तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा तू काढला नाहीस.
धगकर्तीने धाग्याचा मूळ उद्देश लेखात व्यवस्थित लिहिला आहे.

धगकर्तीने धाग्याचा मूळ उद्देश लेखात व्यवस्थित लिहिला आहे.
>>>>>

अवांतर चर्चा करताना हा उद्देश नजरे आड करायचा
आणि मी या उद्देशाला अनुसरूनच उद्देश सांगितला की त्या उद्देशावर बोट ठेवायचे
वाह रे अल्लारखा अजब तेरा कानून Happy

रच्याकाने:
म्हणजे?

भरत तुम्हाला अर्थ माहीत आहे का याचा? Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 August, 2020 - 12:50

हा प्रश्न अवघड असल्याने मागे घेतो Happy

मूळ उद्देशच अवंतरावरून विषयाकडे वळण्यास उपयुक्त ठरतो.
>>>

आणि ईतर उद्देश मूळ उद्देशाला धरूनच असतात.
अवांतराकडे जायची गरजच काय?

धागा पळवला तो पळवला, उद्देशही पळवणार?
>>>

पळवला कुठे
तो आपल्या जागीच आहे. त्याला कोणी नाकारलेय.
धाग्यातून साध्य झालेले आणखी गोष्टी दाखवल्या.

पैचान कौन?

भरतजी सिक्सरच हाणलात Happy

मन्या S
उर्मिला म्हात्रे
गूढ शुभांगी
मेघा
रश्मी
कऊ (आता कोणत्या आय डी ने वावरते माहिती नाही)
Rajsmi

Submitted by अज्ञातवासी on 28 May

वरच्या अज्ञातवासी यांच्या प्रतिसादाला अनुमोदन. या सर्वांना एकत्र भेटायला आवडेल. त्यांच्या सोबत खालील आयडीही असावेत.
भैय्यापाटील
अजिंक्यराव पाटील
रूपाली विशे पाटील
अजून नावे आठवतील तसं लिहिन

वरच्या यादीत भर

मानव पृथ्वीकर (ऑर्कुट वरचे पृथ्वीवासी आणि अनेक सुंदर सुंदर Blush आयडींचे निर्मातै)
व्यत्यय
परिचित
फिल्मी

यांनाही एकत्रच भेटायला आवडेल

शांत माणूस Lol
शांतीत क्रांती झाली की Bw
हे सगळे वेगवेगळे आहेत का? Rofl
नाही म्हणजे तगमग वाल्यांचेच धागे पहिल्या पानावर येतात. Wink

तुम्ही जे कुणीही असाल पण वेगवेगळ्या आयडींनी इथे येऊन वेगवेगळ्या धाग्यावर ज्या प्रकारे माकड उड्या मारत आहात ना त्यावरून तुम्ही नक्कीच सशक्त मनोवृत्तीची व्यक्ती नाही आहात हे लक्षात येतेयं...

तुमची मानसिक स्थिती लक्षात घेता तुम्हांला उत्तर देणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा ठरेल माझा, पण कालपासून जो धिंगाणा तुम्ही घालतायं ना त्यासाठी.. तसेच माझ्या नावाचा वर उल्लेख केलायं तुम्ही.. म्हणून तुमचे कान टोचणे आवश्यक वाटतंय मला..!!

तुमच्या पोटात जे दुखणं सुरु आहे ना त्यावर चांगले उपचार करा... आणि जो विकृतपणा तुम्ही चालवलायं ना त्यावर पण चांगला उपचार करा.. तुम्हांला मनापासून शुभेच्छा..!! लवकर बरे व्हा...

स्वतःच्या खऱ्या नावाने राहायची हिंमत बाळगून आहे मी. जर एवढी हिंमत तुमच्या मध्ये असेल ना तर खऱ्या ओळखीने समोर या...

माझ्या नादाला लागायचं नाही... अश्या शब्दांत मला इथे लिहायला खरंतर बरं वाटत नाहीये... कारण तोंड लपवून लोकांवर शाब्दीक हल्ले करायला मी इथे सदस्य बनलेले नाहीये... सरळसाधा उद्देश आहे माझा... कुठल्या धाग्यावर माझा वाकडा प्रतिसाद पाहिलायं का..??

