तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात?

Submitted by केअशु on 15 August, 2019 - 08:43

आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.

याचंच निमित्य म्हणून आपल्या माबोवर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! Happy

कितपत येते?

वाचता येते की बोलता येते?

कि फक्त समजते?

कुठे शिकलात?

उद्देश काय होता शिकण्याचा?

कधीपासून शिकताय?

पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्‍यापैकी विसरलात?

पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?

शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?

बापरे! किती ते प्रश्न? Wink

आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते? Happy

Group content visibility: 
Use group defaults

मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत,
थोडीफार गुजराती

सगळ्यात छान मला आपुलकीची भाषा येते
डोळ्यांच्या भाषेत मी weak आहे दूरचा चष्मा असल्यामुळे

अर्रे विक्रम, Buenos Dias good morning/ tardes good afternoon/ noches - good evening
करेक्ट है

Buenos म्हणजे गुड

@वर्षा, हो, ए१ चा क्लास लावला आहे. पण क्लासपेक्षा इतर माध्यमांतूनच अधिक शिकणे होत आहे. मुख्यत: ड्युओलिंगो वेबसाईट, युट्युब, मॅकग्रा हिलची प्रॅक्टिस मेक्स पर्फेक्ट जर्मन पुस्तकमालिका ह्या तीन सोर्सेसमधून भाषेची गुह्ये समजून घेत आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रगती होत आहे.

तुम्हाला सल्ला: जर्मन विथ जेनी व जर्मन विथ आन्या हे दोन्हीही चॅनेल्स अवश्य पहाच. न चुकता नोट्स काढा. व्याकरणाचे नियम समजण्यासाठी आयडिया शोधा. जर्मनमध्ये नामाचे लिंग ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे. लिंगानुसार उपपद, क्रियापद, क्रियाविशेषण, विशेषण सर्व बदलते. त्यामुळे कुठलाही जर्मन शब्द लक्षात ठेवताना असा मराठी, संस्कृत, इंग्रजी किंवा हिंदी प्रतिशब्द लक्षात ठेवा ज्याचे लिंग जर्मन शब्दाशी जुळेल. उदा. नदी म्हणजे फ्लूस हे जर्मनमध्ये पुल्लींगी आहे त्यामुळे नदी न लक्षात ठेवता नद हा प्रतिशब्द लक्षात ठेवावा. ड्युओलिंगो ॲप वापराच पण वेबसाइटवर गोष्टी आहेत त्या जरूर ऐका. जर्मन शॉर्टस्टोरीजची एक पुस्तकमालिका (Dino learns Deutsch) उपलब्ध आहे. ती अवश्य वाचा. जर्मन भाषेबद्दल जेवढे समजतेय त्यानुसार ती इतकी सोपी भाषा मुळीच नाही. शिकताना पाया पक्का करतच पुढे जावे लागते. alles gute um deutsch zu lernen
जर्मन जाणणाऱ्या इतर माबोकरांनी देखिल कृपया सल्ले द्यावेत.

कौतुक आहे खरंच सर्वांचं, इतक्या भाषा येतात.

माझ्या बाबतीत सांगायचं तर एकही नीट बोलता येत नाही मला, फार चुका होतात.

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी वाचता मात्र येते. पहिल्या तीन लिहिताही येतात, चौथी नाही येत.

नाही ग बाई वर्षू. Happy . दिवस पुल्लिंगी आणि दुपार व रात्र स्त्रिलिंगी आहे स्पॅनिश मधे, आपल्या सारखेच. (का माहित नाही Happy ) जाउ दे. इथे नको चर्चा. Happy
मस्त धागा आहे. इथून स्फूर्ती घेउन अजून एक भारतीय भाषा दोन वर्षात शिकावी म्हणतो. कानडीच बरी. महाराष्ट्रात सरावासाठी खूप संधी आहे. Happy

मला उगाचच व्याकरण शिकायला आवडत नाही. कामचलाऊ पर्यटक भाषा तात्पुरती आली की झाले. भारतात फिरताना तमिळ,कन्नड,बांगला,गुजराती उपयुक्त. त्या वेळी कामापुरते पाच पन्नास वाक्ये फेकता आली पाहिजेत किंवा ते लोक 'हो,नाही, नाही, नको,जा,या,उद्या,काल,सकाळी, संध्याकाळी, दुपारी इत्यादी कसे म्हणतात हे कळले तरी पुरे.
केरळवाले हिंदी इंग्रजी फार समजतात. फारशी गरज लागत नाही मलयालमची.

