बटाटा हेटर्स क्लब

Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35

बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बऱ्याचदा गणपतीच्या आकाराचा बटाटा सापडला म्हणून कायप्पावर फोटो येत असतात. अशा बटाट्याचं काय करत असतील लोकं?

चांदनी चौक टु चायना मुवीत अक्षय कुमारने जशी बटाट्यारूपी गणेशाची पुजा केली तशी करत असतील; नाहीतर काहीजण पेटपुजा! Proud

बटाटा एक celebrity आहे
त्याच्या येण्यासाठी पायघड्या अंथरतात
तो style मधे आला की चाहत्यांची झुंबड उडते
त्याचे pictures अमिताभ, शाहरूकसारखे super hit आहेत
कित्येक रताळ्यांच्या घरात त्याचे फोटो लावलेले आहेत
त्याची प्रसिद्धी बघून haters पण वाढले

असेच काहीसे वाटले हा धागा बघून Happy

असो, मला बटाटा आवडतोही, आणि नावडतोही.
कोण बनवतेय त्यावर अवलंबून असते Lol
बायकोने करपलेला बटाटा बनवला तरी छान, नाहीतर जगात सोन्याचा बटाटा बनला असेल तरी वाईट Proud काय करायचे, असेच जगायला लागते...!

Submitted by रत्न on 7 April, 2019 - 12:52
>>>>>>>>>

हा प्रतिसाद कुणाला रुन्मेष सारखा वाटतोय का?
Submitted by अज्ञातवासी on 7 April, 2019 - 13:00

>>>>
>>>>>

धागा आजच पाहिला हा. बहुतेक त्या काळात मी माबोवर नव्हतो. ब्रेक पिरीअडमध्ये असेल. असो. अज्ञातवासी मी तो नव्हे Happy

मी बटाटाप्रेमी नाही ..
मी मांसाहारप्रेमी आहे.
बटाटा कोणी चिकन मटणात बिर्याणीत टाकला तर मला एक हातोडा घेत त्याचे डोके उकरावेसे वाटते.
भुर्जीत बटाटा हा देखील एक अशक्य वैतागवाणा प्रकार आहे.
त्यातल्या त्यात बटाटा कश्यासोबत बरा लागतो तर सुके बोंबीलासोबत.. बोंबील उग्र चवीचे असल्याने बटाटा त्याच्या चवीचे फार वाकडे करू शकत नाही.. तरीही अर्थात बोंबीलबटाटापेक्षा नुसते बोंबीलची चटणीच आवडते..

पण शाकाहारामध्ये मात्र मी भाज्याच खात नसल्याने प्रत्येक भाजीत बटाटा टाकायला लावतो आणि बटाटाच खातो.
जेवढे वांगे माझ्या डोक्यात जाते तेवढाच त्यातील बटाटा चांगला वाटतो..
त्यामुळे सांरांशच काढायचे झाल्यास
तसा बटाटा वाईट नसतो. नावडीच्या पदार्थात आधार वाटतो आणि आवडीच्या पदार्थात क़्डचण !

वडापाव, मसाला डोसा, पुरीभाजी ... हे पदार्थ टोटली बटाट्यावर अवलंबून असल्याने आणि बहुतांश हॉटेल टपरयांचा धंदा या पदार्थांवर चालत असल्याने बटाट्याला एक मानाचे स्थानही आहे.

ज्या घरांमध्ये लहान मुले भाज्या खात नाही आणि दुर्दैवाने मांसाहारही करत वा आवडत नाही तिथे बटाटाच त्यांना जगवतो. केवळ बटाट्याकडे बघूनच ते म्हणू शकतात की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जेवणात रोज बटाटा पाहिजे Happy

या लॉकडाऊन काळातही मी घरात सर्वात पहिले काही भरले असेल तर ते महिन्याभराचा बटाटा.. कारण बटाट्याचे आमच्या स्वयंपाकघरातील स्थान गौण नाही तर गोणीभर आहे Happy

हो.. आजच बटाट्याची भाजी होती. दोन टाईम बटाटा तोही पिवळा.. सांगता पण येईना खाता पण अशी अवस्था झालीये लॉकडाऊनमुळ.. Sad Sad Sad

आजच माझी जाऊ बटाटे मागायला घरी आली होती. (ती खालच्या मजल्यावर राहते), मी तिला संपलेत असे खोटच सांगितलं Lol

लॉकडाऊनच्या काळात नो दुनियादारी. एकतर पातळ भाजीचे सगळे ऑप्शन्स संपलेत. आत्ता घरात फक्त गवार, भेंडी, बटाटा, कांदे एवढ्याच भाज्या शिल्लक आहेत. Sad

घरात मुग ,मटकी, चवळी सारखी कडधान्य असुन ती भिजत न घालता आईबटाटाच करते. ह्याच गोष्टीच दुःख आहे..

मी बटाटे खाणं सोडलेत कधीचे , नावडते म्हणून नाही पण बोजड वाटते खाल्ले की.
पण लॉकडॉउन मध्ये भाज्या नाहीच मिळाल्या आणि काहीच ऑप्शन नसेल तर बटाटा बरा म्हणून दिड किलो आणून ठेवले. आणि कोण जातय अश्या काळात भाज्या आणायला म्हणून बटाटा बरे , तर त्यातले अर्धा किलो एका महिन्यात संपले रस्सा भाजी-पुरी आणि वडे करून.

