चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Balkot हल्ला झालाच नाही असे तावातावाने सांगणारे
विरोधी पक्ष जेव्हा देशात मंदी, बेरोजगारी वाढली हे सांगत होते तेव्हा सरकार आणि त्यांचे चेले नाकारत होते, आता
आर्थिक चणचण भासू लागली तर अर्थमंत्री मंदीसाठी उपाय योजना करू लागल्यात.
आता इस्रो ला नाव ठेवणारे आहेत त्यांना
इथे इस्रोला कोणीच नाव ठेवलेले नाही.

अमेरिकेला३८ वेळा अपयश आल्यावर त्यांनी ठरवल की पुढच्या वेळी चंद्रावर यान एकादशी ला पाठवयच अन काय कमाल ३९ वेळेस ते यशस्वी झाले म्हणून गुरूजीनीं आधीच समजवून सांगीतल होत यान सध्या संकष्ट चतुर्थीच्या जवळ चंद्रावर पाठवू नका म्हणुन.... ..पण सेठ नी काय ऐकलं नाही .

Lander चा संपर्क तुटला ह्या आनंदात रात्री 2 वाजता पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये फटाके आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला .
त्या मध्ये एका बांगलादेशी नागरिकाचा गळ्यात रसगुल्ले अडकून मृत्यू झाला .
भारताचे नुकसान झाले की पाकिस्तान आणि बांगलादेशी खुश होतात .
आणि त्यांचे भाईबंद भारतात सुद्धा आहेत .
भारताचे नुकसान झाले की इथे सुद्धा काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात.

भारताचे नुकसान झाले की>>>अरे कसले नुकसान,काय लावलाय सतत या धाग्यात?तो एक प्रयोग होता न मग यश किंवा अपयशाची शक्यता50 50 percnt असणारच होती,
लोक इतके भावूक का होत आहेत हे खरंच समजत नाही,
आणि यानाचा संपर्क तुटला म्हणून एखादा देश मिठाई वाटत असेल तर त्या देशाच्या बुद्धिमतेची कीवच वाटेल की,
कंटाळा आला सतत त्या इस्रो हम तुम्हारे साथ है type च्या पोस्ट बघून,
अरे ते विज्ञान आहे ,प्रॅक्टिकल आहे त्याला तरी सवंग प्रसिध्दी पासून सोडा,अर्थात 100prcnt यश मिळाले असते तर माझ्या देशाच्या नावाचा मानाचा तुरा खोवला गेला असता यात शंकाच नाही पण नाही पूर्ण यश मिळाले तरी ok न,प्रयत्न चालू आहेतच त्यांचे,इथे whtsapp आणि fb वर तुम लढो हम पिछे है,यासारख्या पोस्ट टाकून काय होणार आहे?

अर्र. खरंच की. ट्वीटरवर टाकायची गरज नव्हती. केरश्विनीला अनुमोदन.

तुम्ही भांडत बसला आणि पाकिस्तान गेला पण चंद्रावर! >> हे बेष्ट.

विक्रमशी संपर्क झाला तर लिहायला विसरु नका. Happy

चांद्रयानाच्या उड्डाणाच्या वेळी , आमच्या देशाचा झेंडा चंद्रावर लागणार. तुमच्या देशाच्या फक्त झेंड्यावर चंद्र आहे, असली मुक्ताफळं ओकणर्‍यांच्या ध्यानीमनीस्वप्नी सतत पाकिस्तान असतो.

मोहीम ९०-९५% यशस्वी आहे म्हणायचं आणि त्याच श्वासात नुकसान झालं म्हणून गळे काढायचे हे कसं जमतंं बुवा?

कंटाळा आला आता. हे लाईव्ह दाखवणे वगैरे करायला नको होते. इसरो जे करते ते देशाला दाखवत बसणे गरजेचे नाही, लोकांची आपण काय बघतोय हे समजण्याची कुवत नाही. त्यांना पडद्यावर दिसणारी प्रत्येक गोष्ट स्पर्धा वाटते. इसरो जे करते ते त्या फिल्डमध्ये गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे पण मूर्ख भारतीय त्याची नौटंकी करताहेत.

खरेच कंटाळा आला. इसरोनेही अपडेट द्यायचे बंद करायला हवे. त्यांना त्यांच्या क्षेत्रातील ज्या देशी विदेशी तज्ज्ञांशी शेअर करायचे ते त्यांनी खासगी करावे. ट्विटरवर शेअर करून मूर्ख भारतीयांना वेळ घालवायचे साधन उपलब्ध करून देऊ नये. आता लेटेस्ट 'विक्रम बोलावा म्हणून गणपती पाण्यात घातलेत' एवढेच ऐकायचे राहिलेय. तेसुद्धा ऐकायला मिळेल एक दोन दिवसात.