‌मी जे काही लेखन करते ते मायबोलीचे वाचक वाचतात .. ते कौतुक करतात.. आवडतं मला ते आणि त्याचं श्रेय मी खऱ्या नावाने घेते... त्यात तुम्हांला पोटशूळ उठण्याचं कारण काय..?

शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो म्हण माहित असेल ना..??

अहो ताई, चिडू नका.
या धाग्याचा उद्देश आहे तेच लिहीले आहे. अज्ञातवासी यांच्या पहिल्या पानावर असलेल्या लिस्ट मधल्या सर्व आयडींचे आणि तुमच्या लिखाणाचा फॅन असल्याने तुमचे व इतर लेखकांचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे.
हे सर्व लोक खरेच आहेत आणि खऱ्या आयडीने लिहीण्याची हिंमत ठेवतात याबद्दल शंका आहे का? ते समोर आले तर बरेच आहे की.
तुमचे लिखाण खूप आवडते. त्याला अज्ञात वाचकांकडून जबरदस्त दाद मिळते. अजून काय पाहिजे?
मी काही चुकीचे लिहिले आहे का ते सांगा.
तुम्ही मला अजून कोणत्या धाग्यावर पाहिले? मला तर बरेचसे धागे दिसत नाहीत.

अहो ताई, चिडू नका.>>> भाऊराया, एवढीचं इच्छा असेल ना तर रक्षाबंधनला नक्कीचं भेटू... पण खरी ओळख हवी मला...

इतर लेखकांचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे.
हे सर्व लोक खरेच आहेत आणि खऱ्या आयडीने लिहीण्याची हिंमत ठेवतात याबद्दल शंका आहे का? ते समोर आले तर बरेच आहे की.>>> कुणाच्या खऱ्या खोट्या नावाशी मला देणेघेणे नाही.
माझा उद्देश सरळ आहे ... त्यावर कुणी संशय घेतला तर मला उत्तर द्यावेचं लागेल...

तुमचे लिखाण खूप आवडते. त्याला अज्ञात वाचकांकडून जबरदस्त दाद मिळते. अजून काय पाहिजे?>>> जर मनापासून हे लिहिले असेल ना तर मनापासून धन्यवाद..!!

मी काही चुकीचे लिहिले आहे का ते सांगा.>>> ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या मनाला विचारा... तुमच्या प्रतिसादात खोचकपणा न दिसण्याएवढी दुधखुळी नाहीये मी...

शांत माणूस, ऑर्कुटचा उल्लेख वाचून तुम्ही मला ऑर्कुटपासून ओळखता असे आधी वाटले. पण पुढचे वाचून लक्षात आले नाही ओळखत कारण ऑर्कुटपासून मला ओळखणाऱ्या सगळ्यांना माझे खरे नाव माहीत आहे, भेटले अथवा फोटो तरी पाहिलाय. तुम्ही कदाचित ओझरते पाहिले असावे मला ऑर्कुटवर.
मला भेटायची इच्छा आहे हे वाचून आनंद झाला.
आलात हैद्राबादला की कळवा, भेटू.

रूपाली ताई
मी तुमचे नाव कोणत्या धाग्यावर घेतले? उगीच साप साप म्हणून भुई धोपटण्यात अर्थ नाही.

पृथ्वीवासी, तुमचा फोटो काही मी पाहिलेला नाही. पण मुक्तपीठ वर क्रिकेटची मॅच झाली होती. तीत दोन्ही गटाचे लोक एकत्र खेळले होते. आमचे फोटो त्या वेळी आम्ही टाकले होते. तसेच इथेही गेट टूगेदर झाले तर काय हरकत आहे ? बाकी ऑर्कुटवर ओझरते पाहणे हे पहिल्यांदाच ऐकले. Lol त्या वेळचे आयडीज सांगतो क्रिकेट खेळलेले. शैलेंद्रसिंग, शांत माणूस, चिंतामणी पळसुले, एक जण जुन्नरचा होता त्याचे नाव नाही लक्षात. अभिषेक नाईक नाही आला मॅच खेळायला.

