बटाटा हेटर्स क्लब

Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35

बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असहमत. बटाटा हि एक अत्यंत उपयुक्त भाजी आहे. घरात असली तर अवेळी पाहुण्याला पटकन करून वाढता येते. ही भाजी नेहमीच चविष्ट होते. मी हल्ली फारसा बटाटा खात नाही. पण जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीही भाजी इतकी लोकप्रिय नाहीये. बटाटा हा कसाही केव्हाही खाता येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक लोक केवळ बटाटा खाउन दिवस काढतात.

बायको आल्यापास्नं कसल्या भाजीला धड चवच नाही..! Sad पण सांगायचीही सोय नाही
>>> लोल... सांगायची सोय नाही ही खंत डेंजार आहे.

पण सांगायचीही सोय नाही>>>
तुम्हालाच करायला सांगेल म्हणून घाबरताय ना?
अहो अजिबात घाबरायचं नाही!!!!..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
करायची सुरवात, जमतं हळुहळु सगळं.

करायची सुरवात.जमतं हळुहळु सगळं>>>नेमकी कशाची सुरूवात?स्वयंपाकाची का जेवायला मिळेल त्यात समाधान मानायची... Proud

हा धागा वाचता वाचता बटाट्याचा खूप राग आला आणि म्हणून रात्री 1 वाजता खूप रागाने बटाट्याच्या फ्राईज करून खाल्ल्या,तेव्हा कुठे राग शांत झाला,

इंटस्टेलर मध्ये पण डिकॅप्रिओ बटाट्याचं पीक घेतो ना?>> ते द मार्शन मध्ये आहे. एक माणूस मार्स वर अडकतो तो पिक्चर.

काल सुपरमार्केट मध्ये गेले जे नवीनच उघडले आहे. तर बाहेर जाताना अर्धा किलो बटाटे तयांनी गिफ्ट दिले. तेव्हा ह्या बाफ ची आठवण आली.

अमा मग बनवा तुमचा स्पेशल बटाटा युक्त पदार्थ नि फोटो ही डकवा इकडे की लोकांच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे.

मन्या ऽ,
<कमेंट संपादित करा बायकोपण माबोवर असेल तर तुमचं काय खरं नाही ब्वा! > अरे देवा! आता कमेन्ट संपादित करायची वेळही गेलीय.. Sad माझ्या माहितीत तरी ती नाहिये इथे.. जर असली तर मेलो..! Lol
बटाटा फेकून मारला की बराच लागतो.. टेंगुळ ही येऊ शकतो.. म्हणून मी hater's club मध्ये..!! Lol

मानव,
करायची सुरवात, जमतं हळुहळु सगळं.> Rofl मला चालेल हो, पण hoteling चा खर्च वाढेल त्याचे काय.. (बायकोकडून) Lol

माझा होणारा नवरा कट्टर बटाटा हेटर
आणि मी बटाट्या शिवाय कुठलीच भाजी परिपुर्ण होऊ शकत नाही या मताची Proud

रविवारी मी आलू पराठे आणि बटाट्याच्या काचऱ्या केल्या, त्या खाल्ल्या बिचाऱ्याने निमूटपणे

कटप्पा यांच्या मताशी सहमत.
सर्वांनी बटाट्याचा इतका द्वेष केला पाहिजे की जास्तीत जास्त बटाटे विकत घेऊन त्यांचे तुकडे तुकडे केले पाहिजे...
त्यांना उकळत्या तेलात तळले पाहिजे.
मावे मध्ये चांगलं भाजल पाहिजे.
त्यांच्या सर्वांगावर मीठ मसाले फासले पाहीजेत.
(आणि इतका आसुरी प्रकार करून आसुरी आनंद घेऊन त्यांचा चवीचवीने आस्वाद घ्यावा ही विनंती)
शेवटी बटाट्यानीच म्हटलं पाहिजे.
"HATE ME LIKE YOU LOVE ME, BABY"

बटाटा हेटर्स लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी बटाटे दिसू लागलेत. बटाटा वगळून खाद्यपदार्थांचे मेनू कार्ड लोक मागायलेत. कांदा लसूण आनंदी झाले बटाट्याला वाळीत टाकले म्हणून.

Lol

हा क्लब बटाटा विरोधी नसुन आता बटाटा लव्हर्सचा झालाय. Proud

बहुतेक बाहुबलीने कटप्पाला सारखी बटाट्याची भाजी खायला घातली असेल म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले असेल आणी मग हा क्लब उघडला असेल. Proud

माझ्या घरी नवरा सोडुन बाकी बटाटा प्रेमी / बटाटा अ‍ॅडजेस्टमेंट या गटात आहेत. नुसत्या बटाटाच्या काचर्‍या, उकडुन बटाटा + कांदा+ लसुण पेस्ट +कोथिंबीर+ कढीपत्ता अशी भाजी, बटाट्याचा कांदा टॉमेटो घालुन रस्सा भाजी, आलु पराठा, बटाटा वडा, खिचडी ( साबुदाण्याची नाही ) असा बटाटा सप्ताह असतो.

खास कटप्पा यांच्यासाठी एक बटाटा रेसेपी

साहित्य :- चार-पाच बटाटे, लाल तिखट, मीठ, साजूक तुप व कोथिंबीर

कृती :- बटाटे धुवावेत, साले काढावीत व प्रत्येक बटाट्याच्या फिंगर् टाईप लांब तुकडे कापावेत. कढईत ४-५ टे स्पून साजूक तुप घालावे. तुप लवकर तापते मग त्यात हिंग, जीरे ( मोहरी घालु नका ) व हळद घातल्यावर बटाट्याचे लांबट काप घालावेत. ते कढईवर झाकण ठेऊन शिजवावेत. थोडे शिजत आले की मनसोक्त लाल तिखट घालावे परत झाकण ठेऊन शिजवावे, मग मीठ घालावे. आधी मीठ घातले की बटाटे शिजत नाहीत, दडस होतात. मग पूर्ण शिजले की कोथिंबीरीने सजवावे. गरम फुलक्यासहीत हाणावे. ( ही राजस्थानी पाकृ आहे )

साजूक तुपाची फोडणी असल्याने कितीही तिखट खाल्ले तरी काही अपाय होत नाही. पण तूप वापरतांना कंजुसी करु नये.

कटप्पा, उकडलेल्या बटाट्याची कांदा + तिखट+ कढीपत्ता + कोथिंबीर अशी तवा फ्राय भाजी ( तव्यावर भाजी करायची, कढईत नाही ) करुन खावा, बटाट्याच्या अलगद प्रेमात पडाल. Proud

कटप्पा, उकडलेल्या बटाट्याची कांदा + तिखट+ कढीपत्ता + कोथिंबीर अशी तवा फ्राय भाजी ( तव्यावर भाजी करायची, कढईत नाही ) करुन खावा, बटाट्याच्या अलगद प्रेमात पडाल.
>> दर शनिवारी हीच भाजी ( आमच्याकडे हीला बटाट्याची चटणी म्हणतात) दुपारी असते. कलर लेमन यलो, लाल तिखट वापरले तरी रंग खूप छान येतो. फक्त बटाटे गोड निघाले तर सपक लागते. अनेक वर्षे रुटीन आहे शनिवारी ही भाजी करण्याचे.

रिक्शा. फोटोवर टिचकी मारा.

Pages