निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा उकरुन बघ. रताळे म्हणजे अमरवेल. कधीही मरणार नाही. रताळी काढुन घ्यायची, वेल तसाच ठेवायचा.

रताळी साधारण सहा महिन्यात तयार होतात बहुतेक.

ठीक आहे साधना, उद्याच बघते.
बाकी तुमची आंबोली शेती ची लेखमाला करा ना सुरू परत. खूप माहितीपूर्ण आहे.

वेल अजून बराच हिरवा आहे आणि काही शाखा पिवळ्या पडल्यात. >>> एकदम गुलजार टाईपचं वाक्य झालंय हे - पत्ते सब्ज और शाखें पिलीसी है Happy

गुलबदन आणि मदन पुतळा फारच सुंदर.

सुरंगीचे फोटो अप्रतिमच. आधी पाहिले होते पण इथे पुन्हा एकदा कौतुक करायचा मोह आवरला नाही.

^^एकदम गुलजार टाईपचं वाक्य झालंय हे - पत्ते सब्ज और शाखें पिलीसी है Happy^^
खरंच की....
सध्या गुलजार खूप ऐकते आहे, त्याचा परिणाम असावा Wink

वळेसार म्हणजे मुंबैच्या भाषेत गजरा पण मालवणी व कोकणीत प्रत्येक प्रकारच्या गुंफण्याला वेगवेगळी नावे आहेत. अबोली सुरंगीचे वळेसार. शेवंतीच्या पाती, जाई जुई सायलीचे गजरे इत्यादी…. >>>>> वा!

शेवंतीच्या वेण्याही म्हणतात.

खोदा पहाड, चुहा भी नहीं निकला. Sad Sad
सगळी कुंडी उकरली पण इंचभर रताळे नाही मिळाले ...
वेल तर खूप मोठा झालाय आणि ७ _८ महिने झाले असतीलच.
Bhyyyyyaaaaaa....

आता मी नि ग वर मा का चू धागा सुरू करते ...

पुष्पभार मज सोसवेना …

चाफोत्सवातला आजचा पाहुणा.

33dad28c-77bc-4f28-8cc2-6eff1e51fa34.jpeg

याचा सुगंध तीव्र आहे. दरवळ दूरवर पोहचतो.

मामी मुंबैत शेवंतीची वेणी म्हणतात.. मालवणी व कोकणीत पाती.

पाती ल्यायलेल्या डोक्याचा एक मस्त फोटो आहे पण इथे फोटो डकवायचे सव्यापसव्य खुप आहेत, त्यामुळे कंटाळा..

मनिम्याऊ
rmd

असे रस्ते असतील तर “कभी खत्म ना हो ये सफर“ असेच वाटणार

टोटली अनिंद्य. अशा छान छान रस्त्यांचे काही व्हिडिओज असतील माझ्याकडे. त्यांचे स्क्रीनशॉट्स टाकते इथे सवडीने

आजचा चाफा अगदी पवित्र लूक वाला. त्याचा दरवळ इथे पोहोचत असता तर फार आवडलं असतं.

गुलमोहोर, जकारांदा.... अप्रतिम.

मामी मुंबैत शेवंतीची वेणी म्हणतात.. मालवणी व कोकणीत पाती. >>> हो.

पाती ल्यायलेल्या डोक्याचा एक मस्त फोटो आहे पण इथे फोटो डकवायचे सव्यापसव्य खुप आहेत, त्यामुळे कंटाळा.. >> मला पाठव. मी टाकते तुझ्यावतीनं

माझ्याकडे दोन गार्डन एंजल्स आहेत. गार्डियन नव्हे, गार्डन एंजल्स. दोन्ही सिरॅमिकमधे आहेत. अनिंद्य यांनी सिरॅमिकच्या धाग्यावर सुचविल्याप्रमाणे इथे टाकत आहे.

हा आहे मोठा handmade व्हास. यात फुलं इ ठेऊ शकतो. या परीला दोन चिंटुकले त्रिकोणी निळे पंख आहेत. तिच्या भोवती झाडं आणि गुलाबाची फुलं आहेत. आकाशात सूर्य आणि ढग दिसत आहेत तर मागे डोंगरही दिसत आहेत.

IMG_20250315_120448_(1080_x_1080_pixel)_0.jpg

ही एक नेहमीच्या आकाराची टाईल आहे. यावरचा मेसेज खूप मस्त आहे.

Everything that blooms and grows
Gardening Angel scatters and sows.

IMG_20250315_120534_(1080_x_1080_pixel)_0.jpg

मामी, एंजल्स भारी आहेत.

मनिम्याऊ , डोळे निवले रस्ता पाहून

माधव, फॉल कलर्स प्रचंड लाडके ❤️

अनिंद्य, एकूण किती प्रकारचे चाफे आहेत तुमच्या गच्चीत?
चाफा खूप आवडते झाड आहे का तुमचे?
एकदा भेट द्यायला हवी तुमच्या खाजगी बागेला....

Has very limey smell >>> हा कधी पाहिला नाहीये.

एकदा भेट द्यायला हवी तुमच्या खाजगी बागेला.... >>> +१

चाफा खूप आवडते झाड आहे का तुमचे…

होय. माझा इथला DP बघून अंदाज आलाच असेल. Happy

भरपूर आहेत.

बोगनवेलीही. चाफा झाला की त्यांचे फोटो येतील.

पत्ते सब्ज और शाखें पिलीसी है>>>>> वाह rmd वाह.
आता मी नि ग वर मा का चू धागा सुरू करते ...>>>>> Lol
पुष्पभार मज सोसवेना …>>>> दरवळ पोचला.
गुलमोहोर, जकारांडा... >>>>>> जबरदस्त..

मामी, गार्डन एंजल्स मस्तच आहेत.
मनिम्याऊ, डोळे निवले रस्ता पाहून
माधव, फॉल कलर्स फारच सुंदर आहेत. प्रत्यक्ष कधी पाहिले नाहीत.

Has very limey smell >>> Awesome...
एकदा भेट द्यायला हवी तुमच्या खाजगी बागेला.... >>> +१

Pages