रूपालीताई - खरं खोटं, चूक बरोबर असं काही मनात असेल तर सरळ अ‍ॅडमिनकडे तक्रार करा. माझे चुकले असेल तर ते बघून घेतील. इतरांच्या धमक्या किंवा नादाला लागणे वगैरे भाषेला किंमत नाही इथे. उलट तुम्हीच म्हणताय, मानसिक स्थिती चांगली नाही, वेगवेगळ्या आयडीने प्रतिसाद दिले. माझा तर ऑर्कुटपासूनच हाच आयडी आहे. अ‍ॅडमिनकडे तक्रार करा माझ्या आयडींबद्दल. त्यांना सगळे माहीत असते. यापेक्षा व्यवस्थित अजून काय सांगायचे तुम्हाला ? तुम्हाला नसेल भेटायचे तर सोडून द्या. इथे फक्त कुणाला भेटायला आवडेल इतकेच सांगायचे आहे. तशी सक्ती नाही कुणावर.
माझ्या प्रतिसादात काय खवचटपणा आहे हे ही मला अजून समजलेले नाही. मी शांतपणे प्रतिसाद देत असतो.

ओझरते पहाणे म्हणजे ओझरता संपर्क येणे हो.
मी मुक्तपीठवर होतो, शेवटी शेवटी. तेव्हा ऑर्कुटला उतरती कळा लागली होती. खऱ्या नावानेच आलो होतो. त्याच काळात हे टोपण नाव सुचले व तेच वापरतोय तेव्हा पासून.

पण तुम्ही दिलेला संदर्भ काही माहीत नाही. शैलेंद्र सिंग यांना ओझरते पाहिले आहे ऑर्कुटवर. आणि मुक्तपीठ म्हटल्यावर पळसुलेंना कोण ओळखणार नाही?

मॅच / भांडण / कुठलाही गट वगैरेत कधीच नव्हतो. जर तुमचा आयडी तेव्हाही शांत माणूस हा असेल तर अजिबात आठवत नाहीय. गूढ शब्दकोडी, इतर कोड्यांचे धागे, व्यसनमुक्तीचे धागे यावरूनच तेव्हाचे लोक मला जास्त करून ओळखतात.

रूपालीताई - खरं खोटं, चूक बरोबर असं काही मनात असेल तर सरळ अ‍ॅडमिनकडे तक्रार करा. माझे चुकले असेल तर ते बघून घेतील. इतरांच्या धमक्या किंवा नादाला लागणे वगैरे भाषेला किंमत नाही इथे. उलट तुम्हीच म्हणताय, मानसिक स्थिती चांगली नाही, वेगवेगळ्या आयडीने प्रतिसाद दिले. माझा तर ऑर्कुटपासूनच हाच आयडी आहे. अ‍ॅडमिनकडे तक्रार करा माझ्या आयडींबद्दल.>>> दादा, खरंच माफ करा मला... मी पहिल्यांदा प्रतिसाद देऊन चूक केली असं वाटायला लागलंय आता...

तुमचा आताचा प्रतिसाद वाचून मन खूप भरून आलं... इतक्या चांगल्या, शांत माणसाला उगाचचं असा प्रतिसाद दिला त्याचं वैषम्य वाटू लागलंय मला...

ॲडमिनकडे तक्रार करायला हि काय लहान मुलांची भांडण आहेत का..?? मला त्याची गरज नाही वाटतं.

तुमच्या प्रतिसादात खवचटपणा नव्हता हे तुमच्या अंतर्मनातून आलंय ना... तुम्हांला तसं वाटतंय ना .. बस्स.. प्रश्न मिटला.. हो की नाही..??

त्यांना सगळे माहीत असते. यापेक्षा व्यवस्थित अजून काय सांगायचे तुम्हाला ? तुम्हाला नसेल भेटायचे तर सोडून द्या. इथे फक्त कुणाला भेटायला आवडेल इतकेच सांगायचे आहे. तशी सक्ती नाही कुणावर.>>>
आवडेल ना दादा... तुम्हांला मनापासून भेटायचे असेल तर नक्की भेटेन ना... त्यात काय एवढं..???

माझ्या प्रतिसादात काय खवचटपणा आहे हे ही मला अजून समजलेले नाही. मी शांतपणे प्रतिसाद देत असतो.>>> बरं.. बरं.. ठिक आहे... माझा गैरसमज झाला असेल तर क्षमस्व...!!

यापुढे ही असाच शांतपणेच प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करायला हरकत नाही..

बरं... दादा आता मी थांबतेय.. उगाच गाववाल्यांना अजून विरंगुळा नको... झाला तेवढा खूप झाला.. हो ना..??

