पुणेरी तंदूरी चहा by Namrata's CookBook :५

Submitted by Namokar on 28 June, 2019 - 04:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप पाणी
२ कप दूध
५ छोटे चमचे चहा पावडर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
४ चमचे साखर (आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
१ इंच आलं(किसलेले)
१/४ चमचा वेलची पुड
मातीचं भांड

क्रमवार पाककृती: 

१. मातीचे भांडे कमी गॅस फ्लेमवर गरम करायला ठेवा
२. आता गॅसवर एक भांडे ठेवा त्यामध्ये पाणी ,चहा पावडर ,साखर,किसलेले ,वेलची पुडआलं घाला
३. मातीच्या भांड्याची बाजू बदला
४. पाणी थोडे उकळलेकी त्यात दूध घालून एकदा मस्त चहा उकळून घ्या
५. चहा एका भांड्यात गाळून घ्या
६. आता मातीचे गरम भांडे एका मोठ्या पातेल्यात ठेवा आणि त्यामध्ये गरम चहा ओता
Screenshot_2019-06-28-13-51-49-405_com.miui_.videoplayer_0.png
७. मातीच्या भांड्यात बुडबुडे येण्यास सुरुवात होईल आणि चहा बाहेर पडेल. आता कप मध्ये चहा ओता आणि सर्व्ह करा
या पावसात मस्त तंदूरी फ्लेवर चहाचा आस्वाद घ्या घरच्या घरी
image 1.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

https://youtu.be/XjPIavW7a9g
रेसिपी आवडलीतर युटयुबवर मझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हला नोटिफीकेशन येईल
https://www.youtube.com/channel/UCjsh6KtuWdhxlOjL5nqH6HQ

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मायबोली वरील रेसिपीज् :

निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook १ - https://www.maayboli.com/node/70309
कोबीची वडी by namrata's cookbook २ - https://www.maayboli.com/node/70321
एग्गलेस चॉकलेट कपकेक बनवा १० मिनीटात by Namrata's CookBook:३ - https://www.maayboli.com/node/70367
भोपळ्याची भजी by Namrata's CookBook : ४ -https://www.maayboli.com/node/70420

आमच्या लहानपणी लहान बाळांना खोकला झाला की, लहान बोळकं चुलीत चांगले तापवत. नंतर त्यात हळद टाकून दूध ओतत. ते उतू जात असे. मग थंड झाल्यावर बाळाला पाजत. काहीतरी औषधी उपयोग असेल. अवांतर समाप्त.
तंदुरी चहा खरपूस लागत असेल चवीला.

नम्रता, तुमच्या सगळ्या रेसिपीज ची यादी प्रत्येक नव्या रेसिपीखाली द्यायची गरज नाही. तुमच्या रेसिपीज तुमच्या लेखनात एकत्र दिसतात.
https://www.maayboli.com/user/67871/created