हे मन बावरे - कलर्स मराठी

Submitted by सनव on 27 May, 2019 - 10:23

सध्या कलर्सवर ही मालिका बघत आहे. तशी टीपीकलच असली तरी आवडत आहे. (मी सध्या ही एकच मराठी मालिका बघते.)
अनुश्री दीक्षित (मृणाल दुसानिस) ही एक विधवा तरुणी आहे. तिच्या भूतकाळाबद्दल तुटक माहिती मिळते की तिचा पती अवि (ज्याच्याशी तिचा सुखाने संसार चालला होता) तो आता या जगात नाही. ती गर्भवती असते पण मिसकॅरी करते असाही उल्लेख आला आहे. आता तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला सिद्धार्थ (शशांक केतकर) तिच्या प्रेमात पडला आहे व तिलाही आवडतो आहे. पण सिद्धार्थ श्रीमंत आहे व त्याच्या आईचा या नात्याला विरोध आहे. अनुची एक दूरची नणंद जी जरा मेंटल आहे तिला पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. आणि मुळात अनु आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात करू इच्छित नाही. या वळणावर मालिका आहे.

सर्व प्रमुख कलाकार चांगला अभिनय करतात, अनुची सायको नणंदही!

Group content visibility: 
Use group defaults

सारखं विधवा विधवा असं का म्हणतात तिला? बाकी काहीच ओळख नाही का तिची? प्रत्येक वेळेस तो शब्द तिच्यासाठी उच्चारला की मला वाईट वाटतं.

@ मेधावि: सहमत
मलाही वाटतं की सर्वांनी 'विधवा' शब्दाचा उल्लेख शक्य तेवढा टाळावा; ऐकायला बरा नाही वाटत.

अनूने विधवेचं बेअरिंग मात्र छान सांभाळलंय. फार खळखळून हसत नाही, आनंदाने वेडीपिशी होत नाही. रागसुद्धा बेताचाच. अगदीच संतापली तर प्लीज म्हणते की बस्स. अशा वागतात आजकालच्या विधवा? >>>>>>>>>> नाही. सिरियलमध्येच विधवा नायिकान्ना अतिउदास दाखवतात. त्यान्नी कधीही खळखळून हसू नये, फक्त त्यान्च्या जीवनात दुसरा नायक आल्यावरच त्यान्नी बदलाव असे सिरियलवाल्यान्चे नियम असतात.

अनूने विधवेचं बेअरिंग मात्र छान सांभाळलंय. फार खळखळून हसत नाही >>> ती मोठी बिझनेस वुमन होती आधीच्या सिरीयलमधे, प्रेमळ बाबा, प्रेमळ नवरा तरी उदास उदास अशीच होती. सॉरी पण ती अभिनय असाच करते.

सिद्धार्तचे घर का सुटले पण, आईने घराबाहेर काढले का. ते मंदिरात का भेटले, येता जाता बघितलं काल. आधीच्या मालिकेत पण सारखं मंदिर दाखवायचे, असं सासर मध्ये ती स्कूटर घेऊन मंदिरात जायची संतोष जुवेकरला भेटायला.

काका बदलले, वाटलच होत, एतके दिवस प्रदिप पटवर्धन ला दाखवत नव्हते तेव्हाच वाटलं कि तो मालिकेतुन बाहेर पडलाय. हा नवीन अ‍ॅक्टर कोण आहे , आधी कुठ्ल्या सिरीयल मधे होता तेच आठवत नाहिये. क्राइम पेट्रोल मधे बर्‍याच वेळा असतो. नाव नाही माहीत.

आधी कुठ्ल्या सिरीयल मधे होता तेच आठवत >>> सिरिअलचं नाव नाही आठवते पण नायीकेचं नाव उर्वी असतं तिचा तो बाबा होता.

आधी कुठ्ल्या सिरीयल मधे होता तेच आठवत >>> सिरिअलचं नाव नाही आठवते पण नायीकेचं नाव उर्वी असतं तिचा तो बाबा होता.>>>>>>पसंत आहे मुलगी Happy थँक्स मी नताशा.

विनोद लव्हेकर का. मी बघितला नाहीये अजून हा नवीन काका.>>>> हो बहुतेक.

झी मराठीवर होती का ती? त्या बाबाचे नाव अनुप मिश्रा आहे. तो वहिनीसाहेब या सिरीयलमध्ये होता. आश्विनी एकबोटेचा नवरा दाखवला होता. उर्वी म्हणजे तीच ना? जी गिरीश ओकची सून दाखवलीय?

विनोद लव्हेकर का. मी बघितला नाहीये अजून हा नवीन काका.>>>> हो बहुतेक.>>> नाही , मी अत्ता गुगलंल तर विनोद ल्व्हेकर वेगळाच आहे :Biggrin:

आता जेव्हा अनूच्या वहिनीला कळेल की सिद्धकडे आता काहीच उरलेले नाही, अगदी कंगाल झालाय तेव्हा तीच ईशूला त्याच्यापासून दूर करेल आणि सिद्धार्थलाही घरातून हाकलायचा प्रयत्न करेल अनूच्या मागे कटकट करून. आता सानवीची काय रिअ‍ॅक्शन असेल ते पाहू या. आणि दुर्गा मॅडम 'माता न तू वैरिणी' होऊन सिद्धार्थला नोकरी मिळण्याची प्रत्येक संधी आपली दहशत वापरून उधळून लावते की काय तेही. मग नयना आपटे आपला व्हेटो वापरतील बहुधा.

