हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

मालिकेच्या सुरुवातीला अनु आणि सिड दोघेही सडपातळ होते. हळूहळू दोघांचीही तब्ब्येत सुधारली. आता परत आल्यावर सिड जरा बारीक दिसू लागलाय.
मीनाकुमारीच्या हाताचे एक बोट अपघाताने कापले गेले होते. त्याचा तिला खूपच गंड - कॉंप्लेक्स होता. तो हात ती नेहेमी रुमाल, पदर ओढणी अशा वस्त्रात गुंडाळून वावरायची.

धन्यवाद हिरा, हे माहित नव्हते. अनु जाड होते तेव्हा तिचे दंड खूप जाड दिसतात. हे माझे निरीक्षण आहे. सिद्धार्थचे ओठ काही वेगळे नाही वाटले मला. दोघांचे नक्की लग्न झाले आहे ना. मी तुझा हात पकडू का, तू माझी मैत्रीण, हे असं नाहीये मित्रा हे संवाद ऐकून असं वाटलं की याचसाठी केला का एव्हढा अट्टाहास Uhoh

वन्दना गुप्तेच्या साड्या छान असतात , त्या कॅरी पण खुप छान करतात, शरा चे ड्रेसेस छान असतात , मेकप जरा एक लेयर कमिही चालेल,
मुणाल दुसानिस लग्नाच्या आधी ड्रेसेस मधे बारिक वाटत होती आता साडी मधे जाड वाटते कधी कधी, तिच्या साडी नेसण्यावर काय ऑबजेक्शन होत ते कळल नाही, व्यवस्थित तर नेसली होती, उलट कॉटन टाइप मटेरिअल असुन बरिच चान्गली वाटत होति.
बारिक कानातल्या एवजी जरा बर काहितरी द्द्यायला हवय तिला, आणी बुशी आयब्रोज ट्रिम केल्या तर बर दिसेल अजुन.

मला तिचा एकूण वावर आवडतो. शांत आणि आश्वासक वाटते. तिचा आवाज छान आहे- साधा बोलतानाचाही आणि गाणाराही.>>
मला सुरवातीला ती आलेली माझिया प्रियाला मध्ये तेव्हा ती ऐश्वर्या नारकर ची बहिण किंवा मुलगी वाटलेली..आवाजाचा पोत आणि दिसण बरचस साम्य आहे दोघींमध्ये

अलका कुबल प्रत्यक्षात खूप हसणाऱ्या आणि उत्साही आहेत. मृणाल प्रत्यक्षातही खूप शांत आणि सोशिक वाटते. गाते मात्र छान, चला हवा येऊ द्या मध्ये आली होती दीप्ती देवीबरोबर.

अनु चालताना पायात अंतर ठेवून डुलत चालते (गरोदर बाई सारखी). >> अय्या हे मला पण वाटलेलं, विशेषतः ती आणि सिद्धार्थ जेव्हा icecream खायला जातात रात्री, तिच्या त्या वेस्टर्न ड्रेस मध्ये हे जास्त वाटलं. खरंच goodnews आहे की काय?

खरंच goodnews आहे की काय?>> नसावी. ती आधी पण क्लब मधे स्विमिंग पूलच्या बाजूने चालताना जाणवले होते. मागे लग्नातही नऊवारीत सिदच्या शेजारी विश्राम स्थितीत उभी होती.

अनु चालताना पायात अंतर ठेवून डुलत चालते (गरोदर बाई सारखी). >> अय्या हे मला पण वाटलेलं, विशेषतः ती आणि सिद्धार्थ जेव्हा icecream खायला जातात रात्री, तिच्या त्या वेस्टर्न ड्रेस मध्ये हे जास्त वाटलं >>> + १२३४५६७८९

नवीन जाहिरात बघितली तिची शशांकबरोबर त्यात तर ती काहींच्या काहीच जाड दिसतेय. गुड न्यूज असेल तर छानच आहे.

गुड न्यूज असेल तर छानच आहे. >>हो पण मग सिरीयल मध्ये रिप्लेसमेंट येईल ना, आणि मृणाल शिवाय दुसरी कुठली अनु मला तरी बघवणार नाही

अस्सं सासरच्यावेळी पण ती गेली होती सोडून अमेरिकेला. तिच्या जागी आलेली दुसरीपण छान होती पण तोपर्यंत मालिकेत काही जीवच उरला नव्हता. संतोष जुवेकरने केस भयंकर रंगवले होते Proud मग त्याला गायबच केला, शेवट काय झाला काय माहित.

अनु चालताना पायात अंतर ठेवून डुलत चालते (गरोदर बाई सारखी).>> हो स्पेशली सिद्धार्थने आणलेल्या पिवळ्या ड्रेस मधे तर फारच ! तिला तो ड्रेस् अजिबात कॅरी करता येत नव्हता, सलवार-कमिज मधला टॉप घातलाय पण सलवार घालायची राह्लीलीय अस काहिस दिसत होत.
पुजेवरच अ‍ॅर्ग्य्मेन्ट् तर धन्यच आहेत.

