ज्वारीच्या लाह्या by Namrata's CookBook : १४

Submitted by Namokar on 12 August, 2019 - 08:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

खरतर नागपंचमीसाठी ही पाककृती लिहायची होती पण काही अडचणींमुळे जमले नाही
Sorghum 1.jpg

साहित्य:
१ कप ज्वारी
२ कप पाणी

क्रमवार पाककृती: 

१. पाणी गरम करा
२. ज्वारी गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवा
Screenshot_2019-08-12-16-25-47-734_com.google.android.youtube.png
३. आता यातील पाणी काढून टाका आणि कॉटनच्या कपड्यावर छान वाळेपर्यंत पसरवा / कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवा (त्यालाच उमले म्हणतात)
Screenshot_2019-08-12-16-26-23-072_com.google.android.youtube.pngScreenshot_2019-08-12-16-26-39-736_com.google.android.youtube.png
४. आता कढई गरम करायल ठेवा
८. जेव्हा कढई गरम होईल तेव्हा त्यात वाळलेली ज्वारी घाला
९. नॅपकिन / सूती कपड्याने नीट हलवायचे आहे
Screenshot_2019-08-12-16-30-22-632_com.google.android.youtube.png
१०. काही मिनिटांत ज्वारीच्या लाह्या /ज्वारीचे पॉपकॉर्न तयार होतील
Sorghum 2.jpg

अधिक टिपा: 

*ज्वारी ४ ते ५ तास वाळवून जर लाह्या करायला घेतल्यातर ५०% पेक्षा कमी ज्वारीच्या लाह्या तायार होतील
ज्वारी पुर्ण नीट वाळवलीतरच जास्त लाह्या तयार होतील
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/FXOprlNCvQc

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast ahe.tayar pakite aanayache kinva makyache Dane gheun kele hote.
छान पाकृ, तुमचा प्रोफाइल फोटो सुद्धा सुंदर आहे...... +१.

मस्तच....
गावी आजी करायची आता विकतचे असतात.

छान झाल्यात लाह्या. माझी आजी ज्वारी च्या लाह्या भरपुर करायची. आमच्या कडे जाते होते त्याच्यावर दळून त्याचे पिठ ही करायची. तुप गुळ घालुन मस्त लागायचे. लाडू ही बनवायची त्याचे. फोडणीच्या लाह्या ही करायची.
आता आई फक्त नैवेद्यापुरत्या लाह्या करते. आमच्या कडे लाह्या साठी वेगळी ज्वारी मिळते. ती पाण्यात भिजत नाही घालावी लागत.

ज्वारी किती वेळ वाळवायची? ४ ते ५ तास वा़ळवळी तर नीट बनत नाहीत असे म्हणायचे आहे ना? थोडी ओलसर असताना बनवायला सुरुवात करु शकतो का?