एक लेश विठ्ठलाचा

Submitted by पुरंदरे शशांक on 22 March, 2019 - 22:58

एक लेश विठ्ठलाचा

गाथा अभ्यासिता जरी
हाता न ये ती विरक्ती
तरी समजून घ्यावे
प्रेम प्रपंचाचे प्रति

अभंगाने हेलावून
नाही जात भारावून
तरी चरणी तुक्याच्या
दिले नाहीच झोकून

एक लेश विठ्ठलाचा
जरी नये ह्रदयात
तरी व्यर्थ सारे होई
कथा किर्तनी रमत

तुका आकाशाएवढा
नको आपुली प्रशस्ती
पाया लागोनीया मागू
भाव दृढ तुक्या (हरी) प्रती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक लेश विठ्ठलाचा
जरी नये ह्रदयात

वावा सुंदर ओळी !
पण आपल्या हृदयात तुक्याचा लेश मात्र जरूर आहे .
तो आणि वाढू देत