मोहीम ९०-९५% यशस्वी आहे म्हणायचं आणि त्याच श्वासात नुकसान झालं म्हणून गळे काढायचे हे कसं जमतंं बुवा? >>>

यशस्वी झाली म्हणजे नक्की काय झाले हे कळायची कुवत नसली की हे असे होते.

भारत पाक मुक्ताफळांचा तर भयानक कंटाळा आलाय. दोघांनीही फक्त आपापल्या भानगडींमध्ये लक्ष घालावे आता.

<< हे लाईव्ह दाखवणे वगैरे करायला नको होते. >>
------ मोहिम फत्ते झाल्यावरही थेट दिल्ली वरुन जाता आले असते. पण उत्साहाला आवर घालणे सर्वांना जमतेच असे नाही.

मोहिम फत्ते झाल्यावरही थेट दिल्ली वरुन जाता आले असते>>>>
मी एकंदरीत सगळ्यांच्याच अतिउत्साहाबद्दल बोलत आहे. तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीवर बंदूक ताणून बसायचे आहे तर खुशाल बसा, आक्षेप घेणारी मी कोण?

बाकी, ह्या एकाच व्यक्तीवर बंदूक ताणून बसण्याच्या वृत्तीचाही कंटाळा आलाय......

इनामदार ह्या आयडी नी ह्या धाग्याला राजकीय वळण दिले आणि बाकी दोघा तिघांनी आगीत तेल ओतून विषय भरकटवला .

वर्तुळाचं केंद्र सोडून परिघाबद्दल बोला.>>>>
वर्तुळाचे केंद्र तुम्ही नाहीसे करू शकला नाहीत. उलट सर्व शक्ती केंद्रित करून मारा करत राहिलात त्यामुळे ते केंद्र अजून विस्तारले. परिघाकडेही बघा जरा, तो कमी झाला तर केंद्रही संकुचेल. परीघ कमी करायचे मुद्दे शोधा. माबो सोडून बाहेरच्या जगात तर त्या परिघात यायची धडपड जोरात सुरू आहे. त्यांना जरा सल्ले द्या.

<< इनामदार ह्या आयडी नी ह्या धाग्याला राजकीय वळण दिले >>
-------- इनामदार यांनी राजकीय वळण दिले असे मला तरी वाटत नाही. त्यांनी जे मांडले आहे त्यात काही चुकीचे नाही. वेगळे / विरोधी विचार मांडण्याचे त्यांनी दाखवलेले धारिष्ट्य खरे तर कौतुकास्पद आहे.

मोदी आणि त्यांच्या भक्तगणांनी नेहेमीप्रमाणेच या मोहिमेला पण एका event चे रुप दिले जे खेदजनक आहे.

माझ्या मते मोहिम १०० % यशस्वी झाली आहे. यश कशामधे मोजता यावर सर्व काही अवलंबून आहे.

अमेरिका इराक युद्ध live दाखवलं होते ,मुंबई अतिरेकी घुसले तेव्हा केलेली कारवाई केली live दाखवली होती .
मध्ये थायलंड मध्ये मुले गुव्हेत अडकली होती त्या वेळी त्या देशांनी केलेली कारवाई live दाखवली नव्हती आणि ते शहाणपणाचे होते .
Live दाखवताना मीडिया आपला अजेंडा सुद्धा पुढे रेटते त्या मुळे चुकीचे संदेश समाजात जातात आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होते .
ह्या अनुभव वरून अस वाटत इस्रो ची मोहीम live दाखवायची गरज नव्हती .
दाखवली ठीक पण focus फक्त चांद्रयान आणि त्याला ऑपरेट करणारे संशोधक ह्यांच्या वरच असायला हवा होता आणि त्यासाठी च media ला आमंत्रित केले असावे .
पण मीडिया नी चटपटीत दाखवायच्या नादात पंतप्रधान चे आणि इस्रो प्रमुखांचे खासगी क्षण टिपले ही मीडिया परिपक्व नसल्याची लक्षण आहेत .
मीडिया काय दाखवायचं हा त्यांचा निर्णय आहे .
सरकारनी आदेश देवून त्यांना तो प्रसंग दाखवायला नक्कीच सांगितलं नसणार.
ह्यात सरकारचा किंवा पंतप्रधान चा काही दोष नाही .

चांगलं काही झाले की भाजप भक्त क्रेडीट घेण्यासाठी पुढे सरसावतात. मग ते भारतीय लष्कर असो की इस्त्रो. आमच्या मुळेच मोहिम यशस्वी झाली हे भक्त उड्या मारत साजरी करतात. पण अपयश आलं की ते सत्तर वर्षे कॉंग्रेस ची केलेली घाण आहे नि नेहरू सर्वाला जबाबदार आहेत असे बोलतात.

