हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

मी पण बघत नाही आता.
शशांक केतकर australia ला गेलाय असं न्यूजमध्ये वाचलं. सो तो परत येईपर्यँत असंच पकवत राहणार हे लोक.
आता तो आला तरी सिरीयल बघवेल का ही शंकाच आहे. लग्नानंतर अनुचं अगदीच माकड करून टाकलं.

कलर्सच्या बहुतेक मालिका अश्याच असतात. बटबटीत!!>> आणि झी वाल्यांच्या निर्बुद्ध ऊर्फ माठेरिअलिस्टिक

किमान अनुने वहिनीला सांगताना दाखवायला हवे की दु, सं. का. इ. लोक कसा त्रास देत आहेत. वहिनी नोज देम थरली.

पिळपिळित अनू, बटबटीत दुर्गा (वरती वापरला होता हा शब्द फारच आवडला), कटकटी संयू, घाणेरडे काका काकू, आणि अशक्य सानवी. शी!

मला वाटते सिद्धू चे पात्र करायला नविन कुणीतरी येईल वाटतेय! काल प्रोमोत एक आवाज ऐकला तो जरा वेगळा वाटला!

मी पण बघत नाही आता.
शशांक केतकर australia ला गेलाय असं न्यूजमध्ये वाचलं. सो तो परत येईपर्यँत असंच पकवत राहणार हे लोक.
आता तो आला तरी सिरीयल बघवेल का ही शंकाच आहे. लग्नानंतर अनुचं अगदीच माकड करून टाकलं.>>>>> सेम पिंच , मी इथेच येउन वाचीन म्हणते.
मला एक जुनं नाटक आठवलं हा जो अनुचा छळ चाललाय तो बघुन. ( नाटक हूंडाबळी वरचं, निशीगंधा वाड ,दया डोंगरे- निशीगंधा वाड चे सासरे वारीला जातात आणि त्याच काळात हिच्या छळाची परीसिमा गाठली जाते , तेच आठवलं . )
पण हि सिरीयल एकदम बेक्कार डायलॉग्स आणि बेक्कर डायरेक्शन

खरंच अनूने तोंड उघडावं एकदा. स्वत:ला धैर्य नाही तर सिद्धार्थला टेक्स्ट करावी ना सगळी परिस्थिती. बरं त्याला काहीही झालेलं नाही हे उघड दिसतंय. दुर्गाबाई, स्मिता, काका हे सगळे कारस्थानी आहेत हेही अनेकदा समोर आलंय. मग झडझडून एकदा. ही हळूहळू मुळूमुळू बुळुबुळू मालिका चालणार कशी? बंद पडेल अशाने. ट्रॅक बदला बुवा आता.

धनुडी तुम्ही आव्हान या मालिकेबद्दल बोलत आहात का. उदय टिकेकर, आत्माराम भेंडे, दया डोंगरे, निशिगंधा, स्मिता जयकर वगैरे. असाच चित्रपटही आला होता ज्यात निळू फुले जाळून मारल्या गेलेल्या मुलीचे वडील असतात. सत्यघटना होती ती.

होय, मालिकेचं नाव आव्हान होतं. धन्यवाद चंपा Happy

मला ते गाणं आठवलं, "धाव घेई विठू आता पाहू नको अंत " चांगली होती मालिका. त्या मालिकेची आणि हे मन बावरें ची तुलना नाही होउ शकत, जस्ट आठवली. खरं तर शशांक केतकर आहे तर मालिका चांगली असेल असं वाटलेलं म्हणुन बघायला सुरवात केली. पण हे जे अत्ता वळण घेतलय मालिकेने , चाललेला ट्रॅक सोडुन भलतीकडेच. आता अनुला छळा हेच मिशन.

टीआरपी आहे तोवर छळतील. टीआरपी घसरला की एका दिवसात अनु घडाघडा बोलायला लागेल, काका- काकुची पोल खोल होईल, अनु मोठी उद्योजिका होईल आणि दुर्गाबाई, कशी माझी सून गुणाची म्हणून अनुला जवळ घेतील.

टीआरपी आहे तोवर छळतील. टीआरपी घसरला की एका दिवसात अनु घडाघडा बोलायला लागेल, काका- काकुची पोल खोल होईल, अनु मोठी उद्योजिका होईल आणि दुर्गाबाई, कशी माझी सून गुणाची म्हणून अनुला जवळ घेतील.>>+१११११

बिबॉ लागण्याआधी थोड थोड बघायला मिळत. एका एपिसोडमध्ये रक्षाबन्धनाचा कार्यक्रम चालू होता. त्यात सिरियलवाल्यान्नी नविन शोध लावला होता, ' अनूला साडी नेसता येत नाही' म्हणे.

लग्न होण्याआधी किती तरी वेळा तिने साडया नेसल्या आहेत आणि तेही नीट चापून- चोपून. त्या काकूने तर चक्कच टॉण्टच मारला, ' तुला तुझ्या आईने साडी नेसायला शिकवल नाही का?' जशी अनू सोळा- सतरा वर्षाची मुलगीच आहे जणू. आणि हि तोण्डातून चकार शब्द सुद्दा काढत नाही. तिच्या माहेरच्या लोकान्समोर हा तमाशा चालू होता, तेही काही बोलले नाहीत.

हि तोण्डातून चकार शब्द सुद्दा काढत नाही.>>>मी तर आधिच म्हटले होते कि ती तिच्या बाजूने बोलणार्‍यालाही थांबवते आणि अपमान continue करते (होऊ देते). कोणाला न छळणार्‍या माणसालाही हिला छळायची इच्छा होईल.

