चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, सिच्युएशन नं २ मंगलयानच्या वेळी घडून गेली आहे. तेव्हा अशा कोणत्याही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. पण मंगलयान मोहिमेला मिळालेली प्रसिद्धी पाहून मोदींना चांद्रयान मोहीमेच्या वेळी मोह पडला असावा.

Submitted by जिज्ञासा on 10 September, 2019 - 11:58

मंगलयानच्या वेळी मोदी इस्त्रोत हजर होते. तेव्हाही काय होणार- यश/अपयश- माहीत नव्हतं. पण पीएम मोदी इस्त्रोतच होते- बॅक इन २०१४. त्यांनी लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं मंगळ ग्रहाचा प्रोजेक्ट असल्यामुळे. बट व्हाय लेट फॅक्ट्स कम इन वे ऑफ हेट्रेड यू सी..

सनव, काही लिंक आहे का याची? मी शोधाशोध केलेली नाही. मला स्वतःला मोदी आजिबात आवडत नाहीत. There is no hatred. It's extreme dislike nothing more. त्यामुळे त्यांचं मीठ कायम अळणी आहे माझ्यासाठी. अत्यंत प्रसिद्धिलोलूप आणि उथळ माणूस आहेत ते माझ्या लेखी. Unfortunately he never disappoints me!

नजरेसमोर होत असलेल्या करोडोंच्या चोऱ्या डोळ्यांवर पट्टी बांधून दुर्लक्षित करणाऱ्या ज्ञानी माणसापेक्षा प्रसिध्दीलोलुप, उथळ पण सर्वांवर जरब बसवून सचोटीने कारभार हाकणारा सामान्य माणूस परवडला. As long as he is delivering what he has promised, who cares whether he is प्रसिद्धीलोलुप आणि उथळ...

https://www.ndtv.com/india-news/mangalyaan-in-mars-orbit-history-created...

हो, तेव्हाही मोदी तिथे हजर होते. बहुतेक तेव्हा लाईव्ह टेलेकास्ट केले नव्हते. यावेळेस करून माकडांच्या हातात कोलीत दिले गेले.

>>>>>अत्यंत प्रसिद्धिलोलूप आणि उथळ माणूस आहेत ते माझ्या लेखी.<<<<<
स्वःता नगरपालिकेत, उंदिर मारण्याच्या विभागात काम करतो हे विसरुन
" अमेरिकेची आर्थिक घडी" ह्यावर
आपल मत ठोका, पु ल देशपांडे !!! हे आठवल !!!

सनव, काही लिंक आहे का याची? मी शोधाशोध केलेली नाही. मला स्वतःला मोदी आजिबात आवडत नाहीत. >>

शोधाशोध कसली..एक गुगल सर्च द्यायचा फक्त. वर साधना व टवणे यांनी लिंक दिल्या आहेत. तेव्हाही फेल्युअरची दाट शक्यता होतिच तरीही पीएम तिथे हजर होते. मोदी आवडत नाहीत वगैरे ठीक पण factually incorrect स्टेटमेन्ट कॉन्फिडन्टली करणं टाळायला हवं Happy

स्वःता नगरपालिकेत, उंदिर मारण्याच्या विभागात काम करतो हे विसरुन
" अमेरिकेची आर्थिक घडी" ह्यावर
आपल मत ठोका, पु ल देशपांडे !!! हे आठवल !!! >> स्वतःवरून जगाची कल्पना करायला जाऊ नये. आज किती उंदीर मारले?

टण्या, सनव धन्यवाद! मी माझ्या पोस्ट मध्ये माझं मत मांडलं. आणि त्यावर मी कायम आहे. मोदींना प्रसिद्धीची जाम हौस आहे. सगळीकडे जाऊन प्रसिद्धीचा झोत आपल्यावर कसा राहील असे बघायचे. असू दे. लोकांना आवडतंय आणि दुसऱ्यांदा बहुमताने निवडून पण दिलंय. पण तरीही मी माझं अल्पमत मांडण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

सगळीकडे जाऊन प्रसिद्धीचा झोत आपल्यावर कसा राहील असे बघायचे >> गोंधळले. हे सर्व मुख्य व्यक्तींच्या बाबतीत होतं की. आपण एकुण असेच पहातो ना पडद्यावर, बातम्यात. त्यांनी न सांगताही झोत त्यांच्याकडे रहातोच की. म्हणुन तर मिडियाला आपण दोष देतो.

मलाहि कधीकधी मोदिंचं ओवरएक्स्पोजर खटकतं, पण ती त्यांची स्टाइल आहे असं समजुन सोडुन देतो. वर साधनाताईंनी म्हटल्या प्रमाणे अ‍ॅज लाँग अ‍ॅज दि मॅन डिलिवर्स, आयॅम नॉट गोइंग टु (अँड आयॅम नोबडी टु) कंप्लेन...

