स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणातील बऱ्याच बायकांना सवय असते तशी. वाक्य संपले की हो जोडायची. आमच्या ओळखीच्या अनेक जुन्या बायकांची ही लकब मी पाहिली आहे.>>>>>>>>>>>>पण इथे तर ते रमेचे वडील बोलत आहते ना.. हो.

कोकणातील बऱ्याच बायकांना सवय असते तशी. वाक्य संपले की हो जोडायची. आमच्या ओळखीच्या अनेक जुन्या बायकांची ही लकब मी पाहिली आहे.>>>>>>>>>>>>पण इथे तर ते रमेचे वडील बोलत आहते ना.. हो.

ह्या मालिकेतली पात्रांची भाषा - ह्याच कशाला, पेशवाईवरच्या बहुतेक सगळ्या मालिकांची भाषा संस्कृतनिष्ठ असते. वास्तविक अठराव्या एकोणिसाव्या शतकांत कोंकणी लोकांची भाषा अगदी रांगडी, रोखठोक आणि ' प्रेमळ' शब्दांची रेलचेल असलेली असे. तशी भाषा मालिकांमध्ये वापरणे शक्य नाही हे खरे. तरीसुद्धा संवादलेखकांनी तत्कालीन भाषेचा थोडाफार तरी अभ्यास करावा असे वाटते. द्वितीया विभक्तीचा ' स' हा प्रत्यय ' ला' अथवा ' ना' पेक्षा अधिक वापरात होता. म्हणजे मस, तूस , त्यांस, आम्हांस असे बोलले जाई. तसेच ' ण' चा वापरही अधिक होता.
तसेच त्या काळी पुण्यातल्या काही स्थळांना त्यांची आजची ' ब्रॅंड नेम्स' मिळाली नव्हती. कसबा गणपतीला जाऊन आलो म्हणण्याऐवजी कसब्यात गणपतीदर्शनास जाऊन आलो असे म्हणणे योग्य. 'नारळ वाढवणे ' ऐवजी 'नारळ फोडणे' हाच वाक्प्रचार रूढ होता. असो.
अर्थात कुठल्याही मालिकेमध्ये इतके बारकावे, तेही भाषेचे, शोधणे आणि अपेक्षिणे हे जरा अतीच होईल हे मान्य.

स्वामिनीमध्ये लवकरच आनंदीबाईंची एंन्ट्री होत आहे.कुंजिका काळवीट ही अभिनेत्री हा रोल करणार आहे.सुभाबरोबर एक पिक्चर केला होता,आणि श्रावणक्वीन स्पर्धेत पण होती कधीतरी.
आता मोठ्या रमाबाई आणि मोठे माधवराव कोण याची उत्सुकता आहे.
खरतर हे माधवरावच मोठे वाटत आहेत.पण त्यांना मोठ दाखवतीलच.

जानकीबाईंचा म्रत्यू ऑगस्ट 1755 मध्ये झाला,अशी गुगलवर माहिती आहे.आनंदीबाईंच लग्न त्यानंतर 1वर्षांनी झाल,तेव्हा त्या लहान होत्या.आणि गोपिकाबाईंची चुलतबहीण होत्या.
आता प्रत्यक्षात मालिकेत काय दाखवत आहेत,माहित नाही.

त्याकाळात लग्नात मुली लहान असत.मग कुंजिका मोठी नाही का वाटणार?
आनंदीबाई आणि गोपिकाबाई चुलत बहिणी?पण गोपिकाबाई या (माझ्या माहितीप्रमाणे)माहेरच्या रास्ते गोखले आणि आनंदीबाई माहेरच्या ओक घराण्यातील होत्या.

जानकीबाईंचा म्रुत्यु होतो.अस वाटत आहे.

Submitted by UP on 14 January, 2020 - 14:45
जानकीबाईंचा म्रत्यू ऑगस्ट 1755 मध्ये झाला,अशी गुगलवर माहिती आहे>>>>मला अंदाज वाटलाच होता. बाळंतपणात मृत्यू होणार असेल. कारण त्यांचे अपत्य असल्याची नोंद नाही आणि ते दालन प्रकरण आहेच

नीना कुलकर्णीच झालेल वय दिसुन येत पण अभिनय मात्र खणखणित आहे अजुन, सगळ्या पेशवाई स्त्रिया मधेच नथी घालतात किवा नाही घालत मात्र सगळ्या साजश्रुगारात नाकात काहिच नसण अगदी बारिक मुरणी सुद्द्दा नाही, ते विचित्र दिसत.

काय हा विरोधाभास. ज्या आनंदीबाईंनी ध चा मि करून पुढे नको तो इतिहास घडवला त्या आनंदीबाईंना सध्यातरी सोज्वळ,गुणी,मनमिळाऊ दाखवल आहे आणि ज्या रमाबाईं सोज्वळ ,निर्मळ,विनयशील होत्या, त्यांना त्यांच्या लहानपणी उध्दट,आगाऊ दाखवल आहे.
वा रे विरेन प्रधान.

आज एक शॉट पाहिला. जात्यावर दळण दळताना अचानक चक्कर येऊन पडते ती जानकीबाई होती का?

पण मला एक कळाले नाही..... जर जानकीबाई जत्यावर दळण दळत आहेत आणि त्यांनी तस करायला नको आहे तर पार्वतीबाई नुसत्याच समोर उभ्या राहून नका करू असे नका करू असे एवढच म्हणत आहेत. सरळ जाऊन जात्यावरनं बाजूला का केले नाही अगदी चक्कर आलि तरी लगेच धावल्या नाहीत मदतिला.
रमाच्या आईची गुलाबी साडी काही बदलत नाही.
तसेच जानकीबाई आजारी असताना दादासाहेब मोहीमेवर कसे काय गेले.....

जानकीबाई आजारी असताना दादासाहेब मोहीमेवर कसे काय गेले.....>>>>तेच तर.तर्कविसंगत काहीतरी दाखवतात

अंगठीतला हिरा खाल्ल्यामुळे खरंच मरण येतं का, तेही एवढ्या झटपट. जानकीबाई गेल्या की ते स्वप्न होतं. काळवीट बाई दिसल्या नाहीत मला अजून, दोन दिवस झाले बघतेय मी.

ते स्वप्न होत.काल नारायणरावांचा जन्म झालेला दाखवला आणि बाळाला बघायला आलेल्या जानकीबाईंना चक्कर येते.

नारायण राव पेशवे यांचा जन्म झाला.
जानकीबाईंचे मूल आणि स्वतः जानकीबाई मरण पावल्या. त्यांनी आत्महत्या केली बहुतेक

आता आनंदी बाईंचा प्रवेश होणार, पण त्या तर अत्ता पर्यंत किती चांगल्या स्वभावाच्या दाखवल्या आहेत, न्यायाने विवेकाने वागणाऱ्या. माधवरावांना किती चांगला सल्ला देतात रमाबाईंच्या मामाला पण नीट समजावून सांगतात. मग पुढे त्या चक्क व्हिलन बनतात ध चा मा करणार्या

Pages