चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांद्रयान 2, हे फक्त भारता चेच मिशन होते त्यात कोणतेच देश सहभागी नव्हते .
म्हणून तर मीडिया रिपोर्ट चा हवाला देवून मी पोस्ट केले होते की .
चीन ,रशिया आणि अमेरिका ह्या देशांनी त्यांचा अनुभव भारताशी share केला नाही .
आता संपर्क तुटल्यावर ते मदत केल्या सारखे करत आहेत

Orbiter
At the time of launch, the Chandrayaan 2 Orbiter will be capable of communicating with Indian Deep Space Network (IDSN) at Byalalu as well as the Vikram Lander. The mission life of the Orbiter is one year and it will be placed in a 100X100 km lunar polar orbit.

Lander — Vikram
The Lander of Chandrayaan 2 is named Vikram after Dr Vikram A Sarabhai, the Father of the Indian Space Programme. It is designed to function for one lunar day, which is equivalent to about 14 Earth days. Vikram has the capability to communicate with IDSN at Byalalu near Bangalore, as well as with the Orbiter and Rover. The Lander is designed to execute a soft landing on the lunar surface.

Rover — Pragyan
Chandrayaan 2's Rover is a 6-wheeled robotic vehicle named Pragyan, which translates to 'wisdom' in Sanskrit. It can travel up to 500 m (½-a-km) and leverages solar energy for its functioning. It can only communicate with the Lander.

सोर्स : https://www.isro.gov.in/chandrayaan2-spacecraft#lander-vikram

चंद्रावरील एक दिवस म्हणजे आपले १४ दिवसरात्र <<< यावरून एक प्रश्न. चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका वेळ लागतो तितक्याच वेळात तो पृथ्वीभोवतीही एक प्रदक्षिणा पूर्ण करतो म्हणून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. पृथ्वीगोलावर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या विरूद्धबाजूस असणार्‍या ठिकाणाहून पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यास चंद्राची आपल्याला न दिसणारी बाजूच नेहमी दिसत असेल ना?

संपूर्ण पृथ्वीवरून चंद्राची एकच सेमच बाजू दिसते. चंद्राची पृथ्वीकडे जी बाजू आहेत तिथे जर चंद्राला चेहरा असता तर तो कायम पृथ्वीकडे चेहरा ठेवून पृथ्वीभोवती फिरतोय अशी कल्पना करा Happy असं करताना आपोआपच त्याची स्वतःभोवतीही एक फेरी होते.

वावे, आले लक्षात. Happy
दोघांचे परिवलन आणि परिभ्रमण यांचे वेग आणि दिशा यांची एकत्र मोट बांधून मेंदूत घुसवणे जरा किचकटच.

इथे छान दाखवले आहे. https://youtu.be/j91XTV_p9pc

Lander कडून जे सिग्नल मिळतील ते ऑर्बिटर ला आणि ऑर्बिटर ते पृथ्वी वर पाठवेल आणि ह्या संदेश वहणात
रेडिओ लहरींचा वापर केला जातो .
रेडिओ लहरींचा वेग निर्वात पोकळीत प्रकाश च्या वेगा एवढा असतो.
वातावरणात प्रवेश केला
की वेग थोडा कमी होतो .
आणि त्यांच्या वर बरेच घटक प्रभाव टाकतात.
गजानन वर पोस्ट मध्ये गमतीने बोलले होते
चंद्राचे magnetic फील्ड तर अडथळा ठरत नाही ना ? ही सुद्धा एक शक्यता असावी .
शास्त्रीय ज्ञान मला जास्त नाही .
संबंधितांनी रेडिओ लहरी वर लिहावे

चांगले झाले. अजून बातम्यांमध्ये काही आलेले दिसत नाही. तुम्हाला कोठून समजले.

News मध्ये कुठेच नाही .
संपर्क झाला असता तर इस्रो नी निवेदन प्रसिद्धीस दिले असते ना

magnetic फील्ड अशी काही तरी कारण असतील ती आपल्याला माहीत नसतील .
आणि त्याचा अंदाज संशोधकांना सुद्धा नसेल. >>>>>>> +१११११

नासाने म्हणे सिग्नल पाठवले आहेत आपल्या विक्रमला.

