेतला. त्यानंतर मी मुलांमध्ये पूर्ण गुरफटून गेले.नंतर पुन्हा एकदा माझ्यावर दुर्दैवाने आघात केला. माझी मुलगी ५ वर्षांची झाल्यावर हे जग सोडून गेली. तेव्हा माझ्या माहेरच्यांनी मला १ महिना माहेरी नेले. तिथे मला खूप मोकळे वाटले. मुलगी जाण्याचे दुःख बाजूलाच राहू दे, मला सासरी येऊन परत या माणसाला शारीरिक सेवा द्यायचे टेन्शन आले होते. पुन्हा त्याच्याकडे जाण्याआधी मी कबूल करून घेतले कि तो याबाबतीत मला समजून घेईल. अर्थात तसे काही झाले नाही म्हणा. पहिले पाढे पंचावन्न.

मुलगी गेल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचे ठरवले. मी पण आमच्या कंपनी मध्ये यायला लागले. जरा बरे वाटायला लागले. नवऱ्याची तर्हा काही बदलली नव्हती म्हणा.

गेले ६ महिने झाले नवऱ्याचे कंपनी मधल्या एका सतरा वर्षांच्या मुलीबरोबर अफेयर सुरु आहे. सर्व ३० कामगारांना माहित आहे. मला फक्त १ महिन्यापूर्वी confirm समजले आहे. अगदी खात्रीशीर पुरावे मिळाले आहेत. सासूलासुद्धा आधीपासून सर्व माहित आहे. ती काहींच बोलत नाही. indirect support..

मी खूप वेळा नवऱ्याला या विषयावरून बोलले, पण तो नेहमी एवढंच बोलतो कि माझा गैरसमज आहे. मी त्या मुलीला कंपनी मधून बाहेर काढले तर नवरा तिला बाहेर भेटेल. वर माझ्या शरीराचे अजून अजून लचके तोडेल ते वेगळंच. मला आता त्याच्याबरोबर राहणे मुश्कील झाले आहे. इतके दिवस फक्त मुलांना आई आणि बाबा दोघांचे प्रेम मिळावे यासाठी राहत होते. इथून पुढेही राहिले तर याच कारणासाठी राहीन. पण बऱ्याच वेळा असं वाटत कि मुलगा मोठा झाला कि तो त्याच्या आयुष्यात सुखी होईल. मला मात्र मरेपर्यंत या माणसासोबत राहावे लागेल. आता ३४ वय आहे माझे. अजून ५ ते ६ वर्षानंतर बाहेर पडणे नाही जमणार. पण नंतर परत मुलाचा निरागस चेहरा डोळयासमोर येतो आणि असे वाटतं करावी तडजोड.

काय योग्य राहील माझ्या आणि मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने?
खरं सांगा तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता? मला तटस्थपणे सल्ला नकोय. तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केले असतं ते सांगा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली नोकरी पकडून लगेचच वेगळे झालो असतो.
हे वाक्य अतिशय महत्वाचे.
स्वतः पाय ठेवण्याची जागा उपलब्ध झाल्यावर दुसरा पाय उचलेन म्हणजे खड्यात padnycha धोका शून्य.
परिस्थिती ला अनुरूप निर्णय घेणे हे शहाणपण .

त्याला समजावून डॉक्टर चा सल्ला घेणे आणि ह्या मध्ये जबाबदार व्यक्ती ला(आई वडील, नणंद,जवळचा कॉमन मित्र)सहभागी करून घेणे.
ह्या स्टेप मध्ये प्रश्न सुटलाच पाहिजे. >> नाही सुटला. अगदी याच स्टेप्सने गेले.

तुमच्या नवऱ्याला तो कुठे चुकतोय ह्याची जाणीव नसते पण तुमच्या विषयी द्वेष पण नसतो.
चूक दाखवून ध्या .
मत परिवर्तन होईल.>> मी गोडीत, रागावून प्रसंगी घाणेरड्या शिव्या देऊन दमले आहे.

सत्य सांगते, मी तर नवर्याला सुचवलं की आता अफेअर सुरू असलेल्या किंवा आणि कोणाही बरोबर संबंध ठेव. आपण जगासमोर असेच नवरा बायको म्हणून राहू. मी बाकी सगळी कर्तव्य नीट पार पाडीन.पण तो अफेअर आहे हेच मान्य करत नाही. त्याला मी तर पाहिजेच रोजच्या रोज. मला बोलतो, तुझं नशीब चांगले आहे, तुला रोज हे सुख मिळतंय. Angry

मी गोडीत, रागावून प्रसंगी घाणेरड्या शिव्या देऊन दमले आहे.

शिव्या दिल्या नंतर तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला मारलं की नाही मारलं

मी गोडीत, रागावून प्रसंगी घाणेरड्या शिव्या देऊन दमले आहे.

शिव्या दिल्या नंतर तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला मारलं की नाही मारलं >> त्या रात्री सुट्टी मिळते, दूसर्या दिवसांपासून ये रे माझ्या मागल्या. आणि दिवसा तणावपूर्ण वातावरण.

