निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गार्डनमध्ये बाकावर बसल्यावर मागच्या झाडातून अखंड चिवचिवाट चाललेला. म्ह्टलं कोण आहे बघूया. तर हा पक्षी दिसला. (तो/ती ठाऊक नाही) अगदी आतमध्ये शक्य तितक्या पानांमध्ये लपत गायन चालू होते. या कॉमन स्टर्लिंगला बघून मला कोकिळा (फिमेल) ची आठवण झाली. अशीच ठिपकेवाली असते ना ती.

वर्षा फोटो मस्तच. हा कुठे दिसला? मी पुण्यात पाहिला होता. तो पुर्ण काळा व अंगावर ठिपके होते. डोके वेगळ्या रंगाचे नव्हते. मित्राने त्याचे नाव युरोपीअन स्टर्लींग सांगीतले होते. त्याच्या शेजारच्या फांदीवर अजून एक पक्षी पाहीला पण त्याचे नक्की नाव कुणालाच सांगता आले नाही. मी शोधतो फोटो.

>>वर्षा फोटो मस्तच. हा कुठे दिसला?

न्यूजर्सी. हो युरोपियन स्टर्लिंग पण असतो. मी नॉर्थ अमेरिकन बर्ड ग्रूपवर विचारलं तर तिथे हा कॉमन स्टर्लिंग आहे असं सांगितलं..

मराठी नाव: ठिपकेदार मनोली
इंग्रजी नाव : Scaly breasted Munia (Spoted Munia)
शास्त्रीय नाव: Lonchura punctulata
आकार: ११ सेंटीमिटर
विणीचा हंगाम: साधारण जुन ते ऑगस्ट
F9AFBCC3-7B3C-4156-8E65-831595ADA4DE.jpeg
ऋतूराजच्या म्हणन्यानुसार शास्त्रीय नावे इटालीक्समधेच लिहितात. काय कारण असेल? मला कधीच या नावांचा उच्चार करता येत नाही. अर्थ मात्र थोडा थोडा समजायला लागला आहे.

कार्ल लिनीयस या महान शास्त्रज्ञाने सजीवांच्या वर्गीकर्णाचा फार मोठा अभ्यास करून त्या विषयात खूप मोलाचे योगदान दिले. द्वीपदी शास्त्रीय नाव हे त्याचे योगदान. यामुळेच कोणत्याही सजीवाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अचूक ओळखता येते.
ही पद्धत त्याने आचरणात आणली आणि त्या वेळी ही नावे इटालिक्स मध्ये लिहिली गेली व तो प्रघात अजूनही चालू आहे. असे लिहिल्याने ती नावे इतर माहितीत उठून दिसतात व नजरेस पडून ओळखणे सोपे जाते.
ही नावे सुरुवातीला देताना लॅटिन व ग्रीक भाषेतील अनेक रूप, गुधर्मविषयक शब्द वापरले गेले. त्यामुळे ती किचकट वाटतात, परंतु त्यांचे अर्थ उमगले की ती नावे लक्षात ठेवणे सोप्पे जाते.
तसेच बऱ्याच प्रजातींना काही व्यक्तींच्या स्मरणार्थ नवे दिली आहेत.
रंग, रूप, देश, स्थळ, पौराणिक संदर्भ इत्यादींचा या नावात समावेश आहे.
सजीवांचे वर्गीकरण हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे

ही नावे सुरुवातीला देताना लॅटिन व ग्रीक भाषेतील अनेक रूप, गुधर्मविषयक शब्द वापरले गेले. त्यामुळे ती किचकट वाटतात, परंतु त्यांचे अर्थ उमगले की ती नावे लक्षात ठेवणे सोप्पे जाते. >> अगदी अगदी . ब्लॅक बर्च ला Betula nigra, काळ्या मिरीला Piper nigrum अशी नावं आहेत. त्यातले स्पीशीज चे नाव रंगावरुन आलेलं आहे.

एक प्रकारचा मेपलला एसर पामॅटम म्हणतात. तर मेपल सारखी पाने असलेल्या अजुन एका वृक्षाला प्लॅटॅनस एसरीफोलिया म्हणतात.

