अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 July, 2019 - 00:11

एक जुना किस्सा आठवतो.
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला दर्शनाच्या रांगेत उभे असल्याचे दिसले असे सांगितले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे.
वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते.
कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात.
अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मन शांत ठेवायला श्रद्धेच्या कुबड्याच लागतील अशी व्यवस्था करणं म्हणजे मन दुबळं ठेवणं.

+१११ वा! एका वाक्यात

पळण्याच्या शर्यतीत नेहमी दुसरा येणारा मुलगा , फक्त आज आई स्पर्धा पहायला आली या आनंदाच्या जोषात आज पहिला आला तर ते त्या माउलीच्या उपस्थितीमुळेच घडले नाही का ? ही श्रद्धा च तर विस्मय्कारक घटना घडायला कारणीबूत होउ शकते!!!
विचार करा या द्रुष्टीकोनातून.
>> मग आईला कामधंदा सोडून बाळाबरोबर प्रत्येक स्पर्धेवेळी हजर रहावे लागेल.

मला असे वाटते की जेव्हा आपली परिस्थिती चांगली असते तेव्हा आपण जास्त रॅशनल विचार करू शकतो किंवा करण्याच्या क्षमतेत असतो
तेव्हा मग मानसिक दुबळेपणा वगैरे वर भाष्य करायचे धैर्य येते
याउलट दीर्घ आजारपण, खालावलेली आर्थिक परिस्थिती, ओढगस्ती, अनेक प्रयत्न करूनही यश न मिळणे यातून कोणी जात असेल तर त्याला चटदिशी यातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा असतो
हा मनुष्य स्वभाव आहे
आशा वेळी धीर धरणे, चिकाटीने प्रयत्न करत राहणे हे सगळ्यांनाच जमेल असे नाही आणि मग त्यावेळी दैव वादाचा आसरा हवाहवासा वाटतो
मी कोणाचं वाईट केले नाही आणि आता देवच मला यातून बाहेर काढेल अशी भावना एकदा बळावल्यावर हा सोपा मार्ग वाटू लागतो

आशु +1
डाऊनटर्न मध्ये त्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे. मन दुबळे होतंय का समाजात अंधश्रद्धा पसरताहेत का आणि काय होतय हे अत्यंत गौण आहे.
मी माझं मन दुबळे होऊ नये आणि डाऊनटर्न मध्ये काही बावळट श्रद्धाळूपणा करू नये अशी ईश्वर Wink चरणी प्रार्थना करतो.

फक्त संकटात सापडल्यावर देवाची आठवण येत असेल तर त्यालाही अर्थ नाही.

दुख में सुमीरन सब करे सुख में करे न कोय
जो सुख में सुमीरन करे दुख काहे को होय

अर्थात सगळं ठीक असताना मातलात, देवाची आठवण ठेवली नाहीत, म्हणूनच तुम्हाला आपटी बसली. आता देवाने तुमच्यासाठी का धावून यावं ?

अहो देव कधीच काही करत नाही, रादर तो अस्तित्वात नाही हे माझं ठाम मत आहे. उद्या कठिण प्रसंग आला तर तो सर्वस्वी माझ्या मूर्खपणामुळे किंवा रँडम ऑकरन्स (म्हणा किंवा दैवाचे फासे उलटे पडले म्हणा.. ) मुळे येणारे. त्यात सदसदविवेकबुद्धी शाबुत ठेवून मी वागेन असं आज मला वाटतं. पण कोणी सांगावं?
माणसं बदलताना बघितली आहेत, मनावरचा ताबा सुटलेली व्यक्ती.. जिने आपल्या आयुष्यात कधी वाईट शब्द उचारलेला माहित नाही.. अर्वाच्च्य बोलताना बघितली आहे. माझ्या पानात काय वाढलेलं असणारे आणि त्यातुन मार्ग काढताना काय काँप्रोमाईजेस लागतील ती काय सांगावी? फक्त त्यात दैववादी कॉंप्रोमाईज असू नये इतकंच आज वाटतं. पराधीन आहे जगती स्टेज कधीही न येवो. मार्ग काढायचे बळ मिळे.. तो काढायचा कंटाळा आला तर ठेविले अनंते स्टेज आली तरी चालेल... पण भविष्य, दैव, पोथ्या वाचुन त्यातुन बाहेर पडण्याची कामना मनी न येतो असं वाटतं.

बाकी देव हा मेडिकल इन्श्युरंस सारखा असेल तर तरुण वयात, जेव्हा लाथ मारेन तिथे... असतं तेव्हा कमी किंवा अजिबात न आठवणे आणि वय वाढू लागलं, व्याधी वाढू लागल्या की जास्त पैसे भरून कव्हरेज वाढवून घेणे हा पॅटर्न असेल. वरच्या दोह्यात दुख्खात स्मरण सगळे करतात, आणि जगात ९९.९९९९९%.. (खरं तर १००% म्हणणार होतो... पण नो प्रुफ) या सामान्यात मोडतात. आणि तरी देवाचा धावा करतात. देवाचा धावा करणे हेच इररॅशनल आहे... त्यात देव मला मदत का करेल हा विचार येणे... आणि जरी विचार आला तरी मला मदत मिळणार नाहीये तर मग आता धावा करुयाच नको हा विचार येणे ... नेक्स्ट टू इमपॉसिबल!