गोल्डफिश +१
मुलाला काय आणि कसे समजवायचे ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. वेगळे झाल्यास बालमनावर परिणाम होईल केवळ असाच विचार का करताय? एकत्र राहिल्यास त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वाईट परीणाम होऊ शकतो हेदेखील लक्षात घ्या.
आता ५ वर्षांचा म्हणजे तसा अजून लहान आहे. पण ६-७ चे झाले की मुलं आईवडलांमधील सेक्शुअल टेन्शन, इन्कम्पॅटिबिलिटी ओळखायला लागतात. त्या भावनेला कसं हाताळायचं हे त्यांना कळत नसतं पण they are acutely aware of it. तुमचे आनंदी असण्याचे नाटक फार काळ परिणाम करत राहणार नाहीय.

पुरुष म्हणून पुरुषांची मानसिकता काय असते हे सांगतो.
जे नाते खूप जवळचे आहे बायको असेल किंवा गर्ल फ्रेंड
जिच्या बरोबर शारीरिक संबंध खूप वेळा झाले आहेत.
पूर्ण सेक्स ची भावना झाल्या नंतर स्त्री नी जर नकार दिला तर दोन गोष्टी घडतात.
1) पुरुष आक्रमक होतो आणि शारीरिक तकतीच्या जोरावर इच्या पूर्ण करतो.
2) विरोध होत्याच क्षणी पुरुषांची सेक्स ची इच्या नष्ट होते आणि असे वारंवार झाले की पुरुष त्या स्त्री शी कधीच सेक्स करण्याची भावना ठेवत नाही .
भावना निर्माणच होत नाही.
वरील दोन्ही प्रकार तुमच्या बाबत होत नाहीत .
तुम्ही नक्की स्त्री आहात का .
आणि तुमची समस्या एक स्वप्न रंजन तर नाही ना

ताई, हे जे आहे याला abusive relationship म्हणतात. तुम्ही यातून बाहेर पडलच पाहिजे. Google वर नीट सगळं वाचा या प्रकारा विषयी. म्हणजे तुम्हाला कळेल हा कोणत्या प्रकारचा mindgame तुमच्या बरोबर चालू आहे आहे. अजिबात त्याच्या विषयी सहानुभुतीने विचार करू नका. He will NOT understand your suffering and so he will not take pity on you, till he gets the taste of his own medicine. मुलाशी चांगलं वागतोय तर काही उपकार करत नाहिये. मुलाचं long term मध्ये काही नुकसान होणार नाहि, तुम्ही जर नवर्याला सोडलं तर. short term मध्ये थोडं फार होईल. ते तर तुमचं पण होईलच ना. इतक्या वर्षांमध्ये फर्निचरशी सुद्धा attachment होते. हा तर so called मनुश्य प्राणी होता.

तुम्ही नक्की स्त्री आहात का .
आणि तुमची समस्या एक स्वप्न रंजन तर नाही ना >> मी प्रतिसादात आधीच सांगितलं आहे हा १०० टक्के सत्य आहे. आणि मला दिशादर्शनाची तीव्र गरज आहे.

ताई, हे जे आहे याला abusive relationship म्हणतात. तुम्ही यातून बाहेर पडलच पाहिजे. Google वर नीट सगळं वाचा या प्रकारा विषयी. म्हणजे तुम्हाला कळेल हा कोणत्या प्रकारचा mindgame तुमच्या बरोबर चालू आहे आहे. अजिबात त्याच्या विषयी सहानुभुतीने विचार करू नका. He will NOT understand your suffering and so he will not take pity on you, till he gets the taste of his own medicine. मुलाशी चांगलं वागतोय तर काही उपकार करत नाहिये. मुलाचं long term मध्ये काही नुकसान होणार नाहि, तुम्ही जर नवर्याला सोडलं तर. short term मध्ये थोडं फार होईल. ते तर तुमचं पण होईलच ना. इतक्या वर्षांमध्ये फर्निचरशी सुद्धा attachment होते. हा तर so called मनुश्य प्राणी होता. >> पटतंय Happy

सगळ्यात आधी तर या प्रोब्लेमचं सोल्युशन खूप सरळ आहे, पण काही गोष्टींमध्ये मन इतकं गुंतलेलं असतं, की त्या सोडायला धजावत नाही.
तुम्हाला जर समजा या रिलेशनमधून बाहेर पडायचंच आहे, तर तुम्हांला कुणीही अडवू शकणार नाही. कुणीही. मात्र अशा रिलेशन मध्ये थांबण्याची कारणे हजारो असू शकतात. पोराला काय वाटेल, कसं बाहेर निघू वगैरे. जास्त विचार न करता मुलाला घेऊन एखाद्या दिवशी बॅग भरून चालू लागा. पहिलं पाऊल टाकलं ना, मोकळं वाटेल... बाकी सगळं आपोआप होईल. फाईंड अ सपोर्ट सिस्टीम, जी व्यक्ती तुमची बाजू नीट समजून घेईन, तुम्हाला प्रोत्साहित करेन...
मुलाला तुम्ही एका अब्युसिव रिलेशनमधून बाहेर पडलात, याचा आनंदच होईल, मोठा झाल्यावर, पण बापाचे चाळे बघून तो त्याच मार्गाला जाण्याची प्रचंड शक्यता आहे.
अजून एक एकदा घर सोडल्यावर तुमचा नवरा घरी येईल तुमच्या, खूप रडेल, आणाभाका घेईल, सुधारण्याचा प्रॉमिस करेल, आणि पुन्हा त्या नरकात घेऊन जाऊन तुम्हाला छळायला लागेल हे विसरू नका. म्हणून बी स्ट्रॉंग!!!!
ALL the best फॉर फ्युचर!!!

https://www.indiatoday.in/mail-today/story/-marriage-not-a-contract-for-...

