स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज तर रामचंद्र चक्क गीत रामायणातला प्रसंग जसाच्या तसा आख्यान म्हणून सांगत होता

कालच्या भागात माधवराव संताजीच्या सांगण्यावरून माधवराव गोपिकाबाईंच्या दालनाबाहेर पहारा करणार्या शिरप्याचा वेश घेऊन केवळ रमाबाई आणि गोपिकाबाई काय बोलतात हे ऐकायला बाहेर थांबतात,असा हा पोरकटपणा खरच माधवराव किंवा त्याकाळचे पेशवे करत असतील का?

पोरकटपणा खरच माधवराव किंवा त्याकाळचे पेशवे करत असतील का?>>खरंच काहीही दाखवत होते काल.
तिकडे तो बबड्या असह्य होतोय म्हणून हे पाहावं तर इकडे पण काहीही दाखवतायत....
सगळ्या चॅनेलवरच्या सिरियली एकजात सारख्याच !!!.

ईथले प्रतिसाद वाचून काही भाग बघण्याचा प्रयत्न केला . जाम चिड्चिड झाली . रमा खरच डोक्यात जाते . आगाउ !

ती ऋग्वेदी नेहमी "शेफ" चे रोल का करते ???
स्वानंदीची काकू , राधेची काकू , यावेळी उसाच पिठलं

पेशवांच्या सुना अशा किचनमध्ये असायच्या नेहमी????
सगळ्या सुनांनी बरोब्बर आपापल्या नवर्याला आवडतात ते पदार्थ करून घेतले आनंदी कडून .
केले तर केले , आपण खाउ घालायचे ना , सगळीकडे वाटी घेउन रमा कशाला ?

आणि पार्वती बाईसाहेब आणि सदाशिवराव भाऊ बोलत असताना (नुसतं नाही--काहीतरी रोमँटिक!) रमा कशाला तिथेच? किती अनुचित दिसतं ते? कुणी बोलेल का आपल्या सुनेसमोर असं ?

श्रीखंडासाठी चमचा नव्हता हे त्या काळानुसार योग्य वाटते. जेवताना चमचे वापरण्याची पद्धत अगदी अलीकडची आहे.
भाषेवर आणि उच्चारावर थोडी मेहनत घेतली असती तर त्या काळाचा भास थोडातरी निर्माण करता आला असता.
एक तर बहुतेक प्रमुख पात्रे कोंकणी उगमाची असल्याने नाकी उच्चार योग्य वाटले असते. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत असे उच्चार अस्तित्वात होते. उच्चारांमध्ये 'फ' चा ' व्ह' सारखा उच्चार खटकतो. फ हा पूर्ण ओष्ठ्यच पाहिजे. त्यात दातांचा वापर हा इंग्लिशच्या प्रभावामुळे होऊ लागला आहे. अनेक चुका आहेत पण ढोबळ चुका इतक्या आहेत की अशा छोट्या गोष्टींची काय पत्रास. नवऱ्याविषयी दुसऱ्याशी बोलताना ' इकडून येणं झालं' इकडून सांगणं झालं' असं म्हणत असत. 'तुम्ही' हे सर्वनाम वापरीत नसत. ' आपण' म्हणत. सामान्य बायका 'आमच्याइकडे' असा मोघम उल्लेख करीत. शंभर वर्षांपूर्वीच्या नाटकांच्या संहिता वाचल्या असत्या तरी भाषेची जुनी वळणे काहीशी कळली असती.

जशी रमा तसे माधवराव. सासू सासरे रमाला ट्रेनिंग देतात तिच्यासमोर रोमँटिक बोलून, तिचे समजायचे वय नसले तरी. पेशव्यांचे होते म्हणे बरेच सोपस्कार नैवेद्याचे वगैरे, तर असतील बायका स्वयंपाकघरात. रमा कधी मोठी होणार.

शनिवारवाड्यात तर सेवक, सेविका, दास्या ह्यांचा भरपूर राबता होता असे वाचले आहे. भरजरी शालू नेसलेल्या आणि अंगभर दागिने घालणाऱ्या गोपिकाबाई किंवा कोणत्याही पेशवीण for dat मॅटर मुदपाकखान्यात स्वयंपाक करत असतील असे अजिबात वाटतं नाही.
काही विशेष सणवार असेल तर जातीने लक्ष देत असतील पण इकडे तर सगळे रोज उठून स्वयंपाक करतानाच दाखवतायेत.... (eye rolling emoji)
सतत ते नारायणराव रडतं असतात आणि त्या रमेला त्याला शांत करायला सांगतात हा सीन आत्तापर्यंत 100 वेळेला झालाय.
पटकथालेखकास काही दुसरं सुचत नाहीय का??