<पण मीडिया नी चटपटीत दाखवायच्या नादात पंतप्रधान चे आणि इस्रो प्रमुखांचे खासगी क्षण टिपले ही मीडिया परिपक्व नसल्याची लक्षण आहेत .>

आणि या खाजगी क्षणांत जे झालं ते सगळ्यांना खूप खूप आवडतंय असं ट्वीट प्रधानमंत्री कार्यालयाने केलं. असं करायला काही पंतप्रधानांनी सांगितलं नव्हतं. यात नक्कीच पंतप्रधानांचा काहीही दोष नाही.
ते मीडियापुढे आणि पंतप्रधान कार्यालयापुढेही अगदी हतबल आहेत.

प्रतिसाद वाचुन मनोरंजन झाले. वाईट वाटले.
चंद्रयान आपल्यासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
त्यात राजकारण आणलं ह्याचं तर अजुनच वाईट वाट्तंय.
देशात हा मु पा काहीही झालं तरी ते प्रत्येक सामान्य माण्साला कळायलाच हवं असा नवीनच ट्रेंड आलाय जो सगळ्याच इव्हेंट, घटनांसाठी योग्य नाही. काही गुप्तता असते आणि असावीच.
मैने किया मैने किया ही वृत्ती / ढोल बडवणं नेहमीच उपयोगी ठरणार नाही.
पाक आणि बांग्लादेशबद्दल ज्या काही पोस्टी यत्रतत्र आधी येत होत्या आणि आताही येत आहेत ते लोक खरंच धन्य आहेत. त्यांना सीमेवर पाठवा.

उदय, इनामदार यांनी जे लिहिले त्याचा चांद्रयान मोहिमेशी काहीच संबंध नव्हता. Happy
पंतप्रधानांनी सिवन भावुक झाले तेव्हा दुर्लक्ष केले असते तरी त्यावर पण विरोधी लोक तुटूनच पडले असते त्यामुळे पंतप्रधानांनी सांत्वन केले ते योग्य होते. ट
मुख्य म्हणजे आता त्याचा राजकीय उपयोग “दोन्ही बाजु करत आहेत” फक्त बीजेपी नाही. बीजेपी चांगल्या साठी व विरोधक ‘बीजेपी कसे नाटक करत आहे‘ हे सतत सांगुन, लिंक्स देऊन.

एक मात्र पटले, अशा मोहिमा गुप्तच ठेवाव्यात.

पंतप्रधानांनी सिवन भावुक झाले तेव्हा दुर्लक्ष केले असते तरी त्यावर पण विरोधी लोक तुटूनच पडले असते त्यामुळे पंतप्रधानांनी सांत्वन केले ते योग्य होते. >>>>>> +१११

पंत प्रधानांनी दुर्लक्ष केले असते ना तर मिडीया आणी विरोधक दोघांनी ठणाणा शिमगा केला असता. मागे लोकसत्तातच वाचले होते की राहुल गांधींच्या दौर्‍यात एक पत्रकार पायरीवरुन पडला तेव्हा राहुलजींनी त्याला धावत येऊन त्याची चौकशी केली, काही कुठे लागले नाही याची त्यांना घोर काळजी लागली होती. किती तो मनाचा उदात्तपणा !

आणी हे मोदी बघा, जिथे तिथे स्वतःला मिडीया समोर मिरवतात, वात्रट कुठले !!

एक मात्र पटले, अशा मोहिमा गुप्तच ठेवाव्यात.>>>>>>> सौ टके सच बात !

मी दिलेली लिंक पाहिली तर त्यात दिसेल की जेव्हा ते सिवन भावुक झाले होते तेव्हा पंतप्रधानांनी काहीही केलं नाही. आपल्या जागेवर जाऊन बसले. सिवन यांचे सहकारीच त्यांना थोपटत होते.
यानंतर काही तासांनी पंतप्रधानां नी सिवन यांचं तथाकथित सांत्वन केलं. त्यांचं डोकं दोन्ही हातांनी धरून आपल्या खांद्यावर गच्च दाबून धरलं. एका हाताने पा ठीवर थोपटताना दुसर्‍या हाताने डोकं गच्च दाबलेलंच होतं. सिवन यांना आपला चष्मा काढायची मोकळीक देताना आपला खांदा बदलला.
असं सांत्वन करायला सिवन ढसाढसा रडत होते का?

गणपती मध्ये चंद्र पाहायचा नसतो. पंतप्रधानांनी पहिला. प्रत्यक्ष कृष्णाने गायीच्या पावलात साचलेल्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब पहिले आणि त्याच्यावर चोरीचा आळ आला. हे तर होणारच होते.

Pages