नासाने म्हणे सिग्नल पाठवले आहेत आपल्या विक्रमला. >> ट्रंपुल्याला झापलं असेल साहेबांनी, झक्कत सिग्नल दिला नासाने

चीन चा रोव्हर सुद्धा 1134 km वर आहे विक्रम पासून.
14 दिवसाचे दिवस संपल्यानंतर तिथे 14 दिवस रात्र चालू होइल .
तेव्हा सौर ऊर्जा न मिळाल्या मुळे रोव्हर शांत होईल होईल .
पण रात्र संपली की परत तो काम करेल ना ?

नासाचे ऑर्बिटर सुद्धा चंद्रा भोवती फिरत आहे ते १७ sep ल जिथे विक्रम नी लँडिंग केले आहे त्या कक्षेतून जाईल तेव्हा नासा ते फोटो
भारता बरोबर share करणार आहे असे मीडिया रिपोर्ट सांगतो

अमेरिका, चायना आणि रशिया या तीनही देशांची यानं चंद्रच्या एकाच भागात उतरली होती. विक्रमच्या उतरण्याची जागा एकदमच वेगळी होती. तर इस्रोच्या वैज्ञानिकांनी अशी "मळलेली वाट" सोडून उतरायला आडवाट का ठरवली या बद्दल काही वाचण्यात आले नाही. केवळ नवा भाग एक्सप्लोअर करणं एवढाच हेतु का आण्खी काही?

चांद्रयान १ ला ह्या भागात पाणी असल्याचा शोध लागला होता, आता त्याचे प्रमाण किती आहे हेही अभ्यासले जाणार होते.

जी चंद्राची बाजू पृथ्वी वरून दिसत नाही त्याच चंद्राच्या बाजूला चीन नी रोव्हर चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले आहे ३ जानेवारी २०१९ ला ते ठिकाण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे .आपल्या विक्रम पासून त्याचे अंतर ११३४ km आहे .

<<तुमच्यासारखे विचारी लोक, जे प्रत्येक वक्तव्य तपासणार, सत्य-असत्य पडताळा करणार... >>> आणि असत्य सुद्धा रेटून बोलणार (खोटे बोला रेटून बोला - हे तुमचे आवडते वाक्य होते काही दिवसांपुर्वी Happy ). तुम्हाला मोदींची चांगली कामं कणाइतकीही दिसणार नाहीत कारण फिल्टर लावला आहे >>
------- सर्व काही आलबेल आहे (अर्थात २०१४ नंतर) असे न मानणार्‍यांनी फिल्टर लावलेला आहे असा समज केवळ Inverse filter धारीच करु शकतात. स्वच्छ भारत, बेटी बचाव, जनधन योजना... हे मला आवडलेले मुद्दे आहेत. सुरवातीच्या काळात लिहीले आहे... पुढे त्यातही नाटके (कचरा शोधून आणायाचा आणि मग केवळ कॅमेरासाठी साफ करायचा) होताना दिसल्यावर वाईट वाटले.

<< मला तरी तिचा स्टॅण्ड आवडला. तिला जे नाही आवडले ते तिने स्पष्ट लिहिले. स्वतःचे मत पटवून देण्यासाठी कोणाला अंधभक्त म्हटले नाही की मोदींना शिविगाळ केली नाही. >>> +१ आणि तिने पंतप्रधानांना उठसुठ वाईट न ठरवणाऱ्यांना बिनडोक ठरवणारे पॅरेग्राफही लिहिले नाहीत >>
------- मला पण जिज्ञासा यांचे विचार / मत आवडले. मोदी यांच्या बद्दल लिहीले आहे म्हणून नव्हे तर सहज-सुंदर भाषेत त्यांनी परिस्थितीचे कथन केले आहे.
दुरान्वयेही कुणालाही बिनडोक (हा माझा शब्द नाही आहे... ) ठरवणे हा माझा हेतू नाही/ नसतो. निराधार पौराणिक कथा आणि विज्ञान हे सोबत राहू शकत नाही पण त्याबद्दल इतरत्र कुठे. विषयांतराबद्दल क्षमस्व...