While marital rape is yet to be criminalised, in a rare judgement, a family court in Delhi has acknowledged the indulgence of marital rape by husband who had filed a divorce plea seeking separation from his wife for allegedly being deserted and put through cruelty by her.

It ruled that it was he who was inflicting abusive and humiliating treatment to his wife by committing extreme acts of sexual abuse and domestic violence and cannot take advantage of his own wrongs.

The court in its observations mentioned, "Although in our country marital rape is not considered as an offence, it constitutes inflicting mental cruelty as it connotes lack of respect, dignity and sensitivity towards the wife and violates of the right to life and liberty as enshrined in the Constitution of India."

अजून एक एकदा घर सोडल्यावर तुमचा नवरा घरी येईल तुमच्या, खूप रडेल, आणाभाका घेईल, सुधारण्याचा प्रॉमिस करेल, आणि पुन्हा त्या नरकात घेऊन जाऊन तुम्हाला छळायला लागेल हे विसरू नका.

>> हेच आणि हेच घडतं नेहमीच

भरत.
सहज विचारतो कधी कोर्टाची पायरी तुम्ही चढली आहात का?
काय अनुभव कधी घेतला आहे.
पोस्ट मध्ये न्यायालयाचा निकालच दिला आहे म्हणून विचारलं

सगळं कळतं पण वळत नाही अशी माझी तर्हा आहे. परंतु आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे विचारांना एक निश्चित दिशा मिळतेय असे वाटतंय Happy

आता ५ वर्षांचा म्हणजे तसा अजून लहान आहे. पण ६-७ चे झाले की मुलं आईवडलांमधील सेक्शुअल टेन्शन, इन्कम्पॅटिबिलिटी ओळखायला लागतात. त्या भावनेला कसं हाताळायचं हे त्यांना कळत नसतं पण they are acutely aware of it. तुमचे आनंदी असण्याचे नाटक फार काळ परिणाम करत राहणार नाहीय.>>+१

मुलाला आनंदी करून मला शोषणमुक्त, आनंदी आयुष्य जगायचे आहे>> तुमचा नवरा कधीच तुम्हाला सोडणार नाही. इतक्या वर्षात त्याला हि कितीही रागावली, भांडली, रडली तरी मी मला हवे तसे वागू शकतो/हिला काहीही करू शकतो हे कळून चुकले आहे. तुम्हाला प्रखर(अंगाला हात लावला तर तुझे काही खरे नाही असा) विरोध करता येत नसेल तर तुम्ही त्याच्यापासून वेगळे होण्यावाचून तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

वेगळे राहूनही मुलाला आनंदी ठेवता येईल. कारण तुम्ही त्याला नव-याला भेटण्यापासून अडवणार नाही आहात. पण तुमचा नवरा मात्र तुम्ही दूर जाऊ नये यासाठी तुमच्या मुलाचा वापर करु शकतो. त्याच्यासमोर रडणे, तुमची गयावया करणे, त्याला असे दाखवणे/सांगणे कि तुझ्या आईमुळेच असे होत आहे. तेव्हा त्याचे मुलावर खरेच प्रेम आहे कि फक्त लळा हे कळेल. त्यामुळे तुम्हाला (+मुलाला) या परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल.
पुरावे गोळा कराच पण मुलाला काय प्रश्न पडतील तेव्हा त्याला कसे समजवायचे, काय उत्तरे द्यायची याची तुम्ही(+मुलाचे जवळचे नातेवाईक) तयारी करा.

हेच आणि हेच घडतं नेहमीच
नवीन Submitted by Helpme on 22 November, 2019 - 19:09

मी सुधारण्याच्या नाटकाला बळी पडते नेहमीच. आता नाही पडणार.
नवीन Submitted by Helpme on 22 November, 2019 - 19:10
>>>>
So I was right... कारण तुमच्याच नाही, तर प्रत्येक abusive रिलेशनशिप मध्ये हे होतं.
माझ्या एका बेस्ट फ्रेंडच्या नवऱ्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, ती माहेरी आली, पण हे नाटक सुरू झालं, आणि ती विरघळली... आता भोगतेय परत तीच फळे.
प्रत्येकाला आपली लव स्टोरी सगळ्यात बेस्ट आणि आपला पार्टनर सगळ्यात भारी असं वाटतं, पार्टनरला सोडलं तर गिल्ट फिलिंग येतं, आणि समोरचा रडला तर स्वतःला अपराधी वाटतं, की आपणच चुकतोय.
याचाच फायदा समोरची व्यक्ती घेते. स्ट्रॉंग रहा, मुलगाही हळूहळू समजून घेईन सगळं. फक्त आधीचे काही महिने खूप कठीण जातील, अशावेळी स्वतःला समजवत रहा...
आणि अजून एक सल्ला, ३४ हे काही जास्त वय नाही, तुम्ही अजूनही नवीन लाईफ चालू करू शकतात, पण गैरफायदा घेणारेही भेटतील, त्यांपासून सावधान. (अशा परिस्थितीत माणूस खरंच खूप हळवा होतो.)
अजून पुढे आयुष्य पडलंय!!

