स्वामिनी - कलर्स मराठीवरील नवीन मालिका

Submitted by प्राचीन on 10 September, 2019 - 05:26

कालपासून म्हणजे नऊ सप्टेंबर 2019 पासून कलर्स मराठीवर स्वामिनी ही मालिका सुरू झाली आहे. दररोज रात्री साडेआठ वाजता प्रसारणाची वेळ आहे.
पेशवाईचा इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावर रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा म्हणजे स्वामिनी मालिका .
या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्स केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.
मालिकेमध्ये गोपिकाबाईंच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर रमाच्या भूमिकेत ' सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' पर्वातील सृष्टी पगारे आणि माधवरावांच्या भूमिकेत नवोदित चिन्मय पटवर्धन ही मंडळी आहेत.
पेशवाईचा काळ आणि माफक (नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे) का होईना, तत्कालीन ऐतिहासिक घडामोडी या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळतील अशी आशा आहे. (अपेक्षा म्हणायला नको उगाच).
माबोवर ह्या निमित्ताने चर्चा होऊन काही ऐतिहासिक माहिती समोर आली तर बरंच होईल. नाहीतर आहेतच 'पिसं'..
Swamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारश्या च्या वेळी वरवंट्याला कुंची आणि सोन्याची चेन घालून तो आधी गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणून पाळण्या खालून वरून फिरवतात . त्यावेळी तो ' गोपा ' असतो>>ओह्ह हे माहिती नव्हतं.

बाप रे त्या आनंदीबाईंना एवढ भयानक दाखवतोय हा विरेन प्रधान,खरच प्रत्यक्षात आनंदीबाई तशा नसतील,तर त्यांचा आत्मा या विरेन प्रधानला कधीही माफ करणार नाही......हसणारी बाहुली.
पण हे असल आता बघण्याची तयारी ठेवावी लागेल.याच्या सिरियलमध्ये खूप निगेटिव्हिटी असते.अपवाद उंच माझा झोका.
राधा मध्ये पण खूप निगेटिव्हिटी होती,ती बघणच सोडल.
ती झीची वहिनीसाहेब पण त्याचीच होती.ती पण कहरच होती.
आता फक्त ती आगाऊ रमा मोठी कधी होते आणि मोठे रमा माधव कोण असतील याचीच उत्सुकता आहे.आवडले तर ठीक नाहीतर टाटा बाय बाय या सिरियलला.

यात सध्या 'काहीच्या काही' सुरू आहे>>>>>+++१११११११
आनंदीबाई नक्की कोणाच्या बाजूने आहेत तेच कळत नाहीये, काय दाखवायचे दिग्दर्शकाला? लक्ष्मी बाईंना तो हार मिळवून दिला, रमाबाईंना आणि स्वतः ला थालिपीठ भरवून घेतलं गोपिकाबाईंकडून

कुठला हार मिळवून दिला. माधवराव रमेला भरवत तिच्या मागे मागे फिरत असतील का. गळ्यातला हार रोज बदलायची परवानगी फक्त गोपिकाबाईंना आहे का, पार्वतीबाई आणि जानकीबाई एकच हार रोज घालतात/घालायच्या.

तेच लिहिणार होते.

सावित्रीबाई चटण्या एक्स्पर्ट दाखवल्यात. गरीब असल्याने त्याना सुगरण केलंच पाहिजे, ☺ कोंड्याचा मांडा टाईप्स

आज (की काल) मुगाचे उंडगे दाखवले. त्याचीही रेसिपि साग्रसंगीत दाखवली आणि सांगितली आनंदीबाईंनी रमेला. तिला किती समजली माहित नाही पण माधवने सगळे उंडगे संपवले. मला वाटलं हाही काहीतरी कट असेल आनंदीचा, मागच्या वर्षी माधव जिंकला होता म्हणून. खाण्याच्या अशा स्पर्धा लावणे म्हणजे लोकांच्या साधन सामग्रीचा आणि मेहेनतीचा अपव्यय नाही का वाटायचा पेशव्यांना.

स्वामिनी मालिकेनुसार,मला समजलेल्या गोष्टी:
पेशवे घराण्यातील स्त्रियांची कामे :
मुख्य कामे:
दररोज तिन्ही वेळांसाठी पक्वान्ने आणि अतिसाग्रसंगीत स्वयंपाक करणे.विहिणबाईंकडून नवे पदार्थ शिकणे.
फावल्या वेळेतील उद्योग:
कटकारस्थान, भांडणे करणे.

पेशवे घराण्यातील पुरुषांची कामे:
मुख्य कामे:
आपल्या पत्नीने दालनात आणून दिलेली पक्वान्ने चाखून अभिप्राय देणे.विहिणबाईंच्या हातच्या स्वयंपाकाचे कौतुक करून आपल्या पत्नीला ते शिकायला सांगणे.
फावल्या वेळेतील उद्योग:
प्रशासन, जनतेच्या संरक्षणासाठी योजना, युद्धाची आखणी इ.

