सरकार इडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करतंय काय?

Submitted by स्वप्नील ७७७ on 25 September, 2019 - 09:06

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. माबोकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. माझ्या आयडीच्या वयावर शंका न घेता धागा विषयावर बोलावं ही अपेक्षा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> मोदीप्रेम्यांनी कवतिकाचा दागा नाय काढ्ला मंग? >>>

गांजलेल्यांच्या वेदनांवर हसणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) काहीसे बॅकफुटवर आले आहे. पवारांनी स्वत:हून कार्यालयात हजर राहून आपल्यावरील आरोपाचा खुलासा करण्याची भूमिका घेतल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याबाबत पेच निर्माण झालेला आहे.

चौकशीची कसलीही नोटीस न पाठविता स्वत: हजर राहिलेल्या व्यक्तीचा ईडी स्वत:हून जबाब नोंदवून घेवू शकत नाही, त्यामुळे पवार शुक्रवारी कार्यालयात हजर झालेच तर त्यांचे म्हणणे ऐकुन निवेदन स्विकारले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पवार यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमण्याच्या शक्यतेने परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेतील २५ हजार कोटीच्या कथित घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयडी) तपास सुरु होता. मात्र ईडीने सोमवारी अकस्मितपणे याप्रकरणी शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील , आनंद आडसुळ यांच्यासह ७० नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (मनी लॉड्रीग) प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना ईडीने केलेल्या कारवाईबाबत विरोधकाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्येही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: शरद पवार यांचा शिखर बॅँकेच्या व्यवहाराशी कागदोपत्री कसलाही संबंध नसताना केवळ याचिकेकर्त्यांच्या मागणीनुसार मुंबई पोलिसांनी नाव नोंदविले होते. मात्र ईडीने त्याबाबत कसलीही शाहनिशा न करता त्यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. स्वत: पवार आपल्यावरील कारवाईने आक्रमक झाले असून कारवाई एकतर्फी असल्याचे दाखवून देण्यासाठी ईडीच्या कार्यालयात स्वत:हून हजर राहण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या परिस्थिीतीला कसे सामोरे जायचे, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Sharad Pawar

@PawarSpeaks
काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.@MumbaiPolice @NCPspeaks
1,281
5:11 PM - Sep 26, 2019
Twitter Ads info and privacy
265 people are talking about this

चौकशीशिवाय गुन्हा दाखल केल्याने अडचण
वास्तविक एखाद्या संस्था, कंपनीतील आर्थिक अनियमितता, घोटाळ्यासंबंधी ईडीकडे तक्रार आली ,किंवा त्यांनी स्वत:हून त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक चौकशी केली जाते. त्यामध्ये संबंधिताला बोलावून त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली जाते, त्या चौकशीत जर संंबंधित व्यक्ती, संस्था, कंपनी दोषी आढळत असल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन रितसर कारवाई केली जाते. शिखर बॅँकेच्या घोटाळ्याबाबत दाखल गुन्ह्यामध्ये अशा प्रकारने कोणत्याही पद्धतीचा वापर झालेला नाही. शरद पवार वगळता अन्य नेते हे बॅँकेचे आजी-माजी संचालक व अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आला आहे. मात्र पवारांच्या बाबतीत तसे काहीच नसल्याने त्याच्याविरुद्ध गुन्ह्याबाबत अधिकाºयांची अडचण झाली आहे.

>>> Sharad Pawar

@PawarSpeaks
काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.@MumbaiPolice @NCPspeaks >>>

जवळपास संपुष्टात अालेले अस्तित्व टिकवून धरण्याची अखेरची केविलवाणी धडपड

>>>>>>महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेतील २५ हजार कोटीच्या कथित घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयडी) तपास सुरु होता. मात्र ईडीने सोमवारी अकस्मितपणे याप्रकरणी शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील , आनंद आडसुळ यांच्यासह ७० नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (मनी लॉड्रीग) प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. <<<<<
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेला कसे वापरत ते बघितले आहे !! कधीतरी गुन्ह्याचा बॅरेल भरणार होताच !!