सिद्धार्थच्या काकांच्या भूमिकेद्वारे प्रवेश केलेल्या नवीन कलाकाराचे नाव अनूप मिश्रा नसून विजय मिश्रा आहे. याआधी त्यांनी झी मराठीवरील 'पसंत आहे मुलगी' ह्या मालिकेत उर्मीच्या बाबांची 'विद्याधरची', सोनी मराठीवरील नुकत्याच संपलेल्या 'हृदयात वाजे समथींग' मालिकेत यशोधनच्या बाबांची 'शिरीष रीसवूडांची' भूमीका केलेली आहे. ह्याशिवाय स्टार प्रवाहवरील 'छत्रीवाली' मालिकेत 'माधव जामकरांच्या' भूमीकेत काही भाग दाखवून नंतर त्यांचा खून झाल्याचे दाखवले. कदाचीत 'हे मन बावरे' ह्या मालिकेत प्रवेश करण्यासाठी त्यांची भूमीका संपवली असावी. अन्यथा ते मधुरा जामकरच्या कित्येक वर्ष परागंदा असलेल्या वडीलांच्या भूमीकेत सामोरे आले होते.

मी ही सिरीयल बघायला सुरुवात केली तेव्हापासून काका दाखवलाच नाहीये. पण प्रदीप पटवर्धनना बघायला आवडलं असतं, चांगले कलाकार आहेत.
सिध्दार्थने ऑलरेडी आई, काकू, सानवी, संयु सगळ्यांना एकेकदातरी अपमानित केलं आहे. तसं आता त्याने वहिनी व तिच्या मुलीला करण्याची वेळ आली आहे. एकूणच तो फार प्रॅक्टिकल आहे आणि कोणालाही लगेच योग्य जागा दाखवतो म्हणून मला आवडतो.

घर सोडताना सिध्दार्थने फोनही घरीच ठेवला होता ना? रादर काकूने मागून घेतला होता ना? मग आता सानवी आणि संयू त्याला कश्या काँटेक्ट करतात?

पूर्वी मृणाल चकणी दिसायची. त्यामुळे साइड्वेज बघणे टाळत असे. आता तो दोष तितकासा लक्ष्यात येत नाही. पण जुनी सवय शिल्लक राहिली आहे बहुतेक.

सध्या छान चालू आहे. प्रोमोमध्ये दाखवलं की सिद अनुच्या बाबांना सगळं सांगतो आणि बहुतेक लवकरच अनुलाही सांगून टाकेल. अनुने त्याला सानवीशी लग्न करू नकोस असं सांगितलं आणि स्वतः पैसे देऊन आजीच्या बांगड्या सोडवून आणल्या.

पण ती वहिनी किती चिडते अनुवर. तिलाही ओरडा हवाच असतो. एखादी म्हटली असती कि मी कमवलेले पैसे आहेत त्याचे मला हवे ते करेन.

वहिनी ला लगेच पैसे देणार कोणीतरी भेटतंच.>> हे हे.. बरोबर. पैसे मिळवण्याची तिची एव्हढी ईच्छा/हाव आहे कि तिच्या हातात पैसा येतोच.

सध्या bb बघतांना एक मिनिटं आधी बघितलं जातं किंवा bb मध्ये या सिरियल्सचे प्रोमोज बघितले जातात.

अनुसाठी सिद्धार्थने घर सोडलं, नोकरी करतो etc etc. सगळीकडे अनुशी लग्न करायचं सांगत फिरतो पण त्या अनुला माहीतेय का, तिला कोणी विचारलं का की तिला लग्न करायचं आहे का त्याच्याशी. सगळं हाच ठरवणार का. तिच्या मनाचा विचार करायचा आहे की नाही.

त्यादिवशी पावसात तिला तिचा नवरा आठवत होता बघितलं.

ती तिच्या नवऱ्याच्या आठवणीतून बाहेर पडलेली नाही आणि तिला पडायचेही नाही. तिची सासुही तिला सारखी टोचत राहते. अनुचा नवरा कोण होता, आधी बघितला नाही कुठे.

एक सेकंद बघितलं, तो कोण बघायला पुढे गेले तर परत दाखवलाच नाही Lol

तिला रहायचं असेल तर राहूदेकी नवऱ्याच्या आठवणीत, वेळ लागत असेल एखाद्याला, पण म्हणून दुसरीकडून लग्नाची जबरदस्ती कशाला.

कालपण होता स्पेशल एपिसोड नताशा. बिग बॉसआधी एक मिनिट लावलं तेव्हा सुरु होती ही सिरीयल. मग मी न्युज लावल्या थोडा वेळ.

अखेर सिद्धार्थने 'मन की बात ' स्पष्ट सांगून टाकली अनूच्या आईवडिलांना. सरितावहिनीनेही चोरून ऐकलं. अनूने ऐकलं की नाही कळलं नाही.

Pages