बरं दादा.. पुढच्या कथा लेखनाच्या वेळी मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहीन .. आवडली... नाही आवडली तरी नक्की सांगा ...( तुम्हांला माझं लेखन आवडतंय म्हणून ह्या पामराची आपल्या लेखनाच्या चाहत्याकडून तेवढी अपेक्षा... )

कळावे...

लोभ असावा...

काय चाललंय इथे... +७८६ वरसून वाचत आलो तेव्हा हेच डोक्यात आलेले. असो, जे काही आहे ते मिटले असेल तर खुश राहा गुण्याविदांने Happy

अभिषेक नाईक नाही आला मॅच खेळायला.
>>>>
शांत माणूस, आपण कसे ओळखता याला? आणि कुठली मुक्तपीठची मॅच? हि उपमा आहे की खरीखुरी मॅच झालेली?

ॲडमिनकडे तक्रार करायला हि काय लहान मुलांची भांडण आहेत का..?? मला त्याची गरज नाही वाटतं. >>> कमाल आहे. मायबोलीवर यायचं आणि अ‍ॅडमिनला लहान मुल ठरवायचं का ? अ‍ॅडमिनने अनेकदा सांगितलेलं आहे कि कुठेही भांडण होत असेल तर परस्पर एकमेकांना उत्तर देऊ नये. अ‍ॅडमिनकडे तक्रार करावी. आता तुम्ही म्हणता कि अ‍ॅडमिनकडे तक्रार करणे म्हणजे लहान मुलांची भांडणं ! म्हणजे मायबोली चालवणारे बालबुद्धीचे आहेत का ? त्यांना काही तरी समजत असेल. कोण खरे कोण खोटे हे त्यांना कळत असेल म्हणून तक्रारी करायच्या ना ?

गाववाले, विरंगुळा हे काहीच समजले नाही. तुमचा प्रतिसाद खवचटपणे दिलेला नसावा असे समजून मी पण थांबतो.
ऋन्मेष - इथे अभिषेक नाईकच तुझ्या रूपात वावरतो असे म्हणतात. अभिषेक नाईकचे ८७ फेक प्रोफाईल्स आहेत असे त्यानेच ऑर्कुटवर सांगितले होते. मुक्तपीठवर त्याचं एक प्रोफाईल ब्लॉक केलं की दुस-याने यायचा. एका प्रोफाईलला चड्डी न घातलेल्या मुलाचा फोटो लावला होता. श्रद्धा ताईने त्याला ब्लॉक केलं होतं. क्रिकेटच्या मॅचच्या वेळी सर्वांना आवाहन केलं होतं. हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी अशी मॅच झाली होती. ते सोडा आता.

ताईंचा मुद्दा होता ख-या नावाने वावरण्याचा म्हणून अ‍ॅडमिनकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. ते ठरवतात इथे कुणी कोणत्या नावाने वावरावे. खरा असो, खोटा असो जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत अ‍ॅडमिन त्याला राहू देतात. नाहीतर हकालपट्टी होत असते. ज्या अर्थी इथे राहू दिले आहे त्या अर्थी त्याची पडताळणी झालेली आहे. तरीही त्या प्रोफाईलचा कुणाला त्रास झाला तर अ‍ॅडमिन कारवाई करतात.

कमाल आहे. मायबोलीवर यायचं आणि अ‍ॅडमिनला लहान मुल ठरवायचं का ? अ‍ॅडमिनने अनेकदा सांगितलेलं आहे कि कुठेही भांडण होत असेल तर परस्पर एकमेकांना उत्तर देऊ नये.अ‍ॅडमिनकडे तक्रार करावी >>> अच्छा.. !! मला हे माहित नव्हतं.. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..! एक दिवसांत येऊन मायबोलीचा बराच अभ्यास केलेला दिसतो तुम्ही दादा... हुशार आहात..!!

