स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज ऐश्वर्या नारकर मूळ ऐश्वर्या सारखी वाटली. अश्रू ढाळत आत्मपरीक्षण करीत होती.
बाकी गोपिकाबाईंच्या स्वभावातील कंगोरे मायबोलीवर यापूर्वी वाचल्याचे आठवते. लिंक पाठवता येत नाहीये.

रमेच्या आईचे ब्लाउज आणि साडी ( चेक्स ची साडी आणि ब्लाउज , तिला बहुतेक वेळा तीच साडी देतात ) दोन्ही उंच माझा झोका मध्ये पाहिल्याचे आठवत आहे.

इतके दिवस दुसरीकडे कुठे तरी उपयोगी पडेल म्हणून जपून ठेवलेली दिसतेय. दोघांचे producer एकच आहेत.☺

तशी मालिका खूपच भडक आणि बटबटीत वाटतेय.

राजघरण्यातल्या स्त्रिया ही रोजच एवढया नटून थटून असतील का हा ही एक भाप्र☺

भयानक वाटली मालिका, विश्वास रावांच्या पत्नी वाड्यात वावरताना दाखवल्या आहेत. हे गडबड आहे अगदी

रमेची आई वीरेन प्रधानाची बायको आहे का, असेल तर साडीपण एकच असेल. हो सू मी घ मधला आपटे इथेही आहे, तिथे संभाजी मध्ये हत्तीच्या पायी गेला आणि लगेच इथे त्याच अवतारात, कपडेही नवीन शिवायला नकोत. जिजाऊ मालिका पण चालू आहे, नक्की काय बघतोय तेच कळत नाही.

राजघरण्यातल्या स्त्रिया ही रोजच एवढया नटून थटून असतील का हा ही एक भाप्र>> असाव्यात बहुतेक. कारण सगळ्याच पौराणिक व ऐतिहासिक मालिकांमध्ये अशाच दाखवतात. त्यांच्या इभ्रतीसाठी करावं लागत असेल.

सू मी घ मधला आपटे इथेही आहे, तिथे संभाजी मध्ये हत्तीच्या पायी गेला आणि लगेच इथे त्याच अवतारात, कपडेही नवीन शिवायला नकोत. >> हंबीरमामाही आहेत त्याच अवतारात...

ही बकवास मालिका बघू नका. पेशवे घराण्यातील स्त्रियांबद्दल हा समग्र लेख वाचा- प्रतिसादही नक्की वाचा कारण त्यात अधिक माहिती आहे.

https://www.maayboli.com/node/32852

ही बकवास मालिका बघू नका. पेशवे घराण्यातील स्त्रियांबद्दल हा समग्र लेख वाचा- प्रतिसादही नक्की वाचा कारण त्यात अधिक माहिती आहे. अगदि च खर आहे, यात इतिहास काहिच्या काही च दाखवताहेत

पुढे पाचदहापंधरावीस वर्षांनी ही मालिका आधार धरून मायबोली किंवा असंच कुठे पेशवाईवर ऐतिहासिक् कादंबरी लिहिली जाऊ शकते.

>>राजघरण्यातल्या स्त्रिया ही रोजच एवढया नटून थटून असतील का हा ही एक भाप्र☺>>
दूरदर्शनवर चंद्रप्रकाश द्विवेदींची महाभारत सिरीयल होती, त्यात कपडेपट फार भारी होता. राजस्त्रिया रात्री झोपायचे वेगळे कपडे घालायच्या- अगदी सैलसर, गाऊन टाइप. शिवाय झोपताना अलंकार उतरवायच्या.
अलंकारही काळाला साजेसे दाखवायचा प्रयत्न होता.
आणि काही ऋषींना तर चक्क टक्कल दाखवलं होतं.
पण चालली नाही ती सिरीयल.

सनव लिंकसाठी धन्यवाद!
अशोक यांनी खुप ओघवतं लिहिलंय पेशव्यांच्या स्त्रियांबद्दल..