उदय, तुम्हीपण व्यवस्थित मुद्देच लिहिता. Happy
जिज्ञासाने चांगले लिहिले आहे. पण मी त्यावरुन माझे मत अजुन बनवले नाही, कारण दुसरी बाजुही असेलच. काही योजनांचा परिणाम हळुहळुही दिसायला लागतो. फक्त तिने जे लिहायचे ते व्यवस्थित लिहिले आहे व असे लिहायला हवेच कारण कोणत्याही सरकारला त्याचा फायदाच होणार सुधारणा करण्यासाठी, तपासुन पहाण्यासाठी. भाषणे तर मी कधीच कोणाची ऐकत नाही, फक्त कृती व परिणाम यात रस आहे.
उदय, स्वच्छ भारत अभियान मात्र मागच्या वारीत अनुभवले आहे. काय सांगु आमच्या गावच्या रेल्वे स्टेशनावर काय घाणेरडा वास यायचा Sad पण मागच्या वेळेस ... चकाचक, मस्त डिजिटल फळे सगळीकडे, स्टेशनच्याबाहेर प्रवेशद्वार सुंदर, असंख्य पानाच्या पिचकार्‍या पुसुन मस्त रंग दिलेले आणि सर्वात मुख्य... गलिच्छ वास गायब. तेच दादरला.... बाथरूमला जायचे अंगावर यायचे पण एकदा जावेच लागले तर स्वच्छ वासरहीत बाथरुम. फक्त पाण्याचा नळ सतत वहात होता तर त्या स्त्री ला सांगितले. ती म्हणाली, पाणी नव्हते तेव्हा चालु केला होता. आमच्या गावात इमारतीबाहेरच कचराकुंडी Sad वास्मारी..... ती हलवलेली होती... तर काय वाटतं की, फोटोसाठी थोडफार केले असेल पण खरे परिणाम पण अनुभवले. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर मग कितीही प्रगती होवो, उपयोग नाही. पण स्वच्छता पाहुन फार बरं वाटलं. यात अजुन फक्त सुधारणाच होऊदे ही शुभेच्छा.

विक्रमशी संपर्क होण्याकरता सर्वांनाच शुभेच्छा. हे खुप रोमांचक आहे, कसलं जबरदस्त सॉफ्ट्वेअर असेल, मुख्य म्हणजे चाचणी सिम्युलेशनमधे तरी कशी केली असेल? प्रत्यक्ष उतरवायची चाचणी कशी केली असेल?

तर इस्रोच्या वैज्ञानिकांनी अशी "मळलेली वाट" सोडून उतरायला आडवाट का ठरवली या बद्दल काही वाचण्यात आले नाही. >> विक्रम लॅन्डर ने लॉन्ग रुट घेण्यामागे कमित कमि रिस्क होती म्हणूनच घेतला आहे ,जेव्हा तो चन्द्राच्या जवळच्या कक्षेत आला तेव्हा त्याने स्पीड बराच आधिच कमी करणे अपेक्षित होते पण अपेक्षित गॅप ने तो स्पिड कमि झाला नाही त्यामूळे लॅन्डिन्ग गडबडल अस एनवाय टाईमच म्हणण होत,
लॅण्दर मुले मिशन फेल होणे हे अगदी कॉमन कारण आहे, यापुर्विच्या अनेक प्रगत देशाच्या मोहिमा यामूळेच अयशस्वि झाल्यात त्यावर मिडियासहित सगळ्यानीच एवढी हायतोबा करायच काही कारण नाही, भारताला-इस्त्रोला हे सययिच नाही हे अगदिच मान्य पण अनपेक्षित नक्किच नव्हते.
लाइव्ह प्रक्षेपण हा मुर्खपणा होता, लोक तर जाउच द्या मिडियातरी प्रगल्भ आहे का हे सगळ हॅन्डल करायला? काहीही धरुन बसतात चघळत मग!
मोदीनी सिवनला दिलेला धिर मिठी हे तेवढ्यापुरत आणि त्या क्षणि घडलेली क्रुती आहे, प्लॅन-अनप्लॅन्ड चावत बसण्यात शुन्य अर्थ आहे.