हो स्पेशली सिद्धार्थने आणलेल्या पिवळ्या ड्रेस मधे तर फारच ! >>>>>>> ते ड्रेसमधल्या अनूला दुर्गा आणि संयु असे काही बघत होत्या , जणू काही ती बिकिनी घालून समोर उभी आहे.

Lol असं काय घालायला दिलेलं?? फोटु डकवा..आता हि शिरेल पण बघण बंद केलंय मी.

ते ड्रेसमधल्या अनूला दुर्गा आणि संयु असे काही बघत होत्या , जणू काही ती बिकिनी घालून समोर उभी आहे.>> अगदी अगदी ! माझ्या मनात हेच आलेल, नावडतीच मिठ किती अळणी असाव याला काही सुमारच नाही
बर गमत म्हणजे रात्री काकु येवुन लॉन्डी घेवुन जाते थोड्यावेळाने हे दोघ बाहेर जातात तर म्हणे अडिच वाजता बाहेर गेले, काही सुसन्गती?

अभिजीत केळकर डोंबिवलीत आलेला, प्लस शशांक केतकर, मृणाल दुसानीस. मला माहिती नव्हतं, अर्थात मी जात नाही कलाकारांना भेटायला वगैरे पण माझी छोटी भाची टोटली फिल्मी आहे, ती मामाला घेऊन गेलेली, मी आताच फोटो बघितले fb वर. केळकर आणि भावाचा सेल्फी आहे. बाकी श्रीरंग भावे वगैरे आलेले. भावाने चांगली अभिनेत्री मृणाल दुसानीस असं लिहिल्यावर मी Lol . आता विचारेन त्याला Wink . अर्थात तिच्याबरोबर फोटो नाहीयेत.

मृणाल दुसानीस एवढे पैसे कमवत असेल पण साध थेडिंग करता येउ नये का? किती विचित्र दिसत ते. अजून जाड ठेवला तर चंद्रकांता ची यक्कू सारखे दिसतेल

काकांकडून घेतल्या असतील. तो कबूल करतो ना खोट्या बांगड्या बनवल्याचं. पूजेच्या दिवशी हाsss गोंधळ. पूजेचा दिवस नक्की किती मोठा होता, अनु आणि सिद्धार्थ दोनवेळा मेकअप सकट कपडे बदलून आले, काकाने खोट्या बांगड्या बनवल्या, वाहिनीने वाटी चोरली, परत ठेवली, ती परत तिच्या पर्समध्ये गेली, अनु सोनाराकडे गेली, दुर्गा आजारी पडली. संयूचा नवरा छान आहे, त्याने संयूचा नाद सोडून द्यावा, ती काही आईला सोडून जात नाही.

साध थेडिंग करता येउ नये का? किती विचित्र दिसत ते. अजून जाड ठेवला तर चंद्रकांता ची यक्कू सारखे दिसतेल... +१

यांच्याकडे प्रत्येक सण-समारंभ हा गोंधळ-राडा करण्यासाठीच असतो. नटून-थटून सगळे एकत्र येतात, कचाकचा भांडतात आणि पाहुणे न जेवता घरी जातात.
संयूचा नवरा छान आहे, त्याने संयूचा नाद सोडून द्यावा, ती काही आईला सोडून जात नाही.>> हो. तो म्हणत असतो कि घरी चल तर ती नकार देते. भावाचे लग्न मोडता स्वतःचा संसार विसरुन गेली आहे.

मला वाटतं इथले शेरे ताशेरे निर्मात्यांपर्यंत पोचले असावेत कारण कालचा एपिसोड थोडा हलका फुलका होता. बाळबोध विनोद. पण त्या कचकचीपासून थोडा वेळ सुटका झाली.

आता स्फोट होऊन काळी शाई उडवून तोंड काळे करणार ... Uhoh
मग खूर्चीचा पाय मोडून ठेवणे, जिन्यात तेल ओतणे, भाजीत जास्त तिखट/मीठ/जमालगोटा मिसळणे, रात्री दार वाजवून पळून जाणे, ‘भॉ’ करून घाबरवणे, कपडे कापून ठेवणे, सोफ्याच्या कुशनखाली पादनारा आवाज करणारी पिशवी लपविणे असे फालतू प्रकारही होऊन जाऊदे.

सोफ्याच्या कुशनखाली Rofl बाकी सगळे प्रकार बघितले किंवा ऐकले होते पण हे काही तरी नवीनच. मंदार देवस्थळी किती वर्ष तेच तेच दाखवणार. संयूचे ड्रेसेस छान असतात. किती पीळ मारतात, हारच विसरले, याव नी त्याव.

Pages