हेल्प मी ताई, तुमची तडफड समजली. तुम्हाला उत्तर देत असतानाच मायबोली गंडली. विपू पाहणे शक्य असेल तर पहा. संपर्कातून मेल धाडली तर तुम्हाला ती पाहता येईल का ? या अकाउंटच्या मेल्स चेक करता का ? या विषयावर मेल मधून बोलावे असे वाटतेय.

नवर्‍याला मानसोपचाराची गरज आहे. सेक्स ही गरज फक्त देखावा आहे, मूळ दुखणं दुसरीकडे आहे. त्याला चांगल्या मानसोपचारतज्ञाकडे घेउन जा.
आला नाही तर काडीमोड घ्या.

बर्‍याच जणांनी सल्ला दिलेला आहे की ३४ वर्षे वय फार नाही परत आयुष्य उभे करा. मला ते पटते फक्त एक सावधगिरीचा सल्ला - परत विवाह करण्यात, घिसाडघाई करु नका. विवाह केलाच पाहीजे असेही नसते. तुमच्या गरजा ओळखा, स्वभान येऊ द्यात. जर सेल्फ-अवेअरनेस असेल, स्वतःचे कमकुवत पॉइन्टस, बलस्थाने माहीत असतील तरच योग्य निर्णय घेता येइल. या अशा भयानक नात्यातून पोळून बाहेर पडणे इज नॉट अ जोक.
'जिंदगी को संवारना होगा,
दिल में सूरज उतारना होगा'
हेही दिवस जातील. धिराने पण बुद्धीने पावले टाका. आत्मविश्वास ढासळू देउ नका.

ताई, ह्या रिलेशन मध्ये रहाणं म्हणजे नरक आहे. आणि ते सोडणं म्हणजे शिवधनुष्य उचलण आहे. जर शिवधनुष्य उचलणार असाल तर तुम्हाला आधी तुमच्या स्वताच्या मनाची खूप तयारी करावी लागेल. म्हणूनच म्हटलं की आधी तुम्ही हे काय आणि कशाचा सामना करताय य ते नीट वाचून आणि समजून घ्या. मग खूप सारं डिटेल प्लॅनिंग. रिस्क समजून घ्याव्या लागतील. मग समजुतीने घ्यायचा सल्ला देणार्यांना तुमच्या 'जहन' मधून बाहेर काढून ठेवावं लागेल.
You have to think, God has gifted you with human life. It is up to you, whether you want to throw it at the feet of such an horrible person or whether you want to claim it as yours and make the best of it. But both things are very difficult, remember.

बहुतेकांनी चांगला सल्ला दिला आहे.
तुम्हाला माहेरून पाठींबा आहे ही जमेची बाजू आहे.
वेगळे झाल्यावर बरेचदा आई किंवा वडलांकडून (किंवा दोघांकडूनही) वेगळे होण्यास तुमचे वडीलच/आईच कशी दोषी आहे हे मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न होतो.
तुमच्या बाजूने तुम्ही असे काही करणार नाहीत, मुलाला वडिलांपासून तोडणार नाही असे सांगितले आहे.
पण तुमच्या पती व सासरच्या लोकांबद्दल बद्दल, आणि तुमच्या माहेरच्या लोकांबद्दल काय? ते किती समजूतदार आहेत या बाबत? या मुद्द्यावरून तुम्ही घेत असणाऱ्या निर्णयावर परिणाम व्हायला नको पण असे काही होण्याची शक्यता असेल तर ते कसे टाळता येईल आणि असे झालेच तर सिच्युएशन कशी हँडल करायची याबाबत आधी विचार करून ठेवणे, तज्ज्ञांकडून आगाऊ सल्ला/मार्गदर्शन घेणे उचीत राहील.

परत विवाह करण्यात, घिसाडघाई करु नका. विवाह केलाच पाहीजे असेही नसते. >> आता परत दूसरा नवरा आणि परत शरीरसंबंध.... कल्पना पण नाही करवत सामो.

माणूस किती ही कष्ट उचलू शकतो पण मानसिक त्रास सोसू शकत नाही .
हे मात्र खरे आहे.
तुमच्या नवऱ्याचे वागणे हे अनैसर्गिक आहे असे वाटते.
कधी तरी अशा गोष्टी घडल्या तर समजून घेता येतात पण रोज असेच वागणे असेल तर तो एकदा मानसिक विकृत पणाच झाला.
विकृती हा एक प्रकार चा रोगच आहे..
Samo नी सांगितल्या प्रमाणे मानोस उपचार चा मार्ग निवडून बघावा