काल माझ्या कॉम्प्युटर वर एक मेसेज आला. त्यात लिहिले होते की इझ्राईल चे चांद्रयान आणि भारताचे चांद्रयान या दोहोंचा टच डाऊन च्या आधी संपर्क तुटला. या दोन्ही केस मध्ये अमेरिकेच्या स्टार वॉर प्रोग्रॅम चा संबंध असण्याची शक्यता आहे. खरे खोटे देव जाणे! पण १४ दिवस होऊन गेल्यावर भारत आणि इझ्राईल दोन्ही देश मिळून तपास लावणार आहेत म्हणे!

उदय धाग्याचा विषय वेगळा आहे हो. म्हणून माझ्याकडून मी पंतप्रधानांचा विषय थांबवला होता.
--्-==

पुढे त्यातही नाटके (कचरा शोधून आणायाचा आणि मग केवळ कॅमेरासाठी साफ करायचा) होताना दिसल्यावर वाईट वाटले. >>>> तुम्हाला असे फोटो symbolic असतात हे खरोखर माहित नाही काय? आमच्या ऑफिसच्या परिसरात आम्ही हे अभियान करतो तेव्हा ऑफिसच्या गेटबाहेरच्या आधीच्याच स्वच्छ भागात थोड्या लांबचा थोडासा कचरा आणून ठेवतात आणि मग लांब झाडू घेवून बड्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे फोटो काढतात. आणि नंतर मात्र सगळे खरोखर जरा दूर स्टेशन साईडला जाऊन खरोखरची सफाई करतात. आमच्या कडे ऑफिस प्रिमायसेस मध्ये स्वच्छता अभियान खूप सिरियसली घेतले आहे. तीन EDs पॅनेलवर आहेत. ते कधीही सगळ्या फ्लोअर्सना सरप्राईझ व्हिजिट देतात. अगदी कपाटंही उघडून बघतात, टेबलांखाली पेपर्सवगैरे डंप करून ठेवलेत का बघतात. दर महिन्याला क्लीनेस्ट फ्लोअरला ट्रॉफी असते.

Inverse filter >>> Lol त्या प्रज्ञाला तिकिट देण्यावरून वगैरे मी टीका केली होती आठवतेय का? ती अजिबात निवडून येवू नये असं मला वाटत होतं. फक्त एवढंच आहे की मी जनरलीच कुणावर फारशी टीका करत बसत नाही. कॉंग्रेसवरही नाही. हात धुवून मागे लागल्यासारखं तर नाहीच नाही Lol , एक माणूस कधी परिपूर्ण नसतो तर मोठा समुदाय कसा परिपूर्ण असेल सांगा!

बरं आता फक्त चांद्रयानावरच बोलूया Happy

इझ्राईल चे चांद्रयान आणि भारताचे चांद्रयान या दोहोंचा टच डाऊन च्या आधी संपर्क तुटला. या दोन्ही केस मध्ये अमेरिकेच्या स्टार वॉर प्रोग्रॅम चा संबंध असण्याची शक्यता आहे. खरे खोटे देव जाणे

जिथे खरे खोटे फक्त देवच सांगू शकतो त्या बाबतीत आपण इकडे तिकडे सगळीकडे ती बातमी फॉरवर्ड करून उगीच देवावर प्रेशर का घालावे? देवाला वेळ मिळाल्यावर तो खरे खोटे सांगेल, तोवर धीर धरावा. देवाने कामात लक्ष घालायच्या आधीच आपण बातमी सर्वत्र पसरवणे याला अफवा पसरवणे म्हणतात.

इझ्राईल चे चांद्रयान आणि भारताचे चांद्रयान या दोहोंचा टच डाऊन च्या आधी संपर्क तुटला. या दोन्ही केस मध्ये अमेरिकेच्या स्टार वॉर प्रोग्रॅम चा संबंध असण्याची शक्यता आहे. खरे खोटे देव जाणे>>>>असं असेल तर चीनचा संपर्क का नाही तोडला?

Pages