पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शुद्ध लेखनकारांशी वाद विवाद करून विशिष्ट लोकांची संख्या एक ने वाढण्यापलिकडे काही हाती लागणार नाही असे दिसतेय.

विश्वनाथ प्रतापसिंग ह्यांनी हा कायदा 1990 ल लागू केला आणि तो अजुन सुधा लागू आहे .
हे माझ्या लक्षात नाही आले

बरं चला. सर्जिकल स्ट्राईक मुळे भाजपला गेल्या ७० वर्षात मिळाले नाही असे यश मिळणार आहे. बहुधा हिंदुस्थानचे ६०० कोटी नागरीक मत देणार आहेत.
opinion poll.jpg

A plus B bracket square किया तो 2AB ज्यादा आता है

गणितज्ञ नरेंद्रभट्ट

हा व्हिडीओ आहे का कुणाकडे ?

गल्ली चुकली महाराज... हे तिकडे निबंध धड्यावर विचारा.... इकडे आम्ही भारत पाकिस्तान वर चर्चा करतोय.

दिग्वीजय सिंगनी ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसामाजी केलेला आठवतो आहे?
आता राहुल गांधीनी मसूद अझरला अपार आदराने अझरजी असे संबोधलेले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-refers-jem-chief-...

काँग्रेस की बात, आतंकीयोंका राग

ज्या आदराने भाजपाने त्याला मखरात सजवून कंदाहारला नेऊन सोडले त्याबद्दल तो उपमा देत होता. मोदी अचानक पाकिस्तानात जाऊन नवाज शरिफला विना कामाचे भेटण्याचे कारण मात्र अजून कळलेले नाही. तसेच अजित डोवाल पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारासोबत सिंगापूरमध्ये गुप्तवार्ता बैठक का करत होते ह्याचेही उत्तर अजून मिळालेले नाही. असल मामलेसे ध्यान मत हटा, सावन की घटा....

भारतीय मीडिया ची भूमिका काय होती ह्या विषयावर त्याची चर्चा इथे झाली पण पाकिस्तानी मीडिया नी काय भूमिका घेतली होती तो विषय चर्चेत आलाच नाही .
भारतीय मीडिया मूर्ख आहे इथपर्यंत मत व्यक्त झाली पण पाकिस्तानी मीडिया नी तरी समतोल भूमिका घेतली का हा प्रश्न. आहे

crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे

ज्या आदराने भाजपाने त्याला मखरात सजवून कंदाहारला नेऊन सोडले त्याबद्दल तो उपमा देत होता.
>>>>>

डोके ठिकाणावर आहे का तुमचे?

हा निर्णय सर्वपक्षीय होता आणि यात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सामील होते. विमाना मध्ये १७८ प्रवासी आणि 11 crew members ना ओलीस ठेवले होते त्यांना वाचवण्या साठी हा निर्णय घेतला होता. अतिरेक्यांनी प्रवाशांना ठार मारण्यास सुरवात केली होती. हनिमूनला गेलेल्या रुपेन कट्यालचा त्याच्या बायकोच्या डोळ्यांसमोर खून करण्यात आला होता. जर सर्व प्रवाशांना ठार मारण्यात आले असते तर काँग्रेसनेच तमाशा केला असता का सोडले नाही म्हणून. काँग्रेसचे नेते मोर्चे काढत होते तेव्हा. तुम्ही सोईस्करपणे विसरला असाल, बाकीचे विसरलेले नाहीत.

पसरवा आणखी अफवा... पण आम्ही देशाचे जागरुक नागरिक तुमच्या फेक प्रोपगंडाला भोकं पाडतच राहू.

एकही जीव न जाता भारताच्या भूमीवरच कमांडो कारवाई करण्याचा पूर्ण मौका, वेळ होता, माणसेही तयार होती. पण त्यासाठी लागणारी जिगरबाज वृत्ती वाजपेयीकडे अजिबात नव्हती. त्यांनी असे काही करण्याचा कोणताही निर्णय दिला नाही. केवळ वेळ घालवला. त्यांना भारताच्या आत प्लानिंग करुन हिंदू-मुस्लिम दंगे घडवून आणण्याएवढी समज. अचानक उद्भवणारे संकटांवर स्ट्रॅटेजिक निर्णय कसे घ्यावे हे ह्याचे चातुर्य कुठे? म्हणे मुत्सद्दी नेता. तुमच्या लाडक्या डोवाल द बाँड ने स्वतःच कबूल केलंय की भारतीय सरकारचे अपयश आहे. निगोशिएशन फेल गेलेत कारण निर्णय घेण्याची धडाडी आपल्या लाडक्या भाजप नेत्यांत नव्हती.