. आता तुम्ही म्हणता कि अ‍ॅडमिनकडे तक्रार करणे म्हणजे लहान मुलांची भांडणं ! म्हणजे मायबोली चालवणारे बालबुद्धीचे आहेत का ? त्यांना काही तरी समजत असेल. कोण खरे कोण खोटे हे त्यांना कळत असेल म्हणून तक्रारी करायच्या ना ?>>> माझ्या वाक्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न नका करू दादा... मुळात वादात पडायला मला आवडत नाही... आता काल माझं भान गेलं त्यामुळे तुम्हांला प्रतिसाद द्यायची चूक माझ्याकडून घडली.. त्याबद्दल मी तुमची माफी मागितली... पण तुम्ही तुमच्या ताईला माफ केलं नाही का..?? लहान-सहान भांडण आपांपसात मिटवायची असतात.. त्वरीत कोर्टात जायची घाई कशाला ..?? म्हणून लिहिलं दादा तसं...

गाववाले, विरंगुळा हे काहीच समजले नाही. तुमचा प्रतिसाद खवचटपणे दिलेला नसावा असे समजून मी पण थांबतो.>>> हो ... दादा.. आता खरंच थांबूया...! अजून विषय नको वाढवुया...

ताईंचा मुद्दा होता ख-या नावाने वावरण्याचा म्हणून अ‍ॅडमिनकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. ते ठरवतात इथे कुणी कोणत्या नावाने वावरावे. खरा असो, खोटा असो जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत अ‍ॅडमिन त्याला राहू देतात. नाहीतर हकालपट्टी होत असते. ज्या अर्थी इथे राहू दिले आहे त्या अर्थी त्याची पडताळणी झालेली आहे. तरीही त्या प्रोफाईलचा कुणाला त्रास झाला तर अ‍ॅडमिन कारवाई करतात.>>> मला त्याची गरज वाटली नाही असं मी मागच्या प्रतिसादात लिहिलं होतं. मला ह्याबाबतीत काही पडायचं नाही. साधा सरळ उद्देश घेऊन खऱ्या नावाने इथे आहे मी...दादा.. !!

तरीही दादा..आता खरंच थांबायला हवं... तुम्ही मला माफ केलं असेल अशी अपेक्षा आहे. माझ्या शंका मिटलेल्या आहेत.. पुन्हा एकदा तुमची माफी मागते.. हे कुठेही खवचटपणे लिहिलेले नाही. गैरसमज नसावा.. अजून कुणी माझ्याकडून दुखावले गेले असतील तर त्यांचीही माफी मागते..

मी मुद्दाम शांत माणूसच्या कमेण्टला ट्वीस्ट दिला होता. त्याने जे म्हटलेलं नाही त्याचा अर्थ काय होतो हे सांगितलं. Lol
त्यावरून बरीच आग लागली इथं. माझा हा हेतू नव्हता.
वर जे काही चालू आहे ते थांबवा. प्रत्येकाचा एक पास्ट असतो. तो विसरायला त्याला आवडतं. प्रत्येकाकडून चुका झालेल्या असतात. त्या विसरून तो पुढचं आयुष्य जगत असतो. त्या चुका शोधून काढून , त्याची आठवण करून देऊन आताच्या त्याच्या आयुष्यात विष का कालवायचं ? ऋन्मेष हा आयडी इथे विषारी कधीच नव्हता. त्याच्या फेक प्रोफाईल्स असतील. म्हणून त्याला आजच्या काळात जज्ज करणे चूक आहे.
हीच गोष्ट प्रत्येकाला लागू आहे. इथे कुणीही जज्ज बनण्याचा प्रयत्न न करता आपले आपण बघायला पाहीजे.
जर एखादा लोकांच्या समोर न येता लिहीत असेल आणि त्याचा कुणाला त्रास नसेल तर इतरांना त्याचा त्रास कशाला पाहीजे ? ख-या प्रोफाईलने लिहायचं की खोट्या हे ज्याचं तो ठरवेल. जोपर्यंत मायबोलीला त्रास नाही तोपर्यंत इतरांनी इथे पोलीस बनून तपास करणे आणि स्वत:च न्यायालये भरवणे बंद करावे.

अभिषेक नाईक नाही आला मॅच खेळायला.
>>>>
शांत माणूस, आपण कसे ओळखता याला?

