हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

अलीकडे जरा बरं चाललं होतं इथे. पण आता दुर्गी परत येऊन काय गोंधळ घालणार बघूया.

अ‍ॅक्चुअली सान्वीशिवाय बोअर वाटेल मालिका. ती धमाल करते खूप.

वंदना गुप्ते यांचं प्रतीक्षा लोणकरबरोबर नाटक आलं आहे. हेच कारण असेल मालिका सोडण्याचं. आशा शेलार यांना बघायची सवय नाही दुर्गा म्हणून. असंही मालिका बघत नाही. शनिवारी दुपारी थोडा रिपीट बघितला जातो.

दुर्गाबाई बदलल्या पासून कंटाळा येतो बघायला.

रच्याकाने, घर आणि कंपनीचे शेअर सानवीला का आणि कधी दिले?

रच्याकाने, घर आणि कंपनीचे शेअर सानवीला का आणि कधी दिले?>>> मागे कधीतरी सान्वीने काम्काजाचे पेपर आहेत म्हणून दूर्गाबाई कडून सह्या घेतल्या आणि सगळं घर-दार, ऑफिस-धंदा आपल्या नावावर करून घेतले होते.
इथे एक घर नावावर करायचे असेल तर सगळी कागद्पत्रे जमवायची, नोटरी, वकिल, रजिस्ट्रेशन असा बरेच काही करावे लागते. पण मालिकेत कुठल्याही पेपरवर आरामात बसल्या-बसल्या सह्या केल्या कि झाले.

दुर्गा बदलली तेव्हाच मालिका बघायची बंद केली. उगाच जुन्या दुर्गाची शिक्षा नव्या दुर्गाला देतात असे वाटत राहते.

हो आशा शेलार नाही आवडत वंदना गुप्तेंच्या तुलनेत. अ‍ॅक्टिंग नीट जमत नाही.
साड्या पण वंदनाताईंसारख्या कॅरी करता येत नाहीत.
अ‍ॅक्चुअली आता नवीन काही ट्रॅक नसल्याने तेच ते सानवीची नवीन नवीन कारस्थानं दाखवत आहेत. पण ठीक आहे- मी बघते अजूनही.
संक्रांतीला सगळ्यांच्या साड्या मस्त होत्या. संयूच्या पैठणीचा काय वेगळाच आकाशी कलर होता.

Pages