तरी आम्हाला भारतीय सरकारवर विश्वास होता, आहे.. पण भारतीय जनता पक्षावर अजिबात नाही.

म्हणजे सत्तेत तुम्ही असता, सगळी पावर तुमच्या हाती, पण तुम्हाला देशहिताचे निर्णय घ्यायला जमत नाही. त्याचे खापर तुम्ही विरोधी पक्ष तेही फक्त काँग्रेसवर फोडा. देशहितासाठी सत्ता वापरता येत नाही तर काय फक्त मलिदा खायला बसता का खुर्च्यांवर? म्हणे काँग्रेसने तमाशा केला असता!

केव्हाही बघावे तर ह्यांचे हेच पालुपद. आम्ही हे केले नाही केले असते तर अमुक तमुक ने तमशा केला असता. नाचता येईना अंगण वाकडे. जमत नाही तर सत्तेत बसूच नये.

चांगले झाले की आम्ही केले चे ढोल वाजवायचे, आपल्याच कर्माने वाईट झाले की काँग्रेस होती सर्वपक्षीय बैठकीत असे म्हणून स्वतःची वाचवायची. ही नाटकं आता उघडी पडायला लागलीत साहीब. काही नवीन घेऊन या आता. उरी हल्ला, पठाणकोट, गुरदासपूर पुलवामा हल्ला का झाला त्याचे अजूनही काही डिटेल्स कळवले नाहीत. आपली माणसे हकनाक मेलीच कशी हा प्रश्न चे उत्तर कोण देणार? कोणाची जबाबदारी आहे ती? काँग्रेसची की जेएनयुची की कन्हैयाकुमार ची की इथे बसून टायपत बसलेल्या हेला नामक माबोआयडीची?

आपण सत्तेत असतांना झालेल्या हल्ल्यांना कायम दुसर्‍यांच्या अंगावर ढकलुन द्यायचे एवढेच जमते.

दुसर्‍याने केलेल्या लंकादहनावर तुम्ही इथे शेपूट नाचवून श्रेय घेण्यात काही शौर्य नसते. कधीतरी जबाबदारी घ्यायलाही शिका.

सर्जिकल स्ट्राइकचे जनतेत मार्केटींग करणे म्हणजे केवळ फसवणूक आहे देशाची, वापर केला जातो सैन्याचाही. 'आम्ही बघा बदला घेतला' हे दाखवायला केलंय. उरी झाल्यावरही पुलवामा झालेच ना? मग उरीनंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची जरब कोणाला बसली होती म्हणे? आणि आता हे भाजपचे लोचट भक्त विचारतात की २६-११नंतर का नाही केले हल्ले एवढे सैनिक मेले नसते. अरे तुम्हीच तर होते तेव्हच्या सरकारला मोठ्या आविर्भावात पाच पाच प्रश्न विचारणारे, मग मागच्या पाच वर्षात त्या पाच प्रश्नांवर तुम्ही काही मजबूत काम केले असते तर उरी पठाणकोट गुरदासपूर पुलवामा आणि छोटेमोठे हल्ले झाले नसते आपले सैनिक वाचले असते. पण काम्करायला अक्कल लागते, शाणपणाच्या वाफा तोंडातून सोडायला थोडीच लागते.

हा निर्णय सर्वपक्षीय होता आणि यात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सामील होते.>>
काहीही थापा टाकायला क्रिकेटचा बाफ वाटला की काय? काही विदा? मनमोहन सिंग २००४ च्या आधी माहीत होते का रे तुला? उचलायचे काही आणि टाकायचे कुठेही.
विमानात अडकलेला जावई होता ना कुणा बिजेपि वाल्याचा? अजून काय कारणं होती बरं?

इथे एनएफएल कांफरंस चँपियन्शिप गेम्स आणि सुपरबोल गेमच्या आधिच दोन्हि टिम्सचे चँपियन्शिप जिंकल्याचे टी-शर्ट्स ऑलरेडी छापुन तयार असतात. गेमचा निर्णय जो काहि लागेल त्यानुसार टी-शर्ट्स विक्रिला बाहेर काढले जातात... Proud

दिग्वीजय सिंगनी ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसामाजी केलेला आठवतो आहे?
आता राहुल गांधीनी मसूद अझरला अपार आदराने अझरजी असे संबोधलेले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-refers-jem-chief-...