>>> निष्पाप बालकांना मारून अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करणार का हाउडी ? >>>

देशद्रोही विरोधकांना संपवून अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअनची करणार.

सर्व यंत्रणांचा अगदी व्यावस्थित वापर होतो आहे... Sad

कसोटीचा काळ आहे. पण कुणाच्या ? मांडवली मधे पवार यांच्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम मिळेल.

>>> मांडवली मधे पवार यांच्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम मिळेल. >>>

कसली मांडवली? त्यांची राजकीय वाटचाल २०१४ मध्येच पूर्णपणे संपली आहे.

अरे खवट,

मोदी-शहा हे विनोदमूर्ती सर्वक्षेत्रतज्ज्ञ श्री रा रा राहुलशेठ, जाणता राजांसकट सर्वांचे बाप आहेत.

आर्थिक मंदी आणि बेरोजगारी हा विषय सरकार बदलण्यासाठी सक्षम होता .
Bjp समर्थक लोकांची सुद्धा मत बदलत होती
पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ह्यांच्या वर गुन्हा दाखल करून
परत प्रचाराची दिशा बदलण्यात bjp यशस्वी झाली

पवार चिदु पापी आहेत हे कसे कळले ? चित्रगुप्तांची डायरी घावली का?

नवीन Submitted by BLACKCAT on 26 September, 2019 - 23:33 >>>

तु म्हणतोस ती डायरी कुठे आहे ते रागाच सान्गु शकेल. त्याच्याकडेच असावी ती.

दमला असाल तर चहा,नाश्ता,थंडा, गरम काय बोलाल ते आणून देतो पण ही महाचर्चा अखंड सुरु राहू दे. जोश येण्यासाठी रंगपंचमीची गाणी लावू काय?

बोकलत कराच येवस्ता.

>>>>>>>पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ह्यांच्या वर गुन्हा दाखल करून
परत प्रचाराची दिशा बदलण्यात bjp यशस्वी झाली<<<<<
शरद पवार भ्रष्ट आहेत ह्याची जनतेला खात्री आहे.
शरद पवार सर्वात जास्त काळ कृृषी मंत्री असुनही महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना त्याचा फायदा झाला नाही ना शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्या. त्या शिवाय D company शी असलेले संबंध कधी तरी त्यांना गोत्यात आणणारच होते. उमेदीच्या काळातले सहकारी आता सोडुन जात आहेत.
शरद पवार कधीही कोणाशीही एकनिष्ठ नव्हते, त्यामुळे सोडुन गेलेल्या सहकार्यांकडुन तशी अपेक्षा नसेल. शरद पवारांविरुद्ध पुरावे सोडुन गेलेल्या सहकार्यांकडुन सहज मिळतील.

राममंदिर होवो अथवा न होवो पण रामराज्य जरुर यायला हवं. भ्रष्टाचार करणारा कुणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे.
छगन भुजबळ उजळ माथ्याने तुरुंगाबाहेर फिरत आहेत. लालू, कलमाडी, ए राजा वगैरे लोकांकडून अपहाराची वसूली करण्यात आली नाही.

>>> म्हणुन मोदी त्यांचे बोट धरुन राजकारणात आले का? >>>

उपरोध समजलेला दिसत नाही वशाट साहेबांना

>>> ईडी बोलले चौकशीची गरज नाही >>>

ईडी बोलले तूर्तास चौकशीची गरज नाही.

अपेक्षेप्रमाणे नाटकी माणसाने शेपूट घातली.

>>> महाराष्ट्राच्या रावडीने गुजरातच्या हावडीला थोबाडले >>>

कोण कोणास थोबाडतंय ते जनतेस समजते. म्हणून तर नाटक करून शेवटी शेपूट घातली.

Pages