सरकार इडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करतंय काय?

Submitted by स्वप्नील ७७७ on 25 September, 2019 - 09:06

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. माबोकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. माझ्या आयडीच्या वयावर शंका न घेता धागा विषयावर बोलावं ही अपेक्षा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

'आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला' हे म्हणण्यामागे यमक जुळविणे हा एकमेव उद्देश होता. त्यातून काहीही सोयिस्कर अर्थ काढू नये.

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजकीय घडामोडी सुरू असतानाच शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पवारांशी माझे व्यक्तिगत संबंध असल्याने त्यांना भेटायला आल्याचं राऊत यांनी सांगितलं असलं तरी डॅमेज कंट्रोलचं राजकारण करण्यासाठी राऊत हे पवार भेटीला आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

फाटाफुटीचे राजकारण करता करता ते घरातच शिरलं असल्याची शंका काही महिन्यांपासून येतीय.

"आपण आता पन्नाशी ओलांडलीय. तेव्हा आपण आता निर्णय घ्यायचे व मोठ्यांकडे आशिर्वादाला जायचे." असं वक्तव्य अजितदादांनी फार पूर्वी केल्याचे अनेकांना आठवत असेलच.

तेच आता आणखीन पुढे गेलाय का?
http://jagatapahara.blogspot.com/2019/09/blog-post_28.html?m=1

सूत्रधार
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए
जनतेला मूर्ख बनवणे हे हुशार आणि संयमी लोकांसाठी खूप किरकोळ काम आहे .
बहुसंख्य जनता मेंढरं सारखी असते

शरद पवार ने पद्धतशीरपणे मीडिया ला खेळावलाय. 4 दिवसाचा मिनी इव्हेंट. रोज नवीन हेडलाईन. महाराष्ट्रात व्यवस्थित मेसेज जाणार असा प्लांनिंग करून. या सगळ्याचा निवडणुकीत फायदा किती होईल हे पाहणं मजेशीर असेल.

भाऊ तोरसेकर भाजपच्या पे रोलवर असतील काय? असल्या लोकांचं काही सांगता येत नाही.
>> भजपाने पोसलेले आहे त्या भावड्याला

भगवान भारोसे हिंदू हॉटेल .
ज्या देशात जनतेला स्वतःची मतं नाहीत त्या देशाचे भवितव्य सांगायची गरज नाही ..
चांगलं आणि वाईट .
फायदा आणि तोटा.
न्याय आणि अन्याय .
हे सांगायला भाऊ आणि इतर तथाकथित हुशार लोकांची गरज लागते .
मग लोकांची स्वतःची बुध्दी चालत नाही का

खरा, निष्पक्ष पत्रकार एकाचीच लाल कधीच करत नाही. जसा रविश कुमार भाजपविरोधी आहे तसा भाऊ भाजपसमर्थक वाटतोय.

>>> या सगळ्याचा निवडणुकीत फायदा किती होईल हे पाहणं मजेशीर असेल. >>>

निवडणुकीत शून्य फायदा होईल.

सुजय विखे ला पाडण्यासाठी पवारांनी त्यांच्या चुलत्याचा वापर करून पाहिला होता. इडी कारवाई मागे विखे सुध्दा असू शकतात.

विखे सारखे कावळे हे रस्त्यात पडलेल्या प्रत्येक शेणाच्या पो ची चव घेत असतात. सध्या भाजपाच्या पो वर बसलेत

Pages