हास्य लहरी - क्लीन चिट - चैतन्य रासकर

Submitted by चैतन्य रासकर on 8 September, 2019 - 08:30

"आय चिटेड ऑन निखिल" केतकी म्हणाली.
"व्हॉट?"
"आर यू मॅड??"
"सॉरी..."
"सॉरी काय? अगं तुझ्या लग्नाला दोनच आठवडे राहिलेत" मेघा केतकीवर ओरडली.
हे ऐकून नंदन सटकन शिंकला!! शिंकेचे कण असे भोवताली विसावले, वातावरण शिंकामय झालं.
"शी.. का?" मेघा नंदनवर ओरडली.
"सॉरी... काही शॉकिंग ऐकलं की मला शिंका येतात" नंदन नाक पुसत म्हणाला.
"तुझ्या शिंकासुद्धा शॉकिंग आहेत" मेघा नंदनला रुमाल देत म्हणाली.
हे सगळं बघत, केतकी डिश मधल्या सॉसमध्ये बोट घालून, विचार करू लागली.

आता तुम्ही विचार करा.
एखाद्या बरोबर रिलेशनमध्ये असताना तुम्ही कधी चिट केलंय?
कोणाला कधी फसवलं आहेत? कळत नकळत? हो? नाही? आठवत नाही? का सांगायचं नाही?

पण तुम्ही काय कराल?
जर तुमच्या बेस्ट फ्रेंडने लग्नाआधीच त्याच्या होणाऱ्या पार्टनरला चिट केलं म्हणजे फसवलं, असं काही कांड केलं? तर तुम्ही यावर काय स्टॅन्ड घेणार? यावर सरल मोरल स्टॅन्ड घेणार? का फक्त बायस्टॅण्डर होणार? म्हणजे घरी जाऊन स्टॅन्ड घेणार? का स्टॅन्ड घेऊन घरी जाणार?
कारण कसं असतं, स्टॅन्ड घेणं हे डब्यातला शेवटचा लाडू घेण्यासारखं असतं, घ्यावा की नाही? असा प्रश्न पडतोच.

"चिट केलंस म्हणजे? काय काय केलंस?" चावट नंदन यांनी आबंट प्रश्न विचारला.
"नका ना विचारू प्लिज.. आय कान्ट से" केतकीने प्रश्नाला वाचा फोडली.
चिट केलं म्हणजे काय केलं? कुठे केलं? का केलं? कधी केलं? आपल्याला काय करायचंय? एवढे डिटेल्स केतकी कधी कोणाला सांगणार नव्हती किंवा हे तिला सांगता येणार नव्हतं, म्हणून मेघा लगेच म्हणाली "हे बघा.. इथे इरॉटिक नको, प्रॅगमॅटिक राहू"
"पण तू असं का केलंस?" नंदनने विचारले.
"सॉरी ना... आय वॉज... ड्रंक" केतकी म्हणाली.

मेघा, केतकी अन नंदन.
हे तिघे कॉलेजपासूनचे बेस्टीज. ते असतात ना आपले ते, एकमेकांच्या प्रत्येक पोस्ट्स लाईक्स करणारे, बर्थडेला बारा वाजता केक घेऊन जाणारे, चहाचा कप शेअर करणारे , मिळून मिसळून दुसऱ्यांना नावं ठेवणारे, एकाच सेल्फी मध्ये मावणारे, एकमेकांचे फोटो काढणारे. येकदम टिकाऊ मैत्री.

"खूप गिल्टी वाटतंय" केतकी टिशू पेपरने डोळे पुसत म्हणाली "आता काय करू?"
अपराधी वाटणं म्हणजे मोबाईल मधल्या त्या एका फोटोला डिलीट करावं का फ्रेम करावी? हे न कळणं.
"आता झालं गेलं विसरून जा, गिल्ट निघून जाईल" नंदन म्हणाला.
"अरे ती काय सर्दी आहे का? दोन दिवसांनी निघून जायला?" मेघा भडकली.
"मग काय करणार?"
"तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला, हे सगळं खरं सांगून टाक" मेघाने उपाय सुचवला.
"निखिलला कसं सांगू? आमच्या लग्नाचा व्हेनू मेनू पण ठरलाय" केतकी म्हणाली
"मेनू ठरवून काय करते? इथे लग्नच जेन्यूयन नाही ना"
केतकी प्रोटेस्ट स्वरात म्हणाली "बट आय लव्ह निखिल"

ते जे असतं ना आपलं ते.. काय ते.. एकदाच होतं, मग परत होतच नाही, त्यात झोप येत नाही, कविता होतात. ते काय ते खूप वेळा झाल्यावर, निखिलने केतकीला एका बोटीवर, बोटात अंगठी घालून, बोटावर मोजण्याइतक्या लोकांसमोर प्रपोज केले. केतकी हसत, रडत, खिदळत, अडखळत प्रोपोजलला 'हो' म्हणाली. त्यांच्या प्रेमाची नैया बोटीवरच पार झाली, मग याच बोटीवर, रोटी बरोबर बोटी कबाबची फार मोठी पार्टी झाली. मग, केतकी आणि निखिल लग्न करून, एकमेकांचे 'लीगल लव्हर' होणार होते, पण त्यांचं प्रेम फार वरवरचं निघालं. पण कुठे माशी चिटली अन केतकीने निखिलला लग्नाआधीच चिट केलं.