काँग्रेस की बात, आतंकीयोंका राग

Submitted by रिव्हर्स स्वीप>>>> +१
आवरा या युवराजांना कोणीतरी...बाकी बीजेपी स्वबळावर निवडून येवो अथवा न येवो रागा बळावर येण्याचीच जास्त चिन्ह आहेत Wink

मनमोहन सिंग २००४ च्या आधी माहीत होते का रे तुला? उचलायचे काही आणि टाकायचे कुठेही.
>>>>>

बाळा, मनमोहन सिंगना मी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते ना तेव्हापासून व्यवस्थित ओळखतो. काँग्रेसी भाट त्यांचा अर्थतज्ञ म्हणून गवगवा करतात पण त्यांच्यामागे असलेल्या नरसिंह रावना तेवढे सोईस्करपणे विसरतात कारण त्यांनी सोनिया गांधीना कधी कवडीची किंमत दिली नाही समजलं?

कंदहार विमान अपहरणाच्या वेळची वर्तमानपत्रे कुठे मिळाली तर जरा शोधून पहा त्यावेळी काँग्रेसींचे काय तमाशे सुरु होते ते.

गुजरातच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या त्या पाच प्रश्नांवर विद्यमान पंतप्रधानांनी काय काम केले? त्याचं कधी बोलणार?

हा निर्णय सर्वपक्षीय होता आणि यात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सामील होते. >>> एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वपक्षीय नव्हता का ? कि असे निर्णय फक्त एकट्या भाजपने घेतलेले असतात ? कारण देशभर भाजपच्या पोस्टरवर सैनिकांची आणि व वैमानिकांची चित्रं लावली होती. त्याचप्रमाणे कंदाहार प्रकरणात पण देशभर अजहर मसूद सोबत भाजप नेत्यांची चित्रं लावायला हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही.

एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वपक्षीय नव्हता का ? कि असे निर्णय फक्त एकट्या भाजपने घेतलेले असतात ? कारण देशभर भाजपच्या पोस्टरवर सैनिकांची आणि व वैमानिकांची चित्रं लावली होती. त्याचप्रमाणे कंदाहार प्रकरणात पण देशभर अजहर मसूद सोबत भाजप नेत्यांची चित्रं लावायला हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही.
>>>>>

एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वपक्षीय होता असे काँग्रेस किंवा विरोधी पक्षाचा एकतरी नेता किंवा प्रवक्ता आजतागायत कुठे बोललेला आढळलेला आहे का? असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी. आणि तुमच्या मताप्रमाणे यदाकदाचित जर हा निर्णय सर्वपक्षीय असलाच, तर मग विरोधी पक्षनेते एअर स्ट्राईकचे पुरावे दाखवा म्हणून कशाला कोकलत आहेत? का ज्या निर्णयात आपण सहभागी होतो त्याबद्दलच शंका उत्पन्न करु नये एवढंही भान विरोधी पक्षांकडे नाही?

<विरोधी पक्षनेते एअर स्ट्राईकचे पुरावे दाखवा म्हणून कशाला कोकलत आहेत?>
जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांत विरोधी पक्षाने एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले का? किती खोटे बोलाल? घडा भरतोय.

दिग्वीजय सिंग, कपिल सिब्बल हे लोक कोणत्या पक्षात आहेत म्हणे? याच लोकांनी पुरावे मागितले आहेत.
का हे लोक आता नेतेही राहिलेले नाहीत?
तुमच्यासाठी लिंकसकट बातमी आहे. डोळे उघडून नीट वाचा.

After Digvijay Singh, Kapil Sibal demands proof of IAF strike on Jaish camp
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/after-digv...

तुम्हीच वाचा. प्रूफ ऑफ मिलिटंट लॉसेस , ३०० मेले का हेच म्हटलंय.
तसंही भाजपवाल्यांचं इंग्रजी अगदीच कच्च असतं हे सर्वोच्च न्यायालयातच दोनदा सिद्ध झालंय. पण खो टं बोलणं ही मात्र त्यांची STREANH आहे.

Pages