चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्रावरील जमिनीचा उतार १२° पेक्षा अधिक असल्यास विक्रम सुरक्षितपणे उभे राहू शकणार नाही, कलंडेल आणि कार्यरत राहू शकणार नाही.

>>आणि जर का लँडर मधील ट्रान्मिटर/ रिसिव्हीर च जर काम करत नसतील तर प्रश्नच मिटला.<<
क्रॅश लँडिंग झाल्यामुळे हि शक्यता जास्त वाटते. पण हि शक्यता ग्राह्य धरुन बॅकपची व्यवस्था डिझाइन मध्ये असायला हवी होती. (माझा सुद्धा हातभार, मंडे मॉर्निंग क्वार्टरबॅकच्या भूमिकेतुन... Proud )

अवांतर :
जिज्ञासा - मोदिंनी काहिहि डिलिवर केलेलं नाहि हे तुम्ही लिहिलेलं वाचुन आश्चर्य वाटलं. माबोवरंच या विषयावर अनेकदा चर्चा झालेली आहे आणि गेल्या निवडणुकांपुर्वि स्कोअरकार्ड प्रसिद्ध झाल्याचं आठवतंय. इतर माध्यमांतुनहि त्यांच्या कारकिर्दिचे हिट्स अँड मिस हायलायट झालेले होते. तर ते असो...

आता झालंय काय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मोदि प्रसिद्धीलोलुप आहेत हि बाब काहिंना खटकते, काहिंना झोंबते. परंतु हा द्वेष, घृणा किंवा जी काहि भावना मनात असेल त्याची घोंगडी डोळ्यावर ओढुन मोदिंच्या चांगल्या कार्याची दखल न घेण्याएव्हढं कोतं मन असु नये, असं मला मनापासुन वाटतं. टीका जरुर करावी, पण ती उथळ असु नये. टीकेमागचा अभ्यास, कार्यकारण भाव सुस्पष्ट, तर्काला धरुन असावा; अन्यथा ती टीका लाफिंग स्टॉक होते.

असो, काँग्रेसचीच काहि नेतेमंडळी आता हेच बोलायला लागलेली आहेत, यातंच सर्व आलं...

अवांतराबद्धल क्षमस्व...

नको, उगाच मिडिया इवेंट क्रिएट करेल, आणि उदयशेठ हे शास्त्रीय बैठकित कसं बसणार नाहि हे मोदिंच्या नवलख्खा कोटच्या उदाहरणाने पटवुन देतील... Proud Light 1

खरंच, महा अडाणी प्रश्न विचारते
परत पुढच्या वेळी जो माणूस चंद्रावर जाईल त्याला बघ रे बाबा विक्रम शोध आणि बॅटरी बदल सांगता येईल का?
इतकं महागाचं छान प्रगत उगीच तिथे स्क्रॅप बनून बसेल.

हे शास्त्रीय बैठकित कसं बसणार नाहि >>> कुठे का बसेना, बसल्याशी कारण Proud

बाबा विक्रम शोध आणि बॅटरी बदल सांगता येईल का? >>> आणि सरळ करून प्रग्यानची चाली करव Biggrin . अर्धा किलोमीटर चालू शकला असता आत्ता Happy

>>>>>मला तर जाऊन विक्रमाला अलगद सरळ बसता करून यावंसं वाटतं <<<<<< ईज्रोच्या शास्त्रज्ञांना ईथे बसुन विक्रमाला सरळ बसता करता येण शक्य आहे. कारण विक्रमच्या चारीबाजुला थ्रस्टर्स लावलेले आहेत. थ्रस्टर्स फायर करुन विक्रमला ड्रोन प्रमाणे उचलु शकतात. पण त्या साठी विक्रमशी संपर्क साधणे आवश्यक आहे .

३७० नंतर मोदी विरोधाची लाट अजुन क्षीण झालेली आहे . पण नोटबंदीमुळे तोटा झालेल्यांचा मोदी द्वेष कमी होत नाहीय.

ईज्रोच्या शास्त्रज्ञांना ईथे बसुन विक्रमाला सरळ बसता करता येण शक्य आहे. कारण विक्रमच्या चारीबाजुला थ्रस्टर्स लावलेले आहेत. थ्रस्टर्स फायर करुन विक्रमला ड्रोन प्रमाणे उचलु शकतात. >>>> हो पण त्याला सद्ध्या ऐकता बोलता येत नाहिये ना! मग त्या थ्रस्टर्सना फायर कसं करणार? पण हे भारीये इकडून तसं करून त्याला उचलणं. इस्रोच्या साईटवर देतीलच नंतर शक्य असेल तर.

करता येण शक्य आहे. कारण विक्रमच्या चारीबाजुला थ्रस्टर्स लावलेले आहेत. थ्रस्टर्स फायर करुन विक्रमला ड्रोन प्रमाणे उचलु शकतात>>>

म्हणजे लँडिंग नीट झाले नाही तरी ते विक्रमला चारी पायांवर नंतर उभे करता आले असते. संपर्क तुटला तर काय याचीही सोय केली असेल काहीतरी... पण जसजसे दिवस जाताहेत तसे विक्रमचे आयुष्य कमी होणार.. फिंगर्स क्रोस्सेड.

ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा आता काही उपयोग होणार का?
रोव्हर म्हणजे काय? त्याचे कार्य काय? त्याची स्थिती सध्या काय आहे?
लँडरची स्थिती - सध्या कललेल्या अवस्थेत आहे, संपर्कात नाही. त्याचे काम काय होते?
आता लँडरशी संपर्क झालाच नाही तर या मोहिमेस इथे पूर्णविराम मिळणार असे समजावे का?
>>>

वर गजाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या अल्पमतीनुसार माहिती आहे तसे देतोय

ऑर्बिटरमध्ये काही शास्त्रीय उपकरणे आहेत जी चंद्राच्या पृष्ठभागाला स्कॅन करून त्यातील खनिजांचे प्रमाण, कॉम्पोजिशन वगैरेची माहिती गोळा करत राहतील. हे बहुतेक स्पेक्ट्रोग्राफी पद्धतीच्या उपकरणांनी करतात. तसेच ऑर्बिटरवरील उपकरणांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे नकाशे बनवण्याचेही काम होणार आहे.

लँडरचे मुख्य काम होते रोवरला चंद्रावर उतरवणे. लँडर हे एक वाहन होते. लँडरवरदेखील शास्त्रीय उपकरणे होती. अर्थात लँडर एकदा उतरला की आहे त्याच जागी पडून राहणार होता.
रोवर मात्र लँडरमधून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करणार होता. रोवरमध्ये विविध शास्त्रीय उपकरणे होती जी पृष्ठभागावरील माती/धूळ/दगड यांचे सँपल घेउन त्याचे अ‍ॅनालिसिस करणार होती.

https://www.space.com/ वेबसाईटवरील वृत्तनुसारः

This is the list of instruments on the orbiter
Terrain Mapping Camera 2 (TMC-2), which will map the lunar surface in three dimensions using two on-board cameras. A predecessor instrument called TMC flew on Chandrayaan-1.
Collimated Large Array Soft X-ray Spectrometer (CLASS), which will map the abundance of minerals on the surface. A predecessor instrument called CIXS (sometimes written as C1XS) flew on Chandrayaan-1.
Solar X-ray Monitor (XSM), which looks at emissions of solar X-rays.
Chandra's Atmospheric Composition Explorer (ChACE-2), which is a neutral mass spectrometer. A predecessor instrument called CHACE flew on Chandrayaan-1's Moon Impact Probe.
Synthetic Aperture Radar (SAR), which will map the surface in radio waves. Some of its design is based on Chandrayaan-1's MiniSAR.
Imaging Infra-Red Spectrometer (IIRS), which will measure the abundance of water/hydroxl on the surface.
Orbiter High Resolution Camera (OHRC) to examine the surface, particularly the landing site of the lander and rover.

The lander's instruments include:
Instrument for Lunar Seismic Activity (ILSA), to look for moonquakes.
Chandra's Surface Thermophysical Experiment (ChaSTE), to examine the surface's thermal properties.
Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive ionosphere and Atmosphere (RAMBHA-Langmuir Probe), to look at plasma density on the surface.

The rover will carry two science instruments to look at the composition of the surface: the Laser-Induced Breakdown Spectroscope (LIBS) and the Alpha Particle X-Ray Spectrometer (APXS).

चीनचा रोव्हर अजून फिरत असेल की चांद्रभूमीवर... त्याला म्हणावे हिंदी चिनी भाई भाई...

चिनी रोव्हर इतकी वर्षे झाली तरी अजून कसा फिरतोय? त्याला काहीतरी जेलसदृश्य दिसले असल्याची बातमी परवाच वाचली.

https://earthsky.org/space/what-has-chinas-rover-found-on-the-moons-far-...

हा चिनचा रोव्हर जानेवारीत लँड झाला.
चंद्रावरील एक दिवस म्हणजे आपले १४ दिवसरात्र आणि चंद्रावरील दिवसाचे तपमान १०० अंश से. तर रात्रीचे उणे १७३ अंश से इतके कमी असते.
जर रोव्हरला रात्रीतून जिवंत ठेवायचे असेल तर त्याचे डिझाइन विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स इतक्या कमी तपमानात सुस्थितीत राहिल असे हवे.
विक्रम, प्रज्ञान चे डिझाइन तसे नसावे म्हणुन १ चंद्र दिवसाचा - आपल्या १४ दिवसरात्रींचा- त्यांचा कार्यकाल आहे.