म्हणून म्हणतो.. प्रेम नेहमी मंद आचेवरचं तळावं, नाहीतर गोष्टी करपतात.

केतकीचं असं वागणं मेघाला अजिबात आवडलं नाही, कारण मेघा "भारतीय संस्कार अपग्रेड करावेत का आणि अपग्रेड केलेले संस्कार भारतीय असावेत का?" या विषयावर ती पीएचडी करत होती, त्यामुळे तिने केतकीला झापायला सुरुवात केली.

"घट्ट होण्याआधीच नात्याला तडा गेला गं" असा मेघाचा कडक डायलॉग ऐकून केतकीच्या डोळ्यांच्या कडा अजूनच ओल्या झाल्या.
नात्याला तडा? इथे भगदाड पडलं होतं.
"जाऊ दे आता... या वयात असं होतं" सत्तावीस वर्षाचा नंदन केतकीला थोपटत म्हणाला.
"या वयात नाही, हे वयात आल्यावर होतं" रागात असलेली मेघा बोलली, यावर केतकी काही म्हणाली नाही, ती खिन्न मन घेऊन सुन्नपण समोर बघू लागली, तिच्या समोर वयात अन प्रणयात आलेली काही द्वाड मुलं मुली नाचत होती, हे तिघे 'पुढचं पाऊल' नावाच्या पबमध्ये बसले होते, हो मालिका संपली, मग त्याच नावाने पब काढला, असं काही नाहीये!! मला ते पबचं इंग्रजी नाव वाचता आलं नाही. म्हणून मीच स्वतःहून नाव ठेवलं, तर या पबचा फाजील डीजे किंवा डीजे फाजील, आजच येरवड्यातून पळून आला असावा, कारण तो फारच आनंदी होता, लय हूल देऊन, उड्या मारत, ग्लासफोड गाणी बडवत होता.
तुम्ही कधी दुःखी डीजे बघितलाय?
दोन दिवस झालं, घरात पाणी, लाईट नाही. लाईफला लै शॉट ऐत. असं असताना "आज मेरे पास सरगम नही, सिर्फ गम है" असं म्हणत सॅड गाणी लावून, साद घालणारा दुःखी डीजे कधी बघितलाय? सगळी दुःख हेडफोन मागे लपवून, लोकांना नाचायला लावायचं, आनंदी राहायचं. अवघड काम ए, हॅशटॅग रिस्पेक्ट.

बरं या पबच्या डान्स फ्लोअरचा जनरल डबा झाला होता, कारण जनरल तिथं काहीही सुरु होतं. एवढी गर्दी होती की, कॉमनसेन्सला जागा नव्हती. काहीजण ताल, तर काहीजण ग्लास तर काही एकमेकां धरून, ढकलत, उड्या मारत, लोळत होते, आपल्या इकडे ना, दोन प्रकारचे लोक असतात, लोळणारे अन लोळून झालेले.

तर अशा या रम्य जागी, केतकीने चीटिंगवरची मीटिंग बोलावली होती.

"तू कोणाबरोबर चिट केलंस" नंदनने विचारलं
केतकीने नजर खाली झुकवली, तिला काय, कसं सांगावे हे कळेना.
"अगं सांग ना.." मेघा खेकसली, तशी केतकी दचकली अन पुटपुटली "आय डोन्ट नो...."
"ह्या?"
"आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो" केतकी म्हणाली.
"पहिल्यांदा भेटलात?"
"हो"
"चिट पण केलं?"
"हो.."
हाच का तो प्यार? जो किया नही, हो जाता है. आमच्यावेळी पहिल्या भेटीत मुलगी पसंत करायचे. मग बाकीचे प्रकार व्हायचे. हे आता रिव्हर्स चाललंय. समाज पुढे गेला का मागे? का इथेच थांबलाय? त्यातच या डान्स फ्लोअरला एक शाळेतली मुलगी पाठीवर दप्तर घेऊन नाचत होती. परीक्षा संपली असेल, रिजल्ट लागला असेल, तिला एन्जॉय करावंसं वाटेल, आपल्याला काय करायचं? लहान मुलांना किती टेंशन असतं माहितेय?

बबडे... समंदर पहायले,
जाऊ ना पोहायले
डाल्फिन... तुले बघून (तीन वेळा)
उड्या मारून ऱ्हायले
हे गाणं ऐकून डॉल्फिन बुडून मरतील, पण या गाण्याने जर लोकांचा जगण्याचा उत्साह वाढत असेल तर? आपण कोण अडवणारे? त्या शाळकरी मुलीकडे बघत, आपल्या मेघा बाई म्हणाल्या "ही बघा आजकालची तरुण पिढी (इथे पॉज) कसं होणार आहे या देशाचं?"

