हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

मागच्या आठवडयात एक प्रोमो बघितला ह्याचा 'सूनध्यान' बघताना. अनू चक्क सान्वीला घरातून हाकलत होती. आज नवीन प्रोमो बघितला. त्या सायकोची आई आलीये आणि ती सिद्धार्थला ' जावईबापू' हाक मारते.

कोण सायको. अनुची सासू तिला माहेरी चल म्हणत असते अविच्या श्राद्धासाठी. अनु नेहेमीप्रमाणे मुळूमुळू रडत असते पण सिद्धार्थ म्हणतो की मी पण येतो बरोबर. मला खूप आवडलं त्याचं वागणं.

ही सिरियल मी बघत नाही.सुरुवातीला काही भाग पाहिले.पण दोन तीन दिवसांपूर्वी यू ट्युब वर सर्फिंग करत असताना या मालिकेच्या बाबतीत एक व्हिडिओ होता की ती सानवी आता सिध्दार्थची खोटी बायको म्हणून राहणार आहे.
हा काय प्रकार आहे ,कोणाला माहित आहे का.
बिबॉस बघताना प्रोमोमध्ये तर त्या अनु आणि सिध्दार्थच लग्न झालेल आहे अस दाखवल होत आणि सूनध्यान मधल्या प्रोमोमध्ये ती अनु चक्क त्या सानवीला बाहेर काढताना दाखवली आहे.

सूनध्यान >>>>>हे आधी कळतंच नव्हते किती वेळ,मला वाटले नवीन शिरेल की काय,ज्यात नेहमीप्रमाणे सून ध्यान असेल पण म्हटले इतके वास्तववादी नाव नाही देणार न
Rofl

सून ध्यान Proud हो ती सान्वीची आई म्हणे आजारी आहे, हृदयाला भोक आहे तिच्या. सान्वीची आई आवडते मला, मस्त दिसते ती कलाकार. दुर्गा मॅडमच्या घरात किती बाहेरचे लोक राहतात, जावयाने पण येऊन राहायचं ना, उगाच संयुला विनवण्या करत असतो. अनु भुवयांवर काहीच काम करत नाही, वाढेल तशा वाढू देते, पेनसिलही फिरवत नाही वाटतं.

मला वाटते अनूच्या भुवया मुद्दामच जाड, ठसठशीत राखल्या जातात ज्यायोगे डोळ्यांवरचा फोकस कमी होईल. डोळ्यांत निसर्गत: असलेला दोष झाकण्याची किंवा लक्ष दुसरीकडे वळवण्याची ती एक युक्ती असावी. किंवा (हा आपला माझा अंदाज) ते मेडिकली करण्यायोग्य नसावे.

काय वाट्टेल ते चाललय यार या मालिकेत, आता तर फार्सिकल नाटक बघतेय कि काय असं वाटतय, संयूच्या नव-याला अनुचा नवरा म्हणून उभा करणे म्हणजे हाईट आहे मूर्ख पणाची. आता थांबवावी का मालिका बघायची?

आता थांबवावी का मालिका बघायची?>>>आजचा भाग बघून माझ्याही मनात हाच विचार आला.
आता सान्वीच्या आईने म्हणावे कि नातवाचे तोंड बघितल्याशिवाय मी काही जाणार नाही :|

पण असं का, म्हणजे त्या संयुचा नवरा सिद्धार्थ आहे, हे मुळात नाटक का करायचं. मग पुढे नाटक नाटक खेळत बसलेत का.>>> तसे नाही. सान्वीची आई मरू नये म्हणून सान्वीचा नवरा सिद्धार्थ आणि अनु पाठराखिन झाली आहे. आज कहर झाला. संयुच्या नवर्‍याला अनुचा नवरा केलाय Uhoh

आणि सानवीची आई खरोखर आजारी आहे कि ते पण ह्या सानवी अँड कंपनीचं नाटक ते समजत नव्हतं इतके दिवस, पण आता खात्री पटली कि ती जेन्युइन आहे .पण आता ती बरी झालीये तर ह्या सिद्धार्थ वगैरेंनी सांगावं कि खरं काय आहे ते. खोट्या च्या भोवतीच नाट्य असतं असा ठाम समजूत मराठी मालिकांची झालीये, फक्त खोटंच बोलताना दाखवतात सगळ्यांना

कथेत ट्विस्ट आणायच्या नादात प्रचंड गुंतावळी करून ठेवतात! आणि त्या चॅनेलने त्यांच्या अमक्या मालिकेत तमके दाखविले चला आप्ण देखिल दाखवुयात! असले भंपक फंडे सुरु असतात ह्या मालिकांचे मग विसरतात आपण नेमके काय ठरविले होते. निव्वळ भंपकपणा सगळा!