धन्यवाद ! सनव जी, लिंक साठी.
खूप छान माहिती दिली आहे अशोकजींनी. मी तो धागा निवडक १० त नोंदवला. गोपिकाबाई बद्दल वाचले खूपच धोरणी बाई आणि शेवटी त्यांची जी शोकांतिका झाली ती मनाला चटका लावणारी आहे. आता चाललेल्या 'स्वामींनी' मध्ये एक चुणूक दिसली त्यांच्या धोरणीपणाची ते साड्या खरेदी प्रकरण मध्ये. खरेदी केलेल्या साड्या जाळायला लावतात.

सनव लिंक साठी धन्यवाद.

तिकडे वाचुन एक प्रश्न पडला, गोपिकाबाई तर ठिकेय, पण अशोकमामांनी जे लिहीलेय त्या नुसार त्यांचा मोठा मुलगा विश्वास लग्नाआधीच पानिपतच्या युद्धात मारला गेला, पण या शिरेलीत तर राधिकाबाई सुन झालेली दाखवली आहे.

स्वामी वाचुन खुप काळ लोटलाय त्यामुळे निटसे आठवत नाहिये, कुणाला माहित असेल तर सांगा.

तिकडे वाचुन एक प्रश्न पडला, गोपिकाबाई तर ठिकेय, पण अशोकमामांनी जे लिहीलेय त्या नुसार त्यांचा मोठा मुलगा विश्वास लग्नाआधीच पानिपतच्या युद्धात मारला गेला, पण या शिरेलीत तर राधिकाबाई सुन झालेली दाखवली आहे.>>>

पानिपतवर जायच्या आधीच विश्वासरावांचा विवाह झाला होता असे वाचल्याचे आठवतेय.

दूरदर्शनवर चंद्रप्रकाश द्विवेदींची महाभारत सिरीयल होती, त्यात कपडेपट फार भारी होता. राजस्त्रिया रात्री झोपायचे वेगळे कपडे घालायच्या- अगदी सैलसर, गाऊन टाइप. शिवाय झोपताना अलंकार उतरवायच्या.
अलंकारही काळाला साजेसे दाखवायचा प्रयत्न होता.
आणि काही ऋषींना तर चक्क टक्कल दाखवलं होतं.
पण चालली नाही ती सिरीयल.>>>

ही सिरियल पाहिली नाही पण त्यांची चाणक्य सिरियल खूपच मस्त होती. त्यातले नेपथ्य, कपडेपट अगदी अस्सल वाटत असे.

काल प्रोमोमध्ये अमोल बावडेकर दिसला. नक्की कोण झालाय तो? Uhoh सिरियल बघत नाही म्हणून विचारते.

सनवने पाठवलेली लिन्क वाचली. छान लिहिलय. Happy

आनन्दीबाई कोण झाल्या आहे हे बघण्याची उत्सुकता आहे. अजून त्यान्ची एन्ट्री झाली नाही वाटत. मेघा घाडेला घ्या म्हणाव.

अमोल बावडेकर नानासाहेब पेशवे,गोपिकाबाईंचा नवरा झाला आहे.
मलाही आनंदीबाई कोण असेल याची उत्सुकता आहे,पण आश्चर्य आहे ,जिच्यामुळे पेशवाईत एवढ राजकारण घडल ,ते कँरँक्टर अजून आल नाहीच पण त्यांचा साधा उल्लेखही नाही.
आशुतोश गोवारीकर पानिपतवर जो पिक्चर काढत आहे,त्यात आपले खूप मराठी कलाकार आहेत.
त्या पिक्चरमध्ये आनंदीबाईंचा रोल अर्चना निपाणकर करत आहे,राधामधली दीपिका, इथे बघू कोण करत आहे ते.

आनंदीबाई वरून आठवले,

महादाजी शिंदे सीरिअल मध्ये आनंदी बाईंचे पात्र वागण्या बोलण्यात काहीसे उशृंख दाखवले होते, त्यामुळे बराच वाद झाला होता असे आठवते.