हे वाक्य देशाने नाहीतर पण तिथल्या वेटरने ऐकलं, तो या तिघांजवळ येऊन म्हणाला "डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स?"
"झुरळ"
"चीझ या बटर के साथ?" वेटरने विचारले.
"दादा अहो इथे... टेबलखाली खूप झुरळ आहेत" मेघा वैतागून वेटरला म्हणाली.
नंदन टेबलखाली बघू लागला.
"झुरळ मारा ना? प्लिज?" मेघा वेटरला म्हणाली.
वेटर येडाच झाला, एवढी वर्ष त्या वेटरने कोंबड्या अन मासे मारले होते. एकदा कधीतरी बदक पण मारलं होतं. आज झुरळ मारणार?
"झुरल मतलब?" हिंदी वेटरने विचारले.
"वो होता हैं ना.. ऐसा रेड कलर का.. उसको दो मिशी होता हैं" नंदनने झुरळ एक्सप्लेन केला.
"झुरळाला मिशी नसते"
"हे बघ, आमच्या घरातल्या झुरळांना मिशा आहेत" नंदन म्हणाला.
"मग ते झुरळ नसतील" मेघा म्हणाली.
"ए तू आमच्या झुरळांना का नाव ठेवते?"
केतकी दोघांना थांबवत म्हणाली "गायीज प्लिज.. भांडू नका"
मेघा वेटरकडे बघत म्हणाली "ये नीचे बहुत कॉकरोच है, आप प्लिज मारीये"
"कॉकरोच कैसे मारे?"
"बेगॉन से"
"बेगॉन डास मारायला असतं" नंदन पटकन म्हणाला.
"बेगॉनने झुरळपण मरतील ना?" मेघा म्हणाली.
"तुमच्या घरातले मरत असतील" नंदनने वचपा काढला.
"मै कुछ करता हूँ" असं म्हणत, वेटर तिथून सटकला, झालं आता, आता काही वेळाने कोणाला तरी तुपातलं बॉयलर झुरल आळणी फ्राय मिळेल, सांगता येत नाही, कारण समाज खूप फूडी होतोय.

"निखिलला सगळं सांग, त्याची माफ माग.." मेघा म्हणाली
केतकी माफी मागणार? तिला ते शिकवावं लागेल, केतकी सॉरी ओरडून म्हणायची.
"प्लिज तुम्ही निखिलला यातलं काही बोलू नका" केतकी म्हणाली.
"मी तर अबोलच आहे" असं म्हणत नंदनने खिशातून बिडी काढली, हो बिडीच. केतकी त्या पुढ्यातल्या बिडीकडे बोट दाखवत म्हणाली "व्हॉट इज इट?"
नंदन काही म्हणणार तेवढ्यात मेघाने नंदनच्या हातातून, बिडी हिसकावत खेकसली "काय ए?"
"ओवा" नंदन म्हणाला.
"काय?"
"ओव्याची बिडी ए"
"ओवा काय फुकतोस?"
"अगं ओवा गळ्याला चांगला ना" नंदन म्हणाला.
केतकी तिच्या स्वतः च्या गळ्यावरून हात फिरवत म्हणाली "गळ्याची स्किन रफ झालीय, याने स्मूथ होईल?"
हे ऐकून त्या बिडीलाच धक्का बसला, मेघाच्या हातातली बिडी आपोआप खाली पडली.
"अगं.. गळ्याला आतून आराम मिळतो"
मेघा ती बिडी नाकाजवळ घेत म्हणाली "हा ओव्याचा वास नाहीये"
"ओह हॅलो, ओव्याला वास येतच नाही" नंदन म्हणाला.
"कसं काय?"
"ओवा ओडरलेस असतो" नंदन म्हणाला
"ब्रेनलेस माणसा, ओव्याला ओडर असतो"
नंदन मेघाला बोट दाखवत म्हणाला "एकतर तू ओडर वरून ओरडू नकोस"
"मग बिड्या काय फुकतोस.. घरी जाऊन धुरी घे ना" मेघना म्हणाली
"व्हॉट इस धिस धुरी" केतकीने विचारले.

तसं मेघा अन नंदनने स्लो मोशन मध्ये केतकीकडे बघितले, केतकीला धुरीबद्दल पुरी माहिती नव्हती, कारण तिचे दिवस फार श्रीमंतीत गेले, स्वतःच्या नावाच्या पुढे ती श्री लावायची. श्री फॉर श्रीमंतीन, असं तिला वाटायचं. त्यात तिने, पोटाला चिमटा काढून डायट केलं, एवढं डाएट झालं की, मग चिमटे काढायला जागाच उरली नाही. केतकीचं सगळं आयुष्य एकाच जागेवर म्हणजे चार्जिंग पॉईंट खाली गेलं, तिची सगळीच कामं एका जागी बसून नाहीतर रुसून बसून होतं असतं. तिच्या घरातली चार बाय आठची खोली, फक्त चपला ठेवायला होती.

तुमचं नाव कधी पेपरला आलय? पण केतकीच्या आई वडिलांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले होतं. केतकीचा होणारा नवरा, शॉर्ट मध्ये फियॉन्से सुद्धा निखिल सुद्धा सोन्याचा चमचा तोंडात, हातात, पायात आणि काखेत घेऊन जन्माला आला होता, कारण त्याच्या वडिलांचा भांड्यांचा कारखाना होता. त्यांच्या भांडीच्या दुकानाचं नाव 'भांडीज' असं नाव होतं, पण निखिलने 'ज' चा 'ज्ञ' केला, मग 'भांडीज्ञ' असं नाव झालं, बरं झालं 'ज' चा 'ल' नाही किंवा 'भ' चा 'म' नाही केला.