चीन, रशिया, आणि अमेरिका ह्यांना अनुभव आहे चंद्रभुमी चा आणि तेथील अडचणीचा .
पण ते त्यांचा अनुभव भारताशी share करणार नाहीत .
त्यांनी अनुभव share केला असता तर अजून सोप गेले असते lander शी संपर्क साधायला

आश्विनी इसरो जगभर असेलेले ट्रान्समीटर वापरून संपर्क करायचा प्रयत्न करत आहे. पण CH२L कडून रिस्पॉन्स येत नाहीये. अश्या प्रकारच्या संदेशवहन साठी अँटेना एका ठराविक दिशेला असावी लागते. त्यात चंद्र आणि पृथ्वी सतत कोन बदलतात . त्यामुळे इसरो सध्या वेगवेगळ्या जागी असलेलया सर्व ठिकाणावरून अपलिंक करतेय. त्यात देखील जर नुकसान झाले असेल तर कोन बरोबर असून देखील उत्तर येणार नाही.

बाकी आपण ज्या ठिकाणी उतरणार होतो त्या जागेचा एक्सपेरियन्स कोणालाही नाही. जसा भारतात विमान उतरविणे आणि अंटार्टिका मध्ये वेगळे आहे तसेच आहे हे. बाकी अमेरिका आणि बाकी सर्व देश मदत करतात. यात अमेरिकेचे देखील काही प्रयोग होते. तेंव्हा अमेरिका मदत करणार नाही वगैरे बालिश बडबड आहे.

धन्यवाद चिडकू. अँटेनाच्या दिशेबद्दल लक्षात आलं होतं. पण त्यातल्या ग्राफचा वगैरे अर्थ कळत नव्हता. तुम्ही म्हणता तसं त्या भागात उतरणारे आपण पहिलेच आहोत त्यामुळे calculated risks and challenges पेक्षा वेगळे unforeseen elements असू शकतात.

त्यामुळे इसरो सध्या वेगवेगळ्या जागी असलेलया सर्व ठिकाणावरून अपलिंक करतेय. >>> हो दोन ठिकाणं वाचली होती. इतरही देशांच्या स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्सची मदत घेत असतीलच. CalTech, USA च्या सिनियर ऑफिशियल्सनी इस्रोला काल भेट दिली आहे. CalTech म्हटल्यावर एका मायबोलीकराची आठवण आली Happy

त्यात देखील जर नुकसान झाले असेल तर कोन बरोबर असून देखील उत्तर येणार नाही. >>> असंही electronic म्हटल्यावर नाजुक असणारच. नुसती बॉडी intact दिसून उपयोग नाही.

खूप जुन्या न्यूजमध्ये रशियाचाही आपल्या चांद्रयान मिशनमध्ये सहभाग आहे आणि ऑर्बिटरचं मॅनेजमेंट आपलं व लँडरचं Roscosmos चं असेल असं दिलं होतं. त्यात त्यांचे २ रोव्हर असणार होते. त्या न्यूजचं काय झालं माहित नाही.

During a preliminary review, Isro scientists had also deliberated whether there were “gaps in the understanding of the lunar atmosphere” closer to its surface. Such data is not available in the public domain and the space agencies of Russia, the US and China — that have landed probes on the moon — do not share this information, the scientist said.
.
हा para इकॉनॉमिक्स टाइम्स मधला आहे 11 तारखेच्या

मला आपले असे वाटत राहते की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची चुंबकीय तीव्रता विक्रमास सोसवली नाही काय की!

(गंमतीत लिहिलेय हो, याला काही बेस नाही.)

खूप जुन्या न्यूजमध्ये रशियाचाही आपल्या चांद्रयान मिशनमध्ये सहभाग आहे >> space.com मधली बातमी

Initially, ISRO planned to partner with Russia to perform Chandrayaan-2. The two agencies signed an agreement in 2007 to launch the orbiter and lander in 2013. Russia later pulled out of the agreement, however, according to a news report from The Hindu. The Russian lander's construction was delayed after the December 2011 failure of Roscosmos' Phobos-Grunt mission to the Martian moon of Phobos, the report stated.

Russia subsequently pulled out of Chandrayaan-2 altogether, citing financial issues. Some reports stated that NASA and the European Space Agency were interested in participating, but ISRO proceeded with the mission on its own.

"Chandrayaan-2: Vikram lander went incommunicado 335 meters above lunar surface, not 2.1 km"

News from IndianExpress

2.1 km चंद्र भूमी पासून लांब असताना lander चा संपर्क तुटला नसेल हे मान्य केले तरी lander नी नियोजित मार्ग 2.1 km वर असताना च बदला.
Lander नी त्याचा नियोजित मार्ग चंद्राच्या पृष्ठभाग जवळ आल्यावर का बदलला ह्याचे काही तरी कारण असेल .
कोणत्या तरी बाह्य शक्तीच्या प्रभाव मुळे lander नी मार्ग बदलला असेल आणि त्या मुळेच land होण्याच्या अगोदरच संपर्क तुटला .
त्या साठी दक्षिण ध्रुवावर असलेलं वातावरण,किंवा magnetic फील्ड अशी काही तरी कारण असतील ती आपल्याला माहीत नसतील .
आणि त्याचा अंदाज संशोधकांना सुद्धा नसेल

Pages