चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिच्युएशन १: लाईव प्रक्षेपण नाही. मोहीम प्रसारमाध्यमांपासून दूरच ठेवली.
काही प्रतिक्रिया १:
* २१ शतकातही अशा महत्त्वाच्या मोहीमा गपचूप उरकतात.
* देशाला गाफील ठेऊन अशा मोहीमा राबवतात म्हणजे मोहीम यशस्वी होण्याची खात्री नाही.
* मी तर म्हणतो की अशी काही मोहीमच नाही. काश्मिर प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच हे उपद्व्याप केले आहेत मोदींनी.
* अशा गुपचूप मोहीमा काढल्या तर देशातल्या लहान मुलांना, तरूणांना विज्ञानाबद्दल आस्था कशी निर्माण होणार?

सिच्युएशन २ : लाईव प्रक्षेपण. मोदी गैरहजर.
काही प्रतिक्रिया २:
* सर्व जगभर फिरतात पण अश्या महत्त्वाच्या प्रसंगी पंतप्रधानांनी हजर रहाण्याचं औचित्य नाही. कमाल आहे!
* इथे फार प्रसिद्धी मिळणार नाही ना, त्यामुळे.
* इथे चंद्रयान आणि शास्त्रज्ञांना जास्त फूटेज मिळेल असं वाटल्यामुळे मोदी इस्त्रोमधे आले नसणार.
* इथे बराच मिडिया आहे आणि ते काश्मिरबद्दल प्रश्न विचारतील असं वाटल्यानं घाबरून आलेच नाहीत.

सिच्युएशन ३ : लाईव प्रक्षेपण. मोदी हजर. चंद्रयान यशस्वी.
काही प्रतिक्रिया ३:
* बघा, शास्त्रज्ञांनी इतकी जीवापाड मेहनत केली आणि आता मोहीम यशस्वी होणारच याची खात्री आहे म्हणून लगेच श्रेय उपटायला हजर!
* हो ना, हेच जर मोहीम यशस्वी होणार नाही याची ०.०१% जरी शक्यता असती ना तर आले असते का? आता बघा कसे येऊन झळकतायत.
* सगळा फार्स आहे हो! शाब्बासकी देण्याच्या निमित्ताने कॅमेरासमोर चमकता येतं ना, म्हणून!

सिच्युएशन ४ : लाईव प्रक्षेपण. मोदी हजर. चंद्रयान अयशस्वी. मोदी बाहेर न जाता तिथेच बसून शास्त्रज्ञांशी चर्चा करतात.
काही प्रतिक्रिया ४:
* चंद्रयान मोहीम नाही झाली पूर्ण आता कारण काय ते शास्त्रज्ञांना शोधू देत ना. त्यांना जरा आपापसांत बोलून द्यायचं ना. हे कुठे मधेच चर्चा करतायत. यांना काय विज्ञानातलं कळतंय. साधा चहावाला तो.
* आता त्या शास्त्रज्ञांना कारण शोधायला वेळ तरी द्या. लागले लगेच जाब विचारायला. शास्त्रज्ञांच्या मन:स्थितीचा विचार नको का करायला?
* बघा तरी, इथे मोहीम थोडक्यात हातातून निसटली आणि लगेच पंतप्रधान बोलायला आले तर सिवन वर किती प्रेशर आलं असेल.

सिच्युएशन ५ : लाईव प्रक्षेपण. मोदी हजर. चंद्रयान अयशस्वी. मोदी बाहेर जातात.
काही प्रतिक्रिया ५: लेखाखालील प्रतिक्रीया वाचाव्यात.

मिठी चा घट्ट पना हा भावनेच्या आवेगाशी संबंधित असतो साधं लॉजिक आहे .
आवेग जेवढा जास्त तेवढी मिठी घट्ट .
एका ठिकाणी मत मांडायचे मोदी जी खूप हुशार आहे मग ह्या हुशार राजकारणी माणसाला हे कळत नसेल असे तुम्हाला वाटत का की मीडिया चे कॅमेरे चारी अंगानी दृष टिपत आहेत .
मोदींची तेव्हाची प्रतिक्रिया ही pure नैसर्गिक होती .असे च माझे मत आहे

मामी, सिच्युएशन नं २ मंगलयानच्या वेळी घडून गेली आहे. तेव्हा अशा कोणत्याही प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. पण मंगलयान मोहिमेला मिळालेली प्रसिद्धी पाहून मोदींना चांद्रयान मोहीमेच्या वेळी मोह पडला असावा.

जिज्ञासा +1
काय एकेक प्रतिक्रिया आहेत! तमाशा बनवलाय सगळा! टक्केवारी काय काढताहेत, पाठीशी आहोत काय सांगताहेत! सगळंच स्वस्त करून टाकलंय.

{हुशार राजकारणी माणसाला हे कळत नसेल असे तुम्हाला वाटत का की मीडिया चे कॅमेरे चारी अंगानी दृष टिपत आहेत}
Camera साठीच तर केलं त्यांनी. नाहीतर जेववहा camera चा फोकस नव्हता, तेव्हा बाकीचे लोक सिवन यांचं सांत्वध करत असताना बरं नाही सुचलं?
ऐन निवडणुकांत देशाला उद्देशून भाषण करून उपग्रह मारक क्षेपणास्त्राबद्दल माहिती दिली.
जर तो सुरक्षाविषयक उपक्रम नसता तर त्याचंही थेट प्रक्षेपण झालं असतं.