होय, शनवार वाड्यातल्या राजस्त्रीया अगदी सामान्य बायकांसारख्या राबत असतात सैपाकघरात. आणि त्यांच्या हाताखाली एक ही मदतनिस दिसत नाही कधी ही.

तर काय. पहिल्या दिवशी श्रीमंत पेशवीणबाई म्हणाल्या की कधी वाटलं तर आम्ही जातीने स्वयंपाक करतो. मग रोजचा नैवेद्य घरातील स्त्रियांनी करायचा म्हणून ते सुरू झाले. रोज पाच पदार्थ नैवेद्यासाठी Uhoh न्याहारीचा नैवेद्य Uhoh (त्यादिवशी न्याहारीसाठी खीर पुरी,शिरा आणि अजून दोन तीन पदार्थ केले होते आता विसरले)आता तर रोजचा स्वयंपाक सुरू आहे.मदतनीस नाहीच.कधीतरी गोपिकाबाई सावित्रीबाईंंच्या हाताखाली काम करत आहेत असे वाटते

Biggrin कुकरी शो च झालाय हा..
पेशवेकाल म्हणजे आपण जेवणात चटणी-लोणच ताटाला लावतो तसा दाखवतात. पेशवेकाळ असुन ना कधी लढाया. ना तालिमी. ना दरबार.
अरे तलवारी तरी दाखवा पेशव्यांच्या कंबरेला. Uhoh तेही नाही.
जेव्हा बघाव तेव्हा तेच गुळपीठ दाखवतात.. Angry

अरे तलवारी तरी दाखवा पेशव्यांच्या कंबरेला. Uhoh तेही नाही.
जेव्हा बघाव तेव्हा तेच गुळपीठ दाखवतात.. Angry

अगदी अगदी असेच झाले मला. ज्या कारणासाठी मालिका बघायला सुरुवात केली ते तर दुर दुर पर्यन्त कुठ्र्च दिसत नाही. घरात बनवले जाणारे पदार्थ खाण्यासाठी त्या काळी मर्द पेशवे ते ही सगळेच्या सगळे घरात उपस्थित असावेत दरवेळेला?
बरं मुद्पाकखान्यात बायका आणि स्वयंपाक दखवतात तर व्यायाम शाळेत कधितरी हे पेशवे सराव करताना नाहीच तर निदान आपल्या शिपायांना तालीम देताना तरी दाखवावेत ....
पेश्व्ह्यांच्या लढाया दखवता येत नसतिल तर शत्रूच्या हालचाली तरी दखवा. नुसतेच खलिते. ते पाहून असे वाटते की पनिपत मग सहजच जिंकले असते केवळ खलिते पाठवुन आणि सावित्रीबाईंणी लढाई जिंकल्याच्या आनंदतात एक नविन पदार्थ केला असता आणि शिकवलाही असता.
आनंदीबाईनि उडी घेतल्या पासून मी मालिका बघण्याचा धस्काच घेतलाय. माबो आहे म्हणून... नाहीतर ही दुखे कोणासोबत वाटलि असती.
गमतिचा भाग म्हणून एखद्या भागात होम मिनिस्टरचा खेळही घ्या म्हणाव. साहजिकच रमा पैठणी जिंकेल आणि पुन्हा गोपिकाबाईचे राजकारण सुरु.

रमा माधवचे प्रेम दाखवण्यासाठी काय वाट्टेल ते प्रसंग पेरणे चालू आहे. चाफाची फुलं सुकलीच नाहीत आणि माधवाने शिपायाचे सोंग घेतले. होळीला तर रमाचे पोटच भरत नव्हते. माधव काही बनवून तिला वाढतो की नाही ते नाही बघितले मी.

परवा माधवरावानी रमाबाइसाठि मेतकुट भात एका वाटित आणला होता आणी त्यातच तिच्या आइने पण खाल्ला? काय पण, ते चाफ्याच्या फुलाच कवति काने तर विट आणलाय वर सगळेच रोमॅन्टिक होताना आजुबाजुला रमा, तिचा भाउ आहे हे पण बघत नाहित.
पेशवे फारच मॉडर्न दाखवलेत बुवा.

छोट्या रमेला पाय आणि डोक धरुन टॉम&जेरी कार्टुनमधे दाखवतात तस "मोठ्ठी रमा" करुन द्यावंस वाटतंय.
आताची जाम डोक्यात जाते राव.