ऋन्मेष - इथे अभिषेक नाईकच तुझ्या रूपात वावरतो असे म्हणतात. अभिषेक नाईकचे ८७ फेक प्रोफाईल्स आहेत असे त्यानेच ऑर्कुटवर सांगितले होते. मुक्तपीठवर त्याचं एक प्रोफाईल ब्लॉक केलं की दुस-याने यायचा. एका प्रोफाईलला चड्डी न घातलेल्या मुलाचा फोटो लावला होता. श्रद्धा ताईने त्याला ब्लॉक केलं होतं. क्रिकेटच्या मॅचच्या वेळी सर्वांना आवाहन केलं होतं. हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी अशी मॅच झाली होती. >>>>>

बरेच मनोरंजक आहे हे सगळं
Happy

विषयांतराबद्दल माफी असावी, पण, हिंदुत्ववादी वि. पुरोगामी क्रिकेट सामना हे भयंकर रोचक आहे. याबद्दल जरा अधिक माहिती द्याल का? धन्यवाद.

अभिषेक नाईकचे ८७ फेक प्रोफाईल्स आहेत असे त्यानेच ऑर्कुटवर सांगितले होते.
>>>>
१०० असतील. मी रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली त्या एक्सेलमध्ये ८० होते. म्हणून मी म्हणताना ८०+ बोलतो. नेहमी अधिकृत आकड्यांवर बोलावे.

एका प्रोफाईलला चड्डी न घातलेल्या मुलाचा फोटो लावला होता.
>>>>
बनियानही नव्हती घातली. मी जेव्हा पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हाचा तो फोटो होता. ऑर्कुटवर माझ्या मित्रमैत्रीणींमध्ये फार फेमस होता. तुम्हालाही तो लक्षात आहे याचा आनंद आहे.

.

हिंदुत्ववादी विरूद्ध पुरोगामी अशी मॅच झाली होती.
>>>>>
मग बरोबर आहे. मी कसा त्यात असेल. मला राजकारण धर्म जातपात या लफड्यात जराही रस नव्हता. जर तुम्ही मला ओळखत असाल तर माझी "अमन की आशा" नावाने असलेली ईमेजही माहीत असेलच.

@ आशूचॅम्प
बरेच मनोरंजक आहे हे सगळं
>>>>
कल्पनेच्या बाहेर. हे साधे टिजरही नाही. ऑर्कुट कम्युनिटीज ईजे फर्स्ट लव्ह. आयुष्यात ईतके किडे केले. ईतके एंजॉय केले. ईतके मित्रमैत्रीण मिळाले जे आजही प्रत्यक्ष आयुष्यात मित्रमैत्रीण आहेत. माझ्या व्यक्तीमत्वाचा विकासही तिथेच झाला. एक धागा यायला हवा यावर.. पण साले सारांशात काय कसे लिहावे हा प्रश्न आहे. त्यात दुसरयांबद्दल लिहिलेले त्यांना आवडले नाही तर दुखावले जाण्याचा धोका आणि स्वत:चेच लिहिले तर हा स्वत:बद्दलच लिहितो म्हणून नेहमीचा आरडाओरडा..

हिंदुत्ववादी वि. पुरोगामी क्रिकेट सामना हे भयंकर रोचक आहे. याबद्दल जरा अधिक माहिती द्याल का? धन्यवाद. >>>>

या धाग्यावर अवांतर होईल म्हणून दिले नाही. तुम्ही विचारले तर का नाही देणार ?
ऑर्कुटच्या काळात पहिल्यांदा समाजमाध्यमे उपलब्ध झाली. माध्यमांचे महत्व ओळखणा-या हिंदुत्ववाद्यांनी त्यावर कब्जा केला होता. मुक्तपीठ हे तसे न्युट्रल होते पण हिंदुत्ववादी प्रोफाईल्सचा वरचष्मा होता. त्या वेळी हिंदुत्ववाद्यांचा दहशतवाद समाजमाध्यमांवर होता. एक संजय राऊत यांचा फोटो लावलेला प्रोफाईल होते. ते जरा मनाविरूद्ध लिहीले की असह्य शिवीगाळ करत असे. बहुतेक वेळा त्यांच्या आणि पळसुले यांच्या पोस्टी एकमेकांना पूरक असत. त्यावरून पळसुले यांना अनेकदा विचारणा केली जायची. सूरज महाजन / देशमुख नावाचे एक प्रोफाइल होते. त्याच्या सोबत शंभरेक आक्रमक प्रोफाइल्सचा समूह होता. एक बाजी आणि निखिल पवार नावाचे हिंद्त्ववादी मराठा होते. मराठा समाजाच्या कम्युनिटीतही सतत पुरोगामी मराठा विरूद्ध हे सनातनी मराठा अशी भांडणे चालत होती.