का कुणास ठाऊक , ही समस्या एखाद्या पुरुष आयडीने रचून लिहिलेली वाटते . हुबेहूब अशीच समस्या असणाऱ्या दुर्दैवी स्त्रिया असतीलही ...पण इथे ज्या व्यक्तीने लिहिली आहे ती खरी स्त्री नाही असं वाटतं .. हा लिखाणाचा स्वर एखाद्या स्त्रीचा वाटत नाही .. त्यातही असले अत्याचार वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या स्त्रीचा वाटत नाही . या भाषेत इतक्या मोकळेपणाने लिहिण्याची शैक्षणिक - बौद्धिक क्षमता असणारी सुशिक्षित स्त्री मुळातच इतकी वर्षं असल्या प्रकारचा अत्याचार सहन करेल असं वाटत नाही ... तेही जिला माहेरचा भक्कम सपोर्ट आहे अशी ... ह्या प्रकारचे अत्याचार वर्षानुवर्षे सहन करणारी स्त्री खरंच असेल तर ती सार्वजनिक संस्थळावर इतक्या मोकळेपणाने लिहिण्याएवढी बेधडक असेल हे पटत नाही ... कदाचित समस्या खरी असेल पण ती ह्यांची वाटत नाही , एखाद्या इंग्रजी साईटवरून भाषांतरीत केलेलीही असू शकते पदरचे आणखी चार काल्पनिक प्रॉब्लेम घालून ... प्रांजळपणे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या माबोकरांना प्रतिसाद द्यायला लावण्याकरता ... एखाद्या खोडसाळ पुरुष सदस्यानेच केलेला ट्रॉलिंगचा काहीतरी प्रकार वाटतो .. हेतू फक्त लक्षात येत नाही . लाखात एक चान्स म्हणून खरा स्त्री आयडी असेल तर ऍडव्हान्स मध्ये माफी मागते .

शंका येणाऱ्या काही परस्पर विरोधी घटना.
मी माझ्या वरच्या एका पोस्ट मध्ये व्यक्त केल्या होत्या
.
स्त्री चा संबंधाला नकार देण्याची पद्धत एक तर सरळ शब्दाने स्पष्ट शब्दात नकार देणे.( त्यांनी तर शिव्यांचा प्रयोग सुद्धा केला आहे)
अशा नकाराचा पुरुषानं वर परिणाम हा .
एक तर कामवासना ताबडतोप नष्ट होते आणि त्याची जागा तिरस्कार घेते(पूर्वग्रह असतील तर ) नाही तर स्त्री chya विरोधाचा मताचा सन्मान राखून सेक्स केला जात नाही आणि अशी समजूतदार पणाची भूमिका सुसंस्कृत पुरुष घेतात.
दुसरे स्त्री नी नकार दिला तर स्वार्थी पुरुष आक्रमक होतात आणि शारीरिक takaticha वापर करून आपला हेतू पूर्ण करतात.
पण असे आक्रमक वागणारे पुरुष हे हिंसक वृत्तीचे असतात..
ते बायकोला मारझोड करतील ,तिच्या वर असंख्य बंधन घालतील,
आर्थिक स्वतंत्र देणार नाहीत.
पण ह्यांच्या बाबतीत सेक्स सोडला तर दुसऱ्या कोणत्या च स्वतंत्र वर बंधन नाहीत
किंवा हिंसा नाही
हे परस्पर विरोधी प्रसंग खटकत आहेत.
नशे मध्ये सुसंस्कृत पुरुष असा वागण्याची शक्यता असते पण त्याचा उल्लेख पोस्ट मध्ये नाही.

ताई कृपया लवकरात लवकर घरातून बाहेर पडा. घटस्फोट घ्या. खूपच सोसलंय तुम्ही.

मुलाला दोन्ही आईबाबा मिळावेत म्हणून छान छान चालल्याचं नाटक करण्यात काहीही अर्थ नाही.
नवरा लाईफपार्टनर म्हणून योग्य नाही हे तर क्रिस्टल क्लीयर आहे. वडील म्हणून चांगला असेलही तर मग त्याला स्पष्ट सांगा की मला घटस्फोट हवा आहे, मुलाला मीही आनंदाने सांभाळीन पण तुला सांभाळायचे असल्यास तूही सांभाळू शकतोस.
मुलाला आईनेच बरोबर नेऊन मोठे केले पाहिजे असं काहीही नसते (पण बहुतेक पाच खालील मुलांचा ताबा बाय डीफॉल्ट आईकडे येतो, चूभूदेघे.) मूल कुणाकडेही असले तरी कोर्ट मुलाला भेटायची परवान्गी देईलच.

माहेरचा सपोर्ट असणे ही किती महत्त्वाची बाब आहे! तुम्ही शिकलेल्या, नोकरी करणार्‍या सहृदय व्यक्ती आहात या पॉजिटीव्ह गोष्टीना महत्त्व देऊन, आयुष्यात सुखी होण्याचा मार्ग खुला करण्यापासून कृपया स्वतःला थांबवू नका.

वर कुणी म्हटलंय तसं मुलगा मोठा झाल्यावर आईने आपल्यासाठी हे अत्याचार सहन केले हे कळलं तर त्यालाही खूप गिल्टी वाटू शकते त्याचा काहीच दोष नसताना! बाकी तुमच्याकडे ताबा आला तर त्याला काय, कसं सांगायचं यासाठी काऊन्सेलर्स चा सल्ला घेणे उत्तम. आपल्यासारख्या सामान्य माणसांना कदाचित पटकन काही सूचू शकणार नाही त्याला सांगायला. काऊन्सेलर्स छान समजावून सांगू शकतील.

तुम्ही माहेरी गेल्यावर नवरा हस्तमैथुन करतो आणि कबूल करतो यात चुकीचे काहीच नाही.
पॉर्न साईट सगळेच बघतात. नथिंग न्यू.