>>मी माझं मन दुबळे होऊ नये आणि डाऊनटर्न मध्ये काही बावळट श्रद्धाळूपणा करू नये <<
इन ट्राइंग टाइम्स, इट बॉइल्स डाउन टु हौ स्ट्राँग यु हॅव बिल्ट योर सपोर्ट सिस्टम. सपोर्ट सिस्टम हि जेनेरिक टर्म आहे; त्यात आर्थिक सुबत्ता, आप्त-स्वकियांचं पाठबळ वगैरे सगळं आलं. देव जो अस्तित्वातंच नाहि, त्याच्यावर विसंबुन रहाणं हा निव्वळ मुर्खपणा आहे...

>>बाकी देव हा मेडिकल इन्श्युरंस सारखा असेल ....<
अनॅलजी आवडली. देव हा इंशुरंस आहे, न चूकता प्रिमियम उकळतो, पण जेंव्हा क्लेम करु तेंव्हा डिडक्टिबल्सचं कारण समोर करतो... Lol

Let me not pray to be sheltered from dangers but to be fearless in facing them.
Let me not beg for the stilling of my pain but for the heart to conquer it.
Let me not look for allies in life's battlefield but to my own strength.
Let me not crave in anxious fear to be saved but hope for the patience to win my freedom.
Grant me that I may not be a coward, feeling your mercy in my success alone;
but let me find the grasp of your hand in my failure

रवींद्रनाथ टागोर
दु:ख दे देवा परंतु सोसण्याचे धैर्य दे

मंडळी, मी आणि माझा देव हा वि.शं.चौघुले संपादित ग्रंथात वाचकाला देवाविषयीच्या सर्व कल्पना एकत्रित वाचायला मिळतात.
पहा http://mr.upakram.org/node/770

आशुचॆंप, अगदी बरोबर आहे. माणूस आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर निरोगी विवेकी राहू शकत नाही. त्याचा मेंदु आधार शोधतोच. बर्‍याच लोकांसाठी देव हा स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे.

प्रकाशजी, किंवा अजून कुणी ज्यांना माहीत आहे, एक गोष्ट क्लिअर कराल का:
लेखात लिहीलंय की घाटेंना शनिपाराच्या रांगेत पाहिलं. लहानपणातील सुख दुःखाच्या आठवणी म्हणून ते तिथे अधुन मधून जात असतात / असत असे त्यांनी सांगितले.
पण पुढच्या काही प्रतिसदांमध्ये ते शनिपरावर तेल वहात होते, असे लिहिले आहे.

यातील नक्की काय आहे?

जर ते तिथे जाऊन तेल वहात असतील तर ते फक्त लहानपणीच्या आठवणीचा भाग म्हणुन गेले होते असे होत नाही.

तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. तेल व हार घेउन उभे होते का नुसते उभे होते हे गौण आहे. जनरली भाविक लोक तिथे तेल व हार घेउन उभे असतात. ते शनिपारावर दर्शनाच्या लाइनीत दिसले ना? मग फाउल. विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा. हे मी एका प्रतिसादात म्हटले आहे.
जर ते तिथे जाऊन तेल वहात असतील तर ते फक्त लहानपणीच्या आठवणीचा भाग म्हणुन गेले होते असे होत नाही.>>>> मनोव्यापाराचा भाग आहे असे म्हटले आहे. मनोव्यापारात श्रद्धा अंधश्रध्दा वगैरे सगळे आले. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते असेही मी वर म्हटले आहे.

निरंजन घाटे हयात आहेत काय. हयात असतील तर ते इथं लिहीतील काय. त्यांच्या तोंडून ऐकले की पडदा पडेल या घटनेवर.

निरंजन घाटे हयात आहेत. ते त्यांना जे काही सांगायचे असते ते पुस्तकातुन सांगत असतात. त्यांची काय मते आहेत त्यात कसे बद्ल झाले किंवा नाही हे समजण्यासाठी वाचत सुटलो त्याची गोष्ट हे पुस्तक जरुर वाचा.थोडे कष्ट घ्यावे लागतील

विज्ञानकथा लेखक म्हणुन आपल्या मनात काही प्रतिमा असते त्याला या दृष्याने छेद दिला हा तो मुद्दा.

हा मुद्दा तर्काला धरून नाही, कथा म्हणजे वैचारिक लेख नव्हे, ते ही एक काल्पनिक साहित्यच असते.

वि बा सं वर कथा लिहिणारा आपल्या पत्नीशी एकनिष्ठ कसा म्हणून आश्चर्य वाटणे आचरटपणा मधे मोडेल तसेच हे वाटते

धन्यवाद सर. आमच्या साठी आपण त्यांची शनिपाराच्या घटनेवर मुलाखत घ्या. हा लेख व प्रतिसाद त्यांनी वाचले तर बरं होईल. म्हणजे ते स्पष्टीकरण देऊ शकतील. कृपया राग मानू नये नम्र प्रार्थना.

