कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका
Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ही रमा उद्धट, उर्मट च
मला ही रमा उद्धट, उर्मट च वाटते. तिचे डायलॉग पण विचित्र च लिहिलेले असतात. आणि चेहऱ्यावर पण गोडवा आहे असं नाही वाटत.
लग्नाच्या वेळी घातलेल्या जड कानातल्या मुळे इजा झालेली दिसतेय कानाला ,हल्ली भुंडी च दाखवतायत त्यामुळे.
काल पार्वती बाईंनी लाल नऊवारी च्या आत घातलेली निळी लेगीन चक्क बाहेर दिसत होती. कमीत कमी एवढं तरी टाळायला हवं होतं ना. बाकी दागिने, सिंथेटिक साड्या आणि प्रखर प्रकाश ह्याबद्दल न बोललेलं च बरं.
काल पार्वती बाईंनी लाल नऊवारी
काल पार्वती बाईंनी लाल नऊवारी च्या आत घातलेली निळी लेगीन चक्क बाहेर दिसत होती. कमीत कमी एवढं तरी टाळायला हवं होतं ना>>

काल पार्वती बाईंनी लाल नऊवारी
काल पार्वती बाईंनी लाल नऊवारी च्या आत घातलेली निळी लेगीन चक्क बाहेर दिसत होती. कमीत कमी एवढं तरी टाळायला हवं होतं ना.
>>> मुळांत स्वतःला शेवटपर्यंत सधवा समजणार्या पार्वतीबाईंना 'लाल' नऊवारी दिली आहे. धन्यच आहेत.
रमा जिथे तिथे स्वतःचा शहाणपणा
रमा जिथे तिथे स्वतःचा शहाणपणा पाजळत असते
जेवढे पदार्थ वापरून चटणी केली तेवढे जिन्नस आता मुख्य जेवण बनवायला वापरत नाहीत. एवढं निगुतीनं केलेलं खाऊन कसे वजन वाढत नसेल, लढाई कशी करत असतील. रोज असं जेवण तर सणाचं कसं असेल. नोकरांकडेही सुबत्ता आहे.
मुळांत स्वतःला शेवटपर्यंत
मुळांत स्वतःला शेवटपर्यंत सधवा समजणार्या पार्वतीबाईंना 'लाल' नऊवारी दिली आहे. धन्यच आहेत.>>>>>>>>>पण ह्या प्रसंगात त्या सधवाच आहेत. मग कुठल्याही रंगाचं लुगडं नेसवलं तर बिघडतं कुठे?
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा म्हणजेच विधवा बायकांनी वापरायचा होता. विधवांचे रंग सधवा वापरत नसत.
मी लहान असतानाही आमच्या गावात सवाष्ण लाल रंगाची साडी किंवा बांगडी वापरायची नाही.
नीधप आणि वरदा जास्त चांगलं सांगू शकतील.
अगदी हेच लिहिणार होते.
अगदी हेच लिहिणार होते.
सधवा स्त्रिया केसांना कधी ही कात्री ही लावत नसत तेव्हा, केशावपन च्या अघोरी प्रथेमुळे
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा म्हणजेच विधवा बायकांनी वापरायचा होता. विधवांचे रंग सधवा वापरत नसत.
मी लहान असतानाही आमच्या गावात सवाष्ण लाल रंगाची साडी किंवा बांगडी वापरायची नाही. >> हे खरंच माहीत नव्हतं, सधवा बायका कुठलाही रंग वापरू शकत असतील असंच वाटलं होतं, आपण किती बारकाईने मालिका पाहतो पण ते कुठे एवढा विचार करतात, शिवलेल्या नौवाऱ्या काय, त्याच्या आत लेगीन काय, चापाच्या नथी काय... संताप नुसता
त्यात ती रमा अगदी डोक्यात जाते, ती कधीही निरागस वाटली नाही, गोपिका बाई इतकाच मला राग येतो तिचा...
