तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात?

Submitted by केअशु on 15 August, 2019 - 08:43

आज १५ अॉगस्ट! स्वातंत्र्यदिन. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
दरवर्षी प्रमाणे 'मिले सूर मेरा तुम्हारा' दाखवण्यात आले.भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सगळे भारतीय म्हणून एक आहोत असा संदेश देणारं हे गाणं.

याचंच निमित्य म्हणून आपल्या माबोवर कुणाकुणाला कोणकोणत्या भाषा येतात त्याचीही माहिती शेअर व्हावी.म्हणजे मराठी,हिंदी,इंग्रजी या तीन भाषा सर्रास शिकवतातच शाळेत.त्यांचं काही विशेष नाही पण त्या सोडून अजून कोणत्या भाषा येतात का तुम्हाला?
माणसांची भाषा बरं का? नाहीतर मशिन लँग्वेजेस समजाल चुकून! Happy

कितपत येते?

वाचता येते की बोलता येते?

कि फक्त समजते?

कुठे शिकलात?

उद्देश काय होता शिकण्याचा?

कधीपासून शिकताय?

पूर्वी शिकलेली भाषा अजूनही येते की बर्‍यापैकी विसरलात?

पुन्हा त्या भाषेचा अभ्यास सुरु करावासा वाटतोय का?

शिकताना काही गंमत/फजिती झाली का?कसा होता अनुभव?

बापरे! किती ते प्रश्न? Wink

आता नमनाला घडाभर तेल न वाहता करा बरं सुरुवात सांगायला तुम्ही किती बहुभाषिक आहात ते? Happy

Group content visibility: 
Use group defaults

भारतीय भाषा शिकण्यासंबंधीच्या epub/pdf प्रकारातल्या काही पुस्तकांची उपयुक्त माहिती आणि दुवे. नितीन प्रकाशनाची प्रत्येक भाषेवरची पुस्तके आहेत.पण ती फार सखोल नाहीत.

50 Languages यांच्या प्रत्येक भाषेवरच्या स्वतंत्र अॅप्स आहेत.अतिशय सुंदर आहेत.जरुर वापराव्यात.

तरीही विशिष्ट भाषा जिथे जन्मली तिथल्या स्थानिक लोकांकडूनच ती शिकणे हा सर्वोत्तम मार्ग!

विविध भाषा शिकण्यासाठी प्रत्येक भाषेचे बरेच ग्रुप्स फेसबुक,टेलिग्रामवर आहेत.माबोवरही शिकवता येईल.पण भाषा शिकण्यासाठी सर्वात चांगला सोशल मिडिया म्हणजे व्हॉटसअॅप!

कोणाला भाषा शिकवणार्‍या WhatsApp वरील मोफत समूहांबद्दल माहिती हवी असेल तर विपुमधे विचारु शकता.(इथे लिंक दिल्यास मला माबोवरुन निरोप मिळायचा! ;))

----------------------------------------------------------

तमिळ शिका - नितीन प्रकाशन

तमिळ भाषा प्रवेश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%...

तमिळ-मराठी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%...

हा शब्दकोश सर्व शासकीय मुद्रणालयांमधे छापील स्वरुपातही विकत मिळतो.

https://www.youtube.com/playlist?list=PL41DA461A06758121

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.pdfdriv...

जोशी यांचा तमिळ-मराठी लघु शब्दकोश

https://www.scribd.com/document/367449690/मराठी-तमिळ-लघु-शब-दकोष-लेखिका-रमाबाई-जोशी-pdf

-------------------------------------------------------------
कोंकणीच्या बोली

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/COCHIN%20.epub

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Gawadi%20of%20Goa.epub

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Konkani%20of%20Kankon.epub

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Konkani%20of%20South%20kanara.epub

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Kundali.epub

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/Marathi%20of%20Kasargod.epub

---------------------------------------------------------------

तेलुगू शिका - नितीन प्रकाशन

तेलंगणातील आरे मराठा समाज/भाषा/संस्कृती

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%...
---------------------------------------------------------------
माडिया गोंडांची बोली

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%...
-----------------------------------------------------------------

बंगाली भाषा प्रवेश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%...(%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87)%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%20%E0%A5%A7.epub

बंगाली साहित्य परिचय

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%...

