सरकार इडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करतंय काय?

Submitted by स्वप्नील ७७७ on 25 September, 2019 - 09:06

आजच शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या विरोधात इडी कारवाई करणार आहे. अशी बातमी वाचली. या अगोदर राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती व चौकशी केली गेली होती. भुजबळ सुध्दा तुरुंगात होते.
नेमकं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इडी तत्परतेने कारवाई करायला बघत आहे. यापाठीमागे सरकारचा हात असावा काय? नुकतेच शरद पवार मी अजून तुरुंगात गेलो नाही. असं म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्याला धरुन कारवाई होत आहे काय. माबोकरांची मते जाणून घेण्यासाठी धागा काढला आहे. माझ्या आयडीच्या वयावर शंका न घेता धागा विषयावर बोलावं ही अपेक्षा. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते काहीही असो पण शरद पवारांनी साखर कारखानदारी चालू रहावी म्हणून बरेच प्रयत्न केले आहेत. साखर सम्राटांनी सुरुवातीला त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी मदत नेहमी केली. राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना केल्यानंतर ध्रुवीकरण होऊन पवारांची पकड ढिली पडत गेली. शरद पवार कॉंग्रेस मध्ये राहिले असते तर कमीतकमी राष्ट्रपती बनले असते. शेवटी सोनिया गांधी बरोबर तडजोड करावी लागली. स्वाभिमान लाचारीत बदलला हेही प्रतिमेला तडा जाणारं ठरलं.

देविंदरला सत्तेत आल्या आल्याचं ह्या लोकांची राजकीय गेम करायची होती/अजूनही आहे( जशी त्याच्या मालकाने बाकि लोकांची केली) सर्व पुरावे होतेच रेडी पण पवारांचे गाजपच्या पडद्यामागच्या लोकांशी मोठे आर्थिक सम्बन्ध आहेत त्यामुळे त्या घराला फार काही त्रास कधी होणार नाही. बाकीची चिल्लीपिल्ली मात्र कामाला लागू शकतात. ह्याच टाईपच्या व्यवहारात विलासराव अचानक गचकल्यावर त्याच्या घरच्यांची माग तारांबळ उडाली होती पण त्यांनी ते कसतरी निस्तरलं मागून. ysr रेड्डीची ची गेम ह्या व्यवहारात डाग दिल्याने झालती. इज्जतीत राहतात ते निवांत असतात. आपले कलमाडी भाऊ बगा फार मोठी पोसिशन नसले तरी थोडा तुरुंगवास भोगून हजारो कोट खाऊन, पचवून, ढेकर देऊन मोकळे झाले. उद्ध्या लै मोठ्या बढाया मारायचा पण लोकसभेत बाकीच्या लोकांची लागलेली पाहून शहाणा झाला. वाघ म्हणे Lol . नव्या आलिशान मातोश्रीच् शे कोटच काम चालूय ते नाही दिसत ईडीला बहुतेक. हे फाकरेची लोकं घरात बसून कुढून एवढे पैसे आणतात हे जोपर्यंम्त पब्लिक त्यांना विचारात नाही तोवर खड्यात पडूनच मरणार ... कोणी मोठा धेंड अपघाती मेलेला ऐकलाय का कोणी मुंबईत ?

सहमत.

>>> शेवटी सोनिया गांधी बरोबर तडजोड करावी लागली. स्वाभिमान लाचारीत बदलला हेही प्रतिमेला तडा जाणारं ठरलं. >>>

ते काल म्हणाले की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही.

ज्यांचे आयुष्य दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालण्यात गेले त्यांच्या तोंडी अशा वल्गना विनोदी वाटतात.

ह्या प्रकारच्या कारवाई ला फार काही अर्थ नसेल. या मागे छुपा हेतू शिवसेनेला युतीसाठी स्वस्तात तयार करणे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर दिलासा देणे आहे. राजकारणात साधे सरळ वर वर दिसते असे असेलच असे नसते.

राजकीय नेत्या मध्ये
लालू यादव,छगन भुजबळ हे दोनच नेते सर्वात जास्त काळ तुरुंगात होते आणि आहे .
आता chitambaram.
मोजकेच नेते कायद्या च्या कचाट्यात सापडले म्हणजे बाकी निष्कलंक आहेत असं नाही

मग स्वप्निलभौ.. गोव्यात काय खबर , कुणाला मिळालिय का तिथे ईडीची नोटिस?
नवीन Submitted by मी-माझा on 26 September, 2019 - 03:30
>> मना काय ठाव नै. खबर नथी. आप बताइए.

गोव्यात सगळे वेगळे असते

न्यूड पार्टीची ऑफिशियल एड येते
गोमांस पोटभर मिळते
गोव्यात द्वि भार्या प्रतिबंधक कायदा सर्व धर्मियांना आहे म्हणे, म्हणून गोव्याचे मुस्लिम बेळगावात येऊन दुसरे लग्न करतात , असे ऐकले,

https://en.m.wikipedia.org/wiki/Goa_civil_code

तिथे ईडी कुठे जाणार ? शिवाय सगळे विरोधक आधीच भाजपात आलेत

Bjp नी corrupt नेत्यांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवली असे कोण्ही पोस्ट केले तर शरद पवार,छगन भुजबळ,लालू,chitambaram
Corrupt नेते नाहीत अत्यंत प्रामाणिक नेते आहेत असं किती लोक बोलतील

अहमदनगर: राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली.
बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा
हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे . जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असंही हजारे म्हणाले.
अजित पवार यांचं नाव आहे
'माझ्याकडं आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतु अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीनं शरद पवार यांचं नाव कसं काय घेतलं याची चौकशी पुढे येईल. सहकारी कारखाण्यासाठी बँकेतून करोडो रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र त्यानंतर कारखान्यांनी बँकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळं बँकांनी कारखान्यांवर जप्ती आणली व बँकेनं कवडीमोल भावानं ते कारखाने विकले. यातच मला शंका आहे की कारखाने आजारी पडले की पाडले गेले. सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळीत या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचं सांगितले होतं. त्यामुळं मला या प्रकरणात अधिका-यांचे देखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे' असं अण्णांनी स्पष्ट केलं.

अशोक लवासा Sad आता त्यांच्या मुलाला, बायकोला, बहिणीला आयकर विभागाने चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे...राजकिय नेत्यांचे ठिक आहे. चौकशी चुकवण्यासाठी भाजपात जाण्याचा पर्याय उप्लब्ध आहे, पण ह्या लोकांनी काय करयचे? आधी कॉन्ग्रेसमधे जाउन भाजपात जायचे की डायरेक्ट भाजपात जायचे?

केंद्र सरकार विकासकामे न करता सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा, ३७० सारख्या घटनांनी देशातील जनतेला बधीर करू शकते, परंतू राज्यसरकारकडे जनतेला बधीर करणारी आयुधे नसतात,त्यामुळे आज इडी चा वापर केला तरी पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता येणार नाही,अशा वेळेस जनतेच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील.

>>> सरकार इडी चा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करतंय काय? >>>

नाही.

मेलेल्याला काय मारायचे? पूर्ण संपलेल्यांना काय संपवायचे?

अच्छा

>>> हावडीचा एवढा ढोल ऊसगावात वाजला. पण पडघम ऐकू आला नाही माबोवर. >>>

मोदीद्वेष्ट्यांच्या मूळव्याधीच्या वेदनांच्या किंकाळ्या अजून ऐकू येताहेत की.

Pages