हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

दुर्गा किती मूर्ख आणि सायको आहे एवढंच कळंतं प्रत्येक एपिसोडनंतर. >>> हो ना. अनू नको हे ठीक आहे पण सानवी??? ती सायको आहे हे अजुन पर्यंत समजलं नाही Uhoh

सिदला धमकि दिलेली होती कि तू अनुशी लग्न केले तर तुला प्रॉपर्टीत्ले काहीही देणार नाही.
दुर्गा सही करून प्रॉपर्टी काकाच्या नावावर करते.
त्याआधीच सिद सही करून प्रॉपर्टी (जी त्याला मिळणार नसते) आजोबांच्या नावावर करतो. Uhoh

सिध्दार्थने आईला मस्त सुनावलं आणि तिचं नाटक ओळखलं. तो सगळ्यांना बरोबर ओळखून आहे. >> कुठे काय! काकाने कान भरले तेव्हा कुठे त्याची ट्युब पेटली.
अर्थात सीरियलमध्ये काहीही घडू शकतं म्हणा. आणि ती दुर्गामॅडम सगळ्यांना ह्याच्या त्याच्या शपथा घालत सुटते त्याचाही अतिरेक झालाय.>>+१ होना. तिला कोणीही उलटी शपथ घालत नाही. सगळे तिने शपथ दिली कि गप्प बसतात.

आता हे कायसे डिव्होर्स पेपर अनुकडून सही करून घेणार म्हणजे हिंदी सिरीयल प्रमाणे लग्न वगैरे सगळं व्यवस्थित होऊ देईल आणि मग ऐन वेळी सिद्धार्थ समोर पेपर्स ठेवेल हे अनुने तुझ्यासाठी दिलंय म्हणून. मग आहेत गैरसमज आणि इत्यादी.

तो तिथे मरायला टेकला होता बिचारा आणि ही बया गेल्या गेल्या जी काय सुरू झाली विचारू नका. शेवटी तो बोलला उठतो बये नायतर कोमात जायच्याआधी वरती जायचो.

तोच प्रोमो सारखा सारखा दाखवतात bb बघताना. एकतर ती अनु आधीच रडी त्यात अजून. किती दिवस झाले प्रोमो बदलत नाहीत.

मुलगा डेथ बेड वर. आई वाट पाहातेय केव्हा शुद्धीवर येतोय. आणि अर्धवट शुद्ध आल्यावर ही डिवोर्सचे पेपर समोर करतें सही कर म्हणून. आई आहे की कोण आहे?
आणि कोर्ट्सुद्धा परस्परसहमति असली तरी नवराबायको कोणीच समोर न येता डिवोर्स देऊन टाकणार की काय? असं अगदी अपवादात्मक केसमध्ये घडतं.

मालिकावाल्यांच बहुतेक ठरलेल नसतं नेमक काय दाखवायच ते. प्रोमो मधे जे दाखवतात ते खुप वेळा घडतच नाही. उदा. सिध्दार्थ ने घर सोडण्याच्या प्रोमो मधे तो आईच्या समोर गाडीची चावी, पाकिट काढून ठेवतो. प्रत्यक्षात काकुच्या हातात देताना दाखवल. घराण्याच्या बांगड्या अनूच्या हातात घालतानाचा प्रोमो, अनूला भेटून आपल्यात मैत्री शिवाय काहीच नव्हतं का आणि माझ उत्तर मला मिळाल म्हण्याचा प्रोमो....... हे काही घडलच नाही प्रत्यक्षात

मला आवडतोय हा ट्रॅक. आता पुढचे काही दिवस लग्नाची धामधूम असेल. आधी लग्न तर होऊ दे घटस्फोटाचं मग नंतर बघू.

सिद सगळ्यांना पूर्ण ओळखुन आहे हे पुन्हा एकदा दिसलं. त्याने लगेच ओळखलं की अनुने त्याला प्रेशरखाली हो म्हटलंय. तो लग्नाला नकार पण देतो पण आता अनुच ऐकत नाहीये तर तो काय करणार Wink

अनुच खर प्रेम आहे का सिदवर? म्हणून तिने मनापासून लग्नाला होकार दिला? का तो शुद्दीवर यावा म्हणून हो म्हणाली?

अनूला तो आवडतोय. तो नसला की तिला चुकल्यासारखंसुद्धा वाटतंय. त्याला टाकून बोललं तर तिला दु:ख होतं. पण हे सर्व वाटणं म्हणजे प्रेम आहे हे तिला कळलं नाहीय किंवा कळून घ्यायचं नाहीय. अवीशी प्रतारणा होईल याचं दडपण आहे तिच्यावर.