नंदन बिडी खिश्यात ठेवत म्हणाला "धुरी घेताना आधी तवा गरम करायचा, मग त्यावर ओवा टाकायचा, मग थोडी खडीसाखर टाकायची.."
"धुरीत खडीसाखर? हा कुठला धुराळा ए?" मेघाताई म्हणाल्या.
"हे बघ.. आमच्याकडे असंच करतात" दॅट्स व्हॉट शी सेड.
"धुरीचं जाऊ दे.. तू शेण कोणाबरोबर खाल्लस?" मेघाने केतकीला विचारले.
"शेण? व्हाय डू आय ईट शेण? " केतकी पटकन म्हणाली.
"म्हणजे हा गेम कधी केलास?" चौकशी समितीचे अध्यक्ष नंदन यांनी विचारलं
"गेम??"
"म्हणजे.. एकमेकांना कधी घेतलंत?" नंदन फारच सट्ल होता.
"कधी घेतलंत?"
"म्हणजे.. हे ते मिलन कधी झालं?"
"मागच्या वीकएंडला" केतकी पुटपुटली.
"तू आम्हाला नाही बोलवलंस?" नंदनने विचारलं.
"काय? कशाला? मिलन बघायला?"
"मी तुम्हा दोघांना बोलावलं होतं, पण यू वेअर बिझी" केतकी मोबाईलकडे बघत म्हणाली.
"एक मिनिट.. त्या दिवशी तू तुझी डावी भुवई बारीक करायला पार्लरला जाऊ म्हणालीस" मेघा स्वतः ची उजवी भुवई उंचावत म्हणाली.
"हो.. पण तू आली नाहीस" केतकी पटकन म्हणाली.
नंदन केतकीच्या भुवया बघत म्हणाला "डावी भुवई का उजवी?"
"ए उजवीपण जाड झालीय?" केतकीने विचारलं.
भुवया कधी पासून जाड व्हायला लागल्या? भुवया बारीक करायला काय करावं? रोज सकाळी, कपाळावर आठ्या पाडून बसावं का?
"फ्री मध्ये भुवया बारीक करून दिल्या असत्या" नंदन म्हणाला.
बाप रे किती ही मैत्री!!
"तुला थ्रेडींग येतं?" केतकीने विचारलं
"येस्स.. फक्त दोरा दे, आता करून देतो" नंदन म्हणाला.
"शट अप, तुम्ही असं उघड्यावर थ्रेडींग करणार?" मेघा म्हणाली.
मेघाला या भुईवर भुवया पाडून द्यायच्या नव्हत्या.
"उघड्यावर काय? खूप नॅचरल आहे हे"
"थ्रेडींग नॅचरल आहे?" मेघा भरकटली.
"थ्रेडींग नाही.. पण केस येणं नॅचरल आहे" नंदन स्वतःच्या केसांवरुन हात फिरवत म्हणाला.
"हे जाऊ दे.. तुमच्या दोघात हे जे काही नॅचरल झालं, तेव्हा निखिल कुठे होता?" मेघाने विचारले
तसा केतकीचा आवाज खालावला "दॅट डे, निखिल भांडला माझ्याशी"
"कशावरून?"

केतकी सरसावून बसली, फाईटबद्दल सांगू लागली, "लग्नात मी माझ्या आजीची सीशेल रंगाची साडी घालणार आहे"
"हे तू आजीला विचारलंस का?"
"आजी हो म्हणाली, तिच्याकडे दोन साड्या आहेत"
"पण सीशेल कलर तुला सोसणार नाही" मेघाने बॉम्ब टाकला.
केतकीने निरागस सुरात विचारले "काआआ???"
"तुझ्या स्किन टोनला सूट होणार नाही" मेघा म्हणाली.
"थांबा, टोनवरून तणतण करू नका.." नंदन दोघींना थांबवत म्हणाला, त्याने केतकीला विचारले.
"तुमचं नेमकं कशावरून वाजलं?"
केतकी रडवलेल्या आवाजात म्हणाली "निखिल म्हणाला की लग्नात तो लुंगी घालणार आहे"
"काय?"
"लग्नात लुंगी?"
"उन्हाळ्याचे दिवस आहेत, उकडेल म्हणून" नंदन म्हणाला.
"अरे मग एसी लावा ना, लुंगी का घालायची?" मेघा म्हणाली.
"लग्न आउट डोअर, मग एसी कसे लावणार?"
"लग्न झाडाखाली करा" मेघाने उपाय सुचवला.
"मी त्याला हेच म्हणत होते.. पण तो ऐकत नव्हता" केतकी डोळे पुसत म्हणाली, "मग निखिल माझ्याशी भांडला, म्हणून मी चिडून.."
"पब मध्ये गेलीस?"
केतकीने हो म्हणून मान डोलवली.
बाप रे.. लुंगीवरून भांडण झालं. भांडणे- ए- लुंगी? ही लगेच पबला गेली, आमच्यावेळी भांडण झाल्यावर घराबाहेर जायचे, चहा प्यायला, कारण त्यावेळी पब फार लांब होते.

"कुठल्या पब मध्ये?"
"सायोनारा"
"तो पब मध्येच भेटला का?" मेघाने विचारले.
"येस्स.. वी वेअर डान्सिंग टुगेदर" केतकी म्हणाली
"मग?"
"ही ऑफरड मी अ ड्रिंक" केतकी हळूच म्हणाली.
"मग?"
"वी हॅड फ्यू ड्रिंक्स.. वी वेअर ड्रंक"
"मग?"
"आम्ही माझ्या कार मध्ये गेलो" केतकी म्हणाली.
मग दोघांनी कार मध्ये बसून पावसावर कविता केल्या.

