सरकार इडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करतंय काय?

Submitted by स्वप्नील ७७७ on 25 September, 2019 - 09:06

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. माबोकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. माझ्या आयडीच्या वयावर शंका न घेता धागा विषयावर बोलावं ही अपेक्षा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एका शब्दात उत्तर द्यायचं ते 'हो'. यासाठीच अमित शहाला गृहमंत्री बनवण्यात आले आहे. मोदी स्वतःला नामानिराळे ठेवतील, आणि अमित शहा सगळ्या विरोधकांना संपवुन टाकेल... इडि मार्फत नाहीतर ....

>>> पण मग इतके दिवस का लागले. >>>

भगवान श्रीकृष्णांना सुद्धा शिशुपालाचे १०० अपराध पूर्ण होईपर्यंत थांबावे लागले.

जर पवार आणि इतरांनी काहीच केले नसेल तर मग चौकशीला का घाबताय. चौकशी केली म्हणजे ते काही लगेच तुरुंगात नाही जाणार ... चोराच्या मनात चांदणे.

मोदींची नाही का झाली चौकशी ... ते नाही घाबरले ते ... यांची नुसती नावे आली तरी चड्डी पिवळी

भाजप शिवसेनेचे सरकार स्थापन झालं तेव्हाच सिंचन घोटाळा झाला आहे, लवकरच कारवाई होणार हे पाच वर्ष ऐकत होतो. शिखर बॅंक घोटाळा निवडणूक आल्यावर समोर आला का?

>>> जर पवार आणि इतरांनी काहीच केले नसेल तर मग चौकशीला का घाबताय. चौकशी केली म्हणजे ते काही लगेच तुरुंगात नाही जाणार ... चोराच्या मनात चांदणे.
मोदींची नाही का झाली चौकशी ... ते नाही घाबरले ते .. >>>

+ १

>>> यांची नुसती नावे आली तरी चड्डी पिवळी >>>

Rofl

आघाडी सरकारच्या लोकांनी एवढे वर्षे महाराष्ट्र डब्यात घातला हे शेम्बड पोरालाबी माहितेय. या लोकांना फाशी दिली तरी कमीच आहे पण युतीमध्ये एकाचड एक गणंग नमुने आहेत आणि आघाडीची जी घाण पवित्र करून घेतलीय तिचं काय? मुंबईत फाकरेला दरवर्षी शेकडो कोटींचा मलिदा मिळतो महापालिकेतून तो नाही दिसत ईडीला. सगळ्या राज्यांत भारतात फक्त निवडणुकीचाच मुहूर्त बरा भेटतो ह्या कामासाठी ?
दोन्ही बाजू भिकारछाप असल्याने कोणी आलं तरी पब्लिक अशीबी खड्यातच जाणार आहे पण मला वैयक्तिक पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल.

धन्यवाद जिद्दु भाऊ. एकदम सत्य बोललात. पण पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा सिंचन घोटाळा झाला होता ना. इतरही अनेक घोटाळे झाले असतील.

अशोक लवासा Sad आता त्यांच्या मुलाला, बायकोला, बहिणीला आयकर विभागाने चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे.

कोणताही पक्ष सत्तेवर आला की त्याला वाटतं नेहमीसाठी आमचंच राज्य राहणार आहे, मग डेरिंगबाजपणे घोटाळे केले जातात. जनता परत आपटते डोक्यावरून.

पूर्ण धुतलेल्या तांदळाचा राजकारणी कोणी नाही. कृपया पदावरील व्यक्तीला योग्य संबोधन/ मान द्या.

एडीची नोटिसच आलीय ना? जाऊन द्या की त्यांच्या प्रश्नांची उत्तरे, कशाला घाबरता? नुसती नोटीस आली म्हणून हे बंद, ते बंद ही नौटंकी कशाला? नोटीस तुम्हाला आलीय, लोकांना का हो त्रास?

दोन्ही बाजू भिकारछाप असल्याने कोणी आलं तरी पब्लिक अशीबी खड्यातच जाणार आहे पण मला वैयक्तिक पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल.>>>>>

त्यांना सांगा मेगाभरतीच्या लायनीत उभे राहायला.

कारण त्यांच्या पक्षाने आता अंग झडझडून कामाला लागल्याशिवाय काही आशा नाहीय आणि त्या पक्षाच्या हाई कमांडला अंग झडझडून कामाला लागणे म्हणजे काय हेच माहीत नाही. भविष्यात कधीकाळी पक्षाचे हाई कमांड बदलले व त्यामुळे पक्षच बदलला तर मलाही आवडेल चव्हाण मुख्यमंत्री झालेले. त्यांनी थोडीफार आशा निर्माण केली होती. बाकी घोटाळ्यांवर वचक ठेवण्याइतकी पॉवर त्यांचा पक्ष त्यांच्या मुख्यमंत्री/पंतप्रधान याना देतंच नाही. जिथे नाणावलेले इकॉनॉमिस्ट घोटाळे थांबवू शकले नाहीत तिथे चव्हाणांचे काय....

पृथ्वीराज चव्हाणांनी कोणताही लाभ मिळवला नसेलच हे ठामपणे कुणी म्हणू शकत नाही. आजच्या सत्तेसाठी कुतरओढ चाललेल्या काळात कुणी मिस्टर क्लिन राहू शकत नाही. ते परत मुख्यमंत्री होण्याचे बिलकूल चान्सेस नाहीत.

राजकारणी आहेत हे लोक शेवटी. चांगलेच असले असते तर समाजकारणी म्हणवले जातील. त्यातल्या त्यात उत्तम पर्याय आहे. शेवटी वैयक्तिक फायदा पाहून जरी त्यानिंपक्ष बदलला तरी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे आहे तिथे राहूनच भविष्यात संधीची वाट पाहत राहतील सत्ताबदलाची. बाकी त्यांची दोन्ही अपत्ये राजकारणापासून लांब आहेत हा एक चांगला पॉईंट आहे त्यांचा.

मुले राजकारणात का नको ? कमी मार्क पडले तरी दोक्तरच्या मुलाला डॉकटर होण्यासाठी पेमेंट कॉलेजेस लोकांसाठीच आहेत ना ? लोक घराणेशाही चालवतात , मग बिचारा राहुल , आदित्य का नकोत ?

ईडीचे कार्य आणि त्यांना कोणते अधिकार आहेत हे आता पाहू.

१. फेमा, १९९९ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास अशा प्रकरणांचा शोध घेणे

२. हवाला सारखे फॉरेन एक्स्चेंज रॅकेट, निर्यात उत्पन्न वसुली, परकीय चलन परत न करणे किंवा इतर कोणत्याही मार्गाने फेमा-१९९९ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास अशा प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार ईडीला आहे.

३. पूर्वीच्या फेरा (FERA), १९७३ किंवा आत्ताच्या फेमा (FEMA), १९९९ कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाले असल्यास, अशा खटल्यांचा न्यायनिवाडा करणे.

४. खटल्याच्या कार्यवाही नंतर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दंड वसूल करणे.

५. फेरा (FERA), १९७३ अंतर्गत, खटल्यांची प्रकरणे हाताळणे, त्यांची फिर्याद स्वीकारणे आणि त्यांचा न्यायनिवाडा करणे.

Pages