@जिज्ञासा- मोदींविरुद्ध मत जरुर मांडावं फक्त ते फॅक्ट्सला धरुन असावं इतकंच.

@राज - इतका लोकप्रिय (सलग दोन वेळा ३००+सीट्स) नेता असल्यामुळे ते नॅचरल आहे. मिडिया फॉलो करत राहाते. त्याला मोदी काय करणार? सोशल मिडियावर त्यांचे चाहते इतके आहेत की त्यामुळे तिथेही मोदींचाच बझ क्रिएट होत असतो. तरी ३७० च्या वेळी मोदींनी साईडलाईन्सवर राहून गृहमंत्र्याला आपलं काम करायला फ्रीडम दिला होता. स्टेट लेव्हललाही ते नाक खुपसत नाहीत.

चिडकू, तुम्ही जे पत्रक चिकटवले ते वाचून बघितले का? त्यात असे लिहिलेय की सहाव्या वेतन आयोग शिफारशी व बेसिक पगाराच्या 40 टक्केपर्यंत इतका परफॉर्मन्स बेस्ड इंसेंटिव्ह दोन्ही सुरू केल्यानंतर आधी जी इंसेंटिव्हज देत होते त्याची आवश्यकता उरली नाही. म्हणून ती बंद केली. लोकांनी शास्त्रज्ञ, संशोधक म्हणून यावे व आल्यावर टिकूनही राहावे यासाठी ती इंसेंटिव्हस सुरू केली होती.

आता जे देताहेत ते जुन्या इंसेंटिव्हसपेक्षा जास्त असावे. नाहीतर एव्हाना संप पुकारला असता की...

सुनिधी, भारतात येऊन बघ. यत्र तत्र सर्वत्र मोदी असतात कायम.. सरकारी जाहिरातीपासून गल्लीतल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या होर्डिग्ज पर्यंत जिथे तिथे मोदीच. वैताग आला आहे मला तरी. यात मोदींची काहीच चूक नाही. सगळी चूक मिडीयावाल्यांचीच आहे. Modiji is an innocent victim of media hype. बरं बोलताना काही बुद्धीला चालना देणारं बोलतील तर आजिबात नाही. सगळी इमोशनल कडबोळी.
राज, Modi government has not been able to deliver. I am glad that they are back in power because now they will have to deal with the consequences of their actions in the last term.
मोदींपेक्षा मला अमित शाह बरे वाटतात आजकाल. स्वतः कमी बोलतात आणि उगीच कॅमेरा पुढे येत नाहीत. किती काम करतात ते कळेलच पण सध्या तरी ठिक आहे.

धागा कोणत्या विषयाचा
आणि चर्चा कोणत्या विषयावर.
काही संबंध आहे का विषय आणि चर्चेचा .
काही म्हणा पण मोदी जी नी सर्वांना वेड लावले आहे

कोणतीही व्यक्ती एक पूर्ण पॅकेज असतं. गुण, अवगुण, लकबी, सवयी, ढब असं सगळं एकत्र येतं. मेड टु ऑर्डर थोडीच मिळणार आहे?

त्या व्यक्तीचे एक दोन अवगुण आपण फोकस करत बसलो तर त्यामुळे चिडचिड होणारच. गो बियाँड दॅट.

<< बरं बोलताना काही बुद्धीला चालना देणारं बोलतील तर आजिबात नाही. सगळी इमोशनल कडबोळी. >>

-------- त्यांना पण माहित आहे ते किती थापा मारतात आणि किती सत्य बोलतात... पण त्यांचा चाहता वर्ग हा वेगळा आहे. तुमच्यासारखे विचारी लोक, जे प्रत्येक वक्तव्य तपासणार, सत्य-असत्य पडताळा करणार... नाना तर्‍हेच्या शंका उपस्थित करणार हे संखेने फार अल्प आहेत. तुमच्या बोलण्यात/ विचारांत कितीही तथ्य असले तरी तुम्हाला सौम्य भाषेत मोदी-द्वेषी आणि अगदी दुसर्‍या टोकाला राष्ट्रद्रोही ठरविले जाईल.

विज्ञानाला सज्जड पुरावे हवे असतात. पण विज्ञाना बद्दल काडीमात्र प्रेम नसणारे हे सरकार आहे.
कर्ण का जन्म आणि stem cell... ( व्हिडिओ मधे 0:50)
प्लास्टिक सर्जरी आणि गणपती. दुनिया मे सबसे पहिली प्लास्टिक सर्जरी... (व्हिडिओ मधे 2:10)
https://www.youtube.com/watch?v=hZsKqVVYQ74

भारताच्या पंतप्रधान पदावर असणार्‍या व्यक्तीचे विज्ञानाप्रती असे घोर अज्ञान असेल तर त्यांच्या सहकारी मंत्र्यानी / खुषमस्कर्‍यांनी काय म्हणायचे ? Indian Science Congress Association सारख्या ठिकाणी महाभारत आणि रामायण काळात स्टेम सेल , टेस्ट ट्युब बेबी, विमान तंत्रज्ञान, गायडेड मिसाईल्स....