रक्षाबंधन नाही बघितलं पण दुर्गाबाई म्हणाल्या की माहेरी जायची गरज नाही तर ही लगेच म्हणाली बरोबर आहे तुमचं, दुसऱ्याचं मन सांभाळायचं पण किती. संयु तिला म्हणाली की तुझ्या साड्या फार गावंढळ असतात तर हिने कसनुसा चेहरा केला. वहिनीच्या मुलीचे खर तर सिद्दुवरोबर लग्न व्हायला हवे होते, मजा आली असती. दुर्गा, संयु आणि काकू घर सोडून गेल्या असत्या, आजोबा आजीसकट Proud

:-))

आला गं बाई एकदाचा सिद्धार्थ.
बहुतेक मराठी मालिका नायिकाप्रधान असतात. नायक नामक ठोकळा असला काय नसला काय काही फरक पडत नाही. पण ही मालिका मात्र सिद्धार्थचीच आहे. तो असेल तरच गाडी रुळावरून नीट चालते.

मृणाल दुसानीस बोलताना , अशी डोळे का करते? आकाशात गेल्यासारखे? डोळ्याचा अँगल एकदम विचित्र वाटतो.

अलका कुबलची सावत्र बहिण वाटते. त्याच त्याच प्रकारच्या भुमिका
A0054ECB-0942-498B-901E-1A1F86977ED7.jpeg

मृणाल दुसानीस बोलताना , अशी डोळे का करते? आकाशात गेल्यासारखे? डोळ्याचा अँगल एकदम विचित्र वाटतो.>> तिचे संवाद पाठ होत नसतील म्हणून वाचून बोलत असणार.

मृणालच्या डोळ्यांची खूपच चर्चा चालू आहे. आता आहेत तिचे तसे डोळे. कोण काय करू शकतं? एखाद्याचं नाक चपटं असतं, कोणी अतीबारीक असतं, कोणी अतीउंच. प्रत्येकात काही ना काही असतंच. तरी ती हिट हिरॉइन आहे, हे नाकारू नाही शकत.
मला तिचा एकूण वावर आवडतो. शांत आणि आश्वासक वाटते. तिचा आवाज छान आहे- साधा बोलतानाचाही आणि गाणाराही.
हां, तिने सिरियलमध्ये ठणकावून बोलावं हे फक्त विशफुल थिंकिंग आहे, तसं होणार नाही, हे माहित आहेच आपल्याला Proud

ही सिरियल कधी आवडते, कधी नाही. रोज बघत नाही. शशांक, अनुची मैत्रिण, वंदना गुप्ते वगैरे असले की मजा येते. वंदना गुप्तेंच्या बहुतांश साड्या आवडतात. मस्त, एक्स्क्लुजिव साड्या दिल्यात त्यांना. ती वहिनी आवडत नाही. अती ओव्हरअ‍ॅक्टिंग आणि कर्कश्य आहे.

तिचे डोळे कसे आहेत अशी पोस्ट नाहिये माझी. पोस्ट नीट वाचावी. तिचा अभिनय करताना, डोळ्यांची दिशा कशी असते ह्यावर मत आहे.
नाहितर कसे का असोत कोणाचे डोळे कि फर्क पेंदा..

कालच्या एपिसोडमधला सिद्धार्थ पाहिला का कुणी? मला त्याची जिवणी- विशेषतः खालचा ओठ विचित्र वाटला. अनुष्का शर्मासारखं ह्यानेसुद्धा ओठाचं काहीतरी करून घेतलंय की काय?
नायक नायिका दोघांनीही आपापली वजनं कमी करावीत असा एक प्रे. स.
मला मृ दु दिसायला आवडते. कधीकधी मीनाकुमारीसारखी दिसते. तिला स्वतःलाही तसंच वाटत असावं. कारण तिचा वावर, अभिनय आणि संवादफेक यावर मीनाकुमारीची छाप दिसते. आवाजही तसाच दर्दभरा आणि मधुर आहे. हिलाही नृत्य जमत नसावं बहुतेक. (पण मीनाकुमारीचे डोळे अतिशय बोलके होते.) मृदुच्या हाताची बोटं निरखली पाहिजेत एकदा. (हलक्याने घ्यावे.)

मला मृणाल दुसानीस 'माझिया प्रियाला प्रित कळेना' मधली शमिका म्हणून आवडली. पहिली सिरियल होती तिची. वेगवेगळया छटा होत्या तिच्या भुमिकेला. दुसर्या सिरियलपासून, ' तु तिथे मी' पासून मात्र ती अलका कुबल मोड मध्ये गेली ती परत आलीच नाही.

हाताची बोटं निरखली पाहिजेत म्हणजे. काय संदर्भ. नायक बारीक आहे. नाटकातपण बघितलं आहे त्याला, खूप बारीक आहे तो.

वंदना गुप्तेंच्या बहुतांश साड्या आवडतात. मस्त, एक्स्क्लुजिव साड्या दिल्यात त्यांना.

+१११
मी पण तिच्या साड्या खूप admire करते. बिझनेस फॉर्मल category तल्या सुंदर सुंदर साड्या असतात. ती खूप छान कॅरी पण करते. ब्लाउजेस पण छान असतात. तिची Jewellery पण आवडते मला.

अनु छानच दिसते पण तिला लग्नानंतर तरी जरा मेकअप द्यायला हवा होता. तेच ते छोटे कानातले आणि बारीकसं काळं मंगळसूत्र दिलंय. लग्नात शशांकने निवडलेलं png चं छान होतं ते तरी द्यायचं होतं.

Pages