----------------------------------------------------------

उर्दू-मराठी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%...

----------------------------------------------------------

कन्नड शिका - नितीन प्रकाशन

कन्नड भाषा प्रवेश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%...(%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87).pdf

कन्नड -मराठी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%...

कानडी साहित्य परिचय

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%...

मराठी-कन्नड शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://www.kannada-...

https://www.youtube.com/user/aresumes
-------------------------------------------------------------------
गुजराती भाषा प्रवेश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%...

गुजराती-मराठी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%...
-------------------------------------------------------------------

पाली-मराठी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%...

--------------------------------------------------------------

फार्सी मराठी अनुबंध

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%...

------------------------------------------------------------

मराठी-सिंधी शब्दकोश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%...

----------------------------------------------------------

मल्याळम भाषा प्रवेश

https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%...
---------------------------------------------------------------

केअशु, खरंच उपयोजक आहात.
पुस्तकांच्या नेट साइटस फारच कामाच्या आहेत.
मायबोलीकरांची भाषेची आवड पाहून आनंद झाला. मला गुजराती भाषा समजते. इतर तमिळ,बांगला,कन्नड,मलयालम भाषा रापिडेक्स वाचून शिकण्याचा प्रयत्न करतोय. टिवी चानेलसवर पाककला कार्यक्रमांत बोलतात तेव्हा नेहमीच्या वापरातले शब्द समजू लागतात.
---------
युट्युबवर जर्मन, फ्रेंच, यांचे भाषा शिकण्याचे विडिओ आहेत. ते सतत ऐकता यावेत यासाठी त्याचे एमपी३ करून घेतो. विडिओमध्ये चित्र अशी नसतातच. फक्त एक वाक्य इंग्रजीत एकदा मग फ्रेंचमध्ये दोनदा असे ऐकवतात. तिथे एमपी३ फाईल उपयोगाची आहे. ती ओफलाईन फोनमध्ये राहाते.

केअशु, दिलेल्या यादीतल्या लिंकांना क्रमांक द्या.
तमिळ भाषा - युट्युब लिंका - विडिओ नॉट फाउंड आले.
बंगाली भाषा प्रवेश - 404 पेज नॉट फाउंड.

मराठी येते पण फार अशुध्द लिहितो. हिंदी, उर्दू, मोडी बोलता लिहिता येते. इंग्रजी बऱ्यापैकी येते.
जर्मन शिकायचा प्रयत्न करतोय पण अजिबात यश येत नाहीए.

मराठी हिंदी इंग्रजीव्यतिरिक्त
कन्नड बोलता येते. एकेक अक्षर लावत वाचता येते.
संस्कृत शाळेत शिकले तेवढीच.
गुजराती आणि मारवाडी साधारण समजते.

झंपी ग्रेटच आहे !!
तुम्हा सर्वांप्रमाणेच मलाही म. हिं. इं. लि.वा.बो. येते. गुजराती वा.बो. येते.. लिहीता येत नाही.

इंग्रजी, मराठी, हिंदी भाषा उत्तम प्रकारे बोलता, वाचता, लिहिता येतात. गेल्या २ महिन्यांपासून मी जर्मन शिकतोय. २ महिन्यांच्या मानाने प्रगती उत्तम आहे. बंगाली वाचता येते, बोलता मात्र येत नाही.