मस्त धागा केअशु . इथल्या लोकांना इतक्या भाषा येतात हे बघून मस्त वाटतय आणि किती सहज सांगताएत सगळे जण , कोणताही आव नाही .
छान च . Happy वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या लोकांचा मला खुप आदर वाटतो.

कोणतीही नवीन भाषा शिकायला सोपी आहे. मात्र शिकल्यानंतर तिचा सराव करत राहणे हा मुख्य इश्यू असतो . परदेशी भाषा शिकतो आपण पण आजूबाजूला कोणी ती भाषा बोलणारे नसेल अथवा त्या भाषेतील काही मटेरियल वाचत ऐकत नसू तर ती भाषा विसरायला होते.

विनोबा भावे यांना भारतीय आठ आणि परदेशी सहा एकूण चौदा भाषा अवगत होत्या. कुराणसुद्धा सोपे करून त्यांनी लिहिले आहे.
तुरुंगात असताना(राजकीय कैदी म्हणून) चारी दक्षिणी भाषा शिकले आणि वेळेचा सदुपयोग केला.

तेच. 'इश' च आहे पण श किंचित ष च्या जवळचा. पूर्ण ' ष' सारखा नव्हे. हवा थोडी जास्त रेटायची जिभेवरून.

हो बरोबर.
हवा सोडून षटकोन ष म्हणायचा.

तुम्ही उच्चारासाठी सीडी मिळते ती एका.
मी करणार आहे जर्मन शिकायला.सुरुवात केलेली पण इतकं व्याकरण की कंटाळून सोडलं.

मला मँडारीन मात्र शिकायचच आहे. पण ते पण उच्चारामध्ये किचकट आहे.

संस्कृत तसं येतं मला कारण श्लोक पाठ आहेत तितकच. आणि समजतं.
तेलुगु ह्या एकाच भाषेच इतकं काही कौतुक नाही( बहुतेक त्याचा काही लोकांवरील रागामुळे:))

@ विक्रम
Thanku thanku Vikram sir Happy

Buenos días

buenas tardes

buena noches

Got it

मी कन्नड शिकायला सुरुवात केलेली खूप वर्षापूर्वी, एका जुन्या शेजाऱ्यांकडून, अगदी डायरी वगैरे पण केलेली पण फार डोक्यावरून जायचं माझ्या. नंतर बहिण फ्रेंच शिकत असताना तिनेही प्रयत्न केले मला शिकवायचा पण नाहीच मला समजत लवकर किंवा ग्रास्पिंग power अगदीच अल्प किंवा नाहीच.

>> buena noches
वर्षू : कस होणार तुझ शिष्ये. noches नेहमी buenas असतात.

बर ज्यांना एक नविन भाषा शिकायची आहे कुठलिही चालेल त्यांच्या साठी एक आयडिया

बहासा इंडोनेशिया शिका. एकदम सोप्पी. मजा येईल. Happy
व्याकरण जवळपास नाही. म्हणजे काळ नाही, लिंग नाही, अनेक वचन नाही. क्रियापद आहे तशीच वापरायची असतात.
उदा : गेलो, गेले, गेले होते, जाणार आहे, गेलो होतो , जा, वगैरे साठी क्रियापद बदलत नाही. शिवाय खूप संस्कृत शब्द आहेत त्या भाषेत.
आपल्या संस्कृतीची ओळख पण होईल. आणि कधी बाली बेटावर गेलात तर उपयोग पण होईल.

Pages