झी च्या फेबु पेजवर त्या उसातील पिठलं रेसिपी सिन वर मी नुसती कमेंट टाकली कि "सिरीयल कमी आणि कुकरी शो जास्त्त आहे etc तर एका बाईने मला "गाढवाला गुळाची चव काय म्हणून रिप्लाय दिला"। माझ्या कमेंट मध्ये काय चुकलं ???

जर पेशव्यांच्या बायका स्वयंपाक करत नव्हत्या असतील (असे रमा माधव चित्रपटात म्हटले आहे की पेशव्यांच्या बायका कामं करत नाहीत कामं सांगतात)तर हे माणुसकीच्या विरुद्ध आहे असे मला वाटते कारण बाकीच्या बायकांना ढोरमेहनत(कारण तेव्हा वीजेचा शोध लागलेला नसल्याने कोणतीही साधने नव्हती)आणि पेशवे घराण्यातील सुना मात्र बसून हुकूम सोडणार. हे मनाला खटकतंय कुठेतरी

@अजनबी,झी नाही कलर्स मराठी.
एका बाईने मला "गाढवाला गुळाची चव काय म्हणून रिप्लाय दिला>>>> Angry किती उद्धट असतात लोक. तुम्ही दुर्लक्ष करा.तुमचे काही चुकले नाही

कनिका, तेव्हा राजा आणि सेवक अशी समाजामध्ये ठळक विभागणी असल्याने त्या काळी तसेच होते.
पेशवेच असं नाही शिवरायांच्या काळातही तसेच होते

, तेव्हा राजा आणि सेवक अशी समाजामध्ये ठळक विभागणी असल्याने त्या काळी तसेच होते.>>>>हे मात्र पटले.
अजून एक, आधीचे भाग बघितले का कोणी, ती रमा धावत येऊन पेशवीणबाईंच्या हातातले बोडणाच्या नैवेद्याचे ताट उडवून देते म्हणून तिला अंधारकोठडीत ठेवले होते. मला गोपिकाबाईंचे पटले.मात्र जानकीबाई मध्ये पडल्या आणि त्यांनी स्वतः चेच नुकसान करून घेतले.
असे अनेक प्रसंग आहेत. रमेने लगोरी फोडून माधवरावांच्या डोळ्याला इजा केली होती. आंघोळीशिवाय स्वयंपाक घरात घुसून तिथे अन्नाला शिवली आणि सोवळे मोडून टाकले

रमाबाई आणि माधवराव रात्री जंगलात अडकले होते. तेव्हा रमेने दूधगूळपोहे केले होते.

लेखकाची लेखणी एवढी सिद्धहस्त आहे की हिरॉईन ला जादूने त्याने व्हिलन बनवून टाकलं आहे☺ रमेला सहन करणं अशक्य होतं चाललंय

अजनबी तुम्ही कलर्स मराठी fb वर पोस्ट का नाही केलं, झी चा काय संबंध, सिरीयल कलर्स मराठीची आहे ना.

अर्थात जिने रिप्लाय दिलाय तिचे शब्द योग्य नाहीच.

रमा इनोसन्ट वाटायच्या एवजी आगावु वाटतेय पहिल्यापासुन, तरिही बथ्थड इशा पेक्षा रमेची डायलॉग डिलीव्हरी लाख पटिने चान्गलि आहे, बाकी या दालनातुन त्या दालनात हेच सगळे क्रम दिसतायत सतत, किचन पॉलिटिक्स फक्त.
नारायण रावची रडारड वर तर फिलर म्हणुनच वापरल जातय.
आनदी बाइना दागिन्याची आवड जरा जास्तच होती असा बर्‍याच पुस्त्कातल्या सन्दर्भावरुन खर अस्ल तरी इथे आवड पेक्षा हावरट असल्यासारख दाखवलय.

माफ करा चुकून झी FB पेज लिहिले, खरतर दोन्ही कलर्स आणि झी च्या पेज वर मी केमेन्ट करते पण मी खरंच कलर्सच्याच पेजवर लिहिले आहे (इथे चुकून झी लिहिले)।