बॉटनिकल लॅटिन माझा आवडता विषय होता एकेकाळी ...

जबरदस्त फोटो सर्वच. बाकी लिखाण वाचलं नाही, सावकाश वाचते.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा! अन्जू तुम्हालाही खुप शुभेच्छा!
ऋतूराज छान माहिती. तुझ्याकडून नेहमीच काही ना काही मस्त माहिती मिळते.
मेधा तुमच्याकडे माहितीचा खजीना असणार. येथे लिहा खुप.

Purple sunbird चा eclipse फोटो मस्तच
वेडा राघू पण मस्तच
ते शेवटच्या फोटोतल्या ढगांच्या कडा संधीप्रकाशाने प्रदीप्त झाल्याने मस्त दिसताहेत,
मेघदूतात उज्जैनला, महाकाळेश्वराला जाताना मेघाला सायंकाळच्या तांबड्या आकाशाचे गजासुरच्या नुकत्याच सोललेल्या कातड्याची उपमा देऊन शिव तांडव करत आहे असे वर्णन आहे.

हे नक्की eclipse plumage आहे की हा juvenile आहे? ही जोडी होती. दुसरा शिंजीर पिवळा होता. तो फोटो क्लिअर आला नाही पण येथे देतो. नेटवरही मला यांची माहिती जरा गोंधळात टाकत आहे.

ही त्याच्या सोबत होती. मी हिला मादी समजतोय.

आणि हा कांचनाच्या फुलांवर फिरत होता. याला मी तरी juvenile समजतो आहे. नर आहे. पण Purple Sunbird आणि Purple rumped sunbird यांच्यात फरक आहे. Purple rumped चे डोके निळसर असते व अर्धी छातीही निळसर असते. पोट पिवळसर. आता हा जर plumage मधून जात असेल तर नंतर पुर्ण निळसर होईल Purple sunbird सारखा की याचे पोट पिवळे होईल purple rumped सारखे?

आणि अजुन एक. हा वटवट्या गेले दोन तिन दिवस माझ्या बाल्कनीजवळच्या झाडावर येतो. juvenile वाटत नाही पण त्याला शेपटीच नाहीए. गळून पडल्यासारखी वाटते.

जाता जाता अजुन एक फोटो. कांचन चांगलाच फुलला आहे आणि त्याची पानगळही सुरु आहे.

बहुतेक फोटो Nikon Coolpix P900 ने काढले आहेत.
काही फोटो Nikon D7200 ने काढले आहेत. लेन्स: Nikkor 200-500.
आणि काही फोटो iPhone 7 Plus ने काढले आहेत. Happy

There is little visible difference between the sexes in most of the family, although in several species the iris is red in the males and brown-red in the females.
(माहिती शशांकदांकडून. मी वेडा राघूचे फोटो काढताना याची खुपदा नोंद केली होती पण हा फरक नर व मादी यात असेल असेल हे लक्षात आले नाही. नंतर अंदाज आला पण लाल डोळ्यांचा नर की मादी हे समजेना. शशांकदांनी स्पष्ट केले.)
FF70451A-478C-4E73-9C46-E9F32B86F757.jpeg

छत पे निकला होगा चॉंद...
F6E9FBE8-A6AC-4E8B-BFC9-103227159CE1.jpeg
.
97C67465-5DFD-4454-96D4-EFDECFC02606.jpeg
फोटो कधी काढलेत आठवत नाही. द्वितेयेचा चंद्र आहे हे आठवतय कारण हे फोटो पाहून शशांकदांनी फार सुरेख कवितेच्या ओळी पाठवल्या होत्या.

चंद्र खुलतो अधिक
मेघ आजूबाजू देख
एक एक चांदण्यांनी
आभाळात नक्षीरेख

उमलता पश्चिमेस
द्वितीयेची चंद्रकोर
सलज्जशा गाली खळी
जिवणीची अर्धकोर

There is little visible difference between the sexes in most of the family, although in several species the iris is red in the males and brown-red in the females.>>>>>>हि माहिती माझ्यासाठी नवीन

चंद्रकोर मस्तच.

Pages