आजच्या युवा पिढीला असे बोगस विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु पदावरिल जबबदार व्यक्ती विज्ञान परिषदेत पाजत असतील तर विज्ञाना बद्दल सरकारला किती आस्था आहे हे दिसते.

https://timesofindia.indiatimes.com/india/ravanas-airports-modi-waves-le...

मोदींना हे ओव्हर एक्सपोजर कोण देतो? मोदींनी तर एक दुर्दशन सोडले तर इतर कुठल्याही चॅन्लला सरकारी खर्चानी कव्हरेजला नेणे बंद केले आहे. तरी सगळे जिथे तिथे धडपडतातच आणि ब्लेम मोदींना? मोदी काय सेल्फी काढून कव्हर करतात का?

देशातील वैज्ञानिक संस्थांमध्ये आक्रमकपणे धार्मिक-पौराणिक संस्कृतीचा प्रचार केला जात आहे असे एका जेष्ठ शास्त्रज्ञाचे (CSIR) मत आहे.

विज्ञाना बद्दल आस्था असणार्‍यांसाठी, नोबेल विजेते शास्त्रज्ञ रामक्रिश्नन यांची एक अत्यंत सुंदर मुलाखत.
https://www.ndtv.com/video/shows/reality-check/busting-the-ancient-scien...

मीडिया covrage निगेटिव्ह असू ध्या नाही तर positive प्रसिध्दी मिळून ती बातमी सर्व जनतेत पोचतच आहे ना .
जर तिथे असे काही धार्मिक घडत होते तर त्याला निगेटिव्ह प्रसिध्दी सुद्धा देण्याची गरज नव्हती .
ब्लॅक आऊट करायला हवी होती ती news .
मीडिया ला ज्याची प्रसिध्दी करायची होती ती केली आणि आणि विरोधी दोन तीन वाक्य टाकून दोषारोप सुद्धा स्वतःवर घेतला नाही ह्यालाच चलाखी म्हणतात

तुमच्यासारखे विचारी लोक, जे प्रत्येक वक्तव्य तपासणार, सत्य-असत्य पडताळा करणार... >>> आणि असत्य सुद्धा रेटून बोलणार (खोटे बोला रेटून बोला - हे तुमचे आवडते वाक्य होते काही दिवसांपुर्वी Happy ). तुम्हाला मोदींची चांगली कामं कणाइतकीही दिसणार नाहीत कारण फिल्टर लावला आहे Lol

तरी तुम्हाला सौम्य भाषेत मोदी-द्वेषी आणि अगदी दुसर्‍या टोकाला राष्ट्रद्रोही ठरविले जाईल.>>>>

वर जिज्ञासाला सौम्य किंवा जहाल भाषेत कोणी मोदी द्वेषी किंवा राष्ट्रद्रोही ठरवले का ते दाखवून द्याल का? मला तरी तिचा स्टॅण्ड आवडला. तिला जे नाही आवडले ते तिने स्पष्ट लिहिले. स्वतःचे मत पटवून देण्यासाठी कोणाला अंधभक्त म्हटले नाही की मोदींना शिविगाळ केली नाही.

काही जणांचा मोदीद्वेष इतका टोकाचा आहे की ते शिव्यांशिवाय बोलत नाहीत आणि समोरून तशीच उत्तरे मिळाली की 'बघा, मोदींविरोधात काही बोलले की झालो आम्ही राष्ट्रद्रोही' हा कांगावा करतात.

सगळ्यांचे सगळेच पटले पाहिजे असे नाही आणि आपल्याला जे पटलेय तेवढेच सत्य असेही काही नाही. आदर्श कारभार करणारे सत्ताधारी सगळ्यांनाच हवेत. काँग्रेसला दहा वर्षे मिळालेली, त्यांनी पूर्ण निराश केले. त्यांनी उरले सुरले नेते घेऊन व त्यांचे सर्वोच्च नेते भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन आत जाईपर्यंत प्रयत्न करावेत, कोणी थांबवले नाही. 2019 ला निवडणुकाच होणार नाही म्हणता म्हणता त्या झाल्यासुद्धा. तशाच 2024लाही होतील.

मोदीना ही टर्म मिळाली ते उत्तम झाले कारण 5 वर्षे ज्या कामांचा पाया रचला गेला ती कामे आता आकाराला आणता येतील. ती पूर्णत्वाला नेण्यासाठी अजून काही टर्म्स मिळुदे. Happy Happy

Pages