" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
आंबाडी आहे ही.
आंबाडी आहे ही.
अंबाडी
अंबाडी
अश्विनी११ .. आलं 9 ते 10
अश्विनी११ .. आलं 9 ते 10 महिन्यात येतं
नवनवीन कोंब येताहेत म्हणजे पसरतंय छान.
पानं पिवळी दिसायला लागली की पाणी दोन दिवसाआड घालावं,म्हणजे चांगलं भरतं
अजून एक खूण म्हणजे फुलाचा कोंब येतो, तेव्हा व्यवस्थित तयार झालेलं असतं
धन्यवाद तेजो , अजून फुलाचा
धन्यवाद तेजो , अजून फुलाचा एकही कोंब दिसला नाहीये . म्हणजे उकरून काढायची घाई करू नको ना ? नंतर असे वाटायला नको उगाच काढले , म्हणून विचारले , धुमारे साधारण फूट- दीड फूट उंच झालेत
आले, दीड दोन वर्षांनी काढा
आले, दीड दोन वर्षांनी काढा.छान जून आले मिळेल.
धन्यवाद. अंबाडीची झाड अशी
धन्यवाद. अंबाडीची झाड अशी असतात माहीत नव्हते. लगेच माबोवरील अंबाडीच्या पाककृती शोधल्या. बनवून बघेन भाजी.
अश्विनी11,, अगदीच शंका वाटत
अश्विनी11,, अगदीच शंका वाटत असेल तर पिवळ्या पडलेल्या पानाच्या खाली अगदी हळुवार पणे उकरुन बघा, अंदाज येईल (उपटू नका)
धन्यवाद सगळ्या सुचनांबद्दल .
धन्यवाद सगळ्या सुचनांबद्दल . थांबते थोडे दिवस अजून.
सप्तपर्णीचे झाड अशा कळ्यांनी
सप्तपर्णीचे झाड अशा कळ्यांनी की फुलांनी नखशिखांत डवरले आहे.थँक्स टू मायबोली,कारण अगदी घराजवळ असलेल्या या झाडाचे नावही माबोमुळे कळले.झाडांकडे जरा आवर्जून लक्ष जाऊ लागले.
तिसर्या मजल्याच्यावर हे झाड आहे.संपूर्ण झाडाचा फोटो घेता आला नाही.आज दुपारी अवचित याच्याकडे लक्ष गेले.
याचा एक मंद सुगंध पण
याचा एक मंद सुगंध पण वातावरणात भरून राहतो.
याचा एक मंद सुगंध पण
याचा एक मंद सुगंध पण वातावरणात भरून राहतो.....काही जाणवला नाही आज.उद्या परत जाते त्या झाडापाशी.
खरेच इतक्या वर्षात कधी त्याच्याकडे लक्ष गेले नाही.सकाळी ऑफिसची घाई,संध्याकाळी काळोख असायचा.नाही म्हणायला झाड लहान होते,त्यावेळी चवळीच्या shengesarkhye अनेक धागे(?) पानांच्या झुपक्यातून बाहेर आलेले पाहिले होते.
आजचा तर प्रकार खूप वेगळा दिसला.
(No subject)
गेली दोन वर्षे म्हणजे कोविड
गेली दोन वर्षे म्हणजे कोविड काळात ही सातवीणाची झाडे अतोनात फुलली आहेत. अगदी वर्षानुवर्षे न फुललेली झाडे गेल्या वर्षी फुलली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलीत. गेल्या आठवड्यात चारकोप भागात जाणं झालं. आणि माझा मलाच तो भाग नवखा वाटला. ही झाडं भरगच्च फुलली होती आणि फुलांचा मंदसुंदरसा दरवळ दूरवर पसरला होता. बंगालमध्ये शांतिनिकेतनात अशी खूप झाडं आहेत. 'छतीन ' म्हणतात तिकडे ह्याला आणि हे त्यांचे ' राज्य फूल ' आहे.
हे कसले मूळ आहे कोणाला माहित
हे कसले मूळ आहे कोणाला माहित आहे का?
हळद किंवा आंबे हळद नाही कारण तसा वास नाही याला..
आल नाही ना?
आल नाही ना?
सोनटक्काही असू शकतो.
सोनटक्काही असू शकतो.
मी ऑक्टोबरमध्ये कुंडीत
मी ऑक्टोबरमध्ये कुंडीत खोचलेल्या आले काढण्यासंबंधी प्रश्न विचारला होता. पाने पिवळी पडायला लागली म्हणून उकरून काढले .तर........... खोदा पहाड, निकला चूहा झालंय.
सुप्रभात कोरंटी
सुप्रभात
कोरंटी
किती सुरेख, कसलं फूल आहे?
किती सुरेख, कसलं फूल आहे?
अबोली?
काय सुंदर रंग आहे कोरांटीचा.
काय सुंदर रंग आहे कोरांटीचा. अबोलीसारखा. मस्त.
फ़ार सुंदर. अबोली कोरान्टी
फ़ार सुंदर. अबोली कोरान्टी
हो अबोली रंगाची आहे. नविन
हो अबोली रंगाची आहे. नविन मागवला आहे.
सुप्रभात
सुप्रभात
हजारी मोगरा
हजारी मोगरा
मस्त. सकाळी सकाळी मोगरा आणी
मस्त. सकाळी सकाळी मोगरा , चाफा आणी जागूताई. मन प्रसन्न झाले. आजचा दिवस चांगला जाणार.
जागू ताई, हजारी मोगरा कटिंग
चाफा, हजारी मोगरा.. अहाहा...
जागू ताई, हजारी मोगरा कटिंग पासून रुजतो का? की मुळातून आलेले नवीन रोप लावावे लागते?
धन्यवाद स्मिता आणि रचना.
धन्यवाद स्मिता आणि रचना.
रचना हजारी मोगरा मुळातून आणि फांदीपासूनही जगतो.
तजेलदार पिंपळपान
तजेलदार पिंपळपान
आज फुललेली कुमिदिनी (वाॅटर
आज फुललेली कुमिदिनी (वाॅटर लिलि)
मस्त जागुतै!
मस्त जागुतै!
Pages