तुम्ही माहेरी गेल्यावर नवरा हस्तमैथुन करतो आणि कबूल करतो यात चुकीचे काहीच नाही. >>> समोरच्याला गिल्ट यावा अशा पद्धतीने हेतूपुरस्सर कबुली दिली जात असेल तर ?

पॉर्न साईट सगळेच बघतात. नथिंग न्यू. >>> अशा फिल्म्स पाहिल्यावर आपल्या जोडीदारासोबत बलात्कारसदृश्य संबंध सातत्याने १५ वर्षे ठेवणे हे पण का ?

कसला गिल्ट आणि कबुली. बाईंनी खोदून खोदून विचारलंय ना ट्रॅक करून.

मी फक्त हस्तमैथुन बद्धल बोललो आहे. बाकी नाही.

बाकी जनमत शी सहमत आहे. आयुष्यभर रडण्यापेक्षा एकदाचे रडून वेगळे व्हा. टाईम विल टेक केयर ऑफ एव्हरीथिंग .

त्यातही असले अत्याचार वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या स्त्रीचा वाटत नाही . या भाषेत इतक्या मोकळेपणाने लिहिण्याची शैक्षणिक - बौद्धिक क्षमता असणारी सुशिक्षित स्त्री मुळातच इतकी वर्षं असल्या प्रकारचा अत्याचार सहन करेल असं वाटत नाही >>

मला कंटाळा आला आहे पटवून देण्याचा. लक्षात घ्या, लग्नाच्या आठ वर्षांपैकी ५ वर्षं मतिमंद मुलीला सांभाळण्यात गेली. बौद्धिक क्षमता असून काय उपयोग होता. तेव्हा माहेरचे पण कचरत होते. एक वर्ष झाले मी काम करायला सुरुवात केली आहे. आणि मुख्य म्हणजे मला आणि माहेरच्या लोकांना पण पटलं आहे की नवरा कधीच बदलणार नाही. मुळात नवरा अतिरेक करतोय हेच उशिरा समजलं. मला वाटायचं की माझा लिबिडो कमी पडतोय. मला मुर्ख समजू शकता. माझं लग्न झालं तेव्हा मी याबाबत कोणाशी शेअर सुद्धा करत नव्हते. खरं सहन करण्याचं कारण माझी मुलगी होती. ती होती तेव्हा तिला प्राधान्य होते. आता कुठे मी स्वतःचा विचार करायला लागली आहे.

तुम्ही माहेरी गेल्यावर नवरा हस्तमैथुन करतो आणि कबूल करतो यात चुकीचे काहीच नाही. >> मलाही नाही फरक पडत. याबाबत माझा प्रतिसाद नीट वाचा

अशाच प्रकारची समस्या असलेली एक स्त्री बघितली आहे. आणि इतरही खूप जणी असतील. त्यामुळेहा धागा खरा/खोटा हा भाग वेगळा पण समस्या खरी आहे हे नक्की. मी जी पाहिली आहे तिचा स्वभाव काही अंशी असाच आहे. नवऱ्याने वारंवार बलात्कार केला मारझोड केली कि तेवढ्यापुरते चिडून माहेरी जायचे. मग तो पुन्हा माफी मागायला आला कि पुन्हा त्याच्याबरोबर यायचे. पुन्हा काही दिवसांनी तेच. "बायकांना आवडतात बलात्कार" असा एक वादग्रस्त लेख खूप वर्षापूर्वी एका मासिकात वाचला होता. त्याची आठवण झाली. अनेक चांगल्या सुसंस्कृत सुंदर मुलीना सुस्वभावी सरळमार्गी मुले आवडत नाहीत. म्हणून त्या रेपिस्ट बरोबर प्रेम करतात. अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतात. मग तो तिला लॉजवर नेऊन सलग पाच सहा वेळा तिच्या "मनाविरुद्ध" करतो. एवढे झाल्यावर एखादीने घृणा येऊन आयुष्यात पुन्हा अशा लिंगपिसाटाचे थोबाड बघितले नसते. पण यांचे मात्र प्रेम वाढते. व त्या "नाईलाजाने" चक्क त्याच्याशी लग्न करतात. मग सुरु होतो रोज रोज बलात्कार. मग काही वर्षांनी हे सगळे अति वाटून त्यातून बाहेर यायची केविलवाणी धडपड सुरु होते. नंतर आयुष्याची जी परवड सुरु होते तिला गोंधळलेले मन कारणीभूत आहे हे या बायकांच्या लक्षात कसे येत नाही?

लग्न म्हणजे संस्कृती नसून पुरुषप्रधान समाजातली विकृती आहे व बलात्काराला समाजाने व कायद्याने दिलेली अधिकृत मान्यता आहे असे मी पूर्वी सुद्धा काही धाग्यात लिहिले आहे. या देशात कोणीही स्त्री नवऱ्याविरोधात बलात्काराची केस करू शकत नाही. या सडक्या समाज व्यवस्थेत स्त्रीला हवी तशी व हवी तेंव्हा भोगायची परवानगी नवऱ्याला कायद्याने दिली आहे. बागेत आपली बहिण/मुलगी इतर मुलाबरोबर स्वेच्छेने फिरताना जरी दिसली तरी तिला मारहाण करणारे वीरपुरुष समाजात आहेत. पण तीच मुलगी/बहिण लग्न झाल्यावर "प्रतिष्टीत घरात" नवऱ्याला भोगण्यासाठी असलेली सेक्स गुलाम म्हणून राहते ते मात्र या वीरपुरुषांना चालते. कोणीही काहीही करू शकत नाही. (या व्यवस्थेला स्त्रिया स्वत: सुद्धा काही अंशी जबाबदार आहेत).