धन्स UP, अमोल बावडेकर राघोबादादा व्ह्याला हवा होता.

'रमा माधव' चित्रपटात ज्यु. सोनाली कुलकर्णी आनन्दीबाई आणि प्रसाद ओक राघोबा दादा झाले होते. श्रुती मराठे पार्वतीबाई झाली होती.

जुनी 'स्वामी' मालिका लहानपणी पाहिलेली आठवते. त्यात श्रीकान्त मोघे राघोबादादा आणि एक मराठी बातम्या दयायला यायच्या त्या ( नाव आठवत नाही) आनन्दीबाई झाल्या होत्या. दया डोन्गरे गोपिकाबाई झाल्या होत्या. अस अन्धुकस आठवतय. पुढे ते दोघे ( श्रीकान्त मोघे राघोबादादा आणि एक मराठी बातम्या दयायला यायच्या त्या ) ' अवन्तिका' मध्ये सुभाचे सासू- सासरे झाले होते.

अरे व्वा! किती दिवसांनी त्यांची आठवण निघाली! आनंदीबाईंच्या भुमिकेत काही मला त्या आठवत नाहीत पण त्यांचे बातम्या सादरीकरण आठवते. एक भुवई वर करुन मान एका विशिष्ट कोनात वळवून वाक्य पूर्ण करायच्या! Happy
सह्याद्रि / दूरदर्शन च्या बातम्या खाजगी वाहिन्यांसारख्या सवंगपणे दिल्या जात नाहीत आणि असे छान निवेदक आहेत.

माझी चुलत भाची उमा पळसुलेदेसाई- पेंढारकर ही या मालिकेत पार्वतीबाईची भूमिका करत आहे

पार्वतीबाई म्हणजे काल मागणी घालायला आल्या होत्या रमाला त्या का, मी काल बघितला एक एपिसोड फक्त, छान दिसत होत्या त्या.

माझी चुलत भाची उमा पळसुलेदेसाई- पेंढारकर ही या मालिकेत पार्वतीबाईची भूमिका करत आहे,,,,,,,,,, समजुन उम्जुन काम कर्तेय खर तर ती.

मला आवडल्या उमा यांनी वठवलेल्या पार्वतीबाई.

आज तर ह्या सिरीयल मध्ये वेगळाच घोळ घातलाय. टिपिकल सिरीयल स्टाईल गैरसमज.

छान दिसतात पार्वतीबाई. रमाचा भाऊ मुका आहे का. तो सारखी नक्कल का करत असतो. कोणत्या मुलीसाठी मागणी घातली ते त्यांनी सांगितलंच नाही. त्याचवेळी मोलकरीण बाई पण लागली होती आणि गंगेची आई तिथे अगदी फुल मेकअप आणि उंची साडी नेसून, अभिनय तसाच नाक-डोळे मुरडून. मजा वाटत होती ब्रेकमध्ये चॅनल बदलल्यावर.

मालिका इतिहासाला अनुसरून नसणारच आहे. तरीही...
>>>>>>>विश्वासराव आणि राधिकाबाई गुप्ते यांचा साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. असा उल्लेख आहे. पानिपतावर जाताना (सन १७६१) विश्वासराव २० वर्षांचे होते. राधिकेबरोबर विवाहास गोपिका बाई तयार नव्हत्या. तरीही भावी पेशव्याचे लग्न इतके लांबणीवर पडावे याचे आश्चर्य वाटते. ......या दिरंगाईचे कारण इतिहास काय सांगतो ?
(त्यांचे धाकटे बंधू माधवरावांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी झाला.)
म्हणजे याला कारण एकट्या गोपिकाबाई असतील तर त्या फारच पावर फुल असल्या पाहिजेत
ता. क. लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्‍नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली असा एक उल्लेख आत्ताच वाचला.
म्हणजे पहिली पत्नी असताना राधिकेबरोबर दुसरा विवाह ठरला होता का?

Pages