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा म्हणजेच विधवा बायकांनी वापरायचा होता. विधवांचे रंग सधवा वापरत नसत.>>>> हे माहिती नव्हतं,
त्यात ती रमा अगदी डोक्यात जाते, ती कधीही निरागस वाटली नाही, गोपिका बाई इतकाच मला राग येतो तिचा...>>>>> अगं हो हो सान्वी इतकी नको हो रागावूस (पार्वतीबाई मोड ऑन)
सांगू हो रमेला नीट अभिनय करावयास 
पानिपतच्या 'मर्द मराठा'
पानिपतच्या 'मर्द मराठा' गाण्यात पार्वतीबाई झालेल्या क्रिती सॅनोनला गोपिकाबाई झालेल्या पदमिनी कोल्हापूरे कौतुकाने बघत होत्या. सिरियलमधल्या गोपिकाबाई पेशवीणबाई नाचताना बघून म्हणाल्या असत्या , " पेशव्यान्च्या सूनबाई ना तुम्ही, अस वागायच असत का, हेच शिकवलय काय तुमच्या आईने? "
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा
पूर्वी लाल रंग हा आलवणाचा म्हणजेच विधवा बायकांनी वापरायचा होता. विधवांचे रंग सधवा वापरत नसत.>>>
पानिपत मधल्या मर्द मराठा गाण्यात तर पार्वतीबाई लाल साडी नेसून नाच करत आहेत
पानिपत मधल्या मर्द मराठा
पानिपत मधल्या मर्द मराठा गाण्यात तर पार्वतीबाई लाल साडी नेसून नाच करत आहेत Happy
>> हिंदी मूवीमधे नऊवारी दाखवली हेच खूप झालं.
त्यांना रंग, पदर एका खांद्यावर की दोन की डोक्यावर, साडीला ओचा आहे की नाही, केळ एक की दोन हे कळायची आशाच नाही.
ट्रेलर धाग्यावरच्या आशुचँप आणि नीधपच्या कमेंट्स अगदी पर्फेक्ट आहेत.
@ धनुडी Lol
@ धनुडी Lol ( smiley टाकता येत नाही)
कुणी सांगेल का पामरास?
: आणि लागून D type करायचे
: आणि लागून D type करायचे
(No subject)
जम्या जम्या धन्यवाद अंजु
पण प्रत्येक smiley साठी वेगळे letters असतील ना, जरा ट्रायल न एरर करते फावल्या वेळात
अरे वा, जमलं की.
अरे वा, जमलं की.
आणि कुठेही 'हो' वापरतात!
आणि कुठेही 'हो' वापरतात!
अजून काय हवंय हो? अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे हो......
प्रत्येक वेळी काय...!!
कुठे ही हो वापरतात आणि अभिनय
कुठे ही हो वापरतात आणि अभिनय म्हणजे परंतु म्हणून एक पॉझ , रमेच्या बाबांना ह्या परंतु च पेटंट दयायला हवं.
(No subject)
:
कुठेही 'हो' वापरतात!
कुठेही 'हो' वापरतात!
अजून काय हवंय हो? अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे हो......
प्रत्येक वेळी काय...!!
Submitted by आंबट गोड on 22 November, 2019 - 11:27>>
श्यामची आई पुस्तकात अशा प्रकारची वाक्यरचना आहे.
उंच माझा झोका इफेक्ट-
उंच माझा झोका इफेक्ट- पार्श्वसंगीत आणि हो...
गोपिकाबाई यांना दिवस गेले
गोपिकाबाई यांना दिवस गेले आहेत
अनेक सवाष्णींना लाल साड्या
अनेक सवाष्णींना लाल साड्या देतात हे मठ्ठ शिरेलीवाले.उंच माझा झोका मध्ये पण लाल साडी दिली होती स्पृहाला
आलवण लाल रंगाचं असल्याने
आलवण लाल रंगाचं असल्याने सवाष्णीला लाल साडी नको, असं म्हणणं आहे का तुमचं कनिका?
@प्राचीन, माझं काही म्हणणं
@प्राचीन, माझं काही म्हणणं नाही पण जुन्या काळी सवाष्ण स्त्रिया लाल साडी वापरत नसत.आलवण लाल रंगाचे असल्यामुळेच असेल. वर अनेकांनी उल्लेख केला आहे.ऐतिहासिक मालिका त्या काळानुरूप दाखवणे अपेक्षित आहे म्हणून खटकले
गोपिकाबाई यांना दिवस गेले
गोपिकाबाई यांना दिवस गेले आहेत >>>>>>>> क्काय?
नारायणराव पेशवे यांचा जन्म
नारायणराव पेशवे यांचा जन्म
नारायणराव पेशवे यांचा जन्म >
नारायणराव पेशवे यांचा जन्म >>>>>>> ओह अस आहे तर
कुठेही 'हो' वापरतात!
कुठेही 'हो' वापरतात!
अजून काय हवंय हो? अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे हो......
प्रत्येक वेळी काय...!!>>>>
कोकणातील बऱ्याच बायकांना सवय असते तशी. वाक्य संपले की हो जोडायची. आमच्या ओळखीच्या अनेक जुन्या बायकांची ही लकब मी पाहिली आहे.
म्हणजे तशी सवयच असायची हो
Pages