सुके बोंबील असते तर मजा आली असती...
जवळा असता तर सुद्धा मजा.

ह्या व्यातीरिक्त बटाट्याची आवड विशेष नाहीये आता. पुर्वी ( बालवयात) खायची चिप्स, वडे, काचर्‍या, उपवासाची कचोरी, पराठे, चवळी-बटाटा, कोबी-बटाटा, फ्लॉवर-बटाटा...

पंजाबी नसल्याने, पालेभाज्या वाचल्या; त्या तश्याच बनवतो पण आई बनवायची सुद्धा छान, त्यामुळे टोटल नो-नो आहे मेथी, पालक , शेपू, राजगिरा मध्ये बटाटे... अजिबात आवडत नाहीत. ह्याच्यात कशाला ते पंजाबी घालतात बटाटे देव जाणे.
लाल मिरची-लसणाची फोडणी काफी है.

मी बटाटाप्रेमी नाही ..
मी मांसाहारप्रेमी आहे.
बटाटा कोणी चिकन मटणात बिर्याणीत टाकला तर मला एक हातोडा घेत त्याचे डोके उकरावेसे वाटते.
भुर्जीत बटाटा हा देखील एक अशक्य वैतागवाणा प्रकार आहे.
त्यातल्या त्यात बटाटा कश्यासोबत बरा लागतो तर सुके बोंबीलासोबत.. बोंबील उग्र चवीचे असल्याने बटाटा त्याच्या चवीचे फार वाकडे करू शकत नाही.. तरीही अर्थात बोंबीलबटाटापेक्षा नुसते बोंबीलची चटणीच आवडते..

पण शाकाहारामध्ये मात्र मी भाज्याच खात नसल्याने प्रत्येक भाजीत बटाटा टाकायला लावतो आणि बटाटाच खातो.
जेवढे वांगे माझ्या डोक्यात जाते तेवढाच त्यातील बटाटा चांगला वाटतो..
त्यामुळे सांरांशच काढायचे झाल्यास
तसा बटाटा वाईट नसतो. नावडीच्या पदार्थात आधार वाटतो आणि आवडीच्या पदार्थात क़्डचण !

वडापाव, मसाला डोसा, पुरीभाजी ... हे पदार्थ टोटली बटाट्यावर अवलंबून असल्याने आणि बहुतांश हॉटेल टपरयांचा धंदा या पदार्थांवर चालत असल्याने बटाट्याला एक मानाचे स्थानही आहे.

ज्या घरांमध्ये लहान मुले भाज्या खात नाही आणि दुर्दैवाने मांसाहारही करत वा आवडत नाही तिथे बटाटाच त्यांना जगवतो. केवळ बटाट्याकडे बघूनच ते म्हणू शकतात की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जेवणात रोज बटाटा पाहिजे Happy

या लॉकडाऊन काळातही मी घरात सर्वात पहिले काही भरले असेल तर ते महिन्याभराचा बटाटा.. कारण बटाट्याचे आमच्या स्वयंपाकघरातील स्थान गौण नाही तर गोणीभर आहे Happy

हो खरंय.. विकेण्ड म्हणून जरा जागा आहे. रविवारी सकाळी लेट उठल्याने रात्री झोप येत नाही. उद्या सकाळी नऊच्या ऑफिससाठी ऊठलो की मग उद्या रात्रीपासून झोप लवकर येईल..

हल्ली मी व्हॉटसप मायबोलीपेक्षा बरेच जास्त वापरतो..
चर्चा वादविवाद ही माझी एक गरज आहे. ती जिथे जितकी पुरी होईल तितका मी रमतो.

लॉकडाऊनच्या काळात घरात एकुण 5किलो बटाटे आणले गेले. आधीचे अर्धा एक किलो असतील. तेवढे बटाटे संपलेत घरातले! ( मी, लॉकडाऊन आणि बटाटा! असा धागा काढा रे कुणीतरी..:बटाटा खा खा के त्रासलेली बाहुली:)

नक्की जमेल . ओम रुनम्या ऋणमयां नमः हा मंत्र जपा .
श्री कटप्पा प्रसन्न ! असे लिहायला माझी हरकत नाही .

हा हा हा
सेन्स ऑफ ह्युमर खुपच वाईट आहे तुमचा! Wink

एवढ्यात काय झोपता.. बटाटा नाही आवडत तर केळा वेफर खायला या...
ईंडियन पब्लिक झोपली असेल तर अमेरीकन पब्लिक या..
बाकी केळा वेफर कधीही बटाटा वेफरला सरस. मध्यमवर्गीय बटाटा वेफर्स जास्त खातात. उच्च मध्यमवर्गीय केळा वेफर जास्त खातात.. एक निरीक्षण

बोलले! ऋनमेष बोलले!
यामागे काही लॉजिक? असेलच तर तेही सांगा ऋनमेष. लोक ऐकतील तुम्हाला.. (सहन करतील)

Pages