त्यामुळे बरेच लोक घाबरून असत. माझ्यासारखे काही बावळट होते. ज्यांनी सुरूवातीला शाळेच्या दाखल्यावर लिहावे तशी माहिती भरली होती. त्यात फोन पत्ता पण होता. पण एका महादेव सांगलीकर नावाच्या ब्रिगेडी माणसाला घरी जाऊन जीव घेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आणि पोलिसात तक्रारी झाल्यावर आम्ही हबकलो. जरी माहिती डिलीट केली तरी त्याचे स्क्रीनशॉट्स घेतलेले होते. जुन्या एखाद्या पोस्टवरून हे मूळचे अमूक तमूक प्रोफाईल अशा पोस्ट्स दिसू लागल्याने मी शांत माणूस झालो होतो. ब-याच जणांनी आपापले मूळ प्रोफाईल बंद करून फेक प्रोफाईल वापरणे पसंत केले.

अशा वेळी स्वतःच्या नावाने या आक्रमक हिंदुत्ववाद्यांना उत्तरे देणारा शैलेंद्रसिंह पाटील नावाचा एक युवक उगवला. त्याने फक्त फॅक्ट्स आणि मुद्दे इतकीच मांडणी करून हिंदुत्ववाद्यांना जेरीस आणले. त्याने ५५ कोटींचे सत्य वगैरेंची पोलखोल फक्त अचूक माहिती देऊन केली. शिवीगाळ झाली तरी तो शांत असे. पण शिवीगाळ करणा-यांना गंपू हटेला नावाचे एक प्रोफाईल उत्तरं देत असे. ते त्याचेच असावे असा हिंदुत्ववाद्यांचा होरा होता. त्यावरून शैलेंद्रसिंहला घरी जाऊन मारहाण करण्याच्या पोस्टसुद्धा पडत असत. गंपू हटेला विरोधात पोलीस तक्रार झाली पण त्याचा शैलेंद्रसिंहशी संबंध नव्हता.

हळू हळू शैलेंद्रसिंहच्या मार्गाने अनेक जण लिहू लागले. मग हा कंपू मोठा होत गेला. आता हिंदुत्ववादी कोमात जाऊ लागले. मग राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी ऑर्कुटवर आले. नंतर पूर्ण राजकारण होऊ लागले. हिंदुत्ववाद्यांपासून या पक्षांनी अशा लेखकांचे संरक्षण केले ही एक चांगली गोष्ट झाली. या पार्श्वभूमीवर एका वयस्कर काकांनी चांगल्या वातावरणात चर्चा व्हाव्यात म्हणून पुढाकार घेतला. त्यातून क्रिकेट मॅचची कल्पना पुढे आली.

शैलेंद्रसिंग यांनीच पुढाकार घेतला. त्यांचे फॅन असलेले अतुल काजळे की वाजळे आणि मुबईवरून आलेले एक जण (केटरींगचा व्यवसाय असलेले ) असे पाच सहा जण त्याच्या टीममधे होते. त्या विरोधात हिंदुत्ववादी गटात बरेच जण होते. माझ्या पायाला लागले होते. त्यामुळे स्कोर लिहायला नेमणूक झाली. शैलेंद्रसिंह प्रत्यक्षात ९५ किलो वजनी गटात होते. त्याउलट सर्व हिंद्त्ववादी वयाने जास्त असूनही फिट दिसले. अपेक्षेप्रमाणे त्यांनीच मॅच जिंकली. पुरोगाम्यांना धावा काढतानाही दम लागत होता.

त्या मॅचनंतर शिवीगाळ करणारे प्रोफाईल्स अज्ञातवासात गेले. वातावरण चांगले झाले. मुक्तपीठचे मॉडरेटर असणारे एक मृत्युंजय हे नंतर मिसळपाववर परा म्हणून वावरू लागले. ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पळसुले काकांच्या पत्नी या ही काही काळ मॉडरेटर होत्या. त्या काळात अनेक ब्राह्मणेतर प्रोफाईल्स उडाले असे वाद झाले. नंतर ही मंडळी काही मराठी वेबसाईट्स वर दिसली. पण तिथे जास्त रमले नाहीत.

फेसबुकवर मात्र हे सगळे जण पुन्हा सक्रीय झाले.

Pages