बरं. मोदींच्या सांत्वनामुळेच इस्रोवाल्यांना विक्रमचा शोध घ्यायचग हुरूप आला. नाहीतर काय त्यांनी ते शोधलं नसतं.

हे कोणीतरी अधिकारीच म्हणालाय.
तेव्हा प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय मोदींचं आहे.

पोखरण येथे अणुस्फोटाच्या वेळी पंतप्रधान तिथे हजर होते का? जसं ओबामा कार्यालयात बसून लादेन ची कारवाई पहात होते. तसे यांना सुध्दा जमलं असतं. पण शोबाजी/ भाषणबाजी ( मित्रों...) शक्य झाले नसते ना. Sad

मामी Lol

अगं शेवटच्या सिच्युएशनमधल्या प्रतिक्रियाही संख्येने बर्‍याच वाटल्या तरी आधीच्या सिच्युएशनसारख्या ५-६ बुलेट्समध्ये बसवता येतील Lol

असो.... इतका कुणाचा द्वेष बरा नाही इतकंच सांगते. आपलं चांद्रयान सॉफ्ट लँडिंग व्हायच्या आधी आणि नंतरही पाकिस्तानी जनता/मंत्री त्या मिशनला 'टॉयलेट बांधणे' संबोधत होते / हिणवत होते. काय फरक पडतो आपल्याला? फरक ज्याच्या मेंदूत / हृदयात द्वेष भरला आहे त्याला पडत असतो.

कोणाचा द्वेष आणि कोणाचा उदोउदो न करता स्थिर बुध्दीने निर्णय घेणे हे बुप्रावादी लोकांचं लक्षण आहे.

योग्य ठिकाणी चांद्रयान २ चे मूल्य मापन झाले आहे .
इस्रो पासून सर्व जगानी आडाखे बांधले आहेत .
ह्या मध्ये सर्वसामान्य लोकांच्या मताला अशी पण काही किँमत नसते .
सर्व सामान्य लोकांच्या मतांनी असे निर्णय घेतले पण जात नाहीत आणि रद्द पण केले जात नाहीत .
आपण फक्त निवडणुकीत मत देण्या पुरतेच आहोत .
राष्ट्र विरोधी मत जेवढी व्यक्त होतील तेवढं सरकारच मतदान वाढेल .
जेवढी सरकार विरुद्ध गलिच्छ भाषा वापरली जाईल तेवढे बहुमत वाढेल .
चाललं आहे ते योग्यच चालत आहे अपेक्षे प्रमाणे

कोणाचा द्वेष आणि कोणाचा उदोउदो न करता स्थिर बुध्दीने निर्णय घेणे हे बुप्रावादी लोकांचं लक्षण आहे. >>>> अश्या लोकांना काय म्हणतात ते माहित नाही. पण मनात उद्भवणार्‍या द्वेषावर कंट्रोल ठेवता आला तर त्याच्या विरुद्ध टोकावर (उदोउदो) आपोआप कंट्रोल येतो.

चंद्र यान 2 मोहीम ,उतरण्याच्या वेळी धनु राशी मुळ नक्षत्र 1 चरण गंडांतर योगात असल्याने 2.1 किमी अंतर राहता संपर्क तुटला त्यात फक्त 12 तासाचे अंतर वाढवले असते तर लँडिंग यशस्वी झाले असते.अपयश ही यशाची पायरी असते ,इस्रो चे एकूण अभियान बद्दल अभिनंदन ,मला वाटते इस्रो व ज्योतिषी मिळून एकत्र काम केले तर यशाचे अनेक टप्पे पार करता येतील .शुभम भवतू.

एका ज्योतिषाने वरचा मेसेज मला पाठवला आहे. पण चंद्रावर आपल्या येथील ज्योतिषाचं गणित चालणार नाही असे मला वाटते.

माझी पोस्ट हटवली .
पूर्ण न वाचता टाकली होती

कारण तुला मेंदू नाही म्हणून मजा वाटते. तुझं मानसिक वय आठ च्या पुढे नक्कीच नाही. आय क्यू ची तर बोंबच आहे.

ज्योतिष शास्त्राचा विचार करायला हरकत नाही ते सुधा एक शास्त्र आहे

काय काय चाललंय एक एक.
अख्खा देश पाठीशी आहे अन काय काय.
किती एकटे पडले होते इस्रोचे लोक. केवढा दिलासा मिळाला असेल त्यांना भरगच्च पाठिंबा बघून.
कधी गेलात बंगलोरला तर जाऊन या इस्रोत दोन प्रेमाचे शब्द बोला, बरं वाटेल त्यांना.

आणि याचे दुसरे टोक म्हणजे conspiracy theories पण फिरताहेत whatsapp वर.

मोदी डोळा मारायला विसरले. डोळा मारला असता तर त्यांना दुसऱ्या बाजूनेपण पाठिंबा मिळाला असता.

नासा अमेरिकन समाजाच्या पॉप कल्चरचा कित्येक दशके भाग आहे. मूळ स्पेस रेस ही कोल्ड वॉरचा एक भाग होती. तरीही त्यामुळे नासाचे वा विज्ञानाचे नुकसान झाल्याच्या पोस्टींचा रतीब पडत नाही. सध्या मात्र मोदी चांद्रयान मोहिमेच्यावेळी उपस्थित असंल्यामुळे फारच नुकसान होत आहे विज्ञानाचे असे दिसते.

Pages