भोपळ्याची भजी by Namrata's CookBook : ४

Submitted by Namokar on 25 June, 2019 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भोपळा
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ
दीड चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे / धने+जिरे पूड
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

१.भोपळयाच्या साल काढून पातळ चकत्या करुन घ्या
२. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा ,जिरे, लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर (optonal) एकत्र करुन घ्या .
३. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
४. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
५. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा
६. भोपळ्याची एक एक चकती मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
मस्त गरम गरम संपवून टाका
IMG-20190625-WA0007.jpg

वाढणी/प्रमाण: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मायबोली वरील रेसिपीज् :

निखारा मिसळ| तंदूर मिसळ |झणझणीत कट /सँपल by Namrata's CookBook १ - https://www.maayboli.com/node/70309
कोबीची वडी by namrata's cookbook २ - https://www.maayboli.com/node/70321
एग्गलेस चॉकलेट कपकेक बनवा १० मिनीटात by Namrata's CookBook:३ - https://www.maayboli.com/node/70367

छान. घोसाळ्याची भजी नेहमीच खाते. चविष्ट लागतात. दुधीची भजी करून खाण्यात येतील. प्रमाण खूप थोडं आहे, आम्ही परातभर भजी करतो व पोटभरून खातो.

फोटो मस्तच.
दुधीची भजी पहिल्यांदाच पाहिली.

अच्छा ! हि दुधी भोपळ्याची भजी आहे होय .. तरी म्हंटलं भजी गोल कशी ?! .. (मला वाटलं लाल भोपळा)
दिसतायत तरी मस्त गुबगुबीत ..

हि दुधी भोपळ्याची भजी आहे होय .. तरी म्हंटलं भजी गोल कशी ?! .. (मला वाटलं लाल भोपळा) >>>+११११

पण दुधी भोपळ्याला किती पाणी सुटते, भजी तर लगेच ओली कच्च होइल नाही का??

दुधी भोपळ्याला किती पाणी सुटते, भजी तर लगेच ओली कच्च होइल नाही का?>>>>> घोसाळ्याची भजी खातात तशीच खायची.घोसाळ्याची भजी मस्त लागतात.

ह्या भज्यांसाठी दुधी देखिल एकदम कोवळा आणि लहान हवा असेल... नाहीतर एक भज्याचा व्यास प्लेटएवढा व्हायचा.
ही भजी करुन पहायला हरकत नाही ह्या पावसात.. Happy

@कृष्णा
ह्या भज्यांसाठी दुधी देखिल एकदम कोवळा आणि लहान हवा असेल... नाहीतर एक भज्याचा व्यास प्लेटएवढा व्हायचा. >> Lol Lol
नक्की करुन बघा

@JayantiP
छान आहे कल्पना ,नक्की करुन बघा Happy