अवीशी प्रतारणा होईल यापेक्षाही मोठं कारण जे अनु त्या प्रपोजलच्या सीनमध्ये सांगते ते म्हणजे तिला पुन्हा संसाराचा डाव मांडायचा नाहीये.
एकदा हे असं झाल्यामुळे पुन्हा इमोशन्स इन्व्हेस्ट करायची तिला भीती वाटते. आणि सिद तिला नेहमी हेच सांगत असतो की हरण्याच्या, काही गमावण्याच्या भीतीने तू आयुष्यातील आनंदपण घेऊ शकत नाहीस .

तो अनुचा पहिला नवरा नक्की दिवंगत झालाय ना, नाहीतरी लग्न झाल्यावर त्याला आणायचे. किंवा त्याच्यासारखा दिसणारा दुसरा duplicate उभा करायचे, सिरीयलवाले असं करतात बरेचदा, जुना formula.

माप ओलांडताना किती नाटकं! अनु पण प्रत्येकवेळी पाय पुढे करुन लगेच मागे घेत होती. जणू वाटच बघत होती कोणी टोकायची Angry
कोणी काय बोलले कि पटकन तोंड उघडून पटापट काय ते बोलून/सांगून सगळ्यांना गप्प करेल तर शपथ!! सगळे कहीपण बोलत राहतात अन ही रडके तोंड करून बघत राहते, चमी कुठची!!

किती नॅस्टी दाखवलीय गुप्ते आई!!
आणि अनू म्हणजे माहेरच्या साडीतली अलका कुबलच आठवते.
काहीही काळानुसार दाखवत नाहीत.

त्या अनुला काही डायलॉगच दिलेले नाही लेखकाने!

रडका चेहरा करून, 'असे काही नाही.' 'प्लीज असे नको.' 'मी आहे ना.' 'सॉरी माझे चुकले.'

असे ४-५ वाक्ये दिलीत गेले जवळपास १५-१६ भागात!

हो अगदी माहेरची साडी टाईपच चाललीये सिरीयल, बघवत नाही, आज पासून नाही बघणार. किती छळ सग्ळ्यांनी मिळुन करावा ह्याला कही लिमीट्च नाही. आणि अनु तोंड उघडून बोलतच नाही, तिने सरळ दुर्गा मॅड्म्ला सांगायचं नाही का कि तुम्हीच मागे लागला होतात लग्नाच्या. आधिच्या लग्नात, माहेरच्या लोकांत अनु अडकली आहे असं जेव्हात्या म्हणत होत्या तेव्हा.

ह्या सिरीयलपासून लांब मी अनुमुळे मागेच लिहिलं पण bb साठी मिनिटभर आधी लावते tv आणि ती रडी दिसतेच नेमकी, sorry तिच्या फॅन्ससाठी. बरं तो हिरो मात्र दिसत नाही नेमका, हिलाच बघावं लागतं. वंदना गुप्ते पण फार वाईट दिसते यात.

त्या अनुला काही डायलॉगच दिलेले नाही लेखकाने!
रडका चेहरा करून, 'असे काही नाही.' 'प्लीज असे नको.' 'मी आहे ना.' 'सॉरी माझे चुकले.'
असे ४-५ वाक्ये दिलीत गेले जवळपास १५-१६ भागात!>>>> अगदी अगदी

'असे काही नाही.' 'प्लीज असे नको.' 'मी आहे ना.' 'सॉरी माझे चुकले.'
यात अॅडिशन
दादा अरे कशाला?
वहिनी अगं बास ना

अगदी पिळ आहे ही मालिका!! कलर्सच्या बहुतेक मालिका अश्याच असतात. बटबटीत!!
ती मृणाल लोकांना कशी आवडते कोण जाणे? सुंदर रेखीव चेहरा आहे पण चेहर्‍यावर नेहेमीच बारा वाजलेले असतात. ऊस्फुर्तपणा, आनंद कधी दिसतच नाही. अगदी हसताना सुद्धा हातचं राखून हसल्यासारखी वाटते. आता पर्यंतच्या सगळ्याच रोल्स मधे उगीच गंभीर भाव चेहर्‍यावर घेउन फिरते.
वंदना गुप्ते सुद्धा ह्या मालिकेत इतक्या बटबटीत दिसतात आणि बटबटीत अभिनय करतात.

'असे काही नाही.' 'प्लीज असे नको.' 'मी आहे ना.' 'सॉरी माझे चुकले.'
यात अॅडिशन
दादा अरे कशाला?
वहिनी अगं बास ना>> य़ात मागे, पुढे, मधे please

ती कधीच स्पष्ट आणि पूर्ण सांगत नाही. समोरच्याने पानउतारा केला तरीही गप्प बसते.

ज्यांनी तोंड उघडायला हवं ती माणसं तोंड उघडत नाहीत आणि ज्यांनी गप्प बसावं असं वाटतं त्यांच्या तोंडाचा पट्टा थांबतच नाही.

Pages