निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1
IMG-20250305-WA0002.jpg
2
IMG-20250305-WA0001.jpg

ऋतुराज, कैलासपतीचे तीनही फोटो फार सुरेख आहेत.

रमड, काय अफलातून रंगांची उधळण आहे. कोणती फुलं आहेत ही?

ऋतुराज, बंगलोरला जानेवारीत गेले असता तिथे ब्राईट केशरी रंगांची जरा मोठीशी फुलं खूप फुलली होती. वृक्षही मोठ्ठे होते आणि रस्त्याच्या कडेला सावलीसाठी लावले होते. कोणती फुलं असावीत? मी गुगल करून फोटोची लिंक देते.

Spathodea companulata किंवा आफ्रिकन ट्युलिप ट्री असं नाव दिसतंय. याला काही भारतीय नाव आहे का?

https://www.wildwanderer.com/flowering-trees/ इथे सर्वात शेवटचा फोटो आहे.

मामी, ह्यांच मराठी नाव माहित नाही पण लोकल भाषेत कारंज्याच फुल म्हणतात कारण फुल प्रेस केलं तर पाण्याचा फवारा उडतो त्यातून म्हणून.
केशरी रंग फारच सुदिंग असतो ह्याचा.

सर्वप्रथम हा धागा वाहता केल्याबद्दल सर्वांचे आभार. Happy

भरत, साधनाताईंनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बागेतील झाड लहान असल्याने अजून फळधारणा होत नसणार.
तरीही कारण शोधून पाहतो.

मनिम्याऊ, तुमच्या कैलासपतीच्या फुलांचा रंग गडद आहे.
आणि ते मागे घुबड भारी आहे.

मामी,
बरोबर. याच्या फुलांचा आकार ट्युलिप सारखा असतो म्हणून आफ्रिकन ट्युलिप हे नाव. सध्या सगळीकडे बहरात आहे. याला पिचकारी अस एक नाव आहे.याच्या फुलांच्या कळ्या दाबल्यावर पिचकारीसारखे पाणी उडते म्हणून त्याला पिचकारी किवा फाऊंटन ट्री म्हणतात.
अजून एक नाव म्हणजे आकाश शेवगा.
कारण याची फुले टोकाला येतात आणि मग नंतर शेंगा (शेवग्यासारख्या) ताठ उभ्या राहतात आकाशाच्या दिशेने.
पण मुळात हे झाड भारतीय नाही पण आता सर्रास सगळीकडे दिसतं.

साधना आणि ऋतुराज म्हणतात ते बरोबर असावं. कारण मागच्या बाजूच्या झाडांचे बुंधे चांगले मोठे होते. याचा बारीक आहे.
ऋतुराज, हे झाड बागेत नाही. रस्त्याच्या कडेला आहे. समोरच्या सोसायटीच्या गेटच्या अगदी बाजूला. फोटोत गेट दिसतो आहे.
त्याला फळं येऊ लागली आणि खाली पडू लागली की या झाडाचं काही खरं नाही. तिथे कारही उभ्या असतात. मागच्या बाजूचं झाडही रस्त्याच्या कडेलाच आहे. पण तो रस्ता कमी रहदारीचा आहे.

भरत
गाड्यांना धोका नाही.
कारण याला मुख्य बुंध्यालाच फळे येतात.
यामुळे ती गाडीवर पडणार नाही

धन्यवाद सगळ्यांना.
@मामी, या फुलांचं नाव Ranunculus आहे. यांना बटरकप्स पण म्हणतात.

आफ्रिकन ट्युलिपची माहिती छान. अनेक वर्षांपूर्वी मी असं एक झाड कर्वेनगरात पाहिल्याचं अंधुक आठवतंय.

@मनिम्याऊ, सुंदर फोटोज.

युट्युबवर ही मुलाखत ऐकली. छान वाटली म्हणून शेअर करत आहे.

देवराई म्हणजे नुसते देवळाभोवती लावलेले जंगल नाही. देवराईला परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धा आहेत, गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात देवराईबद्दल भीती, आदर आणि प्रेम देखील आहे. ते का ? देवराई निसर्गाला आणि समाजाला कशी जोडते ? या एपिसोड मधे, देवराई हा विषय समजून घेण्यासाठी आपण "देवराई आख्यान" या पुस्तकाच्या लेखिका आणि AERF संस्थेच्या संस्थापक अर्चना जगदीश, यांच्याशी गप्पा मारल्या आहेत.
अर्चना जगदीश यांनी जंगल वाचवण्यासाठी आपला सरकारी जॉब सोडला. अर्चना आणि AERF टीम, गेली 30 वर्षे देवराई अभ्यास, संशोधन, जंगल जतन आणि संवर्धनाचे काम भारतात करीत आहे. त्यांनी आजवर 13500 एकर पेक्षा जास्त जंगले जतन आणि संवर्धन केली आहेत. त्यामधून कित्येक रोजगार देखील निर्माण झालेत. देवराई हा विषय आणि AERF च्या कामाचा impact हे सर्व जाणून घेवूया या podcast मधे!

हजारो एकर जंगल वाचवणारी अवलिया | अर्चना गोडबोले | Ep 46| Granthpremi Marathi Podcast
: https://www.youtube.com/watch?v=qCedHW1mx5k

अनिंद्य
वॉकिंग बडीज भारीच 😍
कुठे गेला होतात सकाळी सकाळी केकारव ऐकायला.

मामी मस्त.
मी भेटलोय अर्चना गोडबोलेंना
संवर्धनाबरोबर रोजगार निर्माण झाला पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला आहे.

Hi
The location : Outskirts of Hyderabad

मी भेटलोय अर्चना गोडबोलेंना. >> अरे वा.
संवर्धनाबरोबर रोजगार निर्माण झाला पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. >>> हो ते मुलाखतीतून जाणवतं.

लाल झुंबरचं नाव काय? सुंदर आहे अगदी. वरचं हळदीकुंकू पण मस्त.

अनिंद्य, असे मित्र असतील तर रोजच्या वॉकची आतुरतेने वाट पाहिली जाईल Happy २ वर्षांपूर्वी संगमनेरला पाहिले होते असे शेतात बागडणारे मोर.

ऋतुराज भारी फोटो. Happy
रमड, 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' मधला नजारा आहे अगदी. Happy
अनिंद्य , वाह. मोर Happy

अहाहा ! ❤

कुसुंबी रंग का म्हणतात नीटच समजते आहे फुले पाहून

रक्ताम्र नाव फार आवडले.

Pages