=> मला वाटायचे कि माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझाच लिबिडो कमी पडतोय.
>>>>>> सेक्स बाबत निसर्गाने स्त्रीला प्रोएक्टिव्ह नव्हे तर रीएक्टिव्ह बनवले आहे. पुरुष हा शरीराच्या सौंदर्याला भाळतो. पण स्त्री ही मनाच्या सौंदर्यावर भाळते. मानवी भावना तिच्या मनाला जास्त उत्तेजित करतात. एखादे वाक्य, एखादी शायरी, एखादी रोम्यांटिक कृती, एखादा कौतुकाचा शब्द, स्त्रीच्या मनाला स्पर्शून जायला पुरेशी असते. किंबहुना स्त्री त्याचीच अधिक भुकेली असते. मगच तिचे शरीर मिलनासाठी तयार होते. स्त्रीचा लीबिडो पुरुषाच्या मनाच्या सौंदर्यावर अवलंबून असतो. ज्या पुरुषाने स्त्रीचे मन जिंकले आहे त्या पुरुषाला ती स्त्री कितीही वेळ शरीर सुख देताना थकत नाही. हा स्त्रीला जिंकण्याचा मंत्र आहे. गप्पा मारणे, मैत्री करणे, कौतुक करणे, स्तुती करणे, मस्करी करणे, हळूहळू तिला खुलवणे व तिचे मन आनंदी करून तिला मिलनासाठी तयार करणे असा प्रेमाचा मार्ग आहे. वीस बावीस वर्षे उपाशी राहिलेल्या आणि रोज रोज पोर्न बघणाऱ्या वासनांध वळूला ते कळणे अवघड आहे. त्याला फक्त ओरबाडता येते. हळुवारपणे खुलवता येत नाही. त्यामुळे स्वत:ला दोष देऊ नका.

=> तुम्ही माझ्या जागी असतात तर काय निर्णय घेतला असता?
>>>>>> मी स्त्री असतो तर अशा लिंगपिसाटाच्या पेकाटात लाथ घालून कधीच बाहेर पडलो असतो. नको तिथे तुमच्या मनाची भावनिक गुंतवणूक झालेली आहे हि तुमची समस्या आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडा. शिकलेल्या आहात. धडपड केल्यास नोकरी मिळून जाईल. माहेरचे लोक पाठीशी नसताना सुद्धा जिगरबाज स्त्रियांनी यावर मात केली आहे. तुम्ही अजून कशाची वाट पाहत आहात?

एखाद्या खोडसाळ पुरुष सदस्यानेच केलेला ट्रॉलिंगचा काहीतरी प्रकार वाटतो >> काय केले तर मी स्त्री आहे हे पटेल?

हेल्प्मी तुम्ही जर न्यु जर्सीत रहात असाल, तर मला तुमच्याशी मैत्री करणे आवडेल. असो. तुम्ही कुठे रहाता हे सांगीतलेच पाहीजे असे काही नाही.
बाकी स्त्रियांची कामभावना व विशेषतः प्रतिसाद हा अतोनात कॉम्प्लेक्स असतो - या विचाराशी सहमत आहे. तेव्हा तुमचा लिबिडो कमी पडत नसून, अनेक जणी तशा आढळतील.
यातून आपण बाहेर पडाल अशी प्रार्थना. मनावरही किती परिणाम तुमच्या व मुलाच्याही.

हेल्प मी, विपूला उत्तर देताना तिथेच रिप्लाय केला तर ते आपल्याच विपूत राहते. ज्याने विपू केली आहे त्याला कळत देखील नाही. उत्तर देताना तिथेच देण्याऐवजी त्या आयडीच्या नावावर क्लिक करून त्याच्या विपूत उत्तर द्यावे लागते. तुम्हाला आता उत्तर दिले आहे.

अजुन एक त्याची शारीरिक वखवख कुठे अजुन भागत असेल तर भागवु द्यात. एक प्रकारे तुम्ही सुटाल. कोणीतरी म्हणतय उद्या तो काडीमोड घ्यायचा. मी तर म्हणते सुंठीवाचून खोकला जाइल.

हेल्प्मी तुम्ही जर न्यु जर्सीत रहात असाल, तर मला तुमच्याशी मैत्री करणे आवडेल. >>नाही मी भारतात आहे

इथे समस्या मोकळेपणी लिहिले आहे म्हणजे, नवर्‍याला सोडायची मानसिक तयारी झाली आहे. आर्थिक परिस्थिती पण व्यवस्थित आहे. वेगळे व्हावे हे उत्तम. कारण नवर्‍याचा हा स्वभाव कायम असाच रहाणार आहे. वयानुसार फरक पडेल असे वाटत नाही. खुप शुभेच्छा. स्वतःला मानसिकदृष्ट्या अजुन समर्थ करायला सुरुवात करावी. घटस्फोट नंतर, आधी वेगळं व्हावे व कोणाला बधु नये. नवर्‍यापासुन प्राणाला धोका नाही हे पाहुन घेणे. पोलिसांना सांगुन ठेवावे.