"तुम्ही निखिलला..." केतकी एवढं म्हणाली अन त्यावर मेघा म्हणाली "आम्ही काही म्हणणार नाही, पण तू सगळं सांगायला हवंस"
तेवढ्यात पब मधले डास वाढले, त्यात केतकीने शॉर्ट्स घातले होते, तिच्या पायाला डास चावू लागले, ती ओडोमास आणायला सुद्धा विसरली होती, खाली झुरळ, वर डास, आता बास असं म्हणत तिघांनी बिल मागवले, बिल भरून तिघे पार्किंगमध्ये आले, केतकीच्या कार जवळ आले.
"काका नाही आले?"
काका म्हणजे केतकीच्या कारचे ड्रायव्हर काका.
"हो, त्यांना सर्दी झालीय" केतकी म्हणाली
ड्रायव्हरला सर्दी झाली म्हणून सुट्टी? एवढी भारी सर्दी?
पण हा गंभीर विषय आहे, विचार करा, एखाद्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी, तुम्ही कॅब बुक केली, कॅब येते, तुम्ही बघता की कॅबचा ड्रायव्हर शिंकत, खोकत, खाकरत आहे, तर तुम्ही काय करणार? त्याच कॅबने जाणार का दुसरी कॅब बुक करणार?
थोडक्यात, तुम्ही काय निवडणार?
उशीर का सर्दी?

"थँक्स गायीज" केतकी म्हणाली
"थँक्स? आपल्यात कधीपासून?"
"आजपासून.." नंदन म्हणाला.
"याचं नको ऐकूस, निखिलला सांग सगळं.. तो समजावून घेईन" मेघा म्हणाली, यावर केतकीने मान डोलावली, मेघा बाय करून तिच्या स्कुटीवर निघून गेली, तसं केतकीने नंदनकडे बघितलं, नंदन हलकेच हसला अन म्हणाला "काही सांगू नकोस"
"का?"
"निखिल चिडेल, लग्न मोडेल, घरच्यांना ताप होईल, तुझे डॅड तुझं घराबाहेर पडणं बंद करतील" नंदन ज्योतिषी म्हणाले आणि हे सगळं खरं झालं असतं, केतकीला हे माहित होतं.
नंदन तिच्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणाला "इट वॉज अ वाईल्ड नाईट, इट गॉट ओव्हर"
"येस्स..."
"बॅचलरेट पार्टी होती असं समजून, विसरून जा" नंदन त्याच्या बाईककडे जात म्हणाला.
"म्हणजे आता माझी बॅचलरेट पार्टी होणार नाही?" केतकीने विचारलं.
"तुला पाहिजे तर करू...." नंदन हसत, बाईकवर बसत म्हणाला, बाय म्हणून निघून गेला, केतकी तिच्या कार मध्ये तशीच बसून राहिली, तिने तिच्या पर्स मधून मोबाईल बाहेर काढला, व्हॉटसअपवर मेसेज पाठवला.
"आर यू ओके ना?"
"आय गेस सो" पलीकडून लगेच उत्तर आलं.
केतकीला पुढे काय बोलावं ते कळतं नव्हतं, ती फोनच्या स्क्रीनकडे बघत बसली, तेवढ्यात पलीकडून एक मेसेज आला "तू निखिलला सांगितलंस?"
"नाही" केतकीने उत्तर पाठवले.
"सांगणार आहेस?"
"माहित नाही" केतकी म्हणाली.

परत कोणी काही म्हटलं नाही, 'विचारू का नको?' असा विचार करत केतकीने मेसेज पाठवला
"तुला लग्नाला यायचंय?"
पण या मेसेजला कधी उत्तर आलचं नाही.
कारण तिने केतकीला ब्लॉक केलं होतं.

*समाप्त*
...................................................................................
चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोवरचा वाचक आणि प्रतिलिपीचा वाचक वेगळा आहे, तो सेम नाही.
एकदा काय झालं, एक जण मुद्दामून प्रतिलिपीवर नेहमी वाईट बोलून, नकारात्मक प्रतिक्रिया देत होता, मी सवांद साधण्याचा प्रयत्न केला, पण मग कंटाळलो, मग त्याला ब्लॉक केलं, आता तो काही त्रास देत नाही. असं ब्लॉक करणं माबोवर करता आलं तर बरं होईल, एवढीच ती काय इच्छा.

आता सगळ्याच सोशल मीडिया साईटसवर ब्लॉक करायची सुविधा आहे. ज्याचा खूप फायदा होतो, एवढी वर्ष मी अश्यांकडे दुर्लक्षच करत होतो, पण आता होतं नाही, म्हणून काहीतरी उपाय असावा, असं वाटतं.

ईशाचा इशू, तडजोड दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद मी आताच वरवर चाळले. दोन्हीकडे चांगले, कौतुक करणारे प्रतिसादच जास्त आहेत असं वाटतंय मला. निगेटिव्ह प्रतिक्रिया फारतर दोन-तीन आयडीने दिल्या असतील. पण आपला मुद्दा ते परतपरत सांगत असतील म्हणून तुला ते फार जालीम निगेटिव्ह वाटतंय का?
मी चूकदेखील असू शकते - कारण कोणत्या आयडीने कोणकोणत्या धाग्यावर ऋण प्रतिसाद दिलेत तेकाही मी क्रॉसवेरिफाय केलं नाही. पण तरी
> मजेशीर गोष्ट म्हणजे, या नकारात्मक प्रतिक्रिया देणारी माणसं तिचं आहेत. ते माझ्या सगळ्या कथा वाचतात, त्याला नियमित नावं ही ठेवतात. हे आयडी हा प्रकार इतर धाग्यांवर सुद्धा करतात. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून हसू का रडू असं वाटतं. > हे नक्की ना?