हर्पेन सहमत आहे. विज्ञानविषयक सातत्याने दीर्घकाळ लेखन करणारा माणूस हा अश्रद्ध, संशयवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकी,नास्तिक, विचारवंत असा असला पाहिजे ही आपण आपल्या मनात प्रतिमा तयार करतो. मग त्या प्रतिमेला छेद देणारे एखादे दृष्य दिसते त्यावेळी आपला भ्रमनिरास होतो. हे मी एका प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे

फेसवुकवर आहेत ते.
मनोव्यापाराचा भाग म्हणजे लहानपणापासून जे काही करीत आलोय, ते सोडायची इच्छा नाही. त्यामागचं कारण आता अस्तित्वात असेलच असं नाही.
पण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रचार प्रसार करणार्‍या व्य्यक्तीकडून काही अपेक्षा ठेवणं चूक वाटत नाही.

कृपया या लेखाची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मनोरंजन होईल त्यांचे कदाचित.

भरत, त्या दुसऱ्या धाग्यावर निरंजन घाटे यांच्या ज्या लेखाची लिंक तुम्ही दिली आहे ती इथेही डकवा. चांगला, स्पष्ट विचार व्यक्त करणारा लेख आहे. अजिबात गुळूमुळू नाहीये.

कृपया या लेखाची लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मनोरंजन होईल त्यांचे कदाचित.>>>>>होय. त्यांना "या" आणि "त्या" अशा दोन्ही संकेतस्थळांची लिंक पाठवली आहे. त्यांना ती पोहोचली आहे.

Is Sadhguru true?
Srinivasan Radhakrishnan
Srinivasan Radhakrishnan, Finance Controller ICS Finance, "Top Writer 2018" at NTT Data (2013-present)
Updated Jul 21
I had the same doubt a couple of years ago.

In fact if I can be candid I thought he was just one of those COMMERCIAL TYPE GODMEN. I ignored him for many many years.

One other reason for ignoring ALL GODMEN was that I am a TAMIL IYER (BRAHMIN) and come from a family of spiritually illustrious ancestors.

So KANCHI SWAMIGAL of KAMAKOTI PEETHAM & SRINGERI Swamigal were the only entities discussed about and referred to.

I didn’t even know others existed until there were controversies which got published on National media.

My life had a lot of unexpected surprises in store for me from 2003 to 2012. Loosing my father at 23, brother at 28 and mother at 32 did cause me to learn astrology - cause that was the only subject that had some answers to my questions. I became good with it, started helping other people too and found it worked flawlessly.

It’s during this journey (of looking of very many horoscopes) that I found that each and every single human is going through some misery or the other. It was across the board and all encompassing.

My personal life advances during all this. I got married and was about to become a parent.

Given that i had endured 3 deaths of immediate family members with elan I thought I was psychologically mature and could handle anything that life threw at me.

But shit struck the roof when my son was born and had to be kept in the ICU for a couple of days. I couldn’t not fathom the pain. Although I was completely strong outside, I was broken from inside.

That’s when I got into BHAGAVAD GITA, RAMAYANA, MAHABHARATA and other ancient scriptures.

It provided me a perspective that helped me take the vagaries of life in my stride and move forward with a positive perspective. I became more positive minded and tolerant.

That’s when I came across some of SADHGURU’s videos. One video led to another and another and another.

After a good year and a half, I find SADHGURU TO BE A GENUINE SAINT OF THE MODERN TIMES. His sole aim is to uplift people from the miseries of their life.

If you think a saint has to sit in the Himalayas and only meditate. You are in for a bad surprise. Cause SADHGURU will not fit into any of those stereotypes that has been fed to you.

He’s a bike riding, helicopter piloting saint who’s super fluent in English with unmatched wit. He’s a NEW AGE SAINT who has taken birth to restore balance in our society in this KALIYUGA.

In conclusion I would like to quote verses 7 & 8 from Chapter 4 of the BHAGAVAD GITA

Yada yada hi dharmasya glanirbhavati bharata
Abhythanamadharmasya tadatmanam srijamyaham

Paritranaya sadhunang vinashay cha dushkritam
Dharmasangsthapanarthay sambhabami yuge yuge

Meaning -
I am coming, I am coming, when there is a loss of religion, then I am coming, when the iniquity increases, then I am coming to protect the gentlemen, to destroy the wicked I am coming in to establish religion and I am born in the age of era.

God bless

Note - I AM NOT linked to ISHA FOUNDATION or SADHGURU in any way whatsoever. I have not even done any sort of course from ISHA.

But shit struck the roof when my son was born and had to be kept in the ICU for a couple of days. I couldn’t not fathom the pain. Although I was completely strong outside, I was broken from inside.
संकटामुळे माणूस विचलित होतो हे सुचवायचे होते.

मराठी मध्ये लिहा .
नसेल जमत तर अकलेचे तारे (कॉपी पेस्ट) करून तोडू नका

राजेश तुम्ही अजून अंड्यातच आहात. बाहेर पडून मोठं झालं की कळेल हं. अंड्यातूनच अकलेचे तारे तोडू नका.

Pages