कालच्या भागात अगदी सावित्रीबाई आणि पार्वतीबाई यांना सिंपथी मिळवून देण्यासाठी जरी सुन लिहिले असले तरी माझी सिंपथी कालच्या भागात मात्र गोपिकाबाई, आनंदीबाई आणि लक्ष्मीबाईंनाच हो.
एकतर पार्वतीबाईंनी एवढ अडवून धरायला नको होत,सावित्रीबाई मरणाला टेकलेल्या नव्हत्या.बर,चालताही येत नसताना उसन अवसान आणून तयार होणार्या सावित्रीबाईंना बघून हे केवळ त्या आपल्यासाठी अरत आहेत,याची जाण समंजस पार्वतीबाईंना नसावी.त्यामुळे काल गोपिकिबाईंनी जे सुनावल त्याला शंभर गुण.
आनंदीबाईंना ही शंभर गुण,बरोबरच होत त्यांच,लग्नानंतरच पहिल मोठ कार्य,ते ही पेशव्यांच्या शनिवार वाड्यात.
लक्ष्मीबाई ही जे बोलल्या ते पटल, त्या खरच नोकर नाही तर कभावी पेशवीण आहेत.
सगळ्यात डोक्यात गेल्या त्या रमाबाई, सरळ समारंभाला यायच सोडून भलतीकडेच गेल्या.
विरेन प्रधानची बायको म्हणून रुग्वेदी प्रधानला फारच महत्व दिल जात आहे.
त्यांना कितीही सहानुभूती मिळवून द्यायचा प्रयत्न काल लेखकाने केला तरीही लेखक काल चुक्याच.

हाहाहा काल गोपिकाबाई सगळ्यांना एवढं बोलल्या की नानासाहेब(च ना) वैतागून म्हणाले गोपिकाबाईंना की कार्यक्रम सुरु करताय ना Proud
मी तर साड्या आणि दागिनेच बघत असते Wink आनंदीबाईची मरून साडी आणि दागिने फारच छान. गोपिकाबाईंचा लाल सेट त्याकाळच्या मानाने फारच पुरोगामी म्हणजे तसे इमिटेशन दागिने त्याकाळी असतील का. पार्वतीबाईंना जबाबदारी समजत नाही का. थोडावेळ गेल्या असत्या तर काय बिघडलं असतं. रमा तर येडपट त्या फुलपाखराच्या मागे धावत होती. बाळ खरंच पडलं की ते बाळ नसून बाहुली होती. म्हणजे होती बाहुलीच पण मालिकेत नक्की काय झालं. सावित्रीबाई बाजूला बसून का नाही राहिल्या, काय गरज होती भाग घ्यायची. काल त्या खरंच दणकट दिसत होत्या Happy आता म्हणे रमेला राग आलाय आणि ती आईला घेऊन जाणार आहे. जा बाई एकदाची लवकर.

सावित्रीबाई बाजूला बसून का नाही राहिल्या, काय गरज होती भाग घ्यायची. >> +१११
ती रमा एवढा आगाऊपणा करत असते.. खरी मुले एवढी आगाऊ असतात का ?
आणि त्यावेळी तर किती कडक शिस्त असे.. मग हिला हिचे आईबाप एकदाही सज्जड दम भरताना दाखवत नाहीत.. मी आईवडिलां बरोबर रहाणार काय.. तो हार तसाच काढून टाकून जाणं काय.. आत्ताची आई देखील रागावली असती Lol

आयत्यावेळी धप्पकन खाली पडायला जमलं नाही तर वरवंटा पायावर पडायचा....
या भितीने बाहुली घेतली असेल..आफ्टर ऑल निर्मात्या आहेत म्हटलं ऋग्वेदीबाई Happy

अर्रर हे लक्षातच नाही आल.
बर झाल. बाहुलीच घेतली. नाहीतर पायचा सुजलेला अंगठा कसा बरा करायचा? ते सांगत बसली असती. पेशव्यांची मंडळी!

साडे आठला सोनी मराठी वर स्वराज्य जननी जिजामाता हि सीरिअल लागते .ह्या सिरीयल पेक्षा खूपच बरी आहे. कोणी पाहतय का स्वराज्य जननी जिजामाता ? या दोन्ही सिरीयल एकाच वेळी सुरु झाल्या होत्या. यात जिजाबाई च्या बालपणापासून सुरुवात झाली होती आता त्या मोठ्या होवून शिवाजींच्या जन्मापर्यंत येवून पोहचली सिरीयल . स्वामिनी च्या रमाबाई अजून लहानच आहेत.

नंतर नानासाहेब म्हणाले की वरवंट्याला बाहुलीचे कपडे घातले होते. अपशकुन झाला म्हणून गोपिकाबाई तणतण करत होत्या तेव्हा चांगलं ऐकवलं नानासाहेबांनी. ते म्हणाले कधीतरी तुमच्या तोंडातून प्रेमाचे शब्द येतात का ते बघा Proud आनंदीबाई उडी मारतात तो सीन नाही बघितला पण लक्ष वेधून घेण्यासाठी त्या असं करतात असं लक्ष्मीबाई म्हणाल्या असा प्रोमो बघितला. फारच अटेन्शन सीकर दिसतात आनंदीबाई.

बारश्या च्या वेळी वरवंट्याला कुंची आणि सोन्याची चेन घालून तो आधी गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणून पाळण्या खालून वरून फिरवतात . त्यावेळी तो ' गोपा ' असतो

Pages