मालिका सुरू होताना प्रमोशन च्या वेळीच बहुतेक हे सांगितलेलं कि आत्तापर्यंत पेशव्यांच्या लढाया, राजकारणातील मुत्सद्देगिरी बद्दल लिहीलं गेलय, दाखवलं गेलय पण ह्या मालिकेत घरातलं बायकांचे राजकारण दाखवणार त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत त्यावर अधीक भर देणार आहेत, असं वाचलं होतं कुठेतरी

तर काय. पहिल्या दिवशी श्रीमंत पेशवीणबाई म्हणाल्या की कधी वाटलं तर आम्ही जातीने स्वयंपाक करतो. मग रोजचा नैवेद्य घरातील स्त्रियांनी करायचा म्हणून ते सुरू झाले. रोज पाच पदार्थ नैवेद्यासाठी Uhoh न्याहारीचा नैवेद्य Uhoh (त्यादिवशी न्याहारीसाठी खीर पुरी,शिरा आणि अजून दोन तीन पदार्थ केले होते आता विसरले)आता तर रोजचा स्वयंपाक सुरू आहे.मदतनीस नाहीच.कधीतरी गोपिकाबाई सावित्रीबाईंंच्या हाताखाली काम करत आहेत असे वाटते>>>>>>>> बाकी ह्या बद्दल अगदी अगदी!

पेशवे फारच मॉडर्न दाखवलेत बुवा... Happy
तर काय..प्रत्येकाची स्वतंत्र रोमँटीक - प्रेमदृष्ये दाखवितात.....

आनंदी बाई किती छान आहे दिसायला !
ही रमा मात्र डोक्यात जाते..आगाव, भोचक कार्टी!

पण ह्या मालिकेत घरातलं बायकांचे राजकारण दाखवणार त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत त्यावर अधीक भर देणार आहेत.....@धनुडी......खर आहे.
"चलीभोवतीच राजकारण"अस प्रमोशन केल होत.
आत्ता ही रमा छोटी आहे तर असा बिनडोकपणा दाखवत आहेत.ही मोठी झाल्यावर एखादा काल्पनिक ट्रँगल नाही दाखवला म्हणजे मिळवल.
काल रमा माधवरावांच्या अभ्यासात व्यत्यय आणते हे इतक चीड आणणार होत.त्या काळी लहान वयात लग्न झालेली ,अल्लड अशी रमा एकटीच नव्हती तर त्या काळी सगळ्याच मुलींची लग्न लवकर होत असत.
आणि पेशव्यांच्या शनिवार वाड्यात असा उद्दामपणा करण्याची हिंमत कुठल्याही मुलीमध्ये अथवा सूनेमध्ये नसेल.
रमाबाई या अशा खरच बेजबाबदार असतील,नाही वाटत.
यातून लेखकाला आणि दिग्दर्शकाला रमेचा कोणता निरागसपणा दाखवायचा आहे काय माहित?

वरच्या सगळ्या पोस्टशी सहमत.
कितीही नाही बघायचे ठरवले तरी साड्या, शालूशेले, दागिने आणि पदार्थ बघायच्या निमित्ताने 2-3 मिनिटे तरी बघायचा मोह आवरत नाही मला. तुरीचे मुटके म्हणे.आनंदीबाई आणि रमाबाई दोघीच कशा होत्या मुदपाकखान्यात?कुठली वेळ होती ती?तुरीच्या डाळीबरोबर काजू बदाम घातले.आणखी काहीबाही घालत होत्या पण ते नाही बघितले.
चमत्कारांवर चमत्कार सुरू आहेत. ते फुलपाखरू गायब झाले ना आता.बाळ नारायण पण रडत नाही वाटतं. तर आता हे चाफ्याच्या फुलांचे दाखवत आहेत.काहीतरी मूर्खपणा नुसता Angry
आणि अजून एक खूप खटकणारी गोष्ट:
रमाचे आई,वडील, भाऊ,सख्खीचुलत बहीण हे सगळेजण कायमस्वरूपी रमाच्या सासरी पडीक असतात. त्या काळात हे कोणत्याही प्रकारे शक्यच नाहीये. काय दाखवतात हे लोक!!

आणि काय तो रोमान्स.गुलाबाची फुले काय. चारचौघात जिलब्या भरवणे Sad रंग खेळणे काय. प्रत्येक जोडप्याला रमासमोर रोमँटिक होताना दाखवतात. हे सगळे खूप चीड आणणारे आहे.

"रमेच चुकल,रमेने हे केल,रमेने ते केल"हे ऐकून आता कंटाळा यायला लागला आहे.
यांना मोठ्या रमेसाठी कोणी सापडत नसाव बहुतेक,म्हणून त्या छोत्या रमेवर निभावत आहेत.
आता उरलेला आठवडा परत रमेच कौतुक आणि गोपिकाबाईंची धुसफूस.
त्यातल्या त्यात मला तो रामचंन्द्र आणि ती गंगाताई आवडते.

Pages