ती संयु सुधारली की काय? एक एपिसोड बघितला त्यात सगळे डम्ब चेराडस खेळत होते. तेव्हा बघितल. संयु चक्क अनुशी चान्गल बोलत होती. हा दुर्गाबाई घरी नसण्याचा परिणाम की काय?

हो ..... ती सान्वी तिला मारायला जाते.. तर अनु तिची बाजु घेते ..... तिची आई आल्या पासुन मालिका मध्ये काही राम नाही.... दुर्गाबाई आल्या शिवाय हे असेच दाखवणार... tya gelyat na london la amurta barobar shooting karat ahet

मला वाटतंय की सानवीची आई खरी नाहीय. कारण अनूच्या वहिनीला अनूच्या पहिल्या लग्नात तिला पाहिलेल्याचे आठवत नाही. सानवीच्या आईनेसुद्धा अनूच्या भाऊभावजयीला ओळखलं नाही.

दुर्गी गायब. अनूचे आईवडील पण गायब. अनूचे सासूसासरे (सेट १) पण दिसत नाहीत.
तरी आपलं सवय लागलीय म्हणून पाहायचं. मध्येच एखादा एपिसोड मिस झाला तरी चालतंय.
दिवाळीत साड्या मस्त होत्या सगळ्या बायकांच्या. अनूच काय सान्वीची पण साडी छान होती प्रत्येक वेळी.
सान्वीच्या आईचं काम करणारी अभिनेत्री दुसर्‍या कोणत्या मालिकेत होती का?

<<मला वाटतंय की सानवीची आई खरी नाहीय.>>
+१ ती नाटक करत असावी. खरोखर गंभीर आजारी असलेली व्यक्ती इतकी टुणटुणित कशी असेल?

अमृता कोण? संयु तर आईकडे पडीक असतेच, आता तिचा नवरा पण का Uhoh
सेट 1, टुणटुणीत Rofl
सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आराम दिला असेल. सान्वीची आई स्टारच्या जिवलगामध्ये अखाची आई होती. पूर्वीही कुठे कुठे बघितलं आहे.
रच्याकने, मराठी कलाकार आजकाल वारंवार परदेशात जातात. कलर्स अवॉर्डला सुमो नव्हती कारण ती अमेरिकेला गेली होती. मज्जा आहे.

<मला वाटतंय की सानवीची आई खरी नाहीय.>>
+१ ती नाटक करत असावी. खरोखर गंभीर आजारी असलेली व्यक्ती इतकी टुणटुणित कशी असेल?

नवीन Submitted by सनव on 5 November, 2019 - 13:11
रिअल लाईफ मध्येच आजारी व्यक्ती अशक्त बारीक वैग्रे दिसते . मालिकांमध्ये फार फार मेकअप करून डोळ्याखाली काळे करतील आणि हार्ट चा प्रॉब्लेम, हर्नियाचा प्रॉब्लेम जरी असला तरी उग्गीच खोटं खोटं खोकले कि झाला आजारी.

सान्वीच्या आईचं काम करणारी अभिनेत्री दुसर्‍या कोणत्या मालिकेत होती का?>>>> लव लग्न लोचा (झी यूवा) मध्ये होत्या.
आता वाटेल तसा गोंधळ घालतायत. TRP सेट झाला ना.
एक आठवड्याने बघितलं तरी तेच दळण दळतायत.

मला वाटतंय की सानवीची आई खरी नाहीय. कारण अनूच्या वहिनीला अनूच्या पहिल्या लग्नात तिला पाहिलेल्याचे आठवत नाही. सानवीच्या आईनेसुद्धा अनूच्या भाऊभावजयीला ओळखलं नाही.>>>>>> हे कधी झालं? काल बंद केला टिव्ही ह्या सिरीयल च्या वेळी. परवाच्या एपिसोड मध्ये ते सिद्धार्थ चे काका छोट्या छोट्या पुड्यांमधे काय ठेवताना दाखवले आहेत ? त्यातलं काहीतरी सानवी पळवते , काय ते काही कळलं नाही.

मला वाटतंय की सानवीची आई खरी नाहीय. कारण अनूच्या वहिनीला अनूच्या पहिल्या लग्नात तिला पाहिलेल्याचे आठवत नाही. सानवीच्या आईनेसुद्धा अनूच्या भाऊभावजयीला ओळखलं नाही.>>>>>> पण अनू तिला कांचन मामी म्हणून ओळखते की.

छोट्या छोट्या पुड्यांमधे काय ठेवताना दाखवले आहेत ? त्यातलं काहीतरी सानवी पळवते , काय ते काही कळलं नाही.>>> हो. कसल्यातरी बिया होत्या. जमालगोटा असेल काय? नाही तरी तोंड काळे करणे, हाताला चटके देणे, डोळ्यात कुंकू टाकणे असले फालतू उद्योग करून झालेत. जमालगोटाचा प्रयोग राहिलाय.

Pages