> एखादी कथा जर चांगली नसेल तर त्या कथेला "कथा जमली नाही, वाचवली नाही" अशा प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे, पण दुसऱ्या वेबसाईट वर त्याच सेम टू सेम कथेला, "कथा खूप आवडली किंवा कथा संपूच नये असं वाटतं होतं" अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. मग प्रश्न पडतो कोणाचं ऐकायचं? > तू म्हणाला तसं दोन्हीकडचा वाचकवर्ग वेगळा आहे. पण जर एका साईटवर ऋण प्रतिसाद सतत दिसत राहिले तर मग तिकडे लिहणं थांबवायचं <- याखेरीज दुसरा उपाय मला सुचत नाही.

पण मला तुझं लेखन वाचायचं आहे आणि माझ्या मोबाईलवर प्रतिलिपी ओपन होत नाही त्यामुळे इथे लिहणारं नसशील तर फेसबुकवर टाक - मी तुला फॉलो करेन Happy

एक सांगायचं राहिलं-

माझं सर्वसाधारण निरीक्षण असं आहे की इथला जो वाचकवर्ग आहे (काही सन्माननीय अपवाद सोडून) त्यांना ऋण स्त्रीव्यक्तिरेखाचित्रणची अजिबात सवय नाही. वाईट आई, वाईट पालक, वाईट स्त्री याबद्दल लिहलं कि ते भंजाळून जातात. ह्ये असं कुठं कधी असतं का ही पहिली प्रतिक्रिया असते. डिक्लाईन मोड.
स्त्रीवाद म्हणजे सगळ्या स्त्रिया छानछान गोडगोड संस्कारी प्रेमळ देव्या असतात हे एक टोक, नाहीतरमग त्या अगतिक गरिबबिचार्या तडजोड करत कसेबसे जगणाऱ्या असतात हे दुसरं टोक. या दोनच प्रकारच्या साच्यातल्या स्त्रिया इथे चालतात.

तडजोड मधली स्त्री वेगळी आहे, ती इथे सहज एक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे त्या धाग्यावरच्या ऋण प्रतिक्रिया मनावर घ्यायची अजिबात गरज नाही. तू तिची गोष्ट लिहून साचा मोडला आहे, ऋण प्रतिसाद येणारच.

ॲमी, मी इथे लेखन करणार नाही, असा टोकाचा निर्णय घेतला नाहीये, मला मायबोली खूप आवडतं, मी इथे लिहीतच राहीन.
शॉर्ट अँड स्वीट एवढाच मुद्दा आहे की, काही लोकांचा कंटाळा आलाय, त्यांना इथे ब्लॉक करायची सुविधा असावी असं वाटतं

तडजोड कथेबद्दल मत बरोबर वाटतं, या कथेला नकारात्मक प्रतिक्रिया येतील असा अंदाज होताच.

चैतन्य तुम्हाला प्रतिक्रियांचे अकाउंटिंग का करावेसे वाटते?

100 मधल्या 90 जणांना आवडणे एवढा हिट रेशो तर man booker आणि pulitzer विनर पुस्तकांचा सुद्धा नसतो. ह्या विनर पुस्तकांचे वाभाडे काढणारे लोक लाखात असतील.

समजा ह्या सगळ्या प्रतिक्रिया पत्र रूपाने तुमच्या घरी आल्या असत्या तर तुम्ही निगेटिव्ह प्रतिक्रिया देणार्‍या पत्रांचे काय केले असते? Trash केल्या असत्या की पोस्टात जाऊन ह्या ह्या लोकानी पाठवलेली पत्रे मला पुढे पाठवू नका असे म्हणाला असता?

मुद्दाम सतत विनाकारण निगेटिव्ह प्रतिक्रिया देतात अशी तुमची तक्रार असेल तर त्यावर कुठल्याच पब्लिक फोरम वर न लिहिणे एवढा एकच उपाय आहे.
किती जणांना ब्लॉक करणार तुम्ही? त्यापेक्षा पॉझिटिव्ह आणि जालिम निगेटिव्ह दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया एकाच चष्म्यातून तटस्थपणे बघणे जास्त सोपे आहे.

@हायझेनबर्ग
तुमचा मुद्दा बरोबर आहे, मला पटला. कदाचित या नकारत्मक प्रतिक्रियांना सामोरं जाण्यासाठी मी कमी पडत असेल, असं वाटतं.
कोणत्याही प्रतिक्रियेला सामोरं जाण्यासाठी विवेक बुद्धी मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

मी तरी तुमच्या कथांवर मुद्दाम निगेटिव्ह प्रतिसाद देत नाही. In fact, ही सोडून तुमच्या दुसऱ्या कुठल्या कथेवर निगेटिव्ह प्रतिसाद दिल्याचं माझ्या तरी लक्षात नाही. एखादेवेळी दिलाही असेल. पण ते ठरवून मात्र नक्की नाही.
मुद्दा असा की कृपया जनरलाइज करू नका.

सामान्यीकरण करणार नाही.
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची मी वाट बघत असतो, पण असे काही आयडी आहेत, ज्यांच्या प्रतिक्रियांना दुर्लक्ष करावंसं वाटतं, जे मला बऱ्याच वेळा जमत नाही.