>>>>>>>नाही मी भारतात आहे >>>> हे तर उत्तमच. तुमचे कुटुंबिय, मैत्र, सपोर्ट सिस्टीम जवळ आहे. गुड लक!!

अजुन एक त्याची शारीरिक वखवख कुठे अजुन भागत असेल तर भागवु द्यात. एक प्रकारे तुम्ही सुटाल. कोणीतरी म्हणतय उद्या तो काडीमोड घ्यायचा. मी तर म्हणते सुंठीवाचून खोकला जाइल. >> अजून तरी सुटका झाली नाही. तसं लवकर झाले तर बरं होईल.

खूपच सहन केलंत तुम्ही, तसेच काही निर्णय ही चुकीचे घेतले. परंतु अजूनही वेळ नाही गेली, तुम्ही सरळ वेगळे व्हा, ताबडतोब वेगळे राहायला लागा. शक्य असेल तर मुलाला माहेरी ठेवा, नोकरीं करून माहेरी पैसे पाठवत चला मुलासाठी. काही वर्ष स्वतंत्र राहा. स्वतःला वेळ द्या. दुसऱ्या लग्नाचा विचार सध्या नको. काही वेळ स्वतंत्र मोकळ निवांत राहून मग शांत चित्ताने विचार करा. तुम्ही विचारलंत कि तुमच्या जागी असता तर काय केला असता, मी नक्कीच हेच आणि असच केलं असता. अजून आयुष्य जायचा आहे.. अजून काही वर्षाने मुलगा मोठा झाला कि त्याला कळेल, तिथे राहून तुम्हांला उलट त्या माणसाची सेवाच करावी लागेल.
कोणत्याही सुरवातीला कधीच उशीर नसतो झालेला. अजून चर्चा करायला सल्ला द्यायला आवडेल.

तुम्ही सुरवातीलाच लिहीलं आहे की तुम्ही एक ड्यूआयडी आहात. याचाच अर्थ असा की तुम्ही मायबोलीशी परिचीत आहात. तुमचं लिखाण, भाषा, हे सुद्धा एका सजग , शिक्षीत व्यक्तीला साजेसे आहे. तेव्हा तुम्ही स्त्री आहात की पुरुष, ही समस्या खरी की काल्पनिक या मधे न पडता हे लिहीत आहे.
तुमचा मूळ लेख आणि प्रतिसाद वाचता तुमचा नवरा सेक्स पर्व्हर्ट आहे यावर तर तुम्हीच शिक्कामोर्तब केलं आहे. ही एक भयानक विकृती आहे आणि ती प्रोग्रेसिव्ह आहे / असते हे ही तुमच्या नवर्‍याने सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या मुलाला या बापाकडूनच खूप धोका आहे. जे मुलगा आणि बाप हे एक सुंदर नातं आज तुम्हाला दिसतंय त्याला तुमच्या नवर्‍याकडुनच सुरुंग लागू शकेल. बापानीच स्वतःच्या मुलीशी / मुलाशी केलेलं अनैतिक वर्तन, लैंगिक शोषण यासंबंधी खूप वाचलं आहे, ऐकलं आहे. आणि त्या नुसत्या काल्पनिक कथा नव्हेत.
तुमच्या नवर्‍याचे एका मुलीबरोबरचे संबंध तुम्हाला माहित आहेत. पण माहित नसलेले सुद्धा असू शकतात. यामधे sexually transmitted disease चा फार मोठा धोका तुम्हाला आहे.
तर मुलगा लहान आहे , यासंबंधी त्याला काही कळत नाहीये तोवर त्याला वाचवा. आणि स्वतःलाही.
तुम्ही शिकलेल्या आहात. माहेरचा सपोर्ट आहे. तरुण आहात तेव्हा कष्ट करुन / मेहनत करुन दोघांपुरतं नक्कीच मिळवू शकता. नोकरी मिळाली नाही तर डबे करुन देणे, केटरिंग, मुले सांभाळणे, शिकवण्या ह्या अगदी दुसर्‍या दिवसापासून सुरु करता येण्यासारख्या गोष्टी आहेत.
एक प्रश्न राहिला की मी काय केलं असतं. आजच्या तारखेला मी ३४ हून मोठी आहे. मला खात्री आहे बरेच जण ज्यांनी प्रतिसाद दिलेत ते सर्व देखील ३४ + असणार/ असतील. तेव्हा वयानुरुप येणार्‍या जाणिवा ह्या वेगळ्या असतातच. म्हणुनच तेव्हा कुणी काय केलं असतं हे आज सांगणं हे रेलेव्हंट होतच नाही. असो.
तुम्हाला पटेल, रुचेल, शक्य असेल ते सर्व करुन तुमचं आणि मुलाचं आयुष्य सुखकर होईल असं बघा.

जे मुलगा आणि बाप हे एक सुंदर नातं आज तुम्हाला दिसतंय त्याला तुमच्या नवर्‍याकडुनच सुरुंग लागू शकेल. बापानीच स्वतःच्या मुलीशी / मुलाशी केलेलं अनैतिक वर्तन, लैंगिक शोषण यासंबंधी खूप वाचलं आहे, ऐकलं आहे. >>>> बाप्रे तुम्ही तर घाबरवूनच टाकलंत की. शक्यता आहे असे म्हणा की. की डायरेक्ट असाच वागेल ?

Pages