भारी आहे
सगळ्यांना जितक्या भाषा येतात त्या पाहून मोठा आ वासला आहे.जबरा आहात.
मला गुजराती वाचता येते, समजते, काही वाक्य बोलता येतात.नेहमी गुजराती शेजार मिळतो.
जर्मन लिहिता वाचता बोलता येते.
मराठी(बरीच),इंग्लिश(टेक्निकल संभाषण, या भाषेत भांडता येत नाही), हिंदी आता सगळे चुकीची हिंदी ऐकून घेतात, कोणी चूक काढत नाही म्हणून आळशीपणाने बिघडलीय(आता कालचं उदाहरण "हसो मत.एकदम बरोबर बेरीज किया है मै. गलत नही बताया" आणि "वो जीनेपर बडे बाजू से जाओ, शेवाळा है" ही आहेत.)

>>गेल्या २ महिन्यांपासून मी जर्मन शिकतोय.

तुम्ही कुठे जर्मन शिकताय? क्लास लावला आहे का? ऑनलाईन शिकत असाल तर कुठे माहिती देऊ शकाल का? धन्यवाद. मी सध्या यूट्यूबवर Anja (आन्या?) नावाच्या मुलीचे लेसन्स बघत आहे.

सगळ्यांना जितक्या भाषा येतात त्या पाहून मोठा आ वासला आहे.जबरा आहात. >>> टोटली!

केअशु, चांगला धागा आणि चांगली माहिती, लिन्क्स वगैरे देत आहात.

मला आपले नेहमीचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी. संस्कृत थोडेफार समजते. त्याच्यापुढे नाही. त्यातही हिंदी हे शाळेनंतर लेखी कधी लिहीले नाही, त्यामुळे आता नक्कीच चुका होतील लिहीताना. पण अजूनही हिंदीतल्या वेलांट्या, उकार बरोबर लक्षात आहेत असा माझा समज आहे. हिंदीत लिहीलेले वाचायचा मात्र भयंकर कंटाळा येतो. का ते माहीत नाही.

इंग्रजीला भारतीय अ‍ॅक्सेण्ट नक्कीच आहे पण भारतात असताना होता तितका जड आता नाही. भारतीय अ‍ॅक्सेण्ट आणि अमेरिकन अ‍ॅक्सेण्ट याच्या मधे कोठेतरी आहे. इथल्या इमिग्रण्ट लोकांच्या इंग्रजीवरून त्यांची मूळ भाषा ओळखायचा प्रयत्न करणे हा एक आवडता उद्योग आहे.

एकदा जर्मन, एकदा स्पॅनिश शिकायचा प्रयत्न केला पण उत्साह टिकला नाही. एखादी तरी युरोपियन आणि दक्षिण भारतीय भाषा यावी असे अजूनही वाटते.

मातृभाषा सोडून?
हिंदी येते.
इंग्रजी येते.
Java बेसिक +ॲडव्हांस येते.
C बेसिक येते
C++ बेसिक येते.
Python अगदीच थोडी फार येते.
पणं Java, C, C++, Python यांचा सराव सुटलाय जरा.

संस्कृत शिकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

वाह छान धागा, त्या निमित्ताने कळले इथे कित्येक multi linguistic आहेत
मला हिंदी मराठी इंग्लिश व्यतिरिक्त इंडोनेशियन आणी मॅन्डरिन अस्खलितपणे बोलता /वाचता येते
कामचलाऊ थाय आणी स्पॅनिश
सध्या स्पॅनिश चा सखोल अभ्यास सुरू आहे

मला मराठी,इंग्रजी,हिंदी लिहीता,वाचता,बोलता येते,
संस्क्रीत वाचता येते, थोडेफार समजते,जर्मनीत राहात असल्याने जर्मन येते b1 level

तमिळ व्हिडिओ दुवे - युट्युब डाउनलोड करून पाहिला. त्या शिक्षकाचा बोलणं फार घुमतय. शिवाय डेटा बंद केल्यावर ओफलाईन का चालत नाही? युट्युब गो' वर डाउनलोड केलेला ओफलाईन प्ले होतोय.

वर्षा वर्षू, बुएनास नो ए कोरेक्तो. एस्ता ए बुएनोस ड्जियास. Happy
"बुएनास" नाॅचेस असतात. Happy

Pages