> मी इथे लेखन करणार नाही, असा टोकाचा निर्णय घेतला नाहीये, > नाही. मीच तो उपाय सुचवत होते. तुलाच अस नाही इनजनरलंच. जर सतत ऋण प्रतिसाद येत असतील तर लेखक आणि त्या ठराविक फोरमवरचा वाचक कम्पॅटीबल नाहीयत असा निष्कर्ष निघतो. मग प्रतिसादकडे दुर्लक्ष करून लिहित राहणं किंवा कम्पॅटीबल वाचक असलेला फोरम शोधणे हे दोनच पर्याय राहतात.

> मला मायबोली खूप आवडतं, मी इथे लिहीतच राहीन. > गुड! Happy

हाबच्या प्रतिसादशीदेखील सहमत आहे. काय देदणादण शिव्या घालत असतात पुस्तकांना, मालिकेला, सिनेमांना.... HIMYM च्या फेसबुक पेजवरतर अजूनही, नवीन पोस्ट आली की कमीतकमी एकतरी मनुष्य वाईट फिनालेबद्दल बोलतोच. ती लेखकद्वयी काही बोलत नाही कोणाला; इतकी वर्ष प्रेमाने आम्हाला साथ दिलीत त्याबद्दल आभार एवढंच म्हणतात. अर्थात त्यासगळ्यात पैसा, मानमरताब, पुरस्कार वगैरे आहेत म्हणा.
इथे तसंकाही नाहीय; सगळाच फुकटफाकट मामला. त्यामुळे लेखक-वाचक दोघांना आनंद, शिकायला काही नवीन मिळतंय का हाच एक मुद्दा राहतो मग...

एनिवे लय प्रवचन झालं...
मला नाही वाटत इथे कोणी ठरवून तुला टार्गेट करतंय. पण ब्लॉक पर्याय मिळेल असं वाटत नाही. मी फारशी फेवरमधेदेखील नाही त्याच्या, 'इथे'....

मग मी ईशाचा इशू ही कथा प्रतिलिपी वर प्रकाशित केली, या कथेला साधारण नऊ हजार वाचक लाभले, >>> हायला ९०००!! अबबबब!!!
(आधी वाचतांना हे सुटून गेलं होतं)
काय आहे प्रतिलिपी ? म्हणजे मायबोली, मिसळपाव सारखी साईट असेल ना? एवढे वाचक कसे काय आहेत त्यांच्याकडे?

माफ करा स्पष्ट लिहितेय, पण तुम्ही ज्या दोन कथांचा उल्लेख केलाय, जिथे तुम्हाला जालीम निगेटिव्ह प्रतिसाद आलेत, ते निगेटिव्ह नव्हेत तर जेन्यून प्रतिसाद वाटलेत, आणि त्यांची संख्याही १० टक्के असेल.
जर ते निगेटिव्ह प्रतिसाद वाटत असतील, तर 'बेसिक्समेइच कूच लोचा है.'
सेकंड, तुमच्या पाठीमागे तरी एखादा आय डी हात धुवून लागला, असं मलातरी वाटत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे मधुरा, अज्ञातवासी आणि शालींच्या मागे लागलेला एक आयडी.
तीन - जेव्हा प्रचंड पोजिटिव्ह प्रतिसादाची सवय लागते, तेव्हा एखादा निगेटिव्ह प्रतिसाद काट्यांसारखा तोचतो. आणि इथे तर सुरुवातच माझ्या निगेटिव्ह प्रतिसादाने झाली, आणि बऱ्याच लोकांनी तसाच प्रतिसाद दिल्याने गैरसमज होणं साहजिक आहे, कारण तुमच्या एका सिरीजवर फक्त आणि फक्त पोजिटिव्ह प्रतिसाद आलेत. किंबहुना ओलमोस्ट 90% लेखनावर, त्यामुळे ह्याही लेखनावर तसेच प्रतिसाद यावेत, अशीच तुमची अपेक्षा असणार.
चार - आय डी ब्लॉकिंगची सुविधा खरंच असावी, खूप ताण वाचेल.
पाच - प्रतिलिपी आणि मायबोलीवरचा एक फरक म्हणजे, प्रतिलिपीपेक्षा मायबोलीचा वाचक + प्रतिसादक मला जास्त प्रगल्भ वाटतो. आणि लेखकाच्या जास्त क्लोजसुद्धा. इथेही १००० एक वाचने झालीत तरी कळणार नाही, कारण ती सिस्टीमच नाही.
सहा - फक्त एकाच धाग्यावर पोजिटिव्हपेक्षा निगेटिव्ह जास्त प्रतिसाद आहेत, म्हणून इतका त्रागा करणं मलातरी मजेशीर वाटलं. गुड. अ न्यू साईड ऑफ यू. Lol

तेव्हा ईशाचा इशू या कथेला तर फार जालीम निगेटिव्ह प्रतिक्रिया आल्या होत्या, अजूनही त्या धाग्यावर तुम्ही वाचू शकता.>>मला तरी कोणत्याही प्रतिक्रिया जालीम वाटल्या नाहीत,इथे चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येणारच हे आता तुमच्यासारख्या लेखकांना आम्ही सांगायचं म्हणजे विशेष वाटतंय, उलट या निगेटिव्ह प्रतिक्रियांमधून पोसिटीव्ह पॉईंट शोधून तुम्ही शैलीत अजून प्रगती करू शकता,
कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसतेच,मग तेच तुमच्या लिखाणाच्या बाबती होणारच,नाही आवडली तर नाहीच म्हणणार न लोक्स उगाच त्यांनी खोटं खोटं हो म्हणावं असा आग्रह करणार का?
आणि काथ्याकूट अगदी खूप खूप खूप आवडला होता,कदाचित तितक्याच उंचीचे लिखाण अपेक्षित आहे आता तुमच्याकडून,म्हणून ही तेवढी आवडली नसेल,
कधी कावठीचाफा,विशाल,दाद यांच्या पण लेखावरील प्रतिक्रिया वाचा,"कचा style नाही किंवा आजिबात जमली नाही,कैच्याकै आहे,आवडली नाही" अशा प्रतिक्रिया त्यांनाही आहेतच की,
(तुमच्या लिखाणाची कोणाशीही तुलना करायची नव्हती फक्त उदा म्हणून दिगग्ज लेखकांची नवे घेतली आहे)

>>>>Submitted by ॲमी on 13 September, 2019 - 19:47
मग मी ईशाचा इशू ही कथा प्रतिलिपी वर प्रकाशित केली, या कथेला साधारण नऊ हजार वाचक लाभले, >>> हायला ९०००!! अबबबब!!!
(आधी वाचतांना हे सुटून गेलं होतं)
काय आहे प्रतिलिपी ? म्हणजे मायबोली, मिसळपाव सारखी साईट असेल ना? एवढे वाचक कसे काय आहेत त्यांच्याकडे?<<<<<<

@ हा.ब.
प्रतिलिपी एक App आहे ..तिथे तुम्ही लिहू शकता...वाचू शकता..
माझ्या एका मित्राच्या कथेला 75000+वाचक लाभलेत...
आणि चैतन्य तिथे इथल्या पेक्षा जास्त पाॅप्युलर आहेत..

@ चैतन्य...जाऊ द्या हो..इतकं मनाला लावून घेऊ नका .
तुम्ही छान लिहता आणि तुमचं लिखाण आवडणारे खुप जण आहेत..
एक दोन आयडींच्या नकारात्मक प्रतिसादामुळे कशाला इतका त्रागा करून घ्यायचा...ज्यांना काही जमत नाही ना तेच लोक असा प्रतिसाद देतात...सो इग्नोर देम आणि माफ करून टाकायचं आपण..

बाकी जास्तच त्रास देणारे असतील तर ब्लाॅक करण्याची सुविधा हवी..ह्याला 100%अनुमोदन...

अजय भाऊ, अदू साहेब, तुमचं बरोबर आहे, पटलं. बाकी लोभ असावा. पुढच्या कथेच्या वेळेस या गोष्टी लक्षात ठेवीन, धन्यवाद Happy

प्रवचनात अजूनेक मुद्दा राहून गेला:

लेख टाकला, खासकरून मेहनत घेऊन लिहलेला लेख टाकला की काय प्रतिक्रिया येतेय याबद्दल अँगझायटी असते. आणि मग जेकाही प्रतिसाद येतील ते intense वाटू लागतात. कारण आपणच heightened emotional अवस्थेत असतो.
यावर उपाय हा की लेख टाकून झाला की साधारण दोनेक महिने तो परत उघडून बघायचा नाही. आपल्या पुढील लेखाच प्लॅनिंग चालू करायच. नंतर सावकाश, वेळ मिळेल तेव्हा प्रतिसाद वाचायचे, द्यावीशी वाटली तर उत्तरं द्यायची.

इशाचा इशु वर काय एवढे जालीम प्रतिसाद आलेत.
मी तर स्टोरीकंटेंट पण विसरलेय.
असो.
चैतन्य, मला नाही वाटत कुणी मुद्दम तुम्हाला किंवा तुमच्या कथांना टारगेट करत असेल.
कथा ९ जणांना आवडली तर एकाला ती बोरींग वाटु शकतेच.
प्रतिलीपी पेक्षा माबो आणि माबोवाचक जास्त प्रगल्भ आहेत.
आता इशाचा इशु वरचे प्रतिसाद वाचते जरा. (माझा तर नाहीये ना जालीम प्रतिसाद Happy )

@च्रप्स
कथा कशी वाटली ते जरूर सांगा

>>> माझ्या कमेन्ट मधिल imagine काढुन टाका Happy
लिहत रहा. हसवत रहा.

इशाचा इशु आणि तडजोड दोन्हींवरचे प्रतिसाद वाचले.
मला तरी जालिम वैगेरे प्रतिसाद आढळले नाहीत.
चैतन्य, तुम्हाला कुणा एका आयडीमुळे त्रास होत असावा असं मला वाटतंय. इथे किंवा दुसर्‍या साईटवरही तर दुर्लक्ष करणंच योग्य.

धन्यवाद अमी, च्रप्स आणि सस्मित, तुमचे प्रतिसाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत अन नेहमीच राहतील.
पण या विषयाचा डोक्यात निचरा झाला आहे, त्यामुळे या पुढे या विषयावर काही बोलण्यासारखं नाही. आता दुसऱ्या कथा सुद्धा लिहीत आहे, इथे नक्कीच पोस्ट करेन Happy

गूड Happy
काहीतरी रहस्यमय हॉरर लिहा.

रहस्यमय हाॅरर लिहा....+1111

तुमची आवडती जागा ही कथा माझ्या फॅवरेटलिस्ट मध्ये आहे...असचं लिहा ना काहीतरी....

Pages