बटाटा हेटर्स क्लब

Submitted by कटप्पा on 6 April, 2019 - 14:35

बटाट्या सारखी फालतू भाजी दुसरी नसावी. परवा मला एक शाळेतली मैत्रीण भेटली,ती म्हणे भाज्याच खात नाही, फक्त बटाट्याची भाजी खाते.
आता यात चूक तिच्या आई बापाची पण असणार कारण लहानपणापासूनच म्हणे ती बटाटा खाते.
मला बटाटा ओव्हर रेटेड भाजी वाटते, किंबहुना मी बटाटा हेटर् आहे. हे ऐकून ती हसू लागली, म्हणाली बटाटा न आवडणारा तू एकमेव असशील.
मला नाही वाटत मी एकटा बटाटा हेटर असेन, आहे का कोणी ज्याला बटाटा आवडत नाही? बोला...

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण तुमच्यासारखीच एक बटाटा हेटर आहे Happy कुठेही-कधीही माझ्या पानात बटाटयाची भाजी दिसली कि कसतरीच होत Sad
हया सिच्युएशनला एकच अपवाद तो म्हणजे वडापाव! Happy Happy

मलादेखील बटाटा फारसा आवडत नाही पण हेटर आहे असेदेखील म्हणता येणार नाही. किंबहुना बरेच असे पदार्थ आहेत कि फॅननी त्यांचं ओकारी येईल कौतुक थांबवलं तर मी त्या पदार्थांबद्दल न्यूट्रल होऊ शकेन. उदा पाणीपुरी, आंबे Wink

मी तुमच्या एवढा बटाटा हेटर नाही.
मी एकटा बटाटा नाही खाऊ शकत त्याच्यासोबत कुणीतरी असलं की खातो
मला बटाटा 'पराठा' मध्ये आणि 'वडापाव'मध्येही खायला आवडतो.

मी>>अनुमोदन..एकतर पाणीपुरी हा प्रकार मला किळसवाणा वाटतो,एक मुलगी असुनही हि अशी का?अश्याप्रकारचे ?चिन्ह नेहमीच माझ्यासोबत असणार्या बहीणीच्या-मैत्रिणींच्या चेहरयावर दिसतो..

ताई पाणीपुरी हा पदार्थ तुम्हाला किळसवाणा का वाटतो कारण सांगाल का??>>> तांब्यात 1 नंबर केलेली व्हिडिओ पाहिली नाहीत काय, तसेच त्या पुऱ्या ज्या पध्दतीने बनवल्या जातात ते पाहिलं नाहीत वाटतं. बनियान काढून नागव्या पायाने ते पीठ मळत असतात आणि येणारा घाम त्याच पिठात टाकून मळत असतात.

मला प्रचंड आवडतो बटाटा. नुसते बटर लावून निखाऱ्यावर भाजला तरी मिरपुड टाकून खायला भारी आवडतो. ऐनवेळी काही करायचे असेल तर नुसता बटाटा किंवा अंडे हाताशी असेल तर उत्तम डिश बनुन जाते. बटाटा किंवा पनीर सारख्या गोष्टी आपण त्यांची चव कशी फुलवतो त्यावर अवलंबुन असतात.
ज्यांना बटाटा नाही आवडत त्यांच्या नावडीचाही आदर आहेच.

मीही आहे बटाटा hater क्लब मध्ये..
समजा मी उपाशी मरत असेल आणि फक्त बटाटा असेल तरच खाते, अशी परिस्थिती१-२ वेळा येऊन गेलीये, म्हणून हे असं म्हणू शकते.
अपवाद, बटाटा चिप्स चा, ते आवडत्या फ्लेवर चे असतील तर खाते

बटाटा एक celebrity आहे
त्याच्या येण्यासाठी पायघड्या अंथरतात
तो style मधे आला की चाहत्यांची झुंबड उडते
त्याचे pictures अमिताभ, शाहरूकसारखे super hit आहेत
कित्येक रताळ्यांच्या घरात त्याचे फोटो लावलेले आहेत
त्याची प्रसिद्धी बघून haters पण वाढले

असेच काहीसे वाटले हा धागा बघून Happy

असो, मला बटाटा आवडतोही, आणि नावडतोही.
कोण बनवतेय त्यावर अवलंबून असते Lol
बायकोने करपलेला बटाटा बनवला तरी छान, नाहीतर जगात सोन्याचा बटाटा बनला असेल तरी वाईट Proud काय करायचे, असेच जगायला लागते...!

स्वतःची वेगळी विशेष चव असुनही बटाटयाचा सासुरवास भोगणार्या बिचार्या भाज्या!
मेथी-बटाटा,वांग-बटाटा,मटार-बटाटा,यावर कहर तो म्हणजे मधुराज रेसिपी वाल्या मधुराने शेपुच्या भाजीतही बटाटा घातला..

बटाटा एक celebrity आहे
त्याच्या येण्यासाठी पायघड्या अंथरतात
तो style मधे आला की चाहत्यांची झुंबड उडते
त्याचे pictures अमिताभ, शाहरूकसारखे super hit आहेत
कित्येक रताळ्यांच्या घरात त्याचे फोटो लावलेले आहेत
त्याची प्रसिद्धी बघून haters पण वाढले

असेच काहीसे वाटले हा धागा बघून Happy

असो, मला बटाटा आवडतोही, आणि नावडतोही.
कोण बनवतेय त्यावर अवलंबून असते Lol
बायकोने करपलेला बटाटा बनवला तरी छान, नाहीतर जगात सोन्याचा बटाटा बनला असेल तरी वाईट Proud काय करायचे, असेच जगायला लागते...!

Submitted by रत्न on 7 April, 2019 - 12:52
>>>>>>>>>
हा प्रतिसाद कुणाला रुन्मेष सारखा वाटतोय का?

मला बटाटा साधारणपणे आवडतो. पहाडी बटाटा, त्याची रस्सा भाजी आवडते.

पण एकेकाळी उत्तरप्रदेशात पिलीभीत मध्ये महिनाभर होतो. तिथे दुपारी मला फॅक्टरी आसपास हॉटेल मध्ये जेवावे लागे. १०-१५ हॉटेल्स असतील पण सगळी कडे जेवायला एकच - बटाट्याची भाजी आणि पुरी/पोळी, पातळ वरण. तेव्हा बटाटा खाऊन खाऊन इतका विट आला होता, शेवटले काही दिवस फळं खायचो दुपारच्या जेवणाला. आणि परत आल्यावर काही वर्षे बटाटे बंद केले होते.

होस्टेलला राहणारे, खानावळचा डब्बा खाणारे रोज बटाटा आणि उसळीच खात असतात Lol

एनिवे हे बघा
आता परवाच मला काय मिळालं

@एमी - अशक्य भारी दिसतंय.
@प्राचीन - धन्यवाद!!! बाकीच्या सदस्यांच्या मताच्या प्रतीक्षेत!

मी आलटून पालटून बटाटा लव्हर व हेटर आहे. बटाट्याची सुकी भाजी मला आवडते. वांगी बटाटा कॉंबीनेशन अजिबात आवडत नाही.

बटाटा आणि नवर्यासारखा??अजिबात नाही.
बायकोसारखा म्हणा हव तर. Happy कारण कोणताही 'पुरुष' पुर्णतः अनोळखी घरात कायमचं जाऊन तिथल्या लोकांना 'स्त्री'प्रमाणे आपलसं करु शकत नाही.

(तरी मला बटाटा आवडत नाही) Happy Wink

बटाटा हा परदेशी आहे.. मुळात दक्षिण अमेरिकेतुन आला, आणि नावंही पोर्तूगीज आहे.. आता देवाच्या नैवेद्यातही खपून जातो..

@उ.बो. गुणधर्मानुसार बटाटा बायकोसारखा आहे असं म्हणायचं आहे मला! Happy Happy
@ च्रप्स काही पुरुषांना बटाटा (बायको) आवडत नसुन आयुष्यभर खावा लागतो यात मी